प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें       

कृष्णा जिल्हा— हा जिल्हा मद्रास इलाख्याच्या ईशान्य भागांत आहे. याचें क्षेत्रफळ ५९०७ चौरस मैल आहे. याच्या पूर्वेस बंगालचा उपसागर असून पश्चिमेस निजामचें राज्य व करनूल जिल्हा; दक्षिणेस नेलोर व उत्तरेस गोदावरी जिल्हा आहे. कृष्णा नदी प्रथम जिल्ह्याच्या पश्चिम भागाच्या सरहद्दीवरून वहात जाऊन नंतर वायव्य भागांतून थेट आग्नेय भागाकडे जाते. या कृष्णा नदीवरून या जिल्ह्याला कृष्णा जिल्हा हें नाव पडलें आहे. या जिल्ह्याच्या अगदीं पश्चिमेकडील भागांतील मुलुख डोंगराळ आहे. उत्तरेकडील व मध्यभागांतील मुलूख सपाट असून कापसाच्या लागवडीला योग्य आहे. पूर्वेकडील भाग हा अगदी सपाट असून या ठिकाणीं भाताचीं शेतेंच्या शेतें पसरलीं आहेत. या भागांत फार सुपीक जमीन आहे.

भू स्त र.— या जिल्ह्याच्या पूर्व भागांतील मध्यकटिबंधांत पूर्व घांटाच्या पायथ्याशीं जंबूर दगडाची समृद्धि आहे. तसेंच या ठिकाणीं अभ्रक, स्फटिक, हरायित, ग्रानाइट इत्यादि दगडांचेहि थर आहेत. या मध्य कटिबंधाच्या वायव्येस जो सपाट प्रदेश आहे, त्या ठिकाणी स्लेटीसारखे दगड, खडूचे दगड व स्फटिकाचे दगड सांपडतात. या कटिबंधाच्या आग्नेयीस, वाळूचे दगड, स्लेटीचे दगड, व कुरुंदाचे दगड आढळून येतात.

वनस्पती व प्राणी.— कारोमांडल किनार्‍यावर ज्या वन्सपती सर्वसाधारण आढळून येतात त्याच या ठिकाणीं आढळून येतात. हा जिल्हा जरी सुपीक असला तरी या जिल्ह्यांत वृक्ष व लतांचा  जवळ जवळ अभावच आहे. काजूचीं झाडें मात्र मधून मधून दृष्टीस पडतात. हिंस्त्र पशू देखील या जिल्ह्यांत विशेष आढळून येत नाहींत. चित्ते, अस्वलें हे कधी कधीं डोंगरामध्यें आढळतात. रानडुकरें येथें बरींच आहेत. पक्षी मात्र निरनिराळ्या प्रकारचे आढळून येतात. जलचर पक्षी येथें पुष्कळ आहेत. माशांचीहि येथें विपुलता आहे.

ह वा मा न व प र्ज न्य.- जिल्ह्याचें हवामान जरी उष्ण असलें तरी निरोगी आहे. मच्छलीपट्टणची हवा समशीतोष्ण आहे. पर्जन्याचें सरासरी प्रमाण ३३ इंच आहे. पण सर्व भागांत हें प्रमाण सारखेंच असतें असें मात्र नाहीं. मच्छलीपट्टण, तेनाली, वापताला इत्यादि ठिकाणीं पाऊस पुष्कळ पडतो, इतर ठिकाणीं कमी पडतो.

इ ति हा स—. या जिल्ह्यावर अगदी प्रथम आंध्रांचें राज्य होतें. हे आंध्र लोक बौद्धधर्मीय होते. अमरावती येथें या लोकांनीं बांधलेला एक स्तूप असून शिवाय त्यावेळचीं शिशाचीं नाणींहि या ठिकाणीं मधून मधून उपलब्ध होतात. त्यानंतर ७ व्या शतकाच्या सुमारास चालुक्यांचा अंमल या प्रांतावर सुरू झाला. याच्या अमदानींत खडकामध्यें खोदलेल्या मूर्ती व खडकांत बांधलेलें एक देवालय आहे. ९ व्या शतकाच्या अखेरीस यांच्या सत्तेचें उच्चाटण होऊन या प्रांतावर चोलांचें वर्चस्व सुरू झालें. चोलांनीं आपली सत्ता शतक दोन शतकें गाजविल्यानंतर, वरंगळचें गणपति घराणें या प्रांतावर राज्य करूं लागलें. यांच्या अमदानींतच मार्को पोलो हा या प्रांतात आला होता. पुढें या जिल्ह्याचा उत्तर-भाग ओरिसाच्या राजांनीं जिंकून घेतला व दक्षिण भागावर रेड्डी घराण्याच्या राजांनीं आपला अंमल बसविला. या राजांनीं पुष्कळ ठिकाणी किल्ले बांधले. त्यापैकीं कोंडविंडु, वेल्लमकोंड व कोंडपल्ली या ठिकाणीं अद्यापि कालाच्या भक्ष्यस्थानांतून अर्धे मुर्धे वांचलेले किल्ले पहाण्याला मिळतात. इ. स. १५१५ मध्यें विजयानगरच्या कृष्णदेव राजानें ओरिसाच्या राजांच्या ताब्यांत असलेला या प्रांताचा मुलूख जिंकून घेतला. पुढें विजयानगरचें साम्राज्य नष्ट झाल्यावर गोवळकोंड्याच्या कुतुबशाहींचे वर्चस्व या प्रांतावर सुरू झालें व शेवटीं कुतुबशाहीचा शेवट झाल्यानंतर औरंगझेबाच्या मोंगल साम्राज्याच्या छत्राखाली हा प्रांत आला. १७५२ मध्यें दक्षिणच्या सुभेदारानें (निजाम) उत्तरसरकारच्या ताब्यातील मुलुख फ्रेंचांनां दिला व नंतर फ्रेंचांकडून हा प्रांत इंग्लिशांच्या ताब्यांत आला.

या जिल्ह्यांत प्राचीन अवशेष जे सांपडले आहेत ते पुढील प्रमाणें:-

मूळ रहिवाशांच्या गुहा:- या गुहा पलनद तालुक्यांत करसुपुदिपासून थोड्या मैलांवर गुत्तिकोंडा व सनगलु येथें आहेत. यापैकीं गुत्तिकोंडा येथील गुहा गांवापासून दोन मैलांवर असून तीमध्यें एक २८ हात रुंदीचें टाकें आहे. याच्या पलीकडे खडकामध्यें कठड्यासारखी वाट कोरलेली आढळते व येथून काशी व रामेश्वराकडे वाटा जातात अशी दंतकथा आहे. येनडी व येरकल लोकांचे पूर्वज या गुहांमध्यें रहात असावे. यामध्यें कांहीं साधु रहात होते असेंहि सांगतात. हे बौद्ध भिक्षु असावे. या गुहेचा मुचकुंद व कालयवन याच्या दंतकथेशीं संबंध जोडतात. सनगल्लु येथील गुहेमध्यें विहिरीप्रमाणे खोल वाटेंतून जावें लागतें. पलनदमध्यें आणखीहि गुहा आहेत. त्या पाहण्यात कृष्णेंतून होडींत बसून जावें लागतें. गंतुर तालुक्यांत मंगलगिरी व उन्दवल्ली येथें अशाच नैसर्गिक गुहा असून त्या दोहीनां जोडणारी एक चोरवाट भुयारांतून गेली आहे असें सांगतात; हीं भुयारें तेथें दृष्टीस पडतात.

शक किंवा तुराणी याच्या पूर्वी होऊन गेलेल्या तक्षक अथवा दस्यु लोकांनीं कोरलेले नाग वगैरे:- हे अतिशय जुने असून पुष्कळ देवळांतून झाडांसभोंवती दिसून येतात. यावरून पूर्वी झाडें व नाग यांची पूजा करीत होते असें सिद्ध होतें. या नागांचें शिल्पकाम फारच ओबडधोबड व जुनें दिसतें. नागाच्या आकृती निरनिराळ्या व विचित्र आढळून येतात. या प्रदेशातील शिल्पकलेचें हें सर्वांत जुनें स्मारक दिसतें.

शक कालांतील शिल्पावशेष:- पलनद वगैरे आसपासच्या तालुक्यामधून वीरक्कल, चबुत्रे व शिलावर्तुलें इत्यादि स्मारकें आढळतात. निलगिरी पर्वत व कोइंबतुर जिल्ह्यामधील वरवंड्याप्रमाणेंच यापुडिच्या आसमंतात कांहीं वरवंड्या आढळतात. प्रत्येक वरवंडीखालीं एक चौकोनी तळघर असून त्यावर एक सपाट पाथर ठेवलेली आढळते. तळघरांत कांहीं भांडीं वगैरे ठेवलेलीं आढळतात. हें तळघर जमीनींत असून फक्त वरची पाथर तेवढी दृष्टीस पडते. ही पाथर दूर करून नंतर ४।५ हात वाळू अथवा दगड खणून काढावे लागतात. नंतर तळघर जर मोठें असेल तर २।४ दालनें लागतात. व प्रत्येक दालनामध्यें मनुष्यांची जळकीं हाडें, त्याशेजारीं भस्मपात्र व निरनिराळ्या आकाराचीं मृत्पात्रें ठेवलेलीं आढळतात. यांपैकीं कांहीं मडकीं फार प्राचीनकाळीं प्रचारांत असलेली, कांहीं लाल भाजलेलीं कांहीं काळी व कांहीं अर्धवट काळीं, कांहीं अर्धवट तांबडीं व कांहीवर हातांनीं जिल्हई केलेली अशीं आढळतात. एका गुहेमध्यें एक हस्तिदंती अथवा दुसर्‍या कसल्या तरी हाडाचे कंकण सांपडलें होतें. परंतु हत्यारें मात्र कोठें आढळलीं नाहींत. कोइंबतुर जिल्ह्यांतील थडग्यामध्यें लोखंडी हत्यारें आढळतात. हाडांच्या आकारावरून हीं प्रेतें हल्ली रहाणार्‍या  लोकांच्याच पूर्वजांचीं असावीं असें वाटतें. परंतु येथील लोक सांगतात की पूर्वी येथें ठेंगू लोकांची एक जात रहात असून त्यांनीं एक अग्निप्रलय होणार असें भविष्य ऐकून दगडाचीं तळघरें करून आपणास पुरून घेतलें. परंतु अग्निप्रलयामध्यें तें सर्व जळून जाऊन तसेच पुरले गेले. कांही दिवसांपूर्वी एकास तेथें एक कांश्याचें चाक सांपडले होतें. हें बहुतेक बौद्ध अवशेष असावें. वरील थडगीं हें शकं व तुराणी लोकांचें अवशेष असावे. यांची हीं प्रेतें प्रथम जाळून नंतर पुरलीं असावीं असें या अस्थींवरून दिसतें. यांच्या नंतरच्या काळांतील कोणत्याहि जातीमध्यें, निदान हिंदुस्थानांतील या भागांत तरीं, प्रेतें जाळून नंतर पुरण्यांची चाल नव्हती. कृष्णा नदीच्या कांठीं अमरावतीच्या पश्चिमेस एका टेंकडीवर पुष्कळशीं शिला वर्तुळें आहेत.

त्याच्याच नैऋत्येस ४।५ मैलांवर आणखी पुष्कळशी शिलावर्तुळें आढळतात. या वर्तुलांचा व्यास २४ ते ३२ फूट असून याच्या खालीं अस्थिपात्रें, दग्धअस्थी व इतर वस्तू आढळतात. त्यावरून हीं स्मशानें असावीं हें सिद्ध होतें. नंदिग्राम तालुक्यामध्यें कृष्णेच्या डाव्या तिरावर सर्व बाजूंनां हीं थडगीं दिसतात.

बौद्ध अवशेष:- कृष्णा जिल्ह्यांत बेझवाडा गांवापासून २० मैलांवर सत्तनपल्ले तालुक्यांत कृष्णाकाठीं अमरावती येथें कांहीं संगमरवरी दगडांचीं शिल्पकामें आहेत. यांचा शोध प्रथम १७९७ मध्यें कॅ. मॅकेंझी यानें लावला. यापूर्वी चितपल्लीचा राजा वसरेड्डी यानें जवळचीं कांहीं टेंकाडें खोदलीं. त्यांपैकीं एकांत 'दीपावलि दिन्न' या नांवाचा बौद्धाच्या वेळचा एक दीपस्तंभ सांपडला. (या गांवाच्या आसपासची मातीचा टेकाडें खणली असतां बौद्धकालीन अवशेष अद्यापीहि सांपडतात). त्यांत या राजास एक दगडांचा करंडा व त्यांत एक मोती, एक सुवर्णपत्र व दुसर्‍या कांहीं किरकोळ जिनसा सांपडल्या. तसेंच या स्तूपाभोंवती संगमरवरी दगडी कठडा होता. त्याचे भाग कांहीं लंडनच्या ब्रि. म्यूझियममध्यें व कांहीं मद्रांस व कलकत्ता येथील अजबखान्यांत ठेविले आहेत. या ठिकाणी जे शिलालेख सांपडतात त्यांची भाषा व लिपी गुप्तांच्या वेळची आहे. कर्नल मॅकेंझी यास तेथें कांहीं रोमन व कांहीं बॅक्ट्रिअन कडफिसेस याच्या वेळचीं नाणीं सांपडली असून त्यावरून हें शहर ख्रिस्ती शकारंभाच्या वेळीं फार महत्त्वाचें होतें असें दिसतें. येथें सोन्याचीं, व शिशाचीहि नाणीं पुष्कळ सांपडतात. या जिल्ह्यांत यांशिवाय पुढील ठिकाणीं नाणीं सांपडतात.

(१) नजिविद जमीनदारीमध्यें कोक्केवलजवळ सखिनल दिब्बें.

(२) त्याच जमीनदारींत मरिवाडाजवळ दलमर्ते शेतांतील टेंकडीमध्यें.

(३) नंदिग्राम तालुक्यांत पनुगंचीप्रोल गांवाजवळ पटि जमीनींत.

(४) पोंड्रक मिठाच्या भागांत सवतपय व लवल्लपल्ली येथील खारींत.

(५) गुलिवाडा येथें.

याप्रमाणें कृष्णा नदीच्या डाव्या तीरावर उंदवल्ली येथें कांहीं बौद्ध लेणीं आहेत. बेझवाडा येथील लेणी खोदून केलेली आहेत. तेथील एका दगडी देवळांत गणपतीची मूर्ति दिसते. त्यावरून यानंतर ब्राह्मणांचें वर्चस्व येथें स्थापित झालें असावें असें दिसतें. यानंतर कांहीं गुहा लागतात. पुढें एक मंडप आहे. याला लागून कांहीं दालनें असून यांच्यावर एक गुहा व टेंकडीच्या मध्यावर आणखी एक गुहा आहे. गांवांतील मल्लेश्वरस्वामीच्या मंदिरामध्यें व वाचनालयांत कांही बौद्ध मूर्ती वगैरे आढळतात. गुडीवाडा येथें याप्रमाणेंच एक भव्य मूर्ति आहे.

गुडीवाडा येथें अमरावतीप्रमाणेंच नायकिणीचा बुरुज म्हणून एक टेंकडी आहे. याप्रमाणेंच घटिसलपलम आणि कात्तिप्रोल येथेंहि टेंकड्या आहेत. बुधवनी येथें कांहीं तांब्याच्या बुद्धमूर्ती सांपडल्या. त्यांच्या सिंहासनांवर लेख आहेत. तेनाल्ली तालुक्यांत चंडवेलू येथें एक देवालय व बौद्धकालीन अवशेषांच्या टेंकड्या आहेत. जगय्यपेट येथेंहि एक बौद्ध स्तूप आहे. चंडवेलू येथें काहीं सोन्याचीं नाणीं सांपडली असून शिवाय १८७४ मध्यें कांहीं सोन्याच्या ओतीव विटाहि सांपडल्या. भट्टीप्रोलू येथेंहि एक प्राचीन स्तूप होता; त्यात गौतमबुद्धाचे एक हाड एका स्फटिकाच्या करंड्यात ठेवलेलें आढळले. उंदवल्ली येथील टेंकडीच्या पायथ्याशी व वर बर्‍याच गुहा आहेत. येथें एक मंडप व एक चार मजली मंदिर आहे. यांतील तळमजल्यावर एक भुयार आहे. येथून मंगलगिरी येथें चोरवाट गेली आहे असें सांगतात. या देवळास पुढें ब्राह्मणी स्वरूप दिल्याचें दिसतें. तिसर्‍या मजल्यावर रामायणांतील कथांचीं चित्रें खोदलीं आहेत. आंत नरसिंहस्वामीची शेषावर निद्रिस्थ मूर्ति आहे. दुसरी बुद्धाची शिष्यांसह बसलेली एक मूर्ति आहे. परंतु हल्लीं ही विष्णूचीच आहे असें सांगतात. येथें एक तेलगू अस्पष्ट शिलालेख आहे. हा दैत्यांचा मुलूख असून करेमपुदि हें नांव खर नांवाच्या राक्षसावरून व दुर्गा हें नांव दुषण या नांवाच्या राक्षसावरून पडलें आहे असें सांगतात. दचपल्ली येथें व श्रीशैलमंदिरच्या वाटेवर दोन लेणी असून इतिपोतुला, जतेपल्लम् व इललेश्वरम् येथेंहि लेणीं आहेत असें सांगतात.

बौद्ध व ब्राह्मणं यांमधील क्रांतिकालांतील अवशेष:— या कालांत पूर्वीच्या बौद्ध लेण्यांतून ब्राह्मणांनीं केलेलीं ब्राह्मणी शिल्पकामें आढळून येतात. अशा प्रकारचा एक मंडप निनुकोंडा येथें आहे पलनद तालुक्यांतील 'पिडुगुरल्ला' व 'गुर्जल' येथील व बपतल तालुक्यांतील परचुर येथील देवालयेंहि अशींच आहेत. पिडुगुरल्लानजीक कांहीं उंचवटे (बुरुज) आहेत ते पूर्वीच्या किल्ल्याचे अवशेष असावेत असें म्हणतात. हे बुरुज अमरावती येथील बुरुजांप्रमाणेंच दिसतात.

ब्राह्मणी देवालयें व त्यांच्यावरील इ. स. ३०० ते ८०० च्या दरम्यानचे शिलालेख :- यांपैकीं विष्णूचीं देवालयें मंगलगिरि, अकिरिपल्लि, श्रीककोलम्, वेदाद्रि व गोलपल्लि, हीं आहेत. यांतील अकिरिपल्लि येथील देवालयाजवळ कांहीं कोरलेल्या गुहा आहेत.

त्याप्रमाणेंच मुख्य शिवालयें कोटप्पा, कोंडा, बेझवाडा, कलपल्लि, शिवगंगा, मोपेदिवि, चेंबरेला आणि नचेरला हीं आहेत. या देवालयांवर शिलालेख असून ते इ. स. ३०० ते ८०० च्या दरम्यानचे आहेत असें म्हणतात.

मंगलगिरि येथील विष्णुमंदिरामध्यें नरसिंहस्वामीची मूर्ति आहे. येथें फाल्गुनांत उत्सव होतो. हें मंदिर पूर्वीच्या बौद्ध लेण्यांत आहे. टेंकडीच्या पायथ्याशीं एक काळ्या पाषाणाचा स्तंभ आहे. या मंदिराच्या भुयारांतून एक चोरवाट उंदवल्लि येथें गेली आहे असें म्हणतात.

पलनद तालुक्यांतील मचेरला येथें एक जुनें दगडी देवालय असून त्यासभोंवतींच्या भिंतीवर महाभारत व भागवत यांतील कांहीं कथांतील चित्रें खोदलीं आहेत.

शंकरपुरम्, गमलपद व दशपल्लि येथील देवालयांवरहि कोरीव काम आहे. कांहीं दगडी शिवालयें आहेत.

गुर्जल येथे एक मंडप व नलगम राजा नरसिंहराय (वेलम्) यानें बांधलेलें एक मंदिर आहे. त्याचे दगड जुन्या बौद्ध इमारतींचे असावेत असें वाटतें.

किल्ले:- कोंडविड ही गंगातूरच्या पश्चिमेस १५०० फूट उंचीची १२ मैलांची एक टेंकड्यांची रांग आहे. हीवर तीन किल्ले आहेत त्यांचीं नांवें.

पुत्तकोट:- हा उडिया राजांनीं बांधला असावा. येथें पडकी देवळें, मंडप वगैरे आहेत.

दुर्गम्:- हा टेंकडीच्या माथ्यावर आहे. याला कट्टोलदिड्डी नांवाची वेस असून तीवर चार मजली गोपूर होतें. हल्ली त्याचे दोन मजले पडून गेले आहेत. दुसरी वेस पेड्ड दरवाजा म्हणून आहे. येथें खजिना, दारुगोळा व धान्य यांच्या कोठारांचे अवशेष आहेत. कांहीं मोडकीं देवालयें असून कांहींच्या मशिदी झालेल्या दिसतात. येथें प्रथम रेड्डी राजे रहात असून त्यांचा एक निरियल तख्त नांवाचा मंडप आहे. शेवटचा रेड्डी राजा निपुत्रिक मेल्यावर विजयानगरचा राजा कृष्णदेव रायलु यानें त्याच्या ७२ व्या सरदारास एका पुजार्‍याकडून देवाच्या दर्शनाच्या निमित्तानें आणवून कपटानें मारून हा किल्ला बळकाविला असें सांगतात.

कोट:- याला कोलेपेल्ली व नदेल्ली अशा दोन वेशी आहेत. याचा तट अद्याप धड आहे. येथें एक गोपिनाथ स्वामीचें देवालय आहे. येथील स्तंभ प्रेक्षणीय आहेत. या कोंडाविड टेंकडीवरील किल्ल्यांच्या दंतकथा तेलगू भाषेंत लिहिलेल्या आहेत.

कोंडपल्लि:- हा फार प्राचीन डोंगरी किल्ला असून तो पूर्वी  निझामाच्या ताब्यांत होता. हा बेझवाड्याच्या पश्चिमेस १० मैलांवर आहे. याला तट व तीन वेशी आणि कांहीं बराकी आहेत. मुख्य वेशीस दरगा दरवाजा म्हणतात. तेथें 'तानिष महाल' नांवाची मुसुलमानी पद्धतीची इमारत आहे. शिवाय इतर काहीं पडक्या इमारती व सोपे, हमामखाने वगैरे आहेत.

कृष्णा जिल्ह्यांत एकंदर तेरा तालुके आहेत. ते म्हणजे बंदर, बेझवाडा, भीमवरस, एलोर, दिवि, गुडिवाड, कैकलूर, नन्दिग्राम, नरसापूर, नुझविद, टनुकू, तिरुवर, यर्नगुदेम हे होत. इ. स. १९०३ सालीं नवीनच गुंतूर जिल्हा करण्यांत येऊन, त्यांत कृष्णा जिल्ह्यांतील कांहीं तालुके समाविष्ट केले व गोदावरी जिल्ह्यांतील कांहीं तालुके कृष्णा जिल्ह्यांत अंतर्भूत करण्यांत आले. या जिल्ह्यांत एकंदर १७०२ खेडीं असून १३ शहरें आहेत. १९२१ सालीं ह्या जिल्ह्याची लोकसंख्या २१,३३,३१४ होती. या जिल्ह्यांत एकंदर १८,४३,३४० एकर जमीन इनामी असून एकंदर जमीनमहसूल ८० लाखापर्यंतचा आहे. या जिल्ह्यांत मुख्यतः तेलगू भाषा प्रचारांत आहे. येथील शासनपद्धति इतर जिल्ह्यांप्रमाणेंच आहे.

मुसुलमानांच्या अमदानींत हिंदू अधिकार्‍यांक़डून जमीन महसूल जमविला जात असे पण पुढें मुसुलमानांची सत्ता ज्यावेळीं शिथिल झाली त्यावेळीं हें  हिंदु अधिकारी स्वतंत्र जमीनदार बनले व त्यांनीं मुसुलमान राजांनां एकदम कांहींतरी ठरीव रक्कम द्यावयाची व नंतर आपल्या ताब्यांतील रयतेकडून आपल्याला रुचेल त्याप्रमाणें सारा वसूल करून घ्यावयाची पद्धत पाडली. ज्यावेळीं कंपनीची सत्ता या जिल्ह्यावर प्रस्थापित झाली त्यावेळीं कंपनीच्या अधिकार्‍यांनां हे जमीनदार मुसुलमानांचें मांडलिक सरदार असावेत असें वाटून त्यांनीं जमीनदारांच्या अधिकारांत ढवळाढवळ केली नाहीं. त्यामुळें जमीनदारांचें आयतेच फावलें व अशा रीतीनें जुलूम व अव्यवस्था माजली.

पुढें १८०२ मध्यें ज्यावेळीं या जिल्ह्यांत कायम धारापद्धति सुरू झाली त्यावेळीं जमीमदारांच्या उत्पन्नाच्या एक तृतीयांशा सारा जमीनदारांनीं सरकारला द्यावा असें ठरलें. पण यामुळें प्रत्यक्ष रयतेवर सार्‍याचें ओझें वाढत चाललें. अखेरीस १८६४-१८७४ यांच्या दरम्यान सर्व जमीनींची मोजणी करण्यांत येऊन रयतवारी पद्धत सर्वत्र चालू करण्यांत आली. कोरड्या जमीनीवर एकरापाठीमागें दोन रुपये व पाण्याखालील जमीनीवर एकरी पांच रुपये सारा बसविण्यांत आला. जिल्ह्याच्या उत्तरभागांत सार्‍याचें प्रमाण अनुक्रमें १ रु. ४ आ. व ४ रुपये प्रत्येक एकरी ठरविण्यात आलें.

मच्छलीपट्टण व बेझवाडा वगैरे ठिकाणी म्युनिसिपालिट्या असून कांहीं ठिकाणीं जिल्हाबोर्डाकडून व तालुकाबोर्डाकडून सारा वसूल करण्यांत येतो.

या जिल्ह्याचे मुख्य पीक म्हणजे तांदुळाचें होय. तांदुळाचे पांढरे व काळे असे दोन प्रकार आहेत. कोरड्या जमीनीतील चोलम् व कम्बू ही दोन मुख्य पिकें होत. यांशिवाय कापूस, नीळ व तंबाखू यांचें उत्पन्न आहे. या जिल्ह्यांत कुरण मुबलक असल्याकारणानें गुरांची जोपासना उत्तमरीतीनें होण्याला येथें पुष्कळ वाव आहे. शेळ्या व मेंढ्यांचीहि निपज येथें विपुल होते.

या जिल्ह्यांतील बहुतेक बागाईत बेझवाडा येथील कृष्णा नदीच्या कालव्यांनी पिकतें. तलाव व विहिरी यांच्या द्वारें फारच थोड्या जमीनीला पाणी दिलें जातें.

ख नि ज सं प त्ति.— इमारतीला लागणारे दगड वजा केल्यास या जिल्ह्यांत इतर प्रकारची खनिजसंपत्ति फारच थोडी आहे. लोखंड व तांबें फारच थोड्या प्रमाणांत सांपडतें. १६-१७ व्या शतकांत गोवळकोंड्याचे सुलतान कृष्णा जिल्ह्यावर राज्य करीत असतां गोलम्पल्ली व मल्लवल्ली येथें खनिजसंपत्ति शोधून काढण्याचे प्रयत्‍न मोठ्या प्रमाणांत सुरू करण्यांत आले होते. कोल्लर येथें व पर्तियाला येथेंहि हे प्रयत्‍न चालले होते. १७ व्या शतकांत काल्लेर येथे खणण्याचे काम चाललें असतां फ्रेंच प्रवासी व जवाहिर्‍या टॅव्हर्नियर हा येथें आला होता. त्यानें लिहिलेल्या हकीकतींवरून या कोल्लर येथील खाणींत ६०,००० माणसें राबत होतीं असें समजून येतें. याच खाणींत ९०० कॅरेटचा एक हिरा सांपडला होता व तो औरंगझेबाकडे पाठविण्यांत आला. याच हिर्‍याला कोणी 'कोहिनूर हिरा' असें म्हणतात.

पलनद तालुक्यांत करेमपुडीजवळ शिशाच्या खाणी आहेत. परंतु हल्लीं त्या चालू नाहींत. पलनद आणि बिनू कोंडा या दोन्हीं तालुक्यांमध्यें तांबें सांपडतें.

व्या पा र व द ळ ण व ळ ण.- कृष्णा जिल्हा मुख्यतः कृषिप्रधान आहे. सर्व जिल्हाभर, मेंढ्यांच्या लोंकरीपासून जाडें भरडें कापड विणण्यांत येतें. मच्छलीपट्ट्ण येथें पूर्वी उत्तम गालीचे तयार होत असत व ते इंग्लंडांत जात असत. पण हल्ली तो धंदा बसला आहे. येथें एक लहानसा चामडी रंगविण्याचा कारखाना आहे व यांतून दरवर्षी ५०,००० रुपयांचा माल परदेशी जातो. जगय्यपेट येथील रेशमाचा धंदा पूर्वी भरभराटींत होता पण हल्ली त्यालाहि निकृष्टावस्था प्राप्‍त झाली आहे. या जिल्ह्यांतून बायकांच्या पातळांच्या उपयोगी असें हलक्या जातीचें कापड बाहेरगावीं बरेंच पाठविण्यांत येतें. कोंडापल्ली येथें एका हलक्या लांकडापासून खेळणी तयार होतात. कोंडाविड येथे पूर्वी कागद केला जात असे पण तोहि धंदा हल्लीं सपशेल बुडाला आहे.

कृष्णा जिल्ह्यांत मच्छलीपट्टण व निजामपट्टण हीं दोनच बंदरें आहेत. त्यांपैकीं दुसरें बंदर हल्ली निरुपयोगीच झालें आहे. १८६४ च्या महापुरामुळें मच्छलीपट्टण बंदराची बरीच नासाडी झाली. त्यामुळें त्या बंदरांतील व्यापारासहि बराच धक्का बसला. बेझवाडा येथें कातड्यांचा मोठा व्यापार चालतो. याशिवाय कृष्णा जिल्ह्यांतून एरंडिच्या बिया, मिरच्या, तंबाखू हे जिन्नस बाहेरगांवी जातात. कोमटी हीच जात या सर्व वस्तूंचा व्यापार करते. लब्बै जात मात्र चामड्याचा व्यापार करते.

[संदर्भग्रंथ.— इंपीरियल ग्याझे; एडिवरो रिव्ह्यु आक्टोवर १८६९; जेम्स फर्ग्युसन-ट्री अँड सर्पंट वर्शिप; मद्रास अ‍ॅडमिनिस्ट्रेशन रिपोर्ट १९२१-२२].

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .