विभाग अकरावा : काव्य - खतें
कृति- पूरुकुलोत्पन्न हस्तिपुत्र देवमीढ अथवा द्विमीढ याच्या वंशांत जन्मलेल्या सन्नतिमान् राजाचा पुत्र. याने हिरण्यनाभापासून प्राच्य सामाच्या सहा संहिता संपादल्या होत्या. प्राच्य सामांचा उल्लेख वैदिक ग्रंथांत आढळत नाहीं. याचा पुत्र नीपराजा [भाग स्कं. ९, अध्याय २१].