प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें       

कूर्ग- दक्षिण हिंदुस्थानांत म्हैसूर संस्थानच्या पश्चिमेस, पश्चिम घांटाच्या माथ्यावर व उतारावर असलेला एक लहानसा प्रां. क्षे. फ. १५८२ चौ. मै. व लो. सं. (१९२१) १६३८३८. या प्रांताचा नकाशांतील आकार लहान मुलाच्या पायमोजांसारखा असून त्याची टांचेकडील बाजू वायव्येकडे व बोटांकडील बाजू आग्नेय दिशेकडे आहे.

मर्काराचें पठार समुद्रसपाटीपासून सरासरी ३८०० फूट उंच असून पूर्वेस कावेरी नदीकडे उतरत गेलेलें आहे. फ्रेझर पेठ येथें त्याची उंची ११०० फूट आहे. कूर्गच्या उत्तरेस व पूर्वेस म्हैसूर संस्थानांतील हसन व म्हैसूर हे जिल्हे; आणि दक्षिणेस व पश्चिमेस मद्रास इलाख्यांतील मलबार व दक्षिण कानडा हे जिल्हे आहेत. या प्रांताचें मूळ नांव कोडगू असें आहे; व येथून ब्राह्मणेतर मुख्य जातीला कोडगू असें म्हणतात. कूर्ग हा कोडगू याचा इंग्रजांनीं केलेला अपभ्रंश होय.

स्वा भा वि क व र्ण न:- कॉफीचे मळे, लागवडीकरिता तयार केलेला प्रदेश, व खुलीं खोरीं यांशिवाय बहुतेक सर्व प्रदेश अरण्याच्छादित आहे. मोठीं गांवें किंवा खेडीं मुळींच नाहींत. फक्त कोठें कोठें झाडांआड लपलेलीं व धुरामुळें कळून येणारी गवती घरें दिसतात. साधारणपणें डोंगरमाथ्यावर गवत, खोर्‍यांत हिरवें गार वन, डोंगराच्या उतारावर झाडांचीं रानें असून त्यांतून लहान लहान ओढे वाहत असतात. या देशाचें स्वरूप सर्व ठिकाणीं सारखें आहे असें मात्र नाहीं. सोमवारपेठच्या जवळ उत्तरेस डोंगराच्या उतारावर मधून मधून उघडा प्रदेश व रानझाडांचे समूह असल्यामुळें तेथें एखाद्या बागेप्रमाणे शोभा दिसतें. मर्कारापाशीं टेंकड्या जवळ जवळ असून दर्‍या खोल आहेत. फ्रेजरपेठकडील मुलूख सपाट असून त्यांत टेकड्या तुरळक आहेत. वेप्पुनाड व कद्येतनाड येथील प्रदेश खुले असून तेथील जंगलहि दाट व उंच नाही. कावेरी व लक्ष्मणतीर्थ या नद्यांमधील पूर्व सरहद्दीवरच्या भागांत एकसारखें जंगल आहे. पश्चिमघांटाची मुख्य रांग वायव्येस सुब्रह्मण्यपासून दक्षिणेस ब्रह्मगिरीच्या पश्चिम टोंकावर सुमारे ६० मैल लांब पसरली आहे. या रांगेपासून पूर्वेस व पश्चिमेस पुष्कळ लहान रांगा गेलेल्या आहेत. त्यांचीं कांहीं शिखरें येणें प्रमाणें:- सुब्रह्मण्य किंवा पुष्पगिरी (५६२६ फू.), मर्काराच्या उत्तरेस ९ मैलांवर कोटिबेट्टा (५३७५ फू), ताडियांदमोल (५२७९ फू.).

कूर्ग प्रांतांतील मुख्य नदी कावेरी ही पश्चिम घाटांत ब्रह्मगिरीमध्यें उगम पावते व सिद्दपूर प्रदेशांत दक्षिणेकडून वहात जाऊन सिंरगालमधून वहात गेल्यावर म्हैसू प्रांतांत शिरते. हिला हेमावती, लक्ष्मणतीर्थ, कक्कबे, कडनुरहोले, कुम्मेनहे, ले मुत्तरमुदी चिक्कहोले आणि हत्ती किंवा हारंगी या नद्या मिळतात. पावसाळ्यांत नद्यांनां पूर येतो व होड्यांशिवाय पलीकडे जातां येत नाहीं. परंतु पावसाळा संपल्यावर पाणी कमी होऊन उतार पडतो.

सर्व रानांत, व विशेषतः पूर्वसरहद्दीकडे हत्ती पुष्कळ आहेत. येथील शेवटच्या राजानें जुलई १८२२ पासून एप्रिल १८२४ पर्यंत २३३ हत्ती मारल्याचा व १८१ पकडल्याचा उल्लेख एका शिलालेखांत केलेला आहे. हल्लीं हत्तीची शिकार करण्याला कमिशनरचा परवाना घ्यावा लागतो. याशिवाय गवे, वाघ, चित्ते, अस्वलें, जवादी मांजरें, काळीं व रानटी मांजरें, रानटी कुत्रे वगैरे श्वापदें रानांत आढळतात. सांबर व हरणाच्या निरनिराळ्या जाती, नाग, साप, माकडें हे प्राणीहि येथें आहेत.

कूर्गची हवा समशीतोष्ण व दमट आहे. मर्कारा येथें वार्षिक पाऊस सरासरी १३३ इंच पडतो. पावसाचा भर जुलई महिन्यांत असून त्यावेळीं एका महिन्यांत ४२ इंच पाऊस होतो. मर्कारा येथें मे महिन्यांत उष्णमान ७२० व जानेवारींत ६७ असतें.

इ ति हा स.— कावेरीमाहात्म्य नांवाच्या पुराणांत कावेरीच्या उगमाचा इतिहास दिलेला आहे. कावेर मुनीला ब्रह्मदेवाने एक मुलगी बक्षीस दिली. हिचें मूळचें नांव लोपामुद्रा असें असून ती विदर्भ राजाच्या घरीं कढली होती. परंतु कावेर मुनीची ती कन्या झाल्यामुळें तिला कावेरी असें नांव प्राप्‍त झालें. सर्व लोकावर कल्याण करण्याकरितां तिनें नदी होण्याचा निश्चय केला होता. एकदां अगस्त्य मुनींच्या दृष्टीस पडली असतां त्यांनीं तिला आपली पत्‍नी होण्याविषयीं विचारिलें; तेव्हा मुनीनीं केव्हांहि एकटें टाकल्यास आपणांस वाटेल तिकडे जाण्याची मोकळीक असावी या अटीवर तिनें अगस्त्य मुनींशी विवाह केला. दिलेल्या वचनाचा विसर पडून मुनी एकदा कनके नदीवर स्नानाकरितां गेले असतां, कावेरीनें तळ्यात उडी घेतली व तेथून ती नदीच्या रूपानें बाहेर पडली. मुनीच्या शिष्यांनीं तिला अडविण्याचा प्रयत्‍न केल्यामुळें ती जमीनींत गुप्‍त होऊन भागंदक्षेत्र येथें वर आली व पुढें वलंबुरीकडे वाहूं लागली. अगस्त्य मुनी परत आल्यावर त्यांना फार वाईट वाटलें. तेव्हां मुनींचें मन दुखविणें व आपला विचार बदलणें या दोन्ही गोष्टी टाळाव्या म्हणून ती अर्धभागानें मुनीजवळ राहिली, व दुसरा अर्ध नदीरूपानें कायम राहिला. या पुराणांत कूर्ग लोकांनां उग्राचें वंशज (म्हणजे क्षत्रियाला शूद्र स्त्रीपासून झालेली संतती) असें म्हटलें आहे. मत्स्यराज सिद्धार्थ याचा कनिष्ठ पुत्र चंद्रवर्मा (याच्या नांवावरून व दुसर्‍या इतर गोष्टींवरून हा कदंब राजपुत्र असावा.) हा दक्षिणेंतील यात्रा केल्यावर ब्रह्मगिरी येथें आला. त्यानें पार्वतीची स्तुति करून तिला संतुष्ट केल्यावर देवीनें त्याला एक शूद्रपत्‍नी व त्या प्रदेशांतील राज्य दिलें; व स्वतः नदीरूपानें तेथें अवतार घेऊन जगदुद्धार करण्याचें कबूल केलें. या शूद्र पत्‍नीपासून चंद्रवर्म्याला ११ पुत्र झाले. त्यांनीं विदर्भ राजाला शुद्र स्त्रियांपासून झालेल्या कन्यांशीं विवाह केले. प्रत्येक राजपुत्राला शंभरापेक्षां जास्त मुलगे झाले. त्यांनीं आजूबाजूचा बराच प्रदेश साफ करून लागवड केली. जमीन तयार करण्याचें काम ते रानडुकराप्रमाणें करीत गेले म्हणून या प्रदेशाला कोड किंवा कोडगू म्हणजे वराह देश असें नांव पडलें.

देवकांत या ज्येष्ठ पुत्राला गादीवर बसवून व पार्वती लवकर अवतार घेणार आहे असें सांगून चंद्रवर्मा निघून गेल्यावर, तूळ संक्रमणाच्यापूर्वी दोन दिवस, देवकांताला स्वप्नांत पार्वतीचें दर्शन होऊन, तिनें त्याला सर्व लोकांस वलंबुरी येथें जमण्यास सांगितलें. त्याप्रमाणें सर्व लोक जमल्यावर दरींतून कावेरी नदीचा प्रवाह जोरानें आला, त्यांत सर्व लोकांनीं स्नान केलें. प्रवाह फार जोराचा असल्यामुळें स्त्रियांच्या वस्त्राच्या गांठीं पाठीकडे गेल्या; त्या दिवसाच्या स्मरणार्थ कूर्गमधील स्त्रिया अद्यापीहि त्याच प्रमाणें वस्त्रें नेमतात. व दरवर्षी तूळ संक्रमणाच्या वेळीं येथें मोठा उत्सव होत असतो.

ऐतिहासिक काळाक़डे वळलें असतां नवव्या व दहाव्या शतकांत कूर्ग प्रांत तळकार (कावेरीच्या कांठीं) येथील गंगराजांच्या ताब्यांत होतो असें शिलालेखांवरून समजतें. कावेरीच्या उत्तरेकडील नंजराज (य) पट्टण येथील चांगल्व राजे त्यांचे मांडलिक होते. चांगल्व राजांचे शिलालेख येदवनाड व बेट्ट्येत्‍नाड येथें सांपडलेले आहेत. ते जैनधर्मी होते व त्यांचे धर्माधिकारी हनसोगेपासून तले- कावेरीपर्यंत सर्व जैन देवालयांवर अधिकार गाजवीत यावरून त्यांच्या राज्याची मर्यादा तेथपर्यंत असावी.

अकराव्या शतकाच्या आरंभीं चोल राजांनीं गंग राजांची सत्ता नाहींशी करून कूर्ग प्रांतहि घेतला.  त्यावेळीं चांगल्व राजे चोल राजांचे मांडलिक झाले. अकराव्या शतकांत कोंगाल्व राजानीं म्हैसूरमधील अर्कगूड तालुका व कूर्गचा उत्तरेकडील येलुसावीर प्रदेश यांवर राज्य केलें. हेहि जैन होते.

गंग राजांची सत्ता नाहींशी झाल्यावर, म्हैसूरमध्यें पोयसल किंवा होयसल राजांची सत्ता हळू हळू वाढत जाऊन, बाराव्या शतकाच्या आरंभीं त्यांनीं चोल राजांनां म्हैसूरच्या बाहेर घालवून दिलें. त्यांची राजधानी द्वोरसमुद्र येथें होती, पण ते प्रथम पश्चिम घाटांतील सोसेवूर (म्हणजे हल्लींचें कोदूर जिल्ह्यांतील अंगडी) येथून आलेले होते. व "मलपचे वीर" असें त्यांचें बिरुद होतें.

चंगाल्व व होयसल यांच्या दरम्यान पुष्कळ लढाया होऊन अखेर होयसल राजांचा विजय झाला. दोघेहि सोमवंशी यादवांचे वंशज असल्यामुळें चोल राजे गेल्याबरोबर चंगाल्व राजांनीं स्वतंत्र होण्याचा प्रयत्‍न केला. ११४५ पर्यंत पहिला नरसिंह या होयसल राजानें चंगाल्व राजाला लढाईंत ठार मारून हत्ती वगैरे पुष्कळ लूट जमा केली. त्यानंतर चंगाल्व कूर्गमध्यें गेले असावे असें दिसतें; कारण ११७४ त दुसर्‍या बल्लाळ राजानें त्यांच्या विरुद्ध आपला सेनापति बेट्टरस याला पाल्परे (या किल्ल्याचे अवशेष हटगटनाद येथें अद्यापि आहेत) वर पाठविलें होतें. त्यानें चंगाल्वांचा पराभव करून आपल्या राजधानीकरितां गांव वसविलें. परंतु चंगाल्वाच्या मदतीला बृदगंद, नंदिदेव, उदयादित्य वगैरे आल्यामुळें कांहीं वर्षें बेट्टरसाचें चांगलें चाललें नाहीं, पण शेवटीं मात्र त्याला विजय मिळाला. यानंतर लवकरच चंगाल्व राजे होयसलांच्या पूर्णपणें ताब्यांत आले. १२५२ त सोमेश्वर हा होयसल राजा त्यांनां भेटण्याकरितां रामनाथपूर येथें गेला होता. त्यावेळीं त्याची राजधानी श्रीरंगपट्टण येथें होती. त्यांनीं जैनधर्म सोडून लिंगायतधर्म स्वीकारला होता;  व त्यांचें कुलदैवत श्रीगिरी (बेत्ताडपूर डोंगर) वरील अन्नदानी मल्लिकार्जुन हें होतें.

चवदाव्या शतकांत होयसलांच्या पाठीमागून विजयानगरचें राज्य आलें व चंगल्व राजे त्यांच्या सत्तेखालीं गेले. सोळाव्या शतकाच्या आरंभीं नंज राजानें नंजराजपट्टण ही नवी राजधानी स्थापन केली. १५८९ त प्रिय राजानें सिंगपट्टणची दुरुस्ती करून त्याचें नांव प्रियपट्टण असें ठेविलें. विजयानगरची सत्ता मुसुलमानांनीं मोडून टाकिल्यावर हा मुलूख म्हैसूरच्या राजांच्या ताब्यांत गेला. १६४४ त म्हैसूरच्या राजानें बेदत्तपूर व प्रियपट्टण काबीज केलें; त्यावेळीं चंगाल्वानें आपला निभाव लागत नाहीं असें पाहून बायका मुलांस मारून टाकिलें व राजधानीचें रक्षण करीत असतां स्वतः मरण पावला. याप्रमाणे चंगाल्व घराण्याचा शेवट झाला.

सोळाव्या शतकाच्या अखेर खुद्द कूर्गचा कारभार नायकांच्या हातीं होता असें फेरिस्ता लिहितो. १६४६ त बेदनूरचा शिवप्पा नाईक यानें श्रीरंगपट्टणास वेढा दिला असतां बेदनूर किंवा इक्केरी घराण्यांतील एका राजपुत्रानें जंगमाचा वेष घेऊन सर्व प्रांत आपल्या ताब्यांत आणिला. त्याचे वंशज १८३४ पर्यंत कुर्गवर राज्य करीत होते. या वंशांतील वीर राजेंद्र राजानें १८०७ पर्यंतचा इतिहास "राजेंद्रनामें" या ग्रंथांत लिहिविला आहे.

वरील वंशांतील मुद्दु राजानें राजधानी मादेकेरी किंवा मर्कारा येथें नेऊन तेथें १६-१ मध्यें एक किल्ला व राजवाडा बांधिला. त्याच्यामागें त्याचा वडील मुलगा दोद्द वीरप्पा हा राजा झाला व त्याचे भाऊ, अप्पाजी आणि नंद हे अनुक्रमें हालेरी, व होरमस येथें राहूं लागले. १६९० त दोद्द वीरप्पानें येलुसाविर प्रदेश कूर्ग प्रांतास जोडला. वेदनूरच्या सोमशेखर नाइकाविरुद्ध चिरक्कल राजाला मदत करून त्यानें वायव्येकडील अमरशुल्य जिल्हा मिळविला. तो १७३६ त ७८ वर्षांचा होऊन मरण पावला (त्याचा मुलगा १७२९ त त्याच्या हयातींत मरण पावला). त्याच्या मागून त्याचा नातू चिक्कवीरप्पा गादीवर  आला. याच्या कारकीर्दीत म्हैसूरमध्यें हैदरअल्ली प्रबळ होऊन त्यानें बेदनूर (१७६३) व येलुसाविर हे प्रदेश घेतले आणि वार्षिक ३ लक्ष फलम खंडणी घेऊन उचिंगी कूर्गला देण्याचें कबूल केलें. चिक्कविरप्पाला वारस नसल्यामुळें त्याचें राज्य हालेरी व होरमले येथील घराण्यांकडे गेलें. दोघांनीं एकोप्यानें राज्य करून हैदरला उचिंगीबद्दल पंजे आणि बेलारे हे प्रदेश देण्यास भाग पाडिलें. १७७० त दोन्ही राजे वारले. तेव्हां देवप्पा राजा गादीवर बसला. त्यानंतर हालेरीचा राजपुत्र अप्पाजी हा आपला चुलता लिंगराजा यासह हैदरकडे मदतीकरितां पळून गेला. हैदर मराठ्यांशीं युद्ध करण्यांत गुंतला असल्यामुळें त्यावेळीं त्याला कांहीं करितां आलें नाहीं; पण मराठे परत गेल्यावर त्यानें लिंगराजाच्या मदतीला सैन्य पाठवून दिलें. कांहीं अडथळा न होतां लिंगराजा मर्कारावर चालून गेला. देवप्पा राजा संरक्षणाकरितां कोटेच्या चिरक्कल राजाकडे गेला. परंतु तेथें त्याचें स्वागत न झाल्यामुळें वेष पालटून फक्त चार नोकरांसह तो उत्तरेस पळून गेला. अखेरीस हरिहर येथें तो पकडला गेला आणि हैदरानें पट्टण येथें त्याच्या सर्व कुटुंबासह त्याला ठार मारलें. याप्रमाणें होरमले शाखेचा शेवट झाला. लिंग राजाकडून २४ हजार रु. खंडणी देण्याचें कबूल करवून, कूर्ग व वायनाडचा काहीं भाग हैदरानें त्याच्याकडे ठेवला; आणि अमरशुल्य, पंजे, बेल्लारे आणि येळुसावीर हे आपणा कडे घेतले. १७८० त लिंग राजा मरण पावल्यावर त्याचीं मुलें (वीरराज व लिंगराज) वयांत येईपर्यंत सांभाळण्याच्या  मिषानें हैदरानें सबंध कूर्गचा ताबा घेतला. राजपुत्रांनां कावेरी नदीच्या कांठी गुरुरुच्या किल्ल्यांत ठेवून कुर्गच्या सुबरय्या नांवाच्या ब्राह्मण खजिनदाराला सुभेदार नेमण्यांत आलें व मर्काराच्या किल्ल्यावर मुसुलमान शिबंदी ठेवण्यांत आली. प्रजेला हें सहन न होऊन त्यांनीं १७८२ त बंड करून मुसुलमानांनां घालवून दिलें. हैदर त्या वेळीं कर्नाटकांत अर्काटकडे इंग्रजांशीं युद्ध करण्यांत गुंतला होता व पुढें लवकरच (१७८२) मरण पावला;  त्यामुळें बंडाचें पारिपत्य होऊं शकलें नाहीं.

पुढें १७८४ त टिपूनें ज्यावेळीं नगर येथें इंग्रज सेनापति माथ्यू व त्याचे अधिकारी यांनां पकडलें व मंगलोर घेतलें, त्यावेळी पट्टनास तो परत जातांना त्याने कोडगु लोकांचें शांतवन केलें. त्यावेळीं वरील दोन राजपुत्र व राजकुटुंब हें पेरिया पट्टणास कैदेंत होतें. तेथें त्याचा छळ होत असे. त्यामुळें पुन्हां प्रजा खवळून तिनें बंड केलें. टिपूनें १५ हजार सैन्य त्यांच्यावर धाडलें पण तिनें त्याचा पुरा मोड केला. तेव्हां टिपू स्वतः चालून आला व तह करण्याच्या मिषानें त्यानें मुख्य सरदारांनां तलेकावेरीस बोलाविलें व ते तेथें आले असतां त्यांनां विश्वासघातानें कैद करून त्यांनां व पुष्कळशा (एकंदर ७० हजार) कोडगू लोकांना त्यानें जुलुमानें बाटविलें व सांपडेल तेथें कोडगू लोकांनां बाटविण्याच्या किंवा ठार मारण्याच्या अटीवर सारा कूर्ग प्रांत त्यानें मुसुलमान सरदारांनां जहागीर दिला, आणि मर्कारा, कुशाळगड वगैरे ठाण्यांत शिबंदी ठेविली आणि नागप्पा यास दिवाण केलें. पुढें त्याच्यावर लांच खाल्याचा आरोप आल्यावरून तो पळून गेला.

याप्रमाणें देशाची स्थिति असतां, १७८८ त (डिसेंबर) वीर राजेंद्र वोडेयर यानें आपलीं बायकामुलें व लिंग राजा आणि अप्पाजी हे दोघे भाऊ यांसह प्रियपट्टण येथून आपली (सहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर) सुटका करून घेतली. लगेच कूर्ग लोक त्याच्या भोंवती जमा झाले व सर्व प्रदेश त्याच्या ताब्यांत आला. त्यानें आपलें कुटुंब कर्ची नांवाच्या एका सुरक्षित जागीं ठेविलें होतें व तो मुसुलमानांवर स्वार्‍या करीत होता. परंतु त्याचा शत्रु कोटी आरास यानें त्या कुटुंबावर बेरड वगैरे पाठवून त्याचा सत्यनाश केला. टिपूनें कूर्गवर गुलामअल्लीबरोबर मोठें सैन्य पाठविलें. त्यानें तिकडे पुष्कळ जाळपोळ केली. इतक्यांत पश्चिम किनार्‍यावर मल्याळी राजांनीं बंड केल्यामुळें गुलामअल्ली तिकडे गेला.

परत जातांना गुलामअल्लीच्या सैन्याचा बराच नाश वीरराजेंद्रानें केला. तेव्हां टिपूनें बदरीजमाल याला पुष्कळ सैन्यानिशी राजावर धाडलें. परंतु त्यालाहि अडचणीच्या मार्गांत गांठून राजानें त्याच्या सैन्याचा नाश केला. तेव्हां तो कसा तरी मर्कारा येथें जाऊन पोहोंचला. याच वेळीं टिपूवर इंग्रज-मराठे-निजाम चालून आले होते. त्यामुळें तो मोठ्या संकटात अडकला होता. मुंबईचा इंग्रज अ‍ॅबरक्राँबी हा जलमार्गानें पट्ट्णावर येत होता. घांटावरील रस्ता कुर्गच्या राजाच्या हद्दींतून होता. त्यामुळें इंग्रजाला त्याच्या सख्याची अतीशय जरुरी भासली. तसेंच वीरराजालाहि टिपूविरुद् कोणाची मदत पाहिजे होती. यावेळीं तेलिचेरी येथें अ‍ॅबरक्राँबी होता व वीरराजाचा एक हस्तक मथुभट म्हणून तेथें होता. त्याच्या बरोबर इंग्रजानें राजास आपली मैत्री असावी म्हणून विनंतीपत्र पाठविलें. राजानें तें कबूल केलें व तेलिचेरी येथें इंग्रज व राजा यांत स. १७९० च्या आक्टोबरांत तह झाला. त्यांत पुढील मजकुराचें पहिलें कलम होते "जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत तह करणार्‍या उभय पक्षांकडून आपापलें वचन कधींहि मोडलें जाणार नाहीं." बाकीच्या कलमांचा सारांश असा:- (१) टिपूचा नाश करण्यास राजानें इंग्रजास सर्वप्रकारें मदत करावी; (२) दुसर्‍या टोपीवाल्यांशीं संबंध ठेवू नये; (३) कुर्गच्या राज्याचें स्वातंत्र्य रक्षण करण्यास कुंपनी जामीनदार आहे. टिपूशीं इंग्रजांचा सल्ला झाला तरी त्याच्यापासून राजाचें व राज्याचें रक्षण कुंपनी करील तोपर्यंत कुटुंबासुद्धा राजानें तेलिचरीस रहावें इ. इ. यानंतर राजानें इंग्रजास बरेचसे घोडे (दीड हजार) व जनावरें आणिण दाणागोटा पुरवून आपल्या राज्यातून जाण्यास परवानगी दिली; व स्वतः हेगला घाटानें सैन्य पार करून घेऊन आपण इंग्रजांबरोबर थेट पट्टणापर्यंत गेला.  तेव्हां टिपूनें आपला वसूली खात्याचा अंमलदार पूरनय्या याजबरोबर स्वदस्तुरचें पत्र राजास पाठविलें कीं, इंग्रजांस सोडून आपल्याला मदत करावी. त्यास राजानें नकाराचें उत्तर पाठविलें.

यावेळीं टिपूनें बंदींत ठेविलेल्या १२००० कोडगू लोकांनीं आपली सुटका करून घेऊन आपला देश परत मिळविला. तेव्हां टिपूला मराठे, निजाम व इंग्रजांशीं तह करणें भाग पडून आपल्या राज्यांतील अर्धा मुलूख त्यांनां द्यावा लागला व कूर्गवरील त्याची सत्ता नाहींशी झाली. मात्र वीरराजा इंग्रजांचा कायमचा मांडलीक बनला. ती हकीकत अशी :- इंग्रजानें राजास सांगितलें कीं, आम्ही तुमचें टिपूपासून रक्षण केल्याबद्दल यापुढें तुम्हीं आम्हांस दरसाल खंडणी द्यावीं. हें ऐकून राजास राग आला. झालेल्या तहांत असें कलम नव्हतें. शिवाय राजा हा टिपूचा मांडलिकहि नव्हता. तेव्हां तडजोड म्हणून ऑबरक्राँबीनें पुढील करारपत्र कंपनीच्या तर्फे लिहून दिलें (१७९३):- "कूर्ग संस्थान स्वतंत्र असून त्यानें टिपूस खंडणी दिली नव्हती; परंतु तेथील राजा स्वतःच कंपनीनें आपलें टिपूपासून रक्षण केल्याबद्दल कंपनीस सालीना ८ हजार पागोडा (१ पागोडा म्हणजे ८ आणे) उत्पन्न देण्यास तयार आहे. कंपनीहि कुर्गच्या राज्यांत ढवळाढवळ करणार नाहीं व त्रास देणार नाहीं." याप्रमाणें इंग्रजानें पहिला तह मोडून राजास आपला मांडलिक बनविलें व नाइलाजानें राजा त्यास कबूल झाला.

ज्या ठिकाणीं वीर राजाची इंग्रज सेनापति ऑबरक्राँबी याशीं प्रथम गांठ पडली त्याठिकाणीं त्यानें वीरराजेंद्र पेठ हें गांव वसविलें. नाटकनाडू येथें त्यानें राजवाडा बांधला. पुढें १७९४ त दुसरें लग्न केलें, टिपूनें वीरराजाचा खून करविण्याचे पुष्कळ प्रयत्‍न केले पण ते सर्व निष्फळ झाले. टिपूशीं झालेल्या शेवटच्या युद्धांत वीरराजानें इंग्रजांस सामान पुरविण्याच्या कामीं चांगली मदत केली. कूर्गमध्यें इंग्रजांनीं अजार्‍यांसाठीं इस्पितळें उघडलीं. याबद्दल श्रीरंगपट्टण पडल्यानंतर त्याला कांहीं जयचिन्हे मिळाली (या लढाईंत तो स्वतः लढत होता). परंतु प्रियपट्टण त्याच्या हातचें गेल्यामुळें त्याला वाईट वाटलें. दक्षिणकानडामधील बेल्लारी व पंजे हे प्रदेश मात्र त्याला मिळाले. यापुढें इंग्रजांनीं राजाकडून खंडणी न घेतां हत्ती घेण्याचें ठरविलें. १८०७ मध्यें त्याची बायको निपुत्रिक वारल्यामुळें, आपल्या गादीला वारस उत्पन्न होण्याची त्याची आशा खुंटून त्याचा स्वभाव चिडखोर व रागीट बनला.

त्यामुळें त्यानें पुष्कळ अमर्याद कृत्यें केलीं. आपल्याला कोणीं विष घालील म्हणून तो नेहमीं सावध असे. त्यानें १८०७ मध्यें आपल्या घराण्याचा इतिहास लिहविला. त्याचें इंग्रजी भाषांतर ऑबरक्राँबीनें केलें आहे. राजानें रागाच्या भरांत आफ्रिकन शिपायांकडून पुष्कळांचे वध करविलें; यामुळें राजवाड्याच्या रक्षकांनीं व सैन्यांतील कामगारांनीं त्याला मारण्याचा कट केला. परंतु वेळींच त्याला त्यासंबंधीं सूचना मिळून त्यानें आपल्या गादीवर लोड ठेऊन त्यावर पांघरूण घातलें व आपण दुसरीकडे गेला. इकडे मारेकर्‍यांनां राजा निजला आहे असें वाटून त्यांनीं लोड कापून काढिला. पण राजा निसटून गेला आहे असें त्यांनां कळून येतांच ते गर्भगळित होऊन गेले. मग राजानें आपल्या आफ्रिकन शिपयांकडून किल्ल्याचे दरवाजे बंद करवून तीनशे कूर्ग लोकांची कत्तल करविली. या कृत्यामुळें इंग्रजांचें आपल्यासंबंधीं मन वाईट होईल अशी राजास भीति पडली. आपल्या पाठीमागून राज्याचा वारसा आपल्या मुलीकडे जावा अशीं आपली इच्छा असल्याचें त्यानें गव्हर्नर जनरलास कळविलें; परंतु तिकडून उत्तर येण्यास विलंब लागल्यामुळें मुलींनां राज्य मिळण्यास अडचण पडूं नये म्हणून त्यानें आपल्या भावास मारण्याकरिता मारेकरी पाठविलें; परंतु लवकरच शुद्धीवर येऊन लिंगराजास मारण्यापूर्वी त्यानें आपला हुकूम परत घेतला. अप्पाजी त्याच्या अगोदर मारला गेला होता. तो भ्रमिष्ट झाला असावा. कारण त्यानें स्वतः १।२ वेळ  आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न केला होता व एके वेळीं विषप्राशनहि केलें. त्यावेळीं त्यानें एक वारसपत्र लिहून ठेवलें. त्यांत म्हटलें होतें कीं मी मेल्यावर माझें राज्य माझ्या लेकवळ्यांपैकीं राजशेखर व शिशुशेखर यांस द्यावें. पण त्यानंतर त्याला आणखी मुली झाल्या. त्याला एकंदर चार मुली होत्या. तेव्हां लेकवळ्यांनां राज्य न देता या मुलींच्या मुलांनां वडिलकीच्या अनुक्रमानें राज्य द्यावें व घराण्याचें संरक्षण इंग्रजानें करावें असें मृत्यूपत्र त्यानें तयार करून ठेविलें. शेवटपर्यंत तो अस्वस्थच होता. मृत्यूपत्राची नक्कल करून त्यानें ती खजिन्यांत ठेवली होती. सरतेशेवटीं १८०९ मध्यें जूनच्या नवव्या तारखेस त्यानें आपली लाडकी मुलगी देवम्माजी हिजपाशीं राज्याचा शिक्का मोर्तब दिला. पुढें तो लवकरच मरण पावला.

मध्यंतरी लिंगराजानें इंग्रजांच्या मदतीनें कूर्ग लोकांचें पाठबळ मिळवून देवम्माजीकडून राज्य बळकाविलें (इ. स. १८११). वास्तविक वीरराजानें मृत्युपत्रांत ठरविल्याप्रमाणें इंग्रजांनीं देवम्मा हिला गादीवर बसवावयाचें होतें परंतु तें त्यांनीं केलें नाहीं. वेल्स्लीनें तसें कबूल केलें होतें; परंतु तें कागदपत्रांतच राहिलें. त्या प्रांतांतील धार्मिक चालीरीतींप्रमाणें मुलीचा हक्क वारसदार म्हणून चालत असे. वीरराजानें देवम्माजीकरितां मुंबई व कलकत्ता येथें इंग्रजांजवळ ठेवलेल्या ठेवीच्या रकमा (५।। लाख रु.) मिळविण्याचा त्यानें प्रयत्‍न केला. परंतु इंग्रजांनीं त्या रकमा न देतां त्यांचें व्याज मात्र त्यास द्यावयाचें कबूल केलें. तो १८५० त मरण पावला. यानें आपला दिवाण कुशरीआपा याच्या मदतीनें प्रथम पुष्कळ मसलती केल्या. परंतु पुढें त्याला कांहीं आरोप ठेवून त्याच्या आप्‍तेष्टांसह व बर्‍याचशा लोकांसहि राजानें ठार मारिलें. वीरराजाप्रमाणें यालाहि विषप्रयोगाची भीति वाटे. कदाचित त्याला कोणीं विषप्रयोग केलाहि असेल. कूर्गप्रांतात जारणमारण विषप्रयोग नेहमीं होत असत. लिंगराजा कर्तबगार असून त्यानें किल्ल्यांची डागडुजी व जमिनीची मोजणी करविली होती. त्याची प्रजा त्याला अतिशय भीत असे. त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या हद्दींत कोणासहि शिरतां येत नव्हतें. इंग्रजांचें व कोडगू लोकांचें त्यानें दळणवळण बंद केलें होतें. त्याच्या राणीनें हिरकणी खाऊन आत्महत्या केली.

लिंगराजानंतर त्याचा मुलगा वीर राजा बादीवर बसला. हा दुर्व्यसनी व अत्याचारी होता. कुंतबसव या प्रधानाच्या सल्ल्यानें तो चालत असे. देवम्माजी व आपल्या घराण्यापैकीं उरलेलीं दुसरीं सर्व नातेवाईक माणसें त्यानें मारविलीं. त्यानें १८३२ त एक स्त्रियांची पलटण उभारली होती. त्याचें व इंग्रजांचे बांकडें आलें तेव्हां त्यानें आपल्या राज्यांत सर्वत्र जाहीरनामे लाविले कीं, इंग्रज हे हिंदुस्थानांत येऊन हिंदु व मुसुलमान या उभयतांच्या धर्मांचा नाश करीत आहेत; तर सर्वांनीं एकत्र होऊन हालेरीवंशाचें संरक्षण करून इंग्रजांस हांकलून द्यावें. यानंतर १८३४ त ब्रिटिश फौज कूर्ग प्रांतावर चाल करून गेली व राजा नलकनाद येथें निघून गेल्यामुळें व त्यानें लढाई तहकूब केल्यामुळें कूर्ग प्रांत इंग्रजांनीं बंदुकीचा एकहि आवाज न काढतां आपल्या राज्यास जोडला. दिवाण बापू यानें आपण होऊन राजधानी इंग्रजांच्या हवाली केली (१८३४ एप्रिल १०). फक्त बेप्पाडचा सुभा अप्पाचन्ना यानें इंग्रजांच्या एका फौजेचा पराभव करून तिचा मुख्य मिलर यास ठार केलें. एवढीच काय ती लढाई झाली. कूर्ग प्रांत ७ मे १८३४ रोजीं खालसा केला. वास्तविक राज्य खालसा करण्याचें कांहीं कारण नव्हतें. राजा पदच्युत करून त्याचा मुलगा गादीवर बसविला असता तर चाललें असते. ज्या वीरराजानें इंग्रजांनां टिपूच्या मोहिमेंत संकटकाळीं मदत केली त्याच्या नंतर तिसर्‍या पिढींतच ती मदत विसरून इंग्रजांनीं हें राज्य खालसा केलें.

पुढें राजाला वेल्लोर येथें पाठविण्यांत आलें व नंतर बनारस येथें रहाण्याची परवानगी त्यास मिळाली. १८५२ त तो आपली मुलगी गौरम्मा हिच्यासह विलायतेस गेला. तेथें त्यानें आपल्या मुलीला ख्रिस्ती धर्म देवविला व पुढें तिचा विवाहहि एका इंग्रजाबरोबर करून देण्यांत आला होता. हिला एक मुलगी होऊन ती १८६४ त मरण पावली. हिच्या मुलीचें लग्न १८८२ त क्याप्टन यार्डले याच्याशीं झाले परंतु लग्नानंतर मुलगी व तिचा बाप क्यांबेल हे नाहीसें झाले. याप्रमाणें या घराण्याचा शेवट झाला. काशीस ठेवलेल्या वीरराजाच्या मुलांची पुढील हकीकत समजत नाहीं. वीरराजा १८६३ त मरण पावला व त्याला लंडन येथें केन्सन ग्रीन स्मशानांत पुरण्यांत आलें.

१८३३ मध्यें वीरप्पा नांवाचा एक तोतया मनुष्य पुढें आला होता. संन्याशाच्या वेषांत अभ्रबर हें नाव धारण करून लोकांनां बंड करण्याला चिथावीत असल्यामुळें पकडला जाऊन, १८७० त तो बंगलोरच्या तुरुंगांत मरण पावला. १८७७ त गौडांचें एक लहानसें बंड झालें होतें पण तें लवकरच शांत झालें.

१८८१ पासून कूर्ग प्रांत म्हैसूरच्या रेसिडंटाच्या ताब्यांत असून त्याला कूर्गचा चीफ कमिशनर असें म्हणतात. कूर्ग प्रांतांत पुढील तालुके, गांवें व खेडीं आहेत. एकंदर प्रांताची लोकसंख्या मागें सांगितलीच आहे.

तालुक्याचें नांव क्षे.फ.चौ.मै. लोकसंख्या(स.१९०१)
मर्कारा २१६ २८६२०
नंजराजपट्टण ३५५ ४२७२०
पादिनालकनाद ४०० २८६२०
येदेनालकनाद २०१ ४३४१२
निग्गतनाद ४१० ३७२३५
एकंदर १५८२ १८०६०७


मर्कारा, वीरराजेंद्र पेठ, सोमवारपेठ, फ्रेजर पेठ व कोडली पेठ या ठिकाणीं म्युनिसिपालिट्या असून येवढींच कायतीं मोठीं गावें आहेत. कूर्गमधील बहुतेक गांवें फार लहान असून त्यांची लोकसंख्या सरासरी ३५० ते ४०० पर्यंत पडेल.

१९०१ मध्ये बायकांचें पुरुषांशी प्रमाण १०१ त १००० असें होतें. याचें कारण देशांत पुरुष मजुरांची संख्या बरीच होती हें होय. ख्रिस्ती, मुसुलमान वगैरे लोकांत हें प्रमाण निरनिराळें आहे. कूर्ग लोकांत १००० पुरुषांस ९७९ स्त्रिया व लिंगायतांमध्यें १०३८ स्त्रिया असें प्रमाण आहे. [कोडगू लोकांच्यासंबंधीं माहितीकरितां "कोडगू" पहा.]

शे त की:- कूर्गमधील जमीन सुपीक असून तेथें मुख्य पीक तांदुळाचें होतें. पाऊस बराच पडत असून ओढे व नाले पुष्कळ असल्यामुळें पाणी देण्याची कृत्रिम सोय करण्याची जरुरी नसते. पूर्वी तांदुळाच्या खालोखाल वेलदोड्याचें उत्पन्न महत्त्वाचें होतें व शेतकर्‍याकडून ठराविक दरानें सर्व माल सरकार खरेदी करीत असे. हल्लींहि शेतें सरकार खंडानें देतें. हल्ली वेलदोड्याची किंमत फार उतरल्यामुळें जे लोक वेलदोड्यांच्या मळ्यांवर अवलंबून असत, ते फार गरीब झाले आहेत. घाटमाथ्यावर व दर्‍यांतील मळ्यांमध्यें हीं झाडें आपोआप होतात. मोकळ्या जागेंत एखादें मोठें झाड फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यांत पाडलें असतां जमिनीच्या हादरण्यामुळें लहान झाडांनां कोंब फुटून तिसर्‍या वर्षी बोंडें येतात व सप्टेंबर किंवा आक्टोबरमध्यें पीक मिळतें. या झाडांपासून ६।७ वेळ चांगलें पीक घेतां येतें. पुढें त्या झाडांत जोर येण्याकरितां त्यांच्यावर पूर्वीप्रमाणें मोठें झाड पाडावें लागतें.

गेल्या ५० वर्षांत कूर्ग प्रांतांत कॉफीच्या लागवडीला बरेंच महत्त्व प्राप्‍त झालें आहे. नलकनादजवळ मोपला लोकांनीं कॉफीची लागवड प्रथम सुरू केली असावी. यूरोपियन लोकांनीं पहिला मळा १८५४ त मर्कारा येथें सुरू केला. कॉफीच्या मळ्यांपासून खात्रीनें व सहज पैसा मिळवितां येईल या समजुतीनें पुष्कळ लोकांनीं हा धंदा स्वीकारिला. त्यावेळीं तद्देशीय रहिवाशांपासून विकत किंवा सरकारकडून नुसतें विचारिलें असतां जमिनी मिळत; त्यामुळें कॉफीच्या लागवडीकरितां लाखो रुपये खर्च होऊं लागले. कॉफीस एक प्रकारचे किडे व दुसर्‍या नैसर्गिक अडचणीमुळें बराच त्रास झाला, तरी पण म्हैसूर व इतर भागांतून मजुरांचा पुरवठा चांगला झाल्यामुळें या धंद्याची बरीच वाढ झाली. अलीकडे ब्राझिलमधून कॉफी येऊं लागल्यामुळें येथील कॉफीचा भाव उतरला व पुष्कळांनां आपले मळे सोडून द्यावे लागले.

केळीं व नारिंगें हीं येथील मुख्य फळें होत. पाळींव जनावरांनीं येथील हवा चांगलीशी मानवत नाहीं. म्हैस, डुक्कर, गाढव, बकरा वगैरे प्राणी येथें चांगले असतात; परंतु शेळ्यांना मात्र हवा मानवत नाहीं.

भाताच्या जमिनीला दर एकरीं १ रु. ८ आ. ते ४ रु. ८ आ. व कॉफीच्या जमिनीला दर एकरीं ८ आ. ते २ रु. ४ आ. पर्यंत सारा पडतो.

जं ग लें:- राखलेल्या जंगलांचें क्षेत्रफळ जवळजवळ ५०० चौरसमैल असून दुसरी संरक्षित जंगलें आहेत तीं येणेंप्रमाणें :- घाट जंगलें: देवरकाडू (पवित्र रान), उरुद्वे (खेडेगांवीं जंगलें), व पैसारी (सरकारी ओसाड भाग).

धं दे व व्या पा र.- मोठे कारखाने कूर्गमध्यें मुळींच नाहींत. कूर्गमध्यें होणार्‍या सुर्‍या साधारण  बर्‍या असतात. उत्तर भागांत जाडेभरडें कापड व संटिवारसंटे येथें चांगले कापड होतें. सोमवार पेठ व कोडली पेठ येथें थोडाबहुत व्यापार चालतो. दक्षिण कूर्गमध्यें गोणिकोप्पल, अम्मत्ति व सिद्दापूर; आणि उत्तर कूर्गमध्यें सुंटिकोप्प व संटिवारसंटे येथें मोठे बाजार भरतात. येथील मुख्य आयात माल: - रगी, हरभरा, तांदूळ, डाळी, साखर, मीठ, तेल व कापड. निर्गत माल:- कॉफी, वेलदोडे, तांदूळ, नारिंगें, चंदन, इमारती लांकूड व कांतडीं.

द ळ ण व ळ ण:- म्हैसूरमध्यें पेरियापट्टणपासून एक रस्ता पश्चिमेकडे फ्रेजरपेठ व मर्कारावरून, संपजी घांटांतून मंगलोरकडे गेलेला आहे; व दुसरा रस्ता, सिद्दपूर आणि वीर राजेंद्रपेठवरून, पेंर्यंबरी घांटांतून तेलिचेरीपर्यंत जातो. या दोन मुख्य रस्त्यांशिवाय दुसरे लहान लहान रस्ते आहेत. म्हैसूरपासून मर्कारापर्यंत रोज मोटार जाते. माणसीं आठ रुपये भाडें पडतें.

रा ज्य का र भा र:- हा प्रांत प्रत्यक्ष हिंदुस्थान सरकारच्या हाताखालीं असून म्हैसूरचा रेसिंडेंट हाच येथील चीफ कमिशनवर असतो. त्याचें मुख्य ठाणें बंगलोर येथें आहे. खुद्द कुर्गवर एक कमिशनर असून तो मर्कारा येथें रहातो. नंजराज पट्टण, मर्कारा, पादिनालकनाड, येदेनाल कनाड, व कितग्गनाद असे कूर्गचे ५ तालुके असून त्यांवर सुभेदार नेमिलेले आहेत. तालुक्याच्य विभागांनां नाड; नाडाच्या विभागांना मागनी; व मागनीच्या विभागाला ग्राम असें म्हणतात.

शि क्ष ण:- स. १९११ त येथें मुलांच्या ९१ शाळा व मुलींच्या ७ शाळा होत्या. शिवाय संस्थांपैकीं १ हायस्कूल, एक लोअर सेकंडरी स्कूल व मर्कारा येथील ट्रेनिंग स्कूल असून बाकी सर्व शाळा प्राथमिक शिक्षणाच्या आहेत. उच्च शिक्षणाकरितां म्हैसूर, बंगलोर किंवा मद्रास येथें जावें लागतें. येथील लोकांच्या चालीरीतीत मोकळेपणा बराच आहे. कोडगूंमध्ये स्त्रीशिक्षण बरेंच वाढलें आहे.

वै द्य की य:- मर्कारा व वीरराजेंद्र पेठ येथें सरकारी रुग्णालयें व नपोकू, गोनी कोप्पाळ सोमवार पेठ, सुंटिकोप्प, सिद्दपूर आणि पोल्लिबेद येथें लोकलफंडांतून चालविलेले दवाखाने आहेत. ताप व फुफ्फुसविकार हे येथील मुख्य रोग होत.

मो ज णी:- पहिली मोजणी केवळ भूगोलविषयक असून १८१७ त झाली. १८६२ ते १८७४ या वर्षांच्या दरम्यान मद्रासच्या मोजणीखात्यानें या प्रांताची स्थलवर्णनविषयक मोजणी व कॉफीच्या मळ्यांची मोजणी केली. १९०२ त या प्रांताची मोजणी व जमाबंदी झालेली होती.

[संदर्भ ग्रंथः- राईस कूर्ग ग्याझे; रिचलर-एथनॉग्राफिकल् कास्टस् ऑफ कूर्ग; मेमॉयर ऑफ कोडगू सर्व्हे; म्यागलिंग- कूर्ग मेमॉयर; हार्डी- रिपोर्ट ऑन कूर्ग; कूर्ग सेन्स स्. रि. १९११. स्मिथऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ इंडिया; बील-ओरि. बायॉ. डिक्शनरी; गजेंद्रगडकर व नरगुंदकर-कूर्ग-प्रांताचा खरा इतिहास].

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .