प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें       

कृमिसमूह- (वर्म्स) कृमि किंवा वळवळणारे जंतू ह्यांचा एक फार मोठा समुदाय बनलेला आहे. हा कृमिसमुदाय अनेक भिन्नजातीय कृमिवर्ग मिळून झालेला आहे व परस्पर भिन्न असे १२ वर्गाचें कृमी ह्यांचा समावेश यांत करण्यांत येतो. परंतु या वर्गाच्या प्राण्यांचा आपापसांतील संबंध अजून पूर्णपणें उलगडलेला नाहीं. 'कृमि' म्हणून संबोधिलेल्या सर्वसामान्य प्राण्यांचे दोन कृत्रिम भाग करतात. एका भागांत वर निर्दिष्ट केलेले १२ वर्ग येतात. यांतील प्राण्यांच्या शरीराची ठेवण अशी बनलेली असतें कीं, त्यांचें शरीर एकामागून एक अशीं लागलेली वलयें अथवा लहान लहान खंड यांचें झालेलें नसून तें सरसकट सपाट अथवा वर्तुलाकार अखंड असें झालेलें असतें. दुसर्‍या भागांत मोडणार्‍या कृमिवत् प्राण्यांचें शरीर हें एकामागून एक अशी लागलेली वलयें अथवा लहान लहान खंड मिळून झालेलें असतें व ती वलयें किंवा ते खंड आपणाला बाह्यतः मोजतां येतात. ह्य दुसर्‍या कृमिवत् प्राण्यांचा एक स्वतंत्र वर्ग 'वलयांकित शरीरप्राणी' (अ‍ॅन्युलाटा अथवा अन्नेलिडा) असा करण्यांत येतो. कृमि ह्या प्रकरणांत पहिल्या प्रतीच्या म्हणजे अखंड शरीराच्या कृमिसमूहाचा विचार करावयाचा आहे.

पृथ्वीच्या पाठीवर जे थोडे प्राणी अगदीं पहिल्यानें उदयास आलें त्यांची शरीरें आकारशुद्ध असून त्यांच्या शरीररचनेमध्यें तारकितांगसासदृश्य प्राधान्येंकरून आढळून येतें. परंतु ह्याच प्राण्यांपैकीं कांहींनीं ती आपली आकारशुद्धता गमाविली व ज्यांचें कृमीमध्यें रूपांतर झालें त्यांनीं आपल्या शरीराचा एखादा एक विशिष्ट भाग एकाच दिशेनें नेहमी पुढें पुढें सरकविण्याचा प्रयत्‍न केला व त्यामुळें जरी त्यांचे ताराकितांगसादृश्य नाहीसें झालें तरी त्यांना दुसरा एक अमूल्य फायदा झाला तो हा कीं, त्यांच्या शरीराला शीर्ष व पार्श्वभाग हे प्राप्‍त झाले. या पुढच्या भागावर किंवा शीर्षावार साहजिकच आजूबाजूच्या व सभोंवारच्या पदार्थांचा पहिल्यानें संस्कार होऊन त्या भागांत ज्ञानग्राहक ज्ञानपेशी विशेष पूर्णतेस आल्या व त्या भागांत शीर्षज्ञानकंदा (सेरिब्रल गॅग्लिअन) चा उदय झाला. या असल्या क्षुद्र कृमींच्या शीर्षज्ञानकंदाची उत्पत्ति व मेंदूचा आरंभ याच्यांत साम्य दिसून येतें. हें सूज्ञ वाचकांच्या ध्यानांत आलेंच असेल. कारण डोकें पुढें पुढें हलविण्याची ही फायदेशीर संवय व मेंदूची घटना ह्यांचा परस्पर निकट संबंध आहे असें दिसून येतें.

कृमिसमूहामध्यें आणि त्यांच्या नंतरच्या सर्व वरिष्ठ प्राणिवर्गांमध्यें दोन विशिष्ट गोष्टी आढळून येतात त्या दोन गोष्टी आद्यजंतु (प्रोटोझोआ), समुदित सच्छिद्र (पोरिफेरा) व शारीरांत्रैक गूहक (कोलेन्टेराटा) ह्या तिन्ही वर्गांमध्यें मुळींच आढळून येत नाहींत. या दोन गोष्टी म्हटल्या म्हणजे कृमी व त्यांच्या वरिष्ठ वर्गांतील सर्व प्राण्यांमध्यें सांपडणारें मध्यास्तर (मेसोब्लास्ट) व शरीरगुहा (कोलोम) ह्या होत. बाह्यास्तर (एपिब्लास्ट) आणि अंतरास्तर (हायपोब्लास्ट) यांच्यामध्यें उत्तम प्रमाणांवर दिसणारें मध्यास्तर आणि पचनेंद्रियनलिकेपासून निराळी अशी शरीरगुहा आपणास यापुढें ह्यांच्यापेक्षां वरिष्ठ प्राण्यांच्या समुदायांत सदोदित आढळण्यांत येतील. कृमिसमूहामध्यें त्या दोन गोष्टी हळू हळू दृश्यमान होत जातात. अगदीं कनिष्ठ दर्जाच्या कृमिकुलांत मध्यास्तर आणि शरीरगुहा बहुतेक नसतातच असें म्हटल्यास चालेल. कृमिसमूहांतील दोन संघांचा येथें विचार करूं. हे दोन संघ म्हटले म्हणजे एक पर्णकृमि (प्लॅटिहेल्मिंथीस) आणि दुसरा वर्तुलाकार कृमि (नेमाथेल मिथीस) हे होत. या दोन संघांचा वलयांकित शरीरप्राणि (अन्युलाटा)संघाशीं कांहीं संबंध नाहीं; कारण या दोन संघांतील कृमी अखंडशरीर असतात म्हणजे त्यांच्या शरीरात वलयांसारखे विभाग दिसून येत नाहींत.

प र्ण कृ मि सं घ- (प्लॅटिहेल्मिन्थीज) पर्णकृमि या संघांत प्राण्याचें शरीर बहुतेक चपटलेलें असतें. हा संघ परंपरा असलेल्या तीन मुख्य वर्गांचा मिळून झालेला आहे व ते वर्ग टर्बिलेरियन्स ट्रिम्याटोडस व सेस्टोडस हे होत. यांच्यांत मध्यास्तराचा भाग वरून खालीं किंवा पृष्ठोदरतलरीत्या पॅरेंकायमा नांवाच्या घट्ट पेशिससमुच्चयाचा बनून झालेला आहे. याच्यांत शरीरगुहा अशी बनलेली नसते, शीर्षाच्या भागांत मेंदुवत शीर्षज्ञानकंदाचा आरंभ नुकताच झालेला आढळतो. मलोत्सर्गाचें इंद्रिय शरीराच्या दोन्ही अंगाला दोन नळ्यांच्या रूपानें बनलेलें असून त्या नळ्यांनां लहान लहान असंख्य फांटे फुटलेले असतात आणि या फांट्यांच्या शेवटीं चमत्कारिक पेशी बनलेल्या असतात त्यांनां ज्योतपेशी (फ्लेमसेल्स) म्हणतात. ह्या संघांतील बहुतेक सर्व कृमी उभयलिंगी आहेत. ह्या तीन वर्गांतील कृमींविषयीं कांहीं गोष्टी लक्ष्यांत ठेवण्याजोग्या आहेत त्या या कीं, बहुतेक सर्व टर्बिलोरियन कृमी जमिनीमध्यें अगर पाण्यामध्यें स्वतंत्रपणें राहतात. परंतु सर्व ट्रिम्याटोड वर्गांतील कृमी परोपजीवी आहेत. म्हणजे त्यांचें स्वतःचे पोषण व उपजीविका दुसर्‍या एखाद्या प्राण्यावर अवलंबून असते. यांच्यांतील कांहीं कृमी दुसर्‍या प्राण्यांच्या शरीराला बाह्यतः घट्ट चिकटून असतात तर कांहीं कृमी दुसर्‍या प्राण्यांच्या शरीरांत प्रवेश करून तेथेंच आपला काळ कंठितात असले दोन्ही तर्‍हेचे बाह्य व अंतःपरोपजीवि कृमी ट्रिम्याटोड वर्गांत आढळतात. सेस्टोड वर्गांतील कृमी दुसर्‍या प्राण्याला बाहेरून चिकटलेले नसतात, परंतु ते त्या प्राण्याच्या शरीराच्या आंतील भागीं कायमचें ठाणें देऊन बसलेले आढळतात. म्हणून सेस्टोड कृमीनां अंतःपरोपरजीवी (इन्टर्नल पॅरासाइट) कृमी म्हणतात.

विशालकृमिसंघांतील सर्व कृमींमध्यें ज्योतपेशी आढळतात. मलोत्सर्जक नळ्यांच्या बारीक फांट्यांचें प्रत्येक टोंक एका पोकळ पेशीमध्यें शेवट पावतें व त्या पेशीच्या तळाला आंतून हालणारे नाजूक केस लागलेले असून ते एकसारखे दिव्याच्या ज्योतीप्रमाणें हालत असतात. म्हणूनच ह्या पोकळ पेशीनां "ज्योतपेशी" म्हणून संबोधण्यांत येतें.

वर्ग प हि ला, ट र्बि ले रि या, लक्षणें:- यांतील कृमी अखंड शरीर असतात म्हणजे त्यांच्या शरीराचे बाहेरून वलयें किंवा दुसर्‍या तर्‍हेचे खंड झालेले असे विभाग पडलेले दिसत नाहींत. त्यांच्या शरीराचा आकार पर्णासारखा अथवा पानासारखा असतो. हे कृमी गोड्या किंवा सांठलेल्या अगर खार्‍या पाण्यांत सांपडतात. दलदलीच्या ओल्या जागेंतहि हे कधीं कधीं आढळतात. हे कृमी मांसाहारी आहेत. याच्यांतील क्वचितच एखादा कृमि परोपजीवी असा आढळतो. ह्या कृमींच्या शरीराच्या रचनेंत विशेषतः पहिल्यानेंच उभयांगसादृश्य आढळून येतें. बाह्यत्वचेवर केंसांची लव बनलेली असून त्यांत पुष्कळ वेळा पिंडपेशी बनलेल्या असतात व 'र्‍हावडाइट' नांवाचे लहान लहान  दांडेहि झालेले असतात.

हे दांडे कृमीला डंवचल्यास बाहेर बाणासारखे उठतात. शरीराच्या पूर्वभागांत ज्ञानकंदाची (ग्यांग्लियन) जोडी बनलेली असते; व त्या ज्ञानकंदापासून दोन ज्ञानरज्जू निघून शरीरांत पसरतात. पचनेंद्रिय(फूड कॅनाल)नलिकेला बाहेर पडूं शकेल असें मांसल गलविवर (फॅरिक्स) असतें व तिला पुष्कळ फांटे फुटलेले असतात. परंतु नलिकेच्या शेवटीं गुदद्वार झालेलें नसून ती बंद असते. या कृमींच्या शरीरांत रक्तवाहिन्या अगर श्वसनेंद्रियें आढळून येत नाहींत. शरीरगुहा जवळ जवळ झालेली नसतेच असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. मलोत्सर्गेंद्रिय (एक्सक्रीटरी सिस्टिम) दोन उभ्या नळ्यांच्या रुपानें झालेलें असतें व त्या नळ्यांनां असंख्य फांटे फुटलेले असतात व प्रत्येक फांट्याच्या शेवटीं "ज्योतपेशी" लागलेली असते. ह्या वर्गांतील बहुतेक सर्व कृमी उभयलिंगी असतात. यांचीं अंडीं कवचीनें अगर कोशानें झांकलेलीं असतात व परिपूर्णतावस्थेंत त्यांची वाढ होत असतांना त्यांच्यांत वेळेवर रुपांतरें होत असलेलीं आढळून येतात. यांच्यांतील वेळेवर रुपांतरें होत असलेलीं आढळून येतात. यांच्यांतील कांहीं प्राण्यांमध्यें प्रजाजनकत्व प्राणी विभागून जाऊन होत असतें. ह्या टर्बिलेरिआ कृमींमध्यें व शारीरांत्रैक गुहकांमध्यें कांहीं आप्‍तसंबंध असावा असें दिसतें व विशेषेंकरून यांच्यांत व ककंतसमगात्रजीवांमध्यें तो जास्त असावा.

व र्ग दु स रा ट्रि म्मा टो डा लक्षणें:- यांतील कांहीं कृमी पर्णाकृति असतात व कांहीं नळकंड्यासारखे गोल असून ते बाह्य किंवा अंतःपरोपजीवी कृमी आहेत. त्यांच्या या परोपजीवी राहणीमुळें त्यांच्या आंगावर केंसासारखी लव आढळून येत नाहीं; पुन्हां दुसर्‍या प्राण्यांनां बिलगून राहतां येईल अशा तर्‍हेच्या तुंबडीवजा कित्येक चोषणतबकड्यांनां आंकडे बनलेले असतात व कित्येक वेळां या तबकड्यांनां आंकडे बनलेले असतात. यांस जाड असें बाह्यत्वचावरण बनलेलें नसतें व बाह्यत्वचाहि पुढें बहुतेक नामशेष होतें. इंद्रियबोध होणारे अवयवहि झालेले नसतात. या वर्गांतील कृमी, त्यांचे पूर्वज जे टर्बिलेरिया या वर्गांतील स्वतंत्र कृमी यांच्याप्रमाणेंच असावेत असा अंदाज आहे. कारण टर्बिलेरिया कृमींप्रमाणें ट्रिमाटोड कृमींमध्ये शरीर अखंड असतें, शीर्षज्ञानकंद व त्यांच्यापासून पूर्व व पश्चिम शेवटीं जाणार्‍या दोन ज्ञानरज्जू असतात. शरीरगुहाहि अस्पष्ट असते व मलोत्सर्जक नळ्या व त्यांचे असंख्य फांटे फुटणें या क्रिया आढळून येतात. तसेंच ट्रिमाटोड कृमी उभयलिंगी असून त्यांची जननेंद्रियें गुंतागुंतीचीं बनलेलीं असतात. तथापि यांच्यामध्यें जननेंद्रियें, मलोत्सर्ग-इंद्रियें व ज्ञानेंद्रियें टर्बिलेरिया कृमींच्यापेक्षां जास्त पूर्णत्वानें विकास पावतात. पचनेंद्रियनलिका बहुतकरून दुभागून जाते व तिला पुष्कळ वेळां फांटे फुटतात व ती पश्चिमशेवटीं बंद असते. या वर्गांतील सर्व कृमी परोपजीवी असतात हें सांगितलेंच आहे. ते बाह्यपरोपजीवी अगर अंतःपरोपजीवी असतात व ते एखाद्या सपृष्ठवंश प्राण्याला किंवा अपृष्ठवंश प्राण्याला चिकटलेले आढळतात. या वर्गांतील पुष्कळ असे आहेत कीं ते स्वतः स्वतंत्र रीतीनें फलद्रुप होऊं शकतात, तर दुसर्‍यांमध्यें फलद्रुपता एकमेकांचा संयोग झाल्याशिवाय घडून येत नाहीं. बाह्यपरोपजीवी कृमी परिपूर्तितावस्थेंत सरळ सारखे विकास पावत नाहींत; व बहुतकरून त्यांचा दर पिढींत थोडा फार विकास होत असतो. ज्या कृमीचा सरळ सारखा विकास होत नाहीं व ज्यांची वाढ पूर्ण होण्यास दोन बाहेरचे परजीव लागतात ते कृमी आपल्या आयुष्याचा परिपूर्तितावस्थेंतील थोडा काल पुष्कळ वेळां एखाद्या अपृष्ठवंश प्राण्यांमध्यें घालवितात.

ह्या कृमिवर्गात यकृत-कमी वगैरेंसारखे प्राणी मोडतात. हे यकृत-कृमी मेंढरांच्या यकृतांत व पित्तस्रोतसांत आढळतात. त्यांच्यामुळें मेंढरांची फार हानि होते. या कृमींच्यामुळें होणार्‍या रोगाला नुसत्या ग्रेटब्रिटनमध्यें १० लाख मेंढरें प्रतिवर्षी बळी पडतात. हे कृमी घोड्यांमध्यें, हरणामध्यें, उंटामध्यें व इतर गुरांमध्यें देखील आढळतात.

व र्ग ति स रा:— सेस्टोडा या वर्गांतील कृमी दुसर्‍या प्राण्यांच्या शरीराच्या आंत रहाणारे परोपजीवी प्राणी होत. यांच्या आयुष्यक्रमांत दोन स्थित्यंतरें होत असतात. पहिल्या स्थित्यंतराला प्रोस्कोलेक्स म्हणजे फुग्याची अवस्था म्हणतात. या सुमाराला हा कृमि अपृष्ठवंश अथवा सपृष्ठवंश यापैकीं एखाद्या प्राण्यामध्यें सांपडतो. दुसरें स्थित्यंतर म्हटलें म्हणजे स्ट्रोनीला म्हणजे नाडीकृमि  अथवा फीतकृमिअवस्था होय. ह्या अवस्थेंत असलेला कृमि एका अपवादाखेरीजकरून सपृष्ठवंशातील प्राण्यांमध्येच तेवढा आढळतो. ह्या वर्गांतील कांहीं कृमींमध्यें शरीर अखंड असलेलें आढळतें.  तर दुसर्‍यांत बाह्यतः शरीर अखंड दिसतें तरी आंतून त्यांचीं  जननेंद्रियें ओळीनें क्रमश: बनलेलीं आढळतात. दुसर्‍या पुष्कळ कृमींत शरीर सांखळीप्रमाणे अनेक दुव्यांचें बनलेलें असून त्या दुव्यांस प्रोग्लॉटीडिझ् म्हणतात व प्रत्येक प्रोग्लॉटीडमध्यें जननेंद्रियांचे जोड झालेले असतात. तेव्हां ह्या वर्गांत अखंड शरीरांतून खंडसहित शरीरांत संक्रमण होत असलेले कृमी आढळतात. तरी पण या शेवटल्या प्रकारच्या कृमीत शरीराचे खंड स्पष्ट रीतीनें बनलेले नसतात.

या वर्गांतील मुख्य उदाहरण म्हटलें म्हणजे लांब जंत हे होय. हा कृमि फितीसारखा लांबलचक असतो. ह्याचें शरीर म्हटलें म्हणजे अनेक खंडांची मिळून झालेली माळ होय. या प्रत्येक खंडाला प्रोग्लॉटीड म्हणतात. व ह्या प्रत्येक खंडात जननेंद्रियें बनलेलीं असतात. ह्या फितीसारख्या दिसणार्‍या कृमीचें शरीर उभयांगसदृश असतें. शरीराच्या पूर्वशेवटीं शीर्षाप्रमाणें भाग असून त्याला आंकडे अगर खांचण्या असतात. तसेंच चोषणचकत्या लागलेल्या असतात. आकड्यांच्या व चकत्यांच्या साहाय्यानें ह्या कृमींनां दुसर्‍या प्राण्यांच्या पचनेंद्रियनलिकेला चिकटून राहतां येतें. शरीरावरण अथवा शरीरभित्ति ही कांहीं धातूंचे थर मिळून बनलेली आहे. तिचा बाह्य थर हा ज्ञानतंतुमय बाह्यत्वचेचा बनलेला असून त्यावर पातळ त्वकपापुद्रा (क्यूटाइड) आलेला असतो. त्याच्या आतील थर सारख्या लांब व रुंद पेशीनिर्मित संयोजक धातूचा झालेला असतो व पुष्कळ वेळा याच्या पृष्ठावर चुनखडीक्षारांचें मिश्रण झालेलें असतें. या संयोजक धातूच्या थराच्या खालीं उभे व आडवे अशा रीतीनें लागलेल्या बिनपट्ट्याच्या स्नायूंचा दुहेरी थर झालेला असतो. ज्ञानेंद्रियसमूह हा दोन अगर अधिक उभ्या ज्ञानरज्जूंचा मिळून झालेला असतो व त्या रज्जू पूर्वशेवटी आडव्या ज्ञानरज्जूंच्यामुळें जोडल्या जातात. या प्राण्यांत विशिष्ट ज्ञानेंद्रियें बनलेलीं नाहींत. ह्याला पचनेंद्रियनलिका नसते व तिची त्याला गरजहि नाहीं. कारण हा कृमि दुसर्‍या प्राण्यांच्या शरीरांतील पचन झालेल्या अन्नरसांत तरंगत असतो, व हा आपल्या शरीराच्या सर्व भागांनीं तो अन्नरस शोषून घेतो. रक्तवाहिन्यासमूह किंवा श्वसनेंद्रियें ह्या कृमीमध्यें सांपडत नाहींत. या प्राण्यांत शरीरगुहा म्हटली म्हणजे सारख्या लांब रुंद पेशीनिर्मित संयोजक धातूच्या त्या पेशींतील विस्कळीत अंतरचिरा ह्यांचीच बनलेली आहे. या शरीरगुहेमध्यें कोठें कोठें ज्योतपेशी असलेल्या आढळून येतात. ह्या ज्योतपेशी मलोत्सर्जक इंद्रियाच्या नळ्यांच्या अगदी बारीक  फांट्यांच्या शेवटीं लागून असतात. ह्या मलोत्सर्गनळ्या शीर्षामध्यें एकमेकांशीं आडव्या वर्तुलाकार नलिकेनें जोडल्या जातात. तसेंच एका आडव्या नलिकेनें त्या शरीराच्या प्रत्येक खंडामध्यें जोडल्या जातात व शरीराच्या शेवटीं एक किंवा अधिक रंध्रांनीं उघडतात. सर्व प्रकारचे लांब कृमी उभयलिंगी आहेत व बहुतेकांमध्यें अंडीं स्वतःच्या शरीरांतच स्वतःच्या शुक्रबीजांशीं संयोग पावून फलद्रुपता पावतात. पसरट असें बनलेलें मुष्क एक शुक्रस्तोतस व त्याचा बाहेर काढतां येण्याजोगा अंतिम शेवटचा भाग, ज्याचा शिश्नाप्रमाणें उपयोग होतो तो, असे पिळून पंचननेंद्रिय झालेलें आहे. स्त्रीजननेंद्रियामध्यें दोन अंडकोश, बलकपिंड, कवचपिंड, योनिभाग-ज्याच्यामध्यें शुक्रबीजाचा प्रवेश होतो तो, शुक्राशय- ज्याच्यामध्यें शुक्रबीज सांठलें जातें तें-व गर्भाशयाचा भाग, ज्याच्यांत अंडी विकास पावतात तो, इतक्यांचा समावेश होतो. फलद्रुप झालेल्या अंड्यापासून गर्भ तयार होतो व तो प्रोस्कोलेक्स अथवा फुग्याची अवस्था ह्यांत स्थित्यंतर पावतो. ही अवस्था त्याला दुसर्‍या विवक्षित प्राण्याच्या शरीरांत प्राप्‍त होते व ह्या अवस्थेंत शीर्षाचा भाग घडला जातो. ही प्रोस्कोलेक्स अथवा फुग्याची अवस्था पावलेला कृमिगर्भ ज्या प्राण्याच्या शरीरांत बनतो तो प्राणी दुसर्‍या एखाद्या प्राण्याकडून खाल्ला गेल्यास त्या दुसर्‍या प्राण्याच्या पोटांत ह्या कृमीची दुसरी माजास येणारी अवस्था पूर्णत्व पावते. ह्या दुसर्‍या स्थित्यंतरास स्कोलेक्स म्हणतात व त्यापासून लांबकृमि अथवा नाडीकृमि बनून तयार होतो. एकंदरींत हे कृमी अंतःपरोपजीवी प्राणी असल्याकारणानें यांच्यात बाह्यवस्तूला अडकून रहाण्याची अवयवरूपीं साधनें बनलेलीं असतात. तसेंच त्याच कारणामुळें यांच्यात विशिष्ट ज्ञानेंद्रियें झालेलीं नसून ज्ञानेंद्रियसमूह थोडासा गुंतागुंतीचा बनलेला असतो. तरी तो खालच्या दर्जाचा आहे. याची पचनेंद्रियनलिका बनलेली नाहीं व ह्या प्राण्यांत फलद्रुपता विपुलतेनें आढळून येते.

लां ब जं त.— (टीनिआसोलियम) लांबजंत अथना नाडीकृमि याला इंग्रजी भाषेंत टेपवर्म म्हणतात. हा कृमि वर सांगितल्याप्रमाणें फितीसारखा लांबलचक असतो. याचा रंग पांढरा असतो. पूर्ण वाढ झाल्यावर ह्याची लांबी सहा फूट भरते. ह्या कृमीचें शीर्ष मनुष्याच्या पचनेंद्रियनलिकेच्या आंत्राच्या भित्तीला रोवलेलें आढळतें. मनुष्यप्राण्याला ह्या कृमीमुळें फार त्रास पोंचतो व विशेषतः डुकराचें मांस खाणार्‍या लोकांनां ह्याचा मुख्यत्वेंकरून उपद्रव होतो. ह्या कृमीला त्याचा आयुष्यक्रम पुरा करण्यास त्याच्या आयुष्यात दोन निराळ्या जातीच्या सस्तन प्राण्यांचा आश्रय करावा लागतो. कांहीं काळपर्यंत हा कृमि डुकराच्या पोटामध्यें अथवा मांसामध्यें सांपडतो व नंतर तो मनुष्याच्या पोटामध्यें पूर्णावस्थेंत आढळतो. ह्या कृमीचें शरीर सांखळीप्रमाणें असून त्या सांखळीची प्रत्येक कडी ही ह्या कृमीच्या शरीराचा एक स्वतंत्र भाग किंवा खंड होय. ह्या भागाला अथवा खंडाला प्रोग्लॉटीस म्हणतात. पूर्वशेवटी शीर्ष असतें. शीर्षाच्या चोहों अंगाला चोषणकत्या असतात व त्यांच्या वरच्या अंगाला एक आंकड्यांचे चक्र बनलेलें असतें. या आंकड्याच्यामुळें तो आपलें डोकें मनुष्याच्या अंगाच्या भिंतीत खुपसतो. प्रत्येक प्रोग्लॉटीस खंडामध्यें जननेंद्रियाचें सर्व भाग पूर्णपणें झालेले असतात. याच्या शरीराच्या पश्चिम शेवटांची प्रोग्लॉटीस खंडें कांहीं वेळानें तुटून निराळीं पडतात व हीं निराळीं झालेलीं खंडें मनुष्याच्या पचनेंद्रिय नलिकेंतून मलद्वारावाटे बाहेर टाकलीं जातात. ह्या प्रोग्लॉटीस खंडांत लहान लहान अंडीं तयार होतात व तीं फलद्रुप होऊन त्यांपासून अपक्व गर्भ टणक अंडकवचांनीं आच्छादित असे बनले जातात; व अशा अनेक टणक अंडकवचांनीं तो प्रोग्लॉटीस फुगला जातो. जेव्हां हा फुगून ताणलेला खंड फुटतो तेव्हां हीं अपक्व गर्भानें भरलेलीं अंडकवचें मोकळीं होतात. जर हीं अंडकवचें विष्टाहारी डुकराच्या खाण्यांत आलीं तर डुकराच्या पचनेंद्रियनलिकेंत पाचक रसाच्या क्रियेनें त्यांची कवचें विरघळून जाऊन त्यांतील अपक्क गर्भ, ज्यांनां बहुतकरून सहा आंकड्यांचे चक्र लागलेलें असतें असे, तेथें मोकळे होतात. हे सहा आंकड्यांचे अपक्क गर्भ लागलेच त्यांच्या आकड्यांच्या मदतीनें डुकराच्या आंत्राच्या भित्तीला आरपार भोंक पाडून त्यांतून बाहेर पडतात व डुकराच्या मांसांत अथवा स्नायूत किंवा दुसर्‍या अवयवांत जाऊन तेथें स्थिरता पावतात, व त्यांच्या सभोंवती एक आवरण बनतें. येथें कांहीं वेळानें त्यांची पुढील वाढ होण्यास सुरुवात होते. त्यांचे सहा आंकडे गळून पडतात व ते आकारानें वाढूं लागतात. नंतर ते अचल राहून त्यांचेंहि फुग्याच्या अवस्थेंत स्थित्यंतर होतें व या अवस्थेंत लिंगभेद झालेला नसून ते नुसते वाढते फुगे असे झालेले असतात. ह्या फुग्याच्या अथवा 'प्रोस्कोलेक्स' अवस्थेंत त्याच्या अंतःपृष्ठापासून एका ठिकाणीं एक कोंब निघून तो फुग्याच्या पोकळींत वाढूं लागतो व त्या कोंबाचें पुढे शीर्षामध्यें रूपांतर होतें. ह्या स्थितींत त्याला फुगा असलेला कृमि म्हणतात. व अशा स्थितीप्रत पावलेलें हे फुगा- कृमी डुकराच्या मांसांत वास्तव्य करून रहातात. ज्या डुकराच्या मांसांत हे फुगाकृमी आहेत अशा डुकराचें दूषित मांस नकळत एखाद्या दुर्दैवी मनुष्याच्या खाण्यात आलें तर ह्या फुगा-कृमीला आपली वाढ पूर्ण करून घेण्यास संधि मिळते. ती अशी कीं त्या मनुष्याच्या पचनेंद्रियनलिकेंत या फुगा-कृमीचा शीर्षाचा भाग बाहेर पडतो. हा धाकटासा कृमि त्याच्या शीर्षाच्या पाठीमागें थोड्या आखूड मानेच्या भागानें त्या मोठ्या फुग्याला चिकटलेला असतो. नंतर हा फुग्याचा भाग निराळा पडून नाहींसा होतो. कां कीं तो कोणत्याही प्रकारें महत्त्वाचा नसतो व शीर्षाचा भाग आंत्रांत येऊन त्याच्या आंकड्यांनी आंत्राच्या भित्तीला चिकटून राहतो. येथें त्या शीर्षाला अन्नरसाचा पुरवठा पूर्ण मिळूं लागून तो सारखा वाढूं लागतो. त्याची पुढें वाढ होते. म्हणजे शरीराचे खंड एकामागून एक शीर्षाच्या भागापासून तयार झाले असतां पाठीमागें ढकलले जातात, व हे पाठीमागें सारलेलें जुने खंड जितके शीर्षापासून लांब असतील तितके ते पक्व दशेंत येऊं लागतात, व त्यांच्यांत जननेंद्रियाची वाढ होऊं लागते. वर सांगितल्याप्रमाणे हे अगदीं शेवटले खंड त्यांच्यात अंडीं फलद्रूप झाल्यावर निराळे पडतात व मनुष्याच्या विष्टेबरोबर बाहेर निघतात. ही विष्टा डुकरानें खाल्ली असतां त्याच्या शरीरांत त्यांचा प्रवेश होतो व पुढें वर वर्णन केल्याप्रमाणें त्यांची वाढ होते. ह्यांच्यापासून मनुष्याला उपद्रव होतो. म्हणून ह्यांच्या विषयींची माहिती महत्त्वाची आहे. ह्या जंतांचा उपद्रव होण्यास मध्यस्थी प्राणी डुकर होय. डुकराचें मांस शिजविल्यावर त्यांच्यांत एखादा फुगाकृमि जिवंत राहिला तर तो तें मांस खाणार्‍या मनुष्यामध्यें हटकून वाढून त्याला उपद्रव करितो.

टीनिआ मिडीओक्यानेलाटा हा जातिविशेषहि वरच्याप्रमाणेंच "टेपवर्म" ह्या नांवानें संबोधिला जातो, व तो मनुष्याच्या अंगामध्यें वाढतो. ह्याच्या शीर्षाला आंकडे नसतात. ह्या जंताचा उपद्रव होण्यास मध्यस्थ प्राणी म्हटले म्हणजे गाई, बैल हे होत. गाईच्या किंवा बैलाच्या मांसांत ह्याचें फुगाकृमि बनतात व गाईचें किंवा बैलाचें मांस खाणार्‍यास ह्याचा उपद्रव होतो. ग्रेटब्रिटनमध्यें ह्याचा उपद्रव फार होतो.

टीनिआ ईकायनोकॉकस म्हणजे कुत्र्यांत व लांडग्यांत सांपडणारा "टेपवर्म" होय. त्याच्या शरीराला चार खंड असतात व चवथा खंड सर्वांत लांब असतो ह्याच्यापासून मनुष्याला उपद्रव होतो. मनुष्याच्या यकृतामध्यें किंवा दुसर्‍या अवयवांत पुळीचा विकार ह्याच्या गर्भाच्या फुग्याच्या स्थित्यंतरांमुळें होतो. दूषित पाणी प्याल्यानें हे अपक्व गर्भ कवचाच्छादित अंड्यांच्या रूपानें मनुष्याच्या पचनेंद्रियनलिकेमध्यें शिरतात. पाण्यांतहि अशा तर्‍हेचीं अंडीं कुत्र्यांच्या किंवा लांडग्याच्या विष्ठेंतून प्रवेश करितात. पर्वतावरील पाण्याचें डबकें ओहोळ वगैरे अशा रीतीनें दूषित झालेले असतात तेव्हां तेथले पाणी पिणें फार धोक्याचें आहे. हा कृमि कुत्रा किंवा लांडगा ह्याच्या शरीरांत विकास पावतो व मनुष्य हा त्याचें स्थित्यंतर होण्यास लागणारा मध्यस्थ प्राणी होय.

व र्तु ला का र कृ मि सं घ(नेमॅरोहेलमिंथिस):— ह्यांतील कृमी आकारानें बहुश: लंबवर्तुलाकार असतात. म्हणून त्यांना वर्तुलाकार कृमी म्हणतात. या संघांतील खर्‍या वर्तुलाकार कृमींचा एक वर्ग आहे. त्याला वर्तुलाकारकृमि किंवा जंत म्हणतात व या वर्गांतील जंत कांहीं अंतःपरोपजीवी आहेत तर दुसरे पुष्कळ जंत स्वतंत्रपणें गोड्या किंवा खार्‍या पाण्यांत वावरणारे कृमी आहेत.

व र्तु ला का र कृ मि व र्ग.-(नेमॅटोडा) ह्या वर्गांतील कृमी शरीरानें अखंड असून त्यापैकीं कांहीं परोपजीवी आहेत तर कांहीं स्वतंत्रपणे कालक्रमणा करणारे आहेत. ह्या कृमींच्या शरीराच्या त्वचेवरील त्वकपापुद्रा पुष्कळ वेळां घट्ट किंवा जाड असा बनलेला असतो व पुष्कळवेळां तो झडून पडतो किंवा टाकिल जातो. यांच्या शरीरांतील स्नायूंची रचना लांबट मांसपेशी उभ्या बनून झालेली असते व पार्श्वभागीं दोहोंकडे त्यांच्यामध्यें अंतर राहून दोन बहीरेषा (लॅटरल लाइन्स) झालेल्या दिसतात. अन्ननलिकेसभोंवतीं ज्ञानरज्जूंचें एक वलय झालेलें असतें, व त्यापासून सहा ज्ञानरज्जू शरीराच्या पूर्वभागीं जातात व सहा पश्चिमभागीं जातात. पचनेंद्रियनलिका चांगली विकास पावलेली असते व तिला मुख व गुदद्वार झालेलें असून तिचे तीन विभाग आढळून येतात. रक्तवाहिनीसमूह व श्वसनेंद्रियें बनलेलीं नाहींत व शरीरांतील पोकळी ही शरीरगुहा नव्हे. मलोत्सर्गाच्या इंद्रियांची रचना विलक्षण असून तीं दोन बाजूंवर बनलेलीं असून त्या दोन्ही वाहिन्या पूर्णशेवटीं एकच सामान्य छिद्रानें उघडतात. ह्या कृमीमध्यें बहुश: लिंगभेद झालेला असतो, ते क्वचितच उभयलिंगी आढळतात. जननेंद्रियें जरी साध्या प्रकारचीं बनलेलीं असलीं तरी नर व मादी ह्यांमध्यें ठळक भेद दिसून येतो. ह्या कृमींचा एकंदर आयुष्यक्रम गुंतागुंतीचा असतो. विशेष लक्षांत ठेवण्यासारख्या कांहीं गोष्टी आढळून येतात त्या ह्या कीं, त्यांच्यामागें शुक्रबीज मंदगति कामरूप पेशीप्रमाणें असतें, केशरूपी लव मुळींच झालेली नसते व फिरत्या रक्षकश्वेतपेशी (मायग्रेटरी फॅगोसाइट्स) बनलेल्या नसतात.

जं त (अस्केरिस लुंब्रिकॉइड्स):- हें जंत मनुष्याच्या तन्वांत्रांत बहुश: सांपडतांत. ह्याच जातीचे दुसरे जंत घोड्यामध्यें बैलामध्यें आणि डुकरामध्यें सांपडतात. दोन्हीं शेवटीं निमुळती झालेली नलिका असते त्याप्रमाणें ह्यांच्या शरीराची आकृति बनलेली असते. व ह्यांच्या कातडीला कोणताच दुसरा रंग नसतो. फक्त ती पांढरी असते. पकारेडी म्हणजे ग्राऊस ह्या पक्ष्यांच्या नीचांत्रांत अगदीं बारीक जंत असतात. ते जिवंतपर्णी पारदर्शक असल्याकारणानें दिसून येत नाहींत. यांच्यांत नर मादीपेक्षा लहान असतो, व त्याच्या पुच्छाचा भाग अर्धवर्तुलाकार कमानीप्रमाणें वळलेला असतो, व त्याला दोन शृंगमय कंटक लागलेले असून त्याच्या पृष्ठावर पुष्कळ इंद्रियबोधक उंचवटे झालेले असतात. मादीमध्यें अंडीं अतोनात तयार होतात व तीं तिच्या गर्भाशयाप्रमाणें असणार्‍या अंडस्रोतसाच्या भागांत शुक्रबीजाशीं संयोग पावून फलद्रूप होतात. फलद्रुप झाल्यानंतर त्या प्रत्येक अंड्यासभोंवतीं एक कवच तयार होते व अशा स्थितींत ती मनुष्याच्या विष्ठेबरोबर बाहेर पडतात. हीं अंडी विकास पावून त्यापासून जंत कसे तयार होतात ह्याबद्दल संपूर्ण निश्चित माहिती ग्रथित नाहीं. तथापि कांही प्रयोगांच्या परिणामावरून इतकें निश्चितपणें म्हणण्यास हरकत नाहीं कीं ह्यांचा मनुष्याला संसर्गदोष होतो तो स्वतंत्रपणेंच होतो. ह्यांच्या मध्यें व मनुष्यामध्यें ज्याच्यापासून त्यांचा त्याला संसर्ग जडेल असा कोणी दुसरा मध्यस्थ प्राणी नसतो. बहुतकरून परिपूर्तितावस्थेंतील वाढ होत असलेलें व ज्याच्यांत अपक्व गर्भ झालेला आहे असें अंडें पाण्यांतून पाणी पित असतांना किंवा मातींतून चुकून व मातीच्या बरोबर मनुष्य आपल्या पचनेंद्रियांत घेतो व तेथें तो अपक्वगर्भ कवचापासून मोकळा होऊन पूर्णता पावतो अशा रीतीनें जंताचा उपद्रव होतो. मुलांनां माती खाण्याची संवय असते त्यामुळें जंतांचा उपद्रव त्यांनां विशेष होतो. ह्या कृमीमुळें बहुधा प्राणहानि होत नाहीं. तरी हे जंत श्वासनलिकेंत अगर पित्तस्रोतसांत जर शिरले तर त्याचा परिणाम भयंकर होतो.

ओक्सिरिस व्हर्मिक्यूलेरिस:- ह्या सामान्यतः आढळून येणार्‍या कृमीला तंतुकृमि (थ्रेडवर्म) म्हणतात. मादी १/२ इंच व नर १/२ इंच लांबीचे भरतात. सर्व देशांत याचा विकार होत असलेला आढळतो. मुलांनां यांच्यापासून विशेष त्रास होतो. हा कृमि बहुतकरून बृहदांत्रांत व विशेषेकरून गुदामध्यें वास्तव्य करून असतो. रात्रीच्या प्रहरीं याच्या इतस्ततः संचारानें मलद्वाराला अतिशय कंड सुटते तसेंच जननेंद्रियांतहि कंड सुटते.

फिलेरिया सेंग्विनिस होमिनिस अथवा फिलॉरिया ब्रॅन क्रॉफ्टी फी ब्यान्कॉ फ्टाय हा कृमि आस्ट्रेलिया, चीन, हिंदुस्थान, ईजिप्‍त आणि ब्राझिल ह्या देशांत आढळतो. परिणामीं हा फार भयंकर आहे. हा कृमि तीन किंवा चार इंच लांब असून बारीक केसाप्रमाणें असतो; व ह्याचे जथे नतात. लसिका पिंडामध्यें हे वास्तव्य करून राहतात. ह्याचे गर्भ कवचयुक्त असून रक्तामध्यें रात्रीच्या प्रहरीं सांपडतात. हे गर्भमच्छर रात्रीं मनुष्याला चावले असतां त्याच्या रक्ताच्या द्वारें मच्छराच्या शरीरांत शिरतात. म्हणून मच्छर हा प्राणी ह्याचा मध्यस्थं होय. ह्या कृमींच्या संसर्गामुळें हत्तिरोग, (एलिफंटिआसिस) वारुळ अथवा त्वग्रोग होतो. शिवाय लघवींतून रक्त पडतें. ह्याचा उपद्रव मुख्यतः  हिंदुस्थानांत व उष्ण कटिबंधांतील प्रदेशांत होतो.

ड्र्याकन्क्युलस (फीलेरिआ) मे डी ने न्सी स:- ह्या कृमीला नारू म्हणजे गीनिवर्म म्हणतात. ह्याचा प्रसार हिंदुस्थानांत किंबहुना एशिया, आफ्रिका, ईजिप्‍त देशांत आहे. ह्या कृमीमध्यें नर बहुश: आढळून येत नाहींत. मादी १३ इंचांपासून ३० इंचांपर्यंत लांब असते. शरीर नलिकाकार गुळगुळीत असून रंग पांढरा असतो. तो त्वचेच्या खालीं संयोजक धातुमध्यें व विशेषेंकरून पायाच्या भागांत वास्तव्य करून राहते. यामुळें त्या भागाला सूज वगैरे येते व पुळी होऊन भोंक पडतें व दुसरे शारिरक परिणाम घडून येतात. त्या भोंकांतून पू बाहेर पडतो त्या पुवाबरोबर मादीनें घातलेलीं अंडीं व त्यांपासून अपक्व तयार झालेले डिंब बाहेर पडतात. हे डिंब जर पाण्यांत गेले-व तसें होणें अवश्यक आहे— तर ते पाण्यांत वावरणार्‍या सायक्लॉप्स नांवाच्या एका जातीच्या सूक्ष्म संधिपाद प्राण्यांत शिरतात. ज्याच्यांत ह्या प्रकारचे सायक्लॉप्स आहेत असें पाणी मनुष्याच्या पोटांत गेले असतां हे डिंब वाढूं लागतात व हा रोग त्यांच्यांत उद्‍भवतो. तेव्हां सायक्लॅप्स हा येथें मध्यस्थ प्राणी होय. हा रोग खेड्यापाड्यांत विशेष होतो. ह्याचें कारण खेडेगांवची माणसें अशुद्ध पाणी गरम केल्याशिवाय तसेंच पितात हें होय. [ले. रा. आढाव व प्रो. हाटे].

आ यु र्वे दी य कृ मि वि ज्ञा न.- कृमी (शरीराशीं संबद्ध होत असलेले जंतू) दोन प्रकाराचे स्थूलभेदानें आहेत. एक त्वचेवर होणारे व दुसरे शरीराच्या आंत होणारे. ते सर्व कृमी कारणभेदानें चार प्रकारचे मानिले आहेत.  बाहेरचे (घाम वगैरे मळांत), कफांत, रक्तांत व विष्ठेंत होणारें त्यांपैकीं बाहेरचे मळांत म्हणजे घाम वगैरेत उत्पन्न होणारे कृमी हे तिळाएवढालेच असून रंगानेंहि तिळासारखेच असतात. त्यांस पाय पुष्कळ असून अतिशय बारीक असतात. त्यांची लिखा, व उवा अशीं नांवें आहेत. हे डोक्यांत, केसांवर व अंगावरहि होतात. यांपासून गांधी, पुळ्या, कंड व मोठ्या गांठी होतात.

हे कृमी मलिन वस्त्रें पांघरणार्‍या व घामट असणार्‍या माणसास होतात. किंवा कांहीं शारीरिक कारणांनीं (अजीर्ण, ताप, इत्यादि) शरीरांतून बाहेर पडणारे मळ (घाम वगैरे) यांमुळें स्वच्छतेनें रहाणार्‍या माणसासहि होतात.

कृमीं होण्याचीं कारणें खालीं लिहिल्याप्रमाणें:- अन्न जिरलें नसतां जेवण, गोड व आंबट फार व नेहमीं खाणें, पातळ पदार्थ जास्त खाणें, पिठाचे पदार्थ व गूळ जास्त खाणें, दिवसा झोंप घेणें, व्यायाम न करणें, दूध व मासे असे निषिद्ध संयोगी पदार्थ खाणें, हीं सामान्यतः कृमीचीं कारणें होत. विष्ठेंत होणारे कृमी उडीद, पिठाचे पदार्थ, आंबट व खारट रस व गूळ आणि भाज्या यांनीं होतात. मांस, मासे, गूळ, दूध, दहीं, आंबलेले पदार्थ यांच्या सेवनानें कृमी होतात.

विरुद्धसंयोगी जेवण, अजीर्ण, भाज्या फार खाणें इत्यादि कारणांनीं रक्तांत कृमी होतात.

ताप, तोंडाचा रंग बदलणें, पोट दुखणें, हृदयांत दुखणें, आंग गळणें, भोंवळ, भात न आवडणें, अतिसार (शौचास पातळ होणें) हीं रक्तांत कृमी झाले असतां होणारीं लक्षणें आहेत.

कफामुळें आमाशयांत कृमी होऊन ते वाढले म्हणजे सर्व आंतड्यांत पसरतात. ते फार मोठे, चामड्याच्या वादीसारखे लांब किंवा कांहीं गांडुळासारखे किंवा धान्याला आलेल्या मोडाएवढे लहानहि असतात. ते रंगानें पांढरे, तांबूस असतात. अंत्राद, उदरावेष्ट, हदयाद, महागुद्द, चुरू, दर्भकुसुम व सुगंध अशीं त्यांचीं अन्वर्थक नांवें आहेत. मळमळणें, लाळ सुटणें, अपचन, अरोचक, बेशुद्धि, ओकारी, ताप, पोट फुगणें, कृशता, झिंक येणें, व पडसें हे विकार कफजन्य कृमींनीं होतात. रक्त वाहणार्‍या शिरांत रक्तांतील कृमी होतात. ते फार बारीक, पाय नसलेले, वाटोळे व तांबडे असतात. त्यांपैकीं कांहीं इतके बारीक असतात कीं ते डोळ्यांनीं दिसत नाहींत.

केशाद, रोमविध्वंस, रोमद्वीप, उदुंबर, सहमातर, सौरस मातर अशीं त्यांचीं सहा नांवें आहेत.

विष्ठेपासून झालेले कृमी पक्वाशयांत होतात. व ते गुदद्वारांतूनच बाहेर येतात. क्वचित प्रसंगीं ते फारच वाढले तर ते अमाशयाकडे वळतात. त्यावेळीं रोग्याचे श्वासोच्छ्वास, ढेकर यांस विष्ठेची घाण येऊं लागते. ते कृमी जाड, वाटोळे किंवा चापट असतात. त्यांचा रंग काळसर, पिवळा, पांढरा व काळा असा असतो. ककेरुक, मकेरुक, सौसुराद, वशुल आणि लेलिह अशीं त्यांचीं पांच नांवें आहेत. यांच्यामुळें शौचाला पातळ होणें, पोट दुखणें, पोट फुगणें, कृशता, पांढुरकेपणा, तेजोहीनता, रोमांच उभे रहाणें, अग्निमांद्य, गुदद्वारास कंड सुटणें हीं लक्षणें होतात.

ज्याच्या पोटांत कृमी झाले असतील त्याचें स्नेहन व स्वेदन करून त्यास गूळ, मासे, दूध वगैरे खाऊं घालून त्याचा कफ व कृमी हे चाळवून रात्री तसेंच निजून दुसर्‍या दिवशीं सकाळीं गोमूत्रांत निम्में पाणी घालून त्यांत सुरसादि गणांतील औषधांचा काढा करून त्या काढ्यांत पिंपळी, गेळफळ, व वायडिंगें यांचा कल्क आणि तेल व सज्जीखार हीं घालून त्याच बस्ती द्यावा. नंतर पिंपळी, निशोत्तराचें रेचक द्यावें. पोटांतील कृमी बाहेर निघून जाण्याकरितां ओकारी, रेचकें व बस्ती हे उपाय आहेत. ओकारीचीं व रेचक औषधें दिल्यानंतर सुंठ, पिंपळमूळ वगैरे दीपन औषधांनीं तयार केलेली कण्हेरी, भात वगैरे द्यावें. तिखट, कडू व तुरट औषधांच्या काढ्याचें पोटावर सेचन करून अग्नि प्रदीप्‍त झाल्यावर अनुवासन (तेलाचा) वस्ती द्यावा. उंदीरकानीचा पाला पिठांत मिसळून त्याच्या पोळ्या भाजून खाव्या. सैंधवमिश्रित ताक प्यावें. पोटांतील जंत पडून गेल्यानंतरहि महिना पंधरादिवस कडू, व तिखट औषधांचें सेवन करावें म्हणजे पुन्हां कृमी होत नाहींत. डोक्यांतील कृमीवर नस्यें द्यावीं. रुक्ष भोजन करावें. रक्तांतील कृमींवर कुष्ठावरील औषधें द्यावीं. सर्व प्रकारचें दूध, मासे, तूप, गूळ, दहीं, पालेभाज्या आणि गोड व आंबट पदार्थ हे वर्ज करावे. [माधवनिदान]

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .