विभाग अकरावा : काव्य - खतें
कृष्णान्वक- (१०४२९) त्रावणकोरमधील दक्षिणेंतील इरानियल व कल्कुलम या दोन तालुक्यांतच हे लोक आढळतात. कांहीं मक्कथायम वारसाहक्काचा कायदा पाळितात तर कांहीं मरुमक्कथायम कायद्याला धरून वागतात. पहिल्या वर्गांचे आचारविचार वेल्लाळ लोकांसारखे आहेत व दुसर्याचे नायर लोकांसारखे आहेत. यांच्या स्त्रीवर्गांत पूर्वी गोंदण्याची चाल फार असे. हे मूळचे कांजीवरम् येथील रहिवासी. यांच्यांत नियोगाची पद्धत आहे. मग दीर लहान असला तरी चालतो. [थर्स्टन. से. रि. (त्रावणकोर)].