प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें       

कृष्ण-(१) पुराणांतील एक व थोर विभूति व सर्व देवतांमध्यें अतिशय लोकप्रिय देवता. कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे असें समजतात. कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष विष्णूच असेंहि कित्येक मानतात. ज्याच्याबद्दल अनेक गोष्टी व दंतकथा प्रचारांत आहेत असा हा वीरपुरुष बहुधा महाभारताच्या काळीं होऊन गेला असावा. वेदांतून या थोर पौराणिक व्यक्तीचा उल्लेख सांपडत नाहीं. ऋग्वेदांत कृष्ण नांवाचा एक सूक्तकर्ता ऋषि येतो. (ऋ. ८. ८५, ३. ४). कृष्ण देवकीपुत्र याचें नांव प्रथम छांदोग्य उपनिषदांत (३. १७. ६) आलें आहे व त्याचा पौराणिक कृष्णाशीं संबंध जोडण्याचा प्रयत्‍न बरेच पंडित करितात (ज्ञानकोश वि. ३ पा. ४४५ पहा). महाभारतांत त्याचा प्रामुख्यानें उल्लेख केलेला आढळतो. महाभारतांतील एक भाग म्हणून हल्लीं उपलब्ध असलेलीं भगवद्‍गीता श्रीकृष्णानेंच अर्जुनास निवेदन केली. भगवद्‍गीतेंत श्रीकृष्णानें आपणांस “सर्व भूतांचें ठायीं वास करणारा ईश्वर” असें म्हटलें असून, ही सर्व सृष्टि मी उत्पन्न केली व माझ्या ठायीं सर्व वस्तू वास करतात हीं तत्त्वें प्रतिपादिलीं आहेत. ‘जनार्दन, अनादि, अनंत, सर्वव्यापी, सर्वव्यापी, सर्वसाक्षी इत्यादि नांवांनी अर्जुनानें श्रीकृष्णास संबोधिलें आहे.  सर्व जनसमूहाला अत्यंत प्रिय वाटणार्‍या अशा श्री कृष्णाच्या बाल्यावस्थेंतील लीला भागवतपुराणांत सविस्तर वर्णिल्या आहेत.

'देवकीचा आठवा गर्भ तुझा नाश करील' असें नारदानें कंसास आधींच सांगितलें होतें.  ही आपत्ति टाळण्याकरतां कंसानें वसुदेव व देवकी यांनां कारागृहांत टाकलें व त्यांचे पहिले सहा पुत्र उपजतांच दगडावर आपटून ठार केले.  सातव्या गर्भानें रोहिणीच्या उदरांत प्रवेश केला व ती प्रसूत झाली. हाच बलराम होय. आठव्यावेळीं देवकी प्रसूत होतांच वसुदेवानें त्या नूतन बालकास यमुनानदी ओलांडून यशोदेच्या घरीं नेलें. येशोदेला झालेली कन्या उचलून घेऊन व कृष्णास यशोदेच्या घरी ठेवून वसुदेव तडक देवकीकडे आला. कंसानें ही कन्या देवकीचा आठवा गर्भ समजून मारिली.

इकडे कृष्ण गोकुळांत निर्भयपणें वाढत होता. तो आपल्या ज्येष्ठ बंधू (बलराम)सह वनांत गाई चारण्यास जाई. रामकृष्ण व गोपाळ यांचे खेळ चालूं असतां एकदां कंसानें कृष्णाच्या नाशार्थ पाठविलेला अरिष्ट नामक राक्षस, वृषभाचें रूप घेऊन तेथें आला परंतु कृष्णानें त्यास मारिलें. कंसानें पाठविलेल्या केशिन आदिकरूत इतर राक्षसांचाहि कृष्णानें वध केला. नंतर अक्रूराबरोबर बलराम व कृष्ण असे उभयता मथुरेस कंसाच्या निमंत्रणावरून गेले. तेथें कृष्णानें चाणूर व बलरामानें मुष्टिक यांनां मल्लयुद्धांत ठार मारलें. अखेरीस कृष्णानें कंसाला सिंहासनावरून ओढून ठार मारिलें व उग्रसेनास त्याच्या गादीवर बसविलें.

एकदा इंद्रानें गोकुळावर प्रचंड वृष्टि केली असतां कृष्णानें आपल्या करंगुळीवर गोवर्धन पर्वत सात दिवस उचलून धरला व सर्व गोकुळाचें रक्षण केलें. या पराक्रमाबद्दल त्यास ‘गोवर्धनधारी’ असें नांव मिळालेलें पुराणांतून आढळतें.

महाभारतांत श्रीकृष्णाच्या जन्माबद्दल अशी एक कथा आहे कीं, श्रीविष्णूनें आपल्या मस्तकावरील एक पांढरा व एक काळा असे दोन केस उपटले. त्या दोन केसांनीं रोहिणी व देवकी यांच्या उदरांत प्रवेश केला. व त्यापासून अनुक्रमें बलराम आणि कृष्ण अथवा केशव जन्मले. महाभारतात श्रीकृष्णानें केलेल्या अद्‍भुत गोष्टी व पराक्रम वर्णिले आहेत. त्यांपैकीं कांहींचा सारांश असा:-

यमुनेच्या तीरावरील अरण्यांत राहणार्‍या हयाधिपतीस कृष्णानें ठार केलें. वृषभाचें रूप घेऊन गोकुळांत आलेल्या अघासुरनामक दानवास त्यानें यंमसदनीं पाठविलें. प्रलभ्भ, नरक, जम्भ इत्यादि असुरांचाहि त्यानें वध केला. जरासंधाचें साहाय्य असलेल्या कंसास त्यानें ठार केलें व बलरामाच्या साहाय्यानें त्यानें कंसाचा भ्राता जो सुनामन्, त्याचा पराजय करून त्यास मारिलें. त्यानें गंधाराधिपतीच्या मुलीचें (रुक्मिणीचें) स्वयंवराच्या वेळीं हरण केलें. जरासंध व शिशुपाल यांचा त्यानेंच अंत केला. अंग, वंग आदिकरून असंख्य टोळ्यांनां त्यानें जिंकून आपल्या ताब्यांत आणिलें. अद्‍भुत गोष्टीनें युक्त अशा सागरांत प्रवेश करून त्यानें वरुणास जिंकिलें. पाताळामध्यें जाऊन त्यानें पंचजन्याचा वध केला व पांचजन्य नामक अद्‍भुत शंख मिळविला. खांडववनामध्यें अर्जुनासह त्यानें अग्नीची आराधना करून त्याजकडून सुदर्शन चक्र मिळविलें. गरुडावर आरूढ होऊन अमरावती नामक इंद्राच्या राजधानीवलर त्यानें चाल केली व तेथून पारिजातकवृक्ष बरोबर आणिला.

दुसर्‍या एका स्थळीं, अर्जुनानें श्रीकृष्णाच्या पराक्रमांचें पुढीलप्रमाणें वर्णन केलें आहे:-  भोज राजांचा युद्धांमध्यें समुळ नाश करून कृष्णानें रुक्मिणींचे हरण केलें. गांधारांचा त्यानें नाश केला. नागजिताच्या पुत्रांनां त्यानें जिंकून त्यानीं प्रतिबंधांत ठेवलेल्या राजा सुदर्शनाची त्यानें मुक्तता केली. दरवाजाच्या एका फळीनें त्यानें पांड्यांचा वध केला व दन्तकुरामध्यें कलिंगांचा मोड केला. कृष्णाच्या प्रयत्‍नामुळेंच एकेकाळीं जळालेल्या काशीपुराची पुन: स्थापना झाली. निषदाधिपति एकलव्य व जंभ नामक दैत्य यांचा त्यानें वध केला. सुनामन् नामक उग्रसेनाच्या दुष्ट पुत्राचा बलरामाच्या साह्यानें त्यानें वध करून उग्रसेनास त्याचें राज्य परत मिळवून दिलें. शाल्वाधिपतीस जिंकून त्याने शतघ्निनामक शस्त्र प्राप्‍त करून घेतलें. इंद्राच्या विनंतीवरून कृष्णानें मुरु व ओघ या दानवांचा वध करून अखेरीस नरकासहि मारिलें व त्यानें हिरावून घेतलेलीं आदितीचा कर्मभूषणें परत मिळविली.

द्वारकेचा राजा, कृष्ण द्रौपदीस्वयंवराच्या वेळीं हजर असून अर्जुनाने द्रौपदीचा पण उत्तम प्रकारें जिंकला असा त्यानें आपला अभिप्राय दिला, इत्यादि कथाभाग महाभारतांत आढळतो. इंद्रप्रस्थास पांडव राज्य करीत असतां कृष्ण त्यांना भेटावयास गेला व खाण्डववनामध्ये पांडवांसह तो शिकारीकरतां निघाला. तेथें गेल्यावर,खाण्डववन जाळण्यास उत्सुक झालेल्या अग्नीशीं त्यांचे सख्य होऊन अग्नीला कृष्णार्जुनांचें साह्य मिळालें. त्याबद्दल अग्नीनें वज्रनाभ नांवाचें दिव्य चक्र व कौमोदकी गदा या वस्तू कृष्णाला अर्पण केल्या. पुढें इंद्राचा पराजय होऊन अग्नीने सर्व खांडववन जाळिलें. श्रीकृष्णाची भेट घेण्याकरतां अर्जुन द्वारके गेला असतां श्रीकृष्णाने अर्जुनाचें स्वागत केलें. कृष्णानें कानाडोळा केल्यामुळें अर्जुनानें बलरामास न जुमानतां, सुभद्रेला (कृष्णाची स्वसा) घेऊन पलायन केलें व तिच्याशीं लग्न केलें. राजसूज्ञ यज्ञ करण्याचें जेव्हां युधिष्ठिराच्या मनांत आलें, तेव्हां जरासंधास प्रथम जिंकलें पाहिजे असा कृष्णानें युधिष्ठिरास सल्ला दिला. तेव्हां भीमाकडून जरासंधास वध करून राजसूययज्ञास निर्विघ्नपणें प्रारंभ झाला. युधिष्ठिरानें केलेल्या राजसूज्ञ यज्ञाच्या वेळीं कृष्ण हजर असून शिशूपालहि यज्ञाच्या वेळीं तेथें होता. शिशुपालानें यज्ञाच्या वेळीं अत्यंत वाईट वर्तन करून श्रीकृष्णाची निर्भत्सना केल्यामुळें कृष्णानें आपलें सुदर्शन चक्र सोडून शिशुपालाचें डोके उडविलें. कौरवपांडवांमध्यें झालेल्या द्यूताच्या प्रसंगी कृष्ण हजर होता. ज्यावेळीं द्रौपदी पणाला लावली गेली व पण हरला, त्यावेळीं दुःशासन जबरीनें भरसभेंमध्यें तिला घेऊन निघाला व तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्‍न करूं लागला. तेव्हां श्रीकृष्णाला तिची दया येऊन त्यानें तिला वस्त्रें पुरविलीं.

पांडवांचा वनवास संपल्यानंतर कृष्णाने ‘भावी भारतीय युद्धाविषयी चर्चा करणार्‍या मंडळांत भाग घेतला व शांतता प्रस्थापित होण्याविषयीं अटोकाट प्रयत्‍न केले. नंतर तो द्वारकेस परत गेला. भावी युद्धांत त्याचें साहाय्य मागण्याकरतां अर्जुन व दुर्योधन हे उभयता द्वारकेस गेले; परंतु दोन्हीं पक्षांशीं त्याचें नातें असल्यामुळें युद्धांत भाग घेण्याचें त्यानें नाकारलें. “मी व माझें सैन्य या दोहोंपैकी ज्यास जें पसंत पडेल तें त्यानें घ्यावें.” असें श्रीकृष्णानें उभयतांस सांगितलें. अर्जुन दुर्योधनाच्या आधी आल्याकरणानें प्रथम मागण्याचा हक्क त्यास मिळाला व त्यान्वयें त्यानें कृष्णासच पसंत केलें. दुर्योधनानें मोठ्या आनंदानें यादवसैन्य पत्करलें. तदनंतर कृष्ण अर्जुनाचा सारथी झाला. नंतर पांडवांच्या विनंतीवरून शिष्टाई करण्याकरतां म्हणून श्रीकृष्ण हस्तिनापुरास गेला. परंतु त्याचे शांतता राखण्याबद्दलचे सर्व प्रयत्‍न निष्फळ होऊन तो परत आला. नंतर रणसंग्रामाची तयारी करण्यांत येऊन सर्व सैन्य युद्धाकरतां सिद्ध झालें. युद्धाच्या अगदीं आरंभीं, अर्जुनाचा सारथि या नात्यानें कृष्णानें अर्जुनास भगवद्‍गीता सांगितली, व त्याचा व्यामोह नष्ट केला. युद्ध चालूं असतां श्रीकृष्णानें अर्जुनास अमोल मदत करून त्याचें रक्षण केलें. पांडव युद्धांत विजयी झाल्यावर त्यांच्यासह तो हस्तिनापुरास गेला व पांडवांनीं केलेल्या अश्वमेध यज्ञास जातीनें हजर राहिला. यज्ञ समाप्‍त झाल्यावर कृष्ण द्वारकेस परत गेला. त्यावेळीं 'सर्व शहरवासी यांनीं समुद्रतीरी प्रभासक्षेत्रीं जाऊन देवतेची आराधना करावी अशी त्यानें सर्वांना विनंत केली व एक दिवस मदिरेचें सेवन करण्यास त्यानें सर्वांनां परवानगी दिली. दारूनें धुंद झाल्यामुळें यादवांमध्यें खडाजंगींचे भांडण होऊन श्रीकृष्णादेखत त्याचा स्वतःच प्रद्युम्न नामक पुत्र मारला गेला, व बहुतेक यादव सरदारांचा या कलहांत वध झाला. तेव्हां बलरामानें तेथून प्रयाण केलें व शांतपणें एका वृक्षाखालीं त्याने देहत्याग केला. जरास नामक व्याधाने मृग समजून चुकीनें कृष्णावर एक बाण सोडला व त्या बाणानेंच कृष्णाच अंत झाला. त्याकाळीं अर्जुनानें द्वारेस जाऊन कृष्णाचे उत्तरकार्य यथाविधि केलें. नंतर थोड्याच दिवसांनीं समुद्रानें द्वारका नगर आपल्या उदरांत घेतलें.

“कृष्ण हा शिवाचा (महादेव) उपासक होता व शिवपार्वतीकडून त्यास अनेक वर मिळाले होते असा काहीं ठिकाणीं उल्लेख आहे” असें डॉ.मूर विधान करतो.

अष्टनायका (पहा) व भौमासुराच्या बंदीतून सोडविलेल्या सहस्त्र राजकन्या इतक्या कृष्णाच्या स्त्रिया होत्या. मुख्य स्त्रियांची संतति पुढील प्रमाणें:- (१) रुक्मिण- हिचे प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुत्प, भद्रचारु, चारुचंद्र विचार आणि चार असे दहा पुत्र; व चारुमती नामक कन्या होती, तीस कृतवर्म्याच्या पुत्रानें वारिलें होतें. (२) जांबवंती हिचे पुत्र सांब सुमित्र पुरुजित्, शतजित्, सहस्त्र विजय, चित्रकेतु वसुमान्, द्रविड आणि ऋतु. शिवाय एक कन्या होती. (३) सत्यभामा- हिचे पुत्र मानु, सुभानु, स्वर्भानु, प्रभानु, श्रीभानु, प्रतिभानु व एक कन्या (४) भद्रा- हिचे पुत्र संग्रामजित बृहत्सेन, शूर, प्रहरण, अरिजित्, जय, सुभद्र, वामआयु, आणि सत्यक, व एक कन्या. (५) मित्रविंदा-हिचे पुत्र वृक, हर्ष, अनिल गृघ्र, वर्धन, उन्नाद, महाश, पावन, वन्हि आणि क्षुधि. (६) सत्या- हिचे पुत्र वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान्, वृष आम, शंकु, वसु, कुंति. (७) कालिंदी- हिचे पुत्र श्रुत कवि, वृष, वरि, सुबाहु, भद्र, शांति, दर्श, पूर्णमास, आणि सोमक. (८) लक्ष्मणा- हिचे पुत्र प्रघोष, गात्रवान्, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ति, सह, ओज आणि अपराजित्. व एक कन्या. याशिवाय रोहिणी म्हणूनहि कृष्णाची एक स्त्री असल्याचें आढळते.

कृष्णाच्या पुत्रपौत्रांत अठराजण महारथी होते. त्यांच नांवें अशीं— प्रद्युम्न, अनिरुद्ध, दीप्‍तिमान, भानु, सांब, मधु, बृहभ्दानु, चित्रभानु, वृक, अरुण, पुष्कर, वेदबाहू, श्रुतदेव, सुनंदन, चित्रबाहु, विरुप, कवि, न्यग्रोध.

कृष्णावतार व कृष्णभक्ति यासंबंधीं विवेचन ‘अवतार’ या लेखांत आलेंच आहे. वासुदेव कृष्ण, अवतारी पुरुष कृष्ण, नारायण, गोविंद वगैरे व्यक्तीतील साम्य व भिन्नता तसेंच नारायणीय धर्माचा विकास ‘बुद्धोत्तर जग’ या ज्ञानकोश प्रस्तावना खंडाच्या ६ व्या प्रकरणांत विस्तारानें दिला आहे. सध्यांच्या कृष्णभक्तीचा विचार भक्तिमार्ग या लेखांत केला जाईल [महाभारतः भागवत व इतर पुराणें; वैदिक इंडेक्स. डौसन- हिंदु क्लासिकल डिक्शनरी; ज्ञानकोश विभाग ३, ४, व ७.]

(२) हा एक प्रसिद्ध विद्वकुळांतील ब्राह्मण. वर्‍हाडांत पयोष्णीतीरी. दहिगांव या नांवाच्या एक गांव आहे. या ठिकाणीं चिंतामणी नांवाचा एक यजुर्वेदी ब्राह्मण रहात होता. बल्लाळ नांवाचा त्याचा एक पणतू होता. हा मोठ रुद्रभक्त होता. कृष्ण हा बल्लाळचा दुसरा मुलगा होता. भास्कराचार्याच्या बीजावर ‘बीज नवांकूर’ नांवाची टीका यानें केली आहे. जाहांगीर बादशहाच्या दरबारीं कृष्णाचें वजन फार होतें. नूरदिन नांवाचा यवन अधिकारी कृष्णावर फार प्रीति करीत असे. श्रीपतिकृत जातकपद्धतीवर उदाहरणरूप याची टीका आहे. ‘छादक निर्णय’ म्हणून याचा एक ग्रंथ आहे. [भारतीय ज्योतिष शास्त्र.]

(३) हा सह्याद्री संन्निध मावळांत रहाणारा देशस्थ ब्राह्मण होता. यानें ‘करण कौस्तुभ’ नांवाचा ग्रंथ केला. याचें गोत्र कश्यप होतें. शके १५७५ (इ. स. १६५३)त ग्रंथ लिहिण्याच्या व वेधादिकांच्या तयारीस ग्रंथकार लागला होता. यावेळीं मराठी राज्यस्थापक शिवाजी २६ वर्षाचा होता. व त्याची राज्य स्थापण्याची भानगड सुरू होती. यानें दृकप्रत्ययास येणारा ग्रंथ करण्याविषयीं ग्रंथकारास सांगितलें ही गोष्ट महत्त्वाची आहे. कृष्णाचा दुसरा ग्रंथ तंत्ररत्‍न नांवाचा आहे. [दीक्षित- भा. ज्योतिषशास्त्र]

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .