प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें       
 
कुष्ठ- पा श्चा त्य वि वे च न – या स्पर्शसंचारी रोगामध्यें त्वचा, श्लेष्मावरणत्वचा व मज्जातंतु यांच्या ठिकाणीं बारीक गांठींच्या रूपाची विकृति उत्पन्न होते. हॅन्सन यानें या रोगाच्या जंतूंचा शोध लाविला आहे. ते जंतू विकृत शरीराच्या भागांत सांपडतात. दिसण्यांत ते क्षयाच्या जंतूंप्रमाणे पण अधिक सरळ दिसतात. या जंतूंची ज्यांत वाढ केली आहे असें मिश्रण माकडांच्या शरीरांत टोंचून घातल्यानें थोडे दिवस टिकणारा त्वचेचा रोग उत्पन्न होतो. पण तसा इतर प्राण्यांनां होत नाहीं. मानवी रोग्यांमध्यें रोगजंतू रक्त, त्वचा, श्लेष्मावरण, मज्जातंतू, अन्नरसग्रंथि, कंठ, यकृत, प्लीहा, वृषण, मूत्रपिंड व क्वचित् वेळीं फुफ्फुसें इतक्या ठिकाणीं सांपडतात. परंत अस्थी, स्नायु व सांधे यांठिकाणीं मात्र सांपडत नाहींत. एक प्रकारचा पूयजंतूंचा शोध- जे या रोगांत होणार्‍या पुटकुळ्यांत आढळतात. कांहीं मोठ्या जंतुशास्त्रज्ञांकडून लावला गेला आहे व त्यांच्या मतें या मूळजंतूचें हॅन्सन यानें शोधून काढलेला जंतू हें रूपांतर असावें असा तर्क करणें गैरवाजवी होत नाहीं.

रो गा चीं का र णें:- हा रोग आपल्या देशांत बराच पहाण्यांत येत असून शिवाय ब्रह्मदेश, सयाम, चीन, जपान, आफ्रिकेचा ईशान्य भाग, केप ऑफ गुड होप, वेस्ट इंडीज बेटें, मध्य व दक्षिण अमेरिका, मेक्सिक व पासिफिक महासागरांतील कांहीं बेटें इतक्या ठिकाणीं आढळतो. यूरोपमध्यें नांर्वे देशाखेरीज दुसर्‍या कोणत्याहि देशांत हा रोग आढळत नाहीं. मात्र इंग्लंडांतील जे लोक आशिया अगर वर सांगितलेल्या ठिकाणी जाऊन आलेले असतील व त्यांस स्पर्शसांनिध्य दोषाचें कारण होऊन हा रोग होत असल्याचीं उदाहरणें क्वचित् घडतात. परंतु हा रोग अमुक देशांत वृद्धि पावतो अगर अमुक प्रकारची हवा त्याच्या वृद्धीस अनुकूल व दुसर्‍या प्रकारची प्रतिकूल असा कांहीं नियम या रोगासंबंधानें बांधतां येत नाहीं. परंतु एवढे खचित कीं हा रोग तीस उमरीच्या अगोदर होतो. परंतु अगदीं बालवयांत होत नाहीं; व त्यांतल्या त्यांत स्त्रियांपेक्षां पुरुषांनां अधिक प्रमाणांत होतो. या रोगांत आनुवंशिक रोगप्रवृत्ति फारशी दिसून येत नाहीं; व उपजतच मुलास हा रोग असूं शकत नाहीं. ज्या ज्या देशांत हा रोग प्रचलित आहे तेथे सर्व लोकांनां यांची स्पर्शसंचारी प्रवृत्ति ठाऊक झाल्यामुळें तेथें रोग्यास पृथक् ठेवण्याची थोडी फार चाल आपोआप रूढ झालेली असते. कारण हा रोग स्पर्शसंचारी आहे असें जनतेस कित्येक शतकांच्या अनुभवावरून पूर्ण परिचित झालेलें आहे. आतां सावधगिरी बाळगल्यानें परिचारक मंडळी या रोगाच्या आतुरालयांत कित्येक वर्ष कांहीं एक विकृति न होता राहिल्याचीं उदाहरणें बरींच असलीं तरी एखादे वेळीं रोग्याच्या स्पर्शानेंच केवळ रोग झाला असें मानता येण्यासारखीं उदाहरणेंहि कित्येक घड़ून येतात व त्याचप्रमाणे या रोगाचें बीज एखाद्या माणसामध्यें प्रयोगाखातर टोंचून घातलें तर हा रोग होतो असा अनुभव आहे. ज्या नवीन शोध लागलेल्या देशांत पूर्वी मानवी वस्ती नसून तेथें नवीन वसाहत झाली आहे अशा ठिकाणीं जर कांहीं महारोगी नेऊन सोडले तर क्रमाक्रमानें अधिक महारोगी त्या देशांत आढळूं लागतात हें मारिशियस व क्यालिडोनिया या दोन वसाहतींच्या उदाहरणावरून चांगलेंच सिद्ध होतें.

या जंतूंचा प्रवेश शरीरांत इंद्रियद्वारा होत असावा याविषयीं पुढील एक किंवा अनेक स्थलें संभवनीय दिसतात तीं अशीं :- नाक, घसा इत्यादि श्वसनमार्ग, तोंड, मुख, गलग्रंथि, त्वचेंतील जखमा व कदाचित जननेंद्रियमार्ग. अलीकडे ढेंकूण, डांस असले कीटक देखील या रोगप्रसारास मदत करीत असावेत असा सयुक्तिक व शक्य कोटींतील तर्क विचारार्ह समजण्यांत येतो. कारण या प्राण्यांच्या शरीरांत असले कांहीं जंतू सांपडतात. परंतु हे जंतू माती, धुरळा, हवा, पाणी व अन्न या पदार्थांत मिश्र झाल्याचें कधींहि आढळून आलेलें नाहीं.

रो गा चीं ल क्ष णें:- थोडा ताप येऊन अगर बरें वाटेनासें होऊन या रोगास आरंभ होतो. त्वचा बिघडण्यास प्रारंभ झाला आहे हें सूचित करणारें बाह्य लक्षण जे लालसर किंवा लाल पिंगट वर्णाचे डाग ते प्रथम हातावर किंवा छातीवर अगर पाठीवर दिसूं लागतात. त्यांचा आकार वर्तुळ किंवा कधीं अनियमित आकृतीप्रमाणें असून त्याचा व्यास अर्ध्यापासून तीनचार इंचपर्यंत असतो व ते दिसण्यांत जरा फुगीर दिसतात. कित्येक वेळी त्यांतील मधला भाग बरा होऊन कंकणाकृति डाग तेवढे मागाहून शरीरावर रहातात. ताप बरा झाल्यावर हे कंकणाकृति डागहि कदाचित पुष्कळ फिके तरी होतात अगर त्यांच अनेक अवशेष असे काळे किंवा कधी पांढरे डाग मागें रहातात. याप्रमाणें पुन:पुन: ताप, नंतर असे डाग अंगावर उठणें व ते मावळून त्याचे अवशेष मागें रहाणें हा क्रम कांहीं कालपर्यंत चालूं रहातो. महारोगांतील विशेष लक्षण हें कीं, हे डाग दिसूं लागण्याच्या वेळीं किंवा कधीं मागाहून त्वचेमध्ये वाटाण्यायेवढी अगर त्याहून कधीं मोठ्या आकाराची एखाद-दुसरी गांठ किंवा अनेक गांठी उत्पन्न होऊन त्वचेखाली त्या उमटलेल्या दिसतात; व बरेच दिवस राहून त्या पुढें नाहींशा होतात; पण त्या ठिकाणीं डाग रहातात किंवा त्वचा फुटून तिचे थोडा व पातळ पू येत असलेले लहान लहान व्रण बनतात. हे उंचवट व या गांठी (व्रण) चेहरा आणि हाताचे पंजे व पावलाचे पृष्ठभाग व अन्य ठिकाणीं दिसून येतात. त्यामुळें भिवया, नाक, गाल व कानांच्या पाठीं जाड व व्रणित होऊन चेहरा भेसूर दिसतो. या विकृत चेहर्‍याचें सिंहाच्या चेहर्‍याशीं थोडें साम्य असल्यामुळें रोगाच्या या अवस्थेस “केसरीमुखावस्था” असें नांव दिलें आहे. पापण्याहि जाड होऊन त्यांवर व त्यांत क्षतें पडून डोळ्याच्या पापुदर्‍यासहि इजा होण्याचा सुमार येतो. परंतु नेत्रांतील वीक्षणमज्जातंतु, दृढमज्जास्थान, डोळ्यांतील सूर्यकांत कांच, व कांचमय रसधातु यांनां मात्र बिलकुल धक्का लागत नाहीं. तोंड, हिरड्या, टाळूं व नाक इत्यादि श्लेष्मावरणयुक्त जागीं देखील वरीलप्रमाणें पुटकुळ्या येतात. म्हणून आवाजहि घोगरा, खरबरीत पिंजरा येतो. यापासून पडणारीं क्षतें स्नायू, अस्थि, वगैरे स्यलें आंत खोल ठिकाणापर्यंत पोखरीत जाऊ त्यामुळें सांध्यावर जे स्नायूरज्जू असतील ते झिजून सांधे उकलतात. या महारोगाच्या प्रकारामध्यें पुटकुळ्या येणें हें प्रधान अंग असल्यामुळें त्यास गंडप्रधान भेद असें म्हणतात. दुसरा स्पर्शसंज्ञाहीन नांवाचा या रोगाचा एक प्रकार आहे. या भेदामध्ये मुख्यतः मज्जातंतूंच्या स्पर्शज्ञान, पोषण वगैरे शक्तींचा र्‍हास होऊन शिवाय यांत वरील भेदाप्रमाणें पुटकुळ्या येऊन क्षतें पडणें ही शरीर पोखरण्याची क्रिया सुरू असतेच. आरंभावस्थेमध्यें हात, पाय, पाठ, छाती व पोट वगैरे ठिकाणीं निरनिराळ्या जागीं झिणझिण्या येणें, आग होणें हीं लक्षणें प्रथम होऊं लागतात. पण त्यांतल्या त्यांत कोंपरापासून खालीं व गुडघ्यापासून खालीं पावलापर्यंत हीं लक्षणें विशेष जास्त होतात. नंतर त्याच भागांमध्यें जडत्व, बधिरत्व, वेदना, शीतोष्णस्पर्शादि ज्ञानशून्यता हीं मुख्य लक्षण स्पष्टपणें निरनिराळ्या जागीं आढळून येतात. व त्या जागीं आगीमुळें दुःख होतें. अशा स्पर्शसंज्ञाहीन जागेवर वरील भेदामुळें अगर या भेदामुळें पांढरे किंवा कधीं श्यामवर्णाचे डाग पडलेले दिसत असतात; व त्यावर क्रेश असतील तर ते निस्तेज, वर्णहीन व बारीक असून तेथील त्वचा मऊ, तुकतुकीत व अंमळ फुगीर अशी दिसते. कांहीं कालानें रोग्याचे हात अगर पाय तपासून पाहिले असतां तेथील मज्जातंतू जाड झालेले वैद्याच्या हातास स्पष्ट लागतात. त्या भागांतील इतर सर्व स्नायू व विशेषतः पावलाचे व पंजाचे स्नायू अगदी क्षीण व रोडावत व रुक्ष होत असलेले दिसून येतात व त्यामुळें हिंस्त्र पक्ष्यांच्या पंजांप्रमाणें बोटें दिसतात अगर मनगटामध्यें जडत्व अगर लुलेपणा येऊन तीच गति पायांच्या घोट्यांचीहि पण होते. वरील भेदामध्यें हाडें व स्नायू पोंखरणारी क्षतें पडतात तशीच क्षतें हातांच्या व पायांच्या बोटामधील बारीक बारीक सांध्यावर पडून ते सांधे उकलून नाश पावल्यामुळें अगोदर हातापायांची बोटें व नंतर मनगटें व बोटें यांतील बारकीं हाडें झडून जाऊन गळतात. नखांच्या जवळील बोटांचे शेवटले भागं मात्र कधीं कधीं मोठ्या चमत्कारानें रहातात असें म्हणतात व उरलेल्या हातापायांनां त्यांच्या व्रणाची जखम भरून येऊन चिकटून रहातात. फार विकोपास गेलेल्या रोग्याच्या रक्तांतील नानाप्रकारच्या लाल रक्तपेशींची संख्या फारच कमी होऊन रोगी पांढरा, पिवळा, अति निस्तेज असा दिसतो.

येणेंप्रमाणे कधीं रोग कमी तर कधीं जास्ती अंशीं लक्षणें होतात. परंतु रोगी खरोखर बरा होण्याची बिलकुल आशा नसते. त्यामुळें कालावधीनें रोग्याकडे नुसते पाहिलें तरी शिसारी येईल अशी त्याची शोचनीय स्थिति बनते. यानंतर तो फार दिव जगत नाहीं; कारण त्यानंतर त्याची भूक मंद होऊन आहारादि जीवनक्रियेंत व्यत्यय येऊन रोगारंभापासून पांच, दहा, पंधरा अगर अधिक वर्षांनंतर क्षय, मूत्रपिंडदाह, आमांश यांनीं व क्षतांतील पुवामुळें अन्य इंद्रियांस पू होऊन अगर तीं इंद्रिये सडून किंवा दुसर्‍या एखाद्या फुफ्फुसदाहासारख्या आगंतुक दुखण्याचें निमित्त होऊन अगर महारोगामुळेंच कंठामध्यें क्षतें पडून श्वसनमार्ग त्यायोगें बंद होऊन रोग्यास मृत्यु येतो.

रो ग वि कृ ती चें स्व रू प:- या रोगांत पुटकुळ्या येतात त्या त्वचेखालीं उत्पन् होऊन त्यांत निघालेले पापुद्रे खालील शरीराच्या स्नायू वगैरे भागांत घुसतात. यामध्येंच महारोगाच्या रक्तांतील पांढर्‍या पेशीपेक्षां तिप्पट मोठे पेशी असून त्यांतच कांहीं रिक्तस्थानें व पुष्कळ जंतू असतात. या जंतूंचे पुंजके असतात. स्पर्शसंज्ञाविहीन भेदामध्यें मज्जातंत बिघडतात असें वर आलेंच आहे. ते नेहमींपेक्षां दुप्पट किंवा तिप्पट मोठे होऊन त्यांतील संदेशवाहक गाभ्याचे तंतू रुक्ष किंवा क्षीण होतात पण बाहेरील वेष्टणत्वचा मात्र फुगून तंतू हातास जाड लागतात असे जाड तंतू त्वचेखालीं, कोपरें किंवा गुडग्याच्या ठिकाणीं बोटांनीं चांचपून तपासतां येतात.

रो ग नि दा न:- शरीरांत रोग पूर्ण प्रगट झाल्यावर तो ओळखणें फार कठिण जात नाहीं. पुटकुळींतील थोडीशी लस किंवा व्रणांतील पुवाचा थेंब किंवा नाकांतील चिकट स्रावाचे थेंब घेऊन तो सूक्ष्मदर्शक यंत्रानें तपासल्यानें या महारोगांचे जंतू दृष्टीस पडतात.

उपचार.— वस्तुतः हा रोग बरा होत नाहीं. म्हणून जेथें हा रोग नसेल अशा गांवापासून अंमळ एकीकडच्या ठिकाणीं रोग्यास ठेऊन त्याचे मज्जातंतूंस पुष्टि आणण्यासाठीं कांडमाशाचे तैलमिश्रित औषधें द्यावींत व क्षतें पडत गेलीं तर त्यांस साध्या मलमाची पट्टी बांधीत जावी. कवठीचें तेल किंवा चौलमुग्रा तेल २० थेंब व २ द्राम या प्रमाणांत कढत दुधांत पारदर्शक वेष्टनाच्या तयार गोळ्यांच्या रूपांत देतात. पण त्यापासून थोडाबहुत फायदा होण्यासाठीं तें तेल निदान दोन वर्षे तरी घेतलें पाहिजे. यांच्या रोगजंतूंनां मारक असें नॅस्टिन नांवाचें स्निग्ध औषध या महारोगाच्या जंतूंपासूनच तयार करितात. तें औषध दर आठवड्यास टोचल्यानें पुटकुळ्या लहान होऊन रोगाची प्रगति थांबते असें म्हणतात. विल्यम्स या शोधक डॉक्टरानें ही एक लस तयार केली आहे व तिजपासून चांगला गुण येण्याचीं चिन्हें दिसत आहेत.

आ यु र्वे दी य नि दा न.— अयोग्य आहार व विहार केल्यानें, परस्पर विरोधी गुणांचे पदार्थ सतत सेवन केल्यानें, साधूंची निंदा व वध, परद्रव्य हरण करणें इत्यादि पापकर्माच्या योगानें प्रेरित झालेले दोष दूषित होऊन ते शरीरांतील तिर्कस जाणार्‍या शिरांत शिरून त्वचा, लस, रक्त व मांस यांस दूषित व शिथिल करून नंतर बाहेर निघून त्वचेचा रंग पालटवितात व त्वचा बिघडून टाकितात. या रोगास कुष्ठ असें म्हणतात.

याची हयगय केली असतां हें कांहीं काळानें सर्व शरीर तोडून खाऊन टाकितें आणि सर्व धातूंत शिरून त्यास व्यापून व चिघळवून स्वेद, क्लेद व कोथ (सडणें) यांनीं युक्त असे बारीक पण फार भयंकर कृमी उत्पन्न करितें. ते कृमी अनुक्रमें केंस, चामडी, स्नायु, शिरा व कोंवळीं हाडें यांस खाऊन टाकितात.

श्वित्रांत हा प्रकार नसतो म्हणून त्याचा कुष्ठांत समावेश न करितां तें याहून निराळें काढलें आहे.

कुष्ठ सात प्रकारचें आहे. वात, पित्त, कफ, वातपित्त, कफ पित्त, वातकफ व संन्निपात असे ते ७ प्रकार होत. जरी सर्वच कुष्ठें त्रिदोषापासून होतात तरी त्यांत जो दोष अधिक असतो त्या दोषावरून त्यास नांव दिलें जातें. वातापासून कापाल; पित्तापासून औदुंबर; कफापासून मंडल व विचचीं; वातपित्तापासून ऋक्षजिव्ह, वातकफापासून चर्म, एककुष्ठ किटिभ, सिघ्म, अलस, व विपादिका; कफ पित्तापासून दद्रू, शसारू, पुंडरीक, विस्फोट, पामा व चर्मदल, आणि संन्निपातापासून काकण नांवाचें कुष्ठ होतें. त्यापैकीं कापाल, औदुंबर मंडल, दद्रू, काकण, पुंडरीक, व कक्षजिव्ह, हीं सात महाकुष्ठें आहेत.

अंग अतिशय मऊ लागणें किंवा खरखरीत लागणें, घाम अतिशय येणें किंवा मुळींच न येणें, चामडीचा रंग पालटणें, दाह होणें, खाज सुटणें चामडी बधिर होणें, टोंचल्यासारखी पीडा होणें, अंगावर गांधी उठणें, श्रमावांचून थकवा येणें, व्रण झाले असल्यास ते फार दुखणें, व्रण लवकर उत्पन्न होणें व फार दिवस रहाणें, ते भरून आले तरी रुक्ष असणें आणि यत्किंचितहि कारण (खाजवणें वगैरे) घडल्यास पुन्हां उमटणें, रोमांच उभे रहाणें आणि रक्त काळें होणें हीं लक्षणें कुष्ठ होण्यापूर्वी होतात.

वातापासून होणारे कापाल कुष्ठ काळ्या किंवा तांबूस खापरासारखें रुक्ष, बधिर, खरखरीत, पातळ, पसरलेल्या व वेड्यावांकड्या कडांचें, दूषित केसांनीं भरलेलें, लवकर पसरणारें असें असून त्यांत टोंचण फार असते व खाज कमी असते.

ज्याच्या वरची चामडी व केंस पिकलेल्या उंबराप्रमाणें तांबूस असतात, जें पांढर्‍या शिरांनीं भरलेलें असतें, जें जाड असून ज्यांतील लस व रक्त हीं दाट असतात, ज्यांत आग व ठणका हीं फार असतात आणि जें लवकर उत्पन्न होऊन लवकर फुटतें व ज्यांत लौकरच कृमी उत्पन्न होतात तें उदुंबरकुष्ठ जाणावें.

स्थिर, दाट, जड स्निग्ध, पांढरें किंवा तांबडें, लवकर न पसरणारें, एकमेकांस लागलेलें वर उचललेलें व वाटोळें असून ज्याच्या कडा गुळगुळीत व पिवळवट असतात आणि ज्यांत खाज, स्राव व कृमी हे फार असतात तें मंडलकुष्ट समजावें.

विचर्चिका कुष्ठ सांवळें, धूसर रंगाचें असून त्यांतून लस फार वहाते आणि खाज व पुळ्या असतात. खरखरीत, पातळ व मध्यभागीं काळसर असून कडांनीं लाल असलेलें, वर उचलेलें, टोंचणी, दाह व वेदना होत असलेलें, क्लेदयुक्त, खरबरीत, पुळ्यांनीं भरलेलें, पुष्कळ कृमी असलेलें आणि ऋष्य नांवाच्या निळ्या अंडाच्या हरिणाच्या जिभेसारखें जें (आकारानें) असतें त्यास ऋक्षजिव्ह म्हणतात. हत्तीच्या चामड्यासारखें खरखरीत असतें तें चर्मकुष्ठ होय. एकाख्य कुष्ठ फार पसरलेलें, आकारानें माशाच्या अंगावरच्या खवल्यांसारखें असतें व त्या जागीं घाम येत नाहीं.

किटिभ कुष्ठ रुक्ष, घट्ट्याप्रमाणें खरबरीत घट्ट व काळें असून त्यास कंड सुटते. सिघ्म कुष्ठ- ज्यास शिबें म्हणतात तें- बाहेरून रुक्ष व आंतून स्निग्ध असून चोळलें असतां भूस पडतें. तें हातात गुळगुळीत लागतें, पातळ असतें आणि रंगानें भोंपळ्याच्या फुलासारखें तांबूस पांढरें असतें. तें बहुतकरून गळ्यापासून कंबरेपर्यंत होतें. अलसक कुष्ठांत पुष्कळशा लाल गांठी असून त्यांस कंड सुटते.

विपादिका कुष्ठांत हातापायांवर चिरा पडतात, तीव्र पीडा होते, थोडी कंड सुटते आणि पुष्कळशा लाल पुळ्या उठतात. ज्याचे ताणे दूर्वेसारखे लांब पसरलेले असतात. ज्याचा रंग आळशीच्या फुलासारखा निळा असतो, ज्याचीं मंडलें वर उभारलेली व एकमेकांस लागून पसरलेलीं असून ज्यांस कंड सुटते त्यास दद्रुकुष्ठ म्हणतात. ज्यांचीं मुळें मोठीं असतात, ज्यांत दाह व वेदना होतात, जें तांबूस काळसर असतें, ज्यांत व्रण असतात, ज्यांत लस व कृमी फार असतात आणि जें बहुतकरून हाडांच्या सांध्यावर होतें तें शताव्ह होय.

ज्याच्या कडा लाल असून मध्यभाग पांडुर असतो, ज्यांत कंड, दाह व ठणका असतो, जें उभारलेलें असतें, ज्यावर कमळाच्या पानाप्रमाणें पुष्कळशा लाल शिरा असतात, ज्यांतून दाट व पुष्कळ अशी लस व रक्त वहाते आणि जें लौकर फुटतें तें पुंडरीककुष्ट होय. पातळ त्वचेचे पांढरें तांबूस रंगाचे फोड ज्यांत पुष्कळसे असतात तें विस्फोट कुष्ठ होय.

बारीक व धूसर पिंगट रंगाच्या पुळ्या बहुतकरून कुले, हात व कोंपरें यांवर पुष्कळशा येतात, त्यांस पामा म्हणतात. यांत खाज, लस व ठणका हीं फार असतात. चर्मदल कुष्ठांत फोड असतात. त्यास हात लाववत नाहीं, खाज सुटते, चुरचुर, टोंचण व दाह हीं होतात, तें लाल असतें व फुटतें. काकणकुष्ठ प्रथम गुंजेप्रमाणें तांबडें व काळें असून त्यांत कुष्ठाचीं सर्व लक्षणें उत्पन्न झालीं म्हणजे मग अनेक प्रकारचे रंग उत्पन्न होतात. यांत दाह व वेदना हीं फार तीव्र असतात. कुष्ठांत कोणता दोष अधिक आहे हें दोषांच्या लक्षणांवरून व कर्मांवरून ठरवावें. सान्निपातिक, विकृतिविज्ञानीय अध्यायांत सांगितलेलें आणि हाडें मज्जा व वीर्य यांच्या आश्रयानें राहिलेलें कुष्ठ असाध्य समजून सोडून द्यावें. मेदोगत कुष्ठ याप्य असतें. वातपित्तज, कफपित्तज, रक्ताश्रित व मांसाश्रित हीं कुष्ठें कृच्छ्रसाध्य असतात. कफ वातजन्य त्वचेंत असलेलें व एकदोषात्मक कुष्ठ सुखसाध्य असतें.

कुष्ठत्वचेंत असतां टोंचण, विवर्णता व रुक्षता उत्पन्न होते. रक्तांत गेलें असतां घाम, बधिरता, व सूज उत्पन्न होते. मांसांत असतां हातांपायांवर फोड उत्पन्न होतात.

सांध्यावर असतां त्यांतून लस फार वहाते; मेदांत गेलें असतां हाताचीं बोटें सडतात त्या त्या अवयवांची गती बंद होते व ते फाटतात; हाडांत व मज्जेंत गेलें असतां नाक सडतें डोळे लाल होतात, स्वर क्षीण होतो. व क्षतांत किडे पडतात. वीर्यांत गेलें असतां बायको व मुलें यांस त्याचा उपद्रव होतो. रक्तादिकांत कुष्ठ गेलें असतां त्याच्या पूर्वीच्या धातूंत कुष्ठ गेलें असतां जीं लक्षणें होतात तीहि होतात.

म्हणजे मांसाश्रित कुष्ठांत त्वचेंतील, रक्तांतील व मांसांतील कुष्ठांचीं लक्षणें होतात. मेदांत गेलें असतां मेदाचीं व वरील तीनहि धातूंत कुष्ट गेलें असतां होणारीं लक्षणें होतात.

श्वित्र म्हणजे पांढरें कोड हें कुष्ठाच्याच कारणांनीं उत्पन्न होतें. श्वित्रासच किलास व दारूण अशीं नांवें आहेत. वातिक श्वित्र, पैत्तिक श्वित्र, व कफजन्य श्वित्र असें तीन प्रकारचें श्वित्र असतें. वातिक श्वित्र रुक्ष व पिंगट रंगाचें असतें.

पित्तज श्वित्र तांबूस व कमलाच्या पानासारखें असून त्यांत दाह होतो व त्यावरचे केंस गळून पडतात. कफजन्य श्वित्र पांढरें दाट, जड, वर वाजणारें असतें.

हीं श्वित्रे क्रमश: रक्त, मांस व मेद यांत रहातात; दोष व धातु या दोहोंच्या योगानेंच याचे असे रंग होतात.

हीं श्वित्रें क्रमश: उत्तरोत्तर कष्टसाध्य होत. ज्याच्या वरचे केंस पांढरे झाले नाहींत, जें फार दाट नाहीं, जे एकमेकांत मिळालेले नाहीं. जें नवें एक वर्षाच्या आंतलें आहे व जें विस्तवाने भाजल्यानें झालेलें नाहीं असे श्वित्र साध्य असतें. याहून निराळ्याप्रकारचें तें असाध्ध समजावें.

सर्व प्रकारच्या कुष्ठात रोग्यानें प्रथम स्नेहपान करावें. त्याकरितां चरकोक्त तिक्तघृत उपयोगांत आणावें. स्निग्ध झालेल्या अशा रोग्यास निशोत्तर, वाहवा वगैरे रेचक औषधें द्यावीं. कपाळ, हात व पाय यांच्या शिरा तोडून रक्त काढावें. थोडें कुष्ठ असल्यास फासण्या टाकून रक्त काढावें आणि योग्य वाटेल त्याप्रमाणें तुंबड्या, जळवा वगैरे लावाव्या.

कुष्ठ झालेल्या रोग्याचें रक्त काढल्यानें व त्यास रेच झाल्यानें त्याचा कोठा रिकामा होऊन वायूपासून त्याच्या शरीरास विघात होण्याचा संभव असतो तो दूर व्हावा म्हणून त्यास मधून मधून कुष्ठनाशक स्नेह पाजून शक्ति लवकर आणावी.

कुष्ठी रोग्यानें ब्रह्मचर्य पाळून मध व रक्त्याबोळ यांच्याबरोबर गंधक खावा. किंवा खैर व असाण्याच्या नाराच्या काढ्यांतून समभाग तूप घालून गंधक खावा. हा कुष्ठनाशक आहे.

याप्रमाणें उपाय करून अंतस्थ दोषांचें शमन झालें म्हणजे मग बाह्य दोषांचें शमन करण्याकरितां लेप वगैरे लावणें हितावह होतें. कारण देह अशुद्ध असतां तीक्ष्ण लेप लावल्यानें दोष चवताळून अधिक कुष्ठ वाढतें.

ज्या कुष्ठांतील चकदळीं स्थिर व टणक असतील त्यास पुरचुंडींनें शेकून तें वर उचललें म्हणजे शस्त्रानें खरवडून वर लेप लावावें. ज्या स्पर्शज्ञान नसलेल्या भागांवर शस्त्र चालत नाहीं तेथील रक्त व दोष यांचा स्राव करून वर क्षार लावावा. अतिशय कठिण, खरखरीत, बधिर, स्थिर व जुनें अशा कुष्ठावर प्रथम विषघ्न औषधें पिऊन विषांचा समंत्रक लेप लावावा आणि नंतर विषघ्न औषधांचा लोप करावा. स्तब्ध, अत्यंत बधिर, ज्यास घाम येत नाहीं व कंड फार सुटते अशा कुष्ठाचीं चकदळें गोवरीं, समुद्रफेण किंवा शस्त्र यांनीं घांसून नंतर त्यांवर लेप लावावें.

नागरमोथे, त्रिफळा, गेळफळ, करंज, बाहवा, इंद्रजव, सातवीण, कोष्ठ, गव्हला, दारूहळद व पांढरे शिरस यांच्या पाण्यानें स्नान करावें, यांचा काढा ओकारी व रेच होण्याकरितां घ्यावा व या औषधांचा लेप करावा. यांच्या अंतर्बाह्य उपयोगानें कुष्ठ बरें होतें. ज्या कुष्ठांत आग होत असेल त्यांवर तिक्तघृतें व शतधौतघृतें लावावीं. लस फार वहात असल्यास चंदन व ज्येष्ठमध यांनी तयार केलेलें तेल लावावें.

अंगाची आग, विस्फोटक व चर्मदल यांवर थंड लेप, थंड व द्रव औषधांनीं धुणें व घड्या ठेवणें, शरि तोडणें, रेचकें व कडू औषधांनीं तयार केलेलें तूप यांचा उपयोग करावा. वातकुष्ठावर तूप, कफकुष्ठावर वमन आणि पित्तकुष्ठावर रक्त काढणें व रेचक हे सर्वोत्कृष्ठ उपाय आहेत.

कोठा शुद्ध करून व रक्तदोष काढून टाकून नंतर जे लेप कुष्ठांवर केले जातात त्यांचा फार लौकर गुण येतो.

ज्याचे दोष फार वाढले असतील त्यास त्याची शक्ति राखून वरचेवर बेताबातानें विरेचन देत असावें. अर्थात् त्याचे दोष थोडथोडे काढून टाकावे. एकदम जबरदस्त शोधन दिल्यास अतिशय दोष निघून जाऊन  त्या अशक्य झालेल्या माणसास ताबडतोब वायु होऊन तो मरेल. पंधरा दिवसांनीं वमन, महिन्यामहिन्यानें रेचक, तीन दिवसांनी नस्य आणि सहा सहा महिन्यांनीं रक्त काढणें या प्रमाणें हे उपाय करावे.

ज्या कुष्ठी मनुष्यास वमनविरेचन नीटपणीं लागू पडलें नसेल तो जबरदस्त दोषांनीं व्यापला जाऊन निःसंशय असाध्य होय. म्हणून दोष काढणें ते पुरतेपणीं काढावे.

व्रतें, इंद्रियदमन, मनोनिग्रह, दान, सुशीलपणा, ब्राह्मण, देव, गुरू यांची पूजा, सूर्याची उपासना हे उपाय केल्यानें दोष व पाप यांपासून उत्पन्न झालेलें कुष्ठ समूळ नाहींसें होतें.

साळी, सातू, गहूं, हरीक, राळे, मूग, मसुरा, तुरी, कडूभाज्या, जांगलमांस, त्रिफळा, कडू पडवळ, खैर, कडूलिंब व बिब्बे यांनीं युक्त असें अन्नपान, औषधमिश्रित मद्यें व बावच्याचें चूर्ण घातलेला मठ्ठा अशा प्रकारचें खाणें पिणें कुष्ठावर हितकर आहे. आंबट, खारट व तिखट अन्नपान कुष्ठावर हितकर नाहीं. आणि, दहीं, दूध, गूळ, पाण्यांतील प्राण्यांचें मांस, तीळ व उडीद हे पदार्थ सर्वथा वर्ज करावे.

याप्रमाणें जीं मोठीं सात कुष्ठें त्यांची चिकित्सा करावी. कोरडी व ओली खरुज, शिबें, गजकर्ण, नायटे वगैरे जीं अल्पकुष्टें तीं याच सदरांत घातलीं आहेत. त्यांच सामान्य रेचके देऊन गंधक, मोरचूत, शेंदूर, गुग्गुळ, वगैरे औषधांचा लेप करावा. अगर यांनीं तयार केलेलीं तेले लावावीं. करंजेल अथवा शिरशेल हीं तेले लावावीं. विशेषकरून पू शुद्ध होऊन त्वचा मऊ राहील असे उपाय करावे. हा रोग स्पर्शसंचारी आहे म्हणून कुष्ठं झालेल्या रोग्यानें दुसर्‍यास स्पर्श करूं नये.

कोड हे कुष्ठांपेक्षांहि निंद्य असून त्यापेक्षां असाध्यहि लौकर होतें. म्हणून तें बरें करण्याविषयीं ताबडतोब प्रयत्‍न करावा. त्यावर विशेषेंकरून प्रथमच रेचक द्यावें. यावर उत्तम रेचक म्हणजे बांवचाच्या काढ्यांतून त्रिधारी निवडुंगांचा चीक हें आहे. हें रेचक घेऊन अंगास तेल लावून बसवेल तितका वेळ उन्हांत बसावें आणि रेच झाल्यावर तीन दिवसपर्यंत तहान लागली असतां कण्हेरी प्यावी. उन्हांत बसल्यानें कोडाच्या जागेवर जे फोड येतील ते कांट्यानें फोडून त्यांतील पाणी काढून टाकावें. आणि नंतर तीन दिवसपर्यंत सकाळीं पळसाचा क्षार काकवींतून प्यावा.

याशिवाय कुष्ठावरचेहि उपाय करावें. हत्तीचें कातडें जाळून त्याची राख तेलांत खलून लावावी. पेंगूळ किडा बाहव्याच्या क्षाराच्या पाण्यांत खलून लावावा. मोराच्या पिसाचा लेप करावा, रेचकें, रक्त काढणें, रुक्षण, सातू खाणें या उपायांत एखाद्याच मनुष्याचें कोड बरें होतें. [वाग्भट; चरक; योगरत्‍नाकर]

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .