प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें       

केनिया- आफ्रिका केनियाची माहिती द्यावयाचा म्हणजे ब्रिटिश पूर्व आफ्रिकेची माहिती द्यावी लागेल. ब्रिटिश पूर्व आफ्रिकेंत ईस्ट आफ्रिकन प्रोटेक्टोरेट, युगांडा, झांझिबार व पेंबा बेटें हीं येतात. किनार्‍याकडचा थोडा भाग सोडला तर सर्वच देश म्हणजे पूर्वआफ्रिकेचें पठार असून त्याची कमींत कमी उंची दोन हजार फूट व जास्तीत जास्त उंची ६ ते ८ हजार फूट आहे. या लेखांत फक्त पूर्व आफ्रिकेच्या संरक्षित संस्थानांची माहिती दिली असून `झांझिबार’ व `युगांडा’ यांची माहिती वेगळ्या लेखांत सांपडेल.

स्थलवर्णन- उंबा नदीपासून जुबा नदीपर्यंत व आंत युगांडासरहद्दीपर्यंत हा मुलुख पसरला आहे. झांझिबारच्या सुलतानाचा कांहीं प्रदेश लामु द्वीपसमूह व किस्मायु किल्ल्याच्या भोंवतालचा १० मैलाचा टापू यांत येतो.

याचें क्षेत्रफळ २,४६,८२२ चौ. मैल असून लोकसंख्या २८,०७,००० आहे. पैकी ५३६२ यूरोपियन व १७.० आशियाटिक लोक आहेत.

समांतर असणार्‍या प्रदेशांपैकीं किनार्‍यालगतचा अथवा `टेंबोररी’ पहिला भाग होय. या प्रदेशाची रुंदी फार नाहीं. किनार्‍यावर बर्‍याच खाड्या असून मोंबासा अथवा म्व्हीटा, लामू, मंडा आणि पट्टा हीं बेटें आहेत. या प्रदेशापलीकडे `यांका’ नांवाचा सपाट प्रदेश आहे. यानंतर पर्वताच्या ओळी आहेत. पुढें गवताचीं मोकळीं मैदानें असून त्यातं कॅप्टे अथवा कॅपोटे आणि अ‍ॅथि हीं विशेष मोठीं आहेत. या भागांत सर्वात उंच शिखरें केनिया (१७००७ फू.), सॅट्टिमा (१३,२१४ फू.) व नंदरुआ (१२,९०० फू.) हीं आहेत. सॅट्टिमा अथवा अ‍ॅबरडेअर पर्वताची सर्वसाधारण उंची १०,००० फूट आहे. सॅबाकी व टाना या दोन मोठ्या नद्या आहेत. ग्वासोन्थिरो नदी लोरियन दलदलींत नाहीशी होते. रिफ्टव्हॅलीत बरीच तळीं आहेत. दक्षिणेस डोजिलानी मैदानें आहेत. याच्या उत्तरेस सुस्ता व लाँगोनोट हीं मृत ज्वालामुखीचीं शिखरें असून नैवाशा सरोवर आहे. याच्या उत्तरेस अनुक्रमें माउंट, वरु, आणि नॅकुरो, हॅनिंग्टन, बॅरींगो वसुगोटा हीं सरोवरें आहेत. यांच्या उत्तरेस रुडाल्फ सरोवर आहे. रिफ्टव्हेलीच्या पश्चिमेस माऊएस्कार्पमेंट, एलजीयो एस्कार्पमेंट, कांहीं सुपीक जमीन व व्हिक्टोरियानियांझा आहेत. रुडाल्फ सरोवराच्या पूर्वेस व स्टेफॅनोच्या दक्षिणेस एक मोठें निर्जल मैदान आहे. अबिसीनिया व हें संस्थान यांच्यामध्यें गोरोएस्कार्पमेंट आहे.

भूस्तर वर्णन:- ब्रिटिश पूर्वआफ्रिकेंत भूस्तररचनेंत वेगळाले असे चार प्रदेश आहेत. समुद्रकांठचा भाग म्हणजे अलीकडच्या खडकाचा झालेला आहे. पायथ्याजवळचें पठार अगदीं खालच्या खडकी थराचें बनलेलें आहे. टाऊपासून डिकुयुपर्यंतचें प्राचीन पठार जुन्या स्फटिकाच्या थराचे बनलें आहेत. त्यांवर ज्वालामुखीच्या खडकाचा थर बसून त्यामुळें मध्यपूर्वआफ्रिकेच्या ज्वालामुखीचें पठार तयार झालें आहे. ज्वालामुखी पर्वताचें क्षेत्रफळ १,५०,००० चौ. मैल आहे.

हवामान, वनस्पती व प्राणी:- हवामान व वनस्पती ह्या बाबतींत सुद्धां ब्रिटिश पूर्वआफ्रिकेचे किनार्‍याशी समांतर असे भाग पडतात. किनार्‍याजवळच्या प्रदेशाची हवा उष्ण परंतु निरोगी आहे. येथें सुमारे ३५ इंच पाऊस पडतो. यानंतरच्या प्रदेशांत हवा जास्त उष्ण आहे. डोंगरांत म्हणजे ५००० फूट उंचीच्या प्रदेशांत हवा फार निरोगी आहे. ७००० फूट उंचीवर हवा फार थंड असते. व्हिक्टोरिया-नियांझाच्या भोंवतालच्या प्रदेशांतील हवा फार उष्ण आहे. डिसेंबरपासून एप्रिलपर्यंत येथें उन्हाळा असतो. मार्चपासून जूनपर्यंत व नोव्हेंबर, डिसेंबरमध्यें पाऊस पडतो. येथें कधीं कधीं अवर्षणें पडतात.

येथें नारळाचीं झाडें, मॅनग्रोव्ह, एबनी, आलीव्ह, जुनी पीझर, बांबू हीं झाडें असून कापूस व अंजीरहि होतात. कांहीं ठिकाणीं मोठाल्या झाडांचीं अरण्यें असून त्यांच्या सर्वांत खालच्या फांद्या जमिनीपासून ५० फुटावर असतात. मौल्यवान रबराच्या वेलाच्या दोन जाती येथें सांपडतात.

जनावरांत उंट, हत्ती, गेंडा, रेडा, काळवीट, झिब्रा, जिराफ, पाणघोडा, सिंह व माकडाच्या पुष्कळ जाती येथें आहेत. यांत गेंड्यांची संख्या जास्त असून त्यांच्यापासून फार भय असतें. मोठाल्या नद्यांत व व्हिक्टोरिया नियांझांत सुसरी सांपडतात. येथें घोणा, विंचू व डांस बरेच आहेत. शहामृग, माळढोंक, बगळे, फ्लेमिंगो वगैरे पक्षी आहेत.

लोक- किकुयुपठार, रिफ्टव्हॅली व केनिया भाग यांत गोरे लोक असून ते बहुतेक शेतकरी आहेत. याच जिल्ह्यांत कांहीं हिंदी लोकांची वस्ती आहे. दक्षिणेस निग्रोंच्या बन्नु विभागांतील लोक आहेत. यांत बदुंबा, किकुयु व वन्थिका ह्या मुख्य जाती आहेत. व्हिक्टोरिया- नियांझाच्या ईशान्य किनार्‍यावर कॅव्हिरोंडो लोक राहतात. हे लोक नग्न असतात. वायव्येस निलोटिक जाती सांपडतात. याशिवाय मसाई, बोरनी व किनार्‍याजवळ राहणार्‍या सोमालींपैकीं हर्तो, बांडोरोबो नांवाची पारध करून राहणारी जात, या जाती आहेत. समुद्रकिनार्‍यावर स्वाहिली, अरब व हिंदी लोक सांपडतात.

प्रांत व शहरें- केनियाचे खालील विभाग होतात. सेयीडी (राजधानी मोंबासा), उकंबा (राज. नैरेबी), केनिया (राज. न्थेरी), टॅनालंड (राज. लामू), जुवालंड (राज. किस्मायु), नैव्हशा (राज. नैव्हशा), न्यांझांप्रांत (रा. किसूमू). या प्रांतांचे जिल्हे व पोटजिल्हे असे भाग पाडले आहेत. मोंबासा हें सर्वांत मोठें शहर असून त्याची लोकसंख्या सुमारें ३०,००० हजार आहे. मोंबासा शहराच्या समोर फ्रियरटाऊन शहरांत गुलामगिरीतून मुक्त झालेले लोक राहतात. लामू हें किनार्‍यावरील अरबांचें प्राचीन ठाणें होतें. यशिवाय मलिंदी, पट्टा, किपीनी, व किस्मायु हीं किनार्‍याच्या वरील शहरें आहेत. मलिंद येथें १४९८ त वास्कोदगामानें उभारलेला स्तंभ आहे. युगांडा रेल्वेवरील नैरोबी हें संस्थान राजधानीचें शहर आहे. नैव्हशा हें त्याच नांवाच्या सरोवरा जवळ आहे. किसुम अथवा पोर्ट फ्लोरेन्स हें व्हिक्टोरियानियांझा सरोवराजवळच्या टेंकडीवर वसलेलें असून त्याचा युगांडा प्रांतांशीं फार व्यापार चालतो.

दळणवळणाची साधनें- सडका तयार केल्यानें या संस्थानची बरीच भरभराट झाली. पूर्वी मोंबासाहून बर्कलेबे पर्यंत (व्हिक्टोरिया नियांझावरील) मोठी सडक तयार केली होती. नंतर मोंबासाहून व्हिक्टोरियानिआंझा सरोवरापर्यंत ६१८ मैलांची रेल्वे बांधण्यांत आली. युगांडा रेल्वे ही डोंगरांतील रेल्वे आहे. रेल्वेनें गुलामांचा व्यापार बंद होऊन युगांडामध्यें ब्रिटिश सत्तेची चांगली घडी बसली. मोंबासाला बर्‍याच आगबोटीच्या कंपन्यांचीं जहाजें येतात. हिंदुस्थान व मोंबासामध्यें आगबोटीनें दळणवळण नेहमीं चालतें. देशांत तारायंत्र आहे.

शेतकी व इतर धंदे- व्हिक्टोरियानियांझा व किनार्‍यावरील प्रदेशांत तद्देशीय व हिंदी लोक शेतकी करतात, आणि यूरोपियन लोकांचे कांहीं मळेहि आहेत. तांदूळ, मका, इतर धान्यें, कापूस, तंबाखू, नारळ, मॅनग्रोव्ह झाडाची साल, एरंड, ऊंस ह्या वस्तू होत असून रबर गोळा करण्याकडे बरेच लोक खपतात. उंच प्रदेशांतील यूरोपियन वसाहतवाले भाज्या व त्यातल्या त्यांत बटाटे उत्पन्न करण्याकडे ज्यास्त लक्ष देतात. ओट, जंव, गहूं, कॉफी वगैरे येथें होतात. येथें जनावरांचे मोठाले कळप पाळतात. यांत मेंढ्या व शहामृग यांची वाढ विशेषेंकरून करतात. इमारतीचें लांकूड व वाखांचीं झाडें किनारा व उंच प्रदेश यांमध्यें बरींच आढळतात. येथील जमीन हलकी, तांबड्या रंगाची व चिकणमातीची अशी असून कांहीं ठिकाणीं निवळ काळी जमीन आढळते.

वांख व कापूस या धंद्याखेरीज येथे डुकराचें मांस खारविण्याचा धंदा चालतो. देशी लोक कापड, चटया व टोपल्या तयार करतात. दगड, चुनखडी, तांबें यांच्या खाणी येथें असून थिका नदींत हिरे सांपडतात.

व्यापार— कापड, लोखंडी सामान व तयार माल हा मुख्य आयात माल असून तो विशेषतः हिंदुस्थान व यूरोपमधून येतो. हिंदुस्थान व ग्रेटब्रिटन मिळून शेंकडा ५० या प्रमाणांत माल पाठवितात. येथील निर्गतींत युगांडाच्या बाह्य व्यापाराचा समावेश होतो. खोबरें, कातडीं, धान्य, बटाटे, रबर, हस्तिदंत, मिरच्या, मेण, कापूस व वांख या वस्तू परदेशी जातात. १९१७-१८ सालीं २८,०९,६८१ पौंडांची आयात असून १७,४१,९३९ पौंड निर्गत होती. संयुक्त संस्थानें व ग्रेटब्रिटननें हा माल घेतला.

शासनपद्धति- याची राज्यपद्धति क्रौन कालनीप्रमाणें असून सर्व सत्ता गव्हर्नरच्या ताब्यांत असते. त्याच्या हाताखाली लेफ्टनंट गव्हर्नर असतो. प्रत्येक प्रांतावर कमिशनर असतो. येथें कार्यकारी व कायदेकौन्सिलें आहेत. `दहा मैलांच्या पट्ट्यांत’ झांझिबारच्या सुलतानाचा अधिकार चालत असून तेथें अरब व तद्देशीय लोकांनां महंमदी कायदा लागू आहे. सुलताननें १९०७ मध्यें गुलामगिरीविरुद्ध कायदा केला. त्यापूर्वी १८९० च्या कायद्यान्वयें असें जाहीर केलें होतें कीं त्यानंतर जन्मलेल्यांनां गुलाम करतां येणार नाहीं. संस्थानच्या इतर भागांत गुलामगिरी नाहीं. येथील न्यायपद्धति हिंदी न्यायपद्धतीप्रमाणें असून चालरीती आफ्रिकन लोकांच्या प्रमाणें आढळून येतात. येथें २००० पोलीस व किंग्ज आफ्रिकन रायफल्सच्या दोन पलटणी आहेत. जकात, परवाने, अबकारी, रेल्वे व पोस्ट या एकंदर उत्पन्नाच्या मुख्य बाबी होत. एतद्देशीय लोक झोपडीवर कर देतात. युगांडा रेल्वे झाल्यामुळें व्यापार व उत्पन्न यांची वाढ झाली. १९१५-१६ मध्यें ११,६५,५६१ पौंड उत्पन्न व १०,७२,९१७ पौंड खर्च होता.

येथें मुख्य नाणें शिलिंग आहे. येथें मिशनरी लोकांच्या शाळा असून त्यांत धंदेशिक्षणहि देतात. मोंबासा येथें अरब शाळा आहेत. नैरोबी येथें हिंदी व यूरोपियन लोकांसाठी सरकारी शाळा आहेत.

इतिहास- ८ व्या शतकापासून ११ व्या शतकापर्यंत अरब व इराणी लोकांनी किनार्‍यावर वसाहती केल्या. पुष्कळ ठिकाणीं त्यांनीं राजकीय सत्ता स्थापन केली व लवकरच झेंज साम्राज्याचा उदय झाला. या वेळेपासून ब्रिटिश सत्तेच्या उत्कर्षापर्यंत किनार्‍यावरील शहराचा इतिहास म्हणजे झांझिबारचा इतिहास होय. ब्रिटिश पूर्व आफ्रिकेच्या आंतल्या भागाचा शोध १९ व्या शतकाच्या मध्यांत लुड्वीग क्राफ, जोहानेस रेबमन हे जर्मन मिशनरी व बॅरनव्हॉन डेर डेकेन यांनीं लाविला. व्हॉन डेकेन व तीन यूरोपियन यांचे खून बर्डेरा येथें सोमाली लोकांनीं केले (१८६५). स्कॉटिश मघसी थाँपसन यानें व्हिटोरियानियांझाचा व काऊंट टेलेकी (हंगेरियन) यानें रुडाल्फ व स्टेफॅमी सरोवरांचा शोध लाविला.

ब्रिटिश लोकांचा प्रथम झांझीबारशी संबंध आला. येथें १९ व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांचें बरेंच वजन होतें. सुलतान बर्गश हा सर जॉन कर्क या ब्रिटिश प्रतिनिधीच्या सल्ल्यानें नेहमीं वागे. इ.स. १८७७ सालीं बर्गशहानें विल्यम मॅकिनॉन (नंतर सर विल्यम मॅकिनॉन) ब्रिटिश इंडिया स्टीम नॅव्हीगेशन कंपनीचा अध्यक्ष याला कांहीं सवलती व हक्क देऊं केले. परंतु परराष्ट्रीय खात्याचा पाठिंबा नसल्यानें वरील सवलती नाकारण्यांत आल्या. त्याचप्रमाणें किलिमांजारो जिल्ह्यांत जॉन्सन याला मिळालेल्या सवलतीकडे दुर्लक्ष देण्यांत आलें. परंतु जर्मनांनी १८८४-८५ त पूर्व आफ्रिकेच्या किनार्‍यावर कांहीं हक्क संपादन केल्यामुळे ब्रिटिशसत्तावाद्यांनीं पुन्हां उचल खाल्ली.

मोंबासाच्या मागील बाजूच्या जिल्ह्यांवर १८६८ त ब्रिटिशांनीं जर्मनीच्या अनुमतानें आपला हक्क बसविला. १८८७ त बर्गशहानें मॅकिनानच्या कंपनीला जर्मन सत्ताक्षेत्राच्या बाहेर असलेल्या आपल्या प्रदेशांत कांहीं हक्क दिले. परंतु सार्वराष्ट्रीय तहान्वयें किनार्‍यापासून दहा मैलपर्यंतच्या प्रदेशावर सुलतानचा हक्क असल्याचें ठरविण्यांत आलें. वरील प्रदेश व त्याच्या मागील भाग यांवर अंमल बसविण्याची इच्छा असल्यानें या कंपनीनें `इंपीरियल ब्रिटिश ईस्ट आफ्रिका कंपनी’ हें नांव धारण केलें व कांहीं जास्त हक्क मिळविले (१८८८). यामुळे कंपनीचें भांडवल २,४०,००० पौंड उभारण्यांत आलें. परंतु जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीच्या चढाओढीनें ब्रिटिश कंपनीला बराच त्रास झाला. नवीन कंपनीस १८८८ मध्यें सुलताननें कांहीं हक्क दिले होते. व्हिक्टोरियानियांझाच्या दक्षिणेस जर्मनीचा कारभार चालेल असें प्रिन्स बिस्मार्कच्या अभयवचनावरून वाटलें. परंतु जर्मनांनी लामू वगैरे कंपनीच्या सत्तेखालील भागांत आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली. याला जर्मन सरकारचा पाठिंबा मिळाला. परंतु ब्रिटिश कंपनीला परराष्ट्रीय खात्याकडून मदत मिळण्याऐवजीं उलट निरुत्साहजनक उत्तरें मिळत गेली. ब्रिटिशांनी ऑक्टोबर १८८८ च्या सवलतीमुळें बंदरांतील जकातीच्या ऐवजी बरीच रक्कम सुलतानला देण्याचें कबूल केले, परंतु लवकरच सुलतान वारला व त्याच्या नंतरच्या सुलतानाच्या जवळ जर्मनीनें लामू वगैरेची मागणी केली. त्यामुळें व्यापारांत बराच चट्ट बसला व सुलतानला मोठी रक्कम द्यावी लागत असल्यानें कंपनीला जास्त तोटा आला. परंतु तिनें साम्राज्याचे बरेच हितसंबंध सुरक्षित राखले.

जुलै १८८७ च्या जर्मनी व ग्रेटब्रिटनमधील पत्रव्यवहारांत नमूद केल्याप्रमाणें युगांडावर ब्रिटिशांचा हक्क होता. परंतु जर्मन लोकमत याविरुद्ध असून नकाशांत हा प्रदेश जर्मन अंमलाखाली दाखविला होता. परंतु ब्रिटिश जनतेच्या मताप्रमाणें पाहिलें असतां हा प्रदेश ब्रिटिश सत्तेखालीं येत असे. इ.स. १८८९ त कार्लपीटर्स नांवाच्या जर्मन अधिकार्‍यानें युगांडावर एक स्वारी केली. म्हणून कंपनीनें जॅक्सनला व्हिक्टोरिया नियांझाला पाठविलें. परंतु युगांडांत न जाण्याचा हुकुम मोडून युगांडांतील लोकांच्या बोलावण्यास मान देऊन जॅक्सननें आपला मोर्चा युगांडाकडे वळविला. हें पाहून पीटर्स परत फिरला व कांहीं तह केल्याचें त्यानें जाहीर केलें. जॅक्सननें सुद्धा कांहीं तह केले. इतक्यात १८९० मध्यें आंग्लोजर्मन तहनाम्यांत युगांडावर ब्रिटिश अंमल असल्याचें जाहीर झालें. कंपनीचा अंमल तेथें बसूं न देण्याची फ्रेंच मिशनरींनीं बरीच खटपट केली. परंतु त्यांचा प्रयत्‍न व्यर्थ गेला. १८९० मध्यें ब्रुसेल्स येथें सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींनीं जमून गुलामगिरी मोडण्याचें ठरविले. याला कंपनीच्या युगांडांतील चळवळीचें बरेंच साहाय्य मिळालें. पुढें तिनें मोंबासा ते व्हिक्टोरियानियांझा पर्यंत रेल्वे केली. एकंदर खर्च कंपनीला झेपला नाही म्हणून साम्राज्य सरकाराकडे मदतीची याचना केली असतां पार्लमेंटांत बिल नामंजूर झाले. पैशाची बरीच अडचण असल्यामुळें कंपनीनें युगांडांतील आपलें सैन्य परत बोलाविलें व ब्रिटिश सरकारानें संरक्षित संस्थान म्हणून देशावर आपला अंमल बसविला.

कंपनीवर बर्‍याच सांपत्तिक अडचणी येऊन पुढें ती मोडली. १८९० मध्यें झांझिबार ब्रिटिश संरक्षणाखालीं आल्यानें येथें खुला व्यापार चालू झाला. परंतु शासन वगैरेचा कंपनीचा खर्च तसाच राहून जकात, कर वगैरे वसूल करतां येईना. यामुळें बराच तोटा झाला व त्याबद्दल मोबदला कांहींच मिळाला नाहीं. कंपनीनें करासंबंधीं कांहीं ठराव पुढें मांडले होते. परंतु त्याला परराष्ट्रीय खात्याची संमति मिळाली नाही.

मळे व व्यापार यांत तोटा आणि एतद्देशीय व्यापार्‍यांस दिलेला बुडीत पैसा अशी चोहोंकडून संकटें आलीं असतांनां सर विल्यम मॅकिनॉन हाहि १८९३ त मरण पावला. अखेरीस सर्व सनदा व कारभार सरकारच्या स्वादीन करण्याचें ठरलें. सरकारनें कंपनीचे सर्व हक्क, मालमत्ता अडीच लाख पौंडास विकत घेतली. कंपनीच्या भागीदारास फायदा मुळींच मिळाला नाही. परंतु कंपनीनें कामगिरी मात्र उत्कृष्ट रीतीनें बजावली. येथें ब्रिटिश अंमल होण्यास सर विल्यम मॅकिनॉन यांचे प्रयत्‍न कारणीभूत झाले. या गृहस्थानें व त्याच्या बरोबरच्या मंडळींनी गुलामगिरी नाहींशी करणें व लोकांस सुधारणें यासाठीं बरेच प्रयत्‍न केले. यासाठी त्यांनीं मद्याचा व्यापार बंद केला, सडका बांधल्या व औद्योगिक मिशनांची स्थापना केली.

१ जुलै १८९५ रोजीं ब्रिटिश सरकारनें हें राज्य आपल्या ताब्यांत घेतल्याचे जाहीर केलें. याला पूर्व आफ्रिकेचें संरक्षित राज्य असें नांव मिळालें. वितूचें सुलतानचें राज्य ब्रिटिश संरक्षित राज्यांत सामील करण्यास आलें. याच सुमाराला मझरुई या प्रसिद्ध अरब घराण्यांत वारसामुळें लढा पडून अखेरीस अरबांचें बंड झालें. अखेरीस १८९६ त बंडखोर जर्मन प्रदेशांत गेले व तेथें त्यांनां अडकविण्यांत आलें. या बंडानें अरबी अंमलाचा नाश होऊन त्या ऐवजी यूरोपियन अंमल बसला.

मोंबासा- व्हिक्टोरियानियांझा रेल्वेला १८९६ त सुरुवात होऊन ती १९०३ मध्यें पुरी झाली. मसाई, सोमाली वगैरे जातीवर चांगला दरारा बसला. आतांपर्यंत किनार्‍याच्या प्रदेशाचें महत्त्व युगांडाचा रस्ता म्हणून जास्त असे. परंतु रेल्वेमुळें पठारावर यूरोपियन लोकांस राहण्यायोग्य असा प्रदेश आढळला. ईस्ट आफ्रिका सिंडीकेट व इतर लोक यांनीं वसाहत करण्यास जमीनींची मागणी केली (इ.स. १९०२). बरेच वसाहतवाले आल्यानें इ.स. १९०३ मध्यें वसाहतीस जमीन देण्याची बंदी झाली. याच सुमारास परराष्ट्रीय प्रधान लॉर्ड लँड्सडौन व येथील कमिशनर सर चार्लस इलियट यांच्यांत बेबनाव होऊन सर चार्लसनें राजीनामा दिला. याच्या नंतरचे सर डोनाल्ड स्टुवर्ट यांनीं मसाई लोकांनां दुसरीकडे वसाहत करावयास लावून वसाहतीसंबंधीं भानगडी मिटविल्या. ता. १ एप्रिल १९०५ पासून या प्रांताचा राज्यकारभार परराष्ट्रीय खात्याकडून वसाहत खात्याकडे देण्यांत आला. १९०५ च्या अखेरीस सुमारें १० लक्ष एकर जमीन मक्त्यानें देण्यांत आली अथवा विकली. गोरे रहिवाश्यांनीं कॉलनिस्टस असोसिएशन म्हणून मंडळे स्थापिलें. याच्या मागणीवरून १९०७ मध्यें एक कायदे कौन्सिल स्थापण्यांत आलें. येथें गव्हर्नराची नेमणूक होऊं लागली. याच वर्षी यूरोपियन लोकांस अयोग्य असलेल्या जिल्ह्यांत हिंदी वसाहतींना उत्तेजन देण्यांत आलें. युद्धप्रिय मसाई लोकांकडून सरकारला फारसा त्रास झाला नाहीं. सोमाली लोकांनीं मात्र त्रास दिला. परंतु त्यांच्यावर स्वारी करून (१९०५-०६) त्यांनां वठणीस आणलें. येथें मजुरांचा पुरवठा नसल्यामुळें वसाहतवाल्यांना बराच त्रास झाला. त्यांत एतद्देशीय लोकांनां काम करण्याचा कंटाळा असल्यानें विशेष भर पडली.

ब्रिटिश सरकारचा अंमल बसला तरी उत्तरेकडच्या भागाची माहिती नव्हती. या भागावर गॅलास व अबिसीनियन सरकारचीं ठाणीं रुडाल्फ सरोवराच्या दक्षिणेपर्यंत सरकलीं व बोरान देश त्यांनीं ताब्यांत घेतला. अखेरीस अबिसेनियन सरकारशीं ठराव होऊन जुबानदी व सरोवर यांमध्यें सरहद्द ठरवण्यांत आली (१९०७). १९०८-०९ मध्यें नेमलेल्या अँग्लो-अबिसीनियन कमिशननें ती कायम ठरवून टाकली.

इ.स. १९०९ मध्यें सर पर्सी जिरौर्ड हा केनियाचा गव्हर्नर झाला. ह्या सुमारास केनियामध्यें रहाणार्‍या गोर्‍या लोकांमध्यें त्यांच्या मागण्या पुर्‍या न झाल्याकारणानें असंतोष माजून राहिला होता पण अशा बिकट परिस्थितींतहि जिरौर्ड यानें आपला कारभार मोठ्या कुशलतेनें चालविला. १९११ पर्यंत या गोर्‍या लोकांमध्यें व केनियातील रहिवाशांमध्यें, फारसें वितुष्ट नव्हते. पण १९११ मध्यें हें वितुष्ट अचानक तर्‍हेनें प्रगट झालें. यावेळी देश्य लोकांकडून चोर्‍यांचा उपद्रव फार होत असे एकदां कोल नांवाच्या एका वसाहतवाल्यानें, मेंढ्या चोरल्याच्या निमित्तावरून एक किक्यूयू जातीच्या रहिवाशाला ठार मारिलें. तेव्हा ब्रिटिश सरकारनें त्याला हद्दपारीची शिक्षा फर्मावली. त्यामुळें शेफारून गेलेल्या गोर्‍या वसाहतवाल्यांनी एकच काहूर माजविलें व ब्रिटिश सरकारला चोरांपासून गोर्‍यांचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपाय अंमलांत आणणें भाग पडलें. पण त्यामुळें या गोर्‍या लोकांनां पुरेसे मजूर मिळेनात, तेव्हां वर्षांतून २ महिने तरी मजुरांनीं सार्वजनिक काम केलेंच पाहिजे असा एक जाहीरनामा सरकारनें काढला. त्यावेळपासून या काळ्या मजुरांच्या हालाला सुरुवात झालीं.

इ. स. १९१२ च्या जुलैमध्ये जिरौर्ड यानें राजीनामा दिला व त्याच्या दली सर एच्. सी. वेलफील्ड हा नवीन गव्हर्नर आला. जुबालंडमध्यें सेहेहात जातीनें बंडखोरीचें धोरण स्वीकारल्यामुळें तसेंच अबिसिनियाच्या टापूंतल्या सोमालिलँडच्या सरहद्दीवरील प्रांतांत तुरकान व इतर जातींनीं धामधूम सुरू केल्यामुळें, सरकारला त्यांच्या बंदोबस्तासाठीं तजवीज करणें भाग पडलें. १९१४ मध्यें महायुद्धाला सुरुवात झाली. तेव्हां येथील वसाहतवाल्यांनी व काळ्या रहिवाशांनींहि आपापलीं पलटणें उभारलीं. १९१६ च्या मार्च पर्यंत या पलटणींनीं जर्मन लोकांच्या हल्ल्याला उत्तम प्रकारें तोंड देऊन जर्मन लोकांचा पराजय केला. पण या युद्धांत केनियांतील मूळच्या रहिवाशांनां फार त्रास सोसावा लागला. मालाची व युद्धोपयोगी सामानाची नेआण करण्यासाठीं लष्कराला मांस पुरविण्यासाठीं या काळ्या रहिवाशांना आपल्यांतील माणसें पुरविणें भाग पडलें. तरी पण अनंत हाल सोसूनहि या रहिवाशांनीं दोस्त राष्ट्रांना अमोलिक साहाय्य केलें. यांतच जूबालंडमधील बंडखोर जातींनीं पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या बंदोबस्तासाठीहि ब्रिटिश सरकारला ताबडतोब व्यवस्था करणें भाग पडलें.

१९१७ मध्यें बॅलफील्डनें राजीनामा दिल्यामुळें सर बौरिंग याची त्या जागी नेमणूक झाली. बौरिंगच्या कौन्सिलनें नेमलेल्या कमिटीनें, राज्यकारभारांत लोकनियुक्त प्रतिनिधींना जागा द्यावी अशा प्रकारच्या सुधारणा सुचविल्या पण त्या अंमलांत आल्या नाहींत. १९१९ मध्यें बौरिंगच्या जागीं सर एडवर्ड नार्दे याची नेमणूक झाली. याच्या अमदानींत केनियांत पुष्कळच असंतोष माजला. महायुद्धामुळें चलनी नाण्यासंबंधीं फार बिकट परिस्थिति उत्पन्न झाली होती. केनियांत मूळचें रुपया हें मुख्य चलनी नाणें होतें. पण १९१५ पासून पौंड हें नाणें सरकारनें मुख्य ठरविलें व पौंडाचा भाव १५ रुपये ठरविला. पण १९१७ मध्यें रुपयाचा भाव अंदाजाबाहेर वाढला. १९२० मध्यें रुपयाचा भाव २ शिलिंग ९ पेन्स झाला. तेव्हां ही आपत्ति टाळण्यासाठीं केनिया, युगांडा व टांगानिका प्रदेशांत रुपयाचा भाव २ शिलिंग ठरविण्यांत आला. याचा परिणाम केनियांतील उद्योगधंद्यांवर फार विपरीत होऊं लागला. सरते शेवटीं वसाहत सरकारनें शिलिंग हें मुख्य नाणें करावयाचें ठरविलें.

चलनी नाण्यांच्या घोटाळ्यानें ज्याप्रमाणें असंतोष माजला त्याचप्रमाणें युद्धांत भाग घेतलेल्या शिपायांनां जमिनी बक्षिस देण्याच्या बाबतींतहि यश न आल्यामुळें त्यांच्यामध्यें असंतोष माजला.

याच सुमारास ब्रिटिश ईस्ट आफ्रिका ही ब्रिटिश सरकारची वसाहत म्हणून ठरविण्यांत आली. याच्यापूर्वी ब्रिटिश ईस्ट आफ्रिकेचा दर्जा संरक्षित संस्थान म्हणून होता. पण १९१९ मध्यें तो दर्जा बदलला. १९१९ च्या जुलैमध्यें वसाहतीच्या कायदे कौन्सिलमध्यें यूरोपियन लोकांनां लोकनियुक्त प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क देण्यांत आला. या कायदेकौन्सिलमध्यें ५ हिंदी लोकांतर्फे, दोन अरबांतर्फे व एक सरकारनियुक्त प्रतिनिधि घेण्याचें ठरविण्यांत आलें. गोर्‍या लोकांचा मतदानाचा हक्क विस्तृत करण्यांत आला. १९२० मध्यें ब्रिटिश ईस्ट आफ्रिका ही साम्राज्याला जोडण्यांत आल्याचें जाहीर करण्यांत आलें व त्याला केनियाची वसाहत असें नांव देण्यांत आले. केनिया पर्वतावरून हें नांव निवडण्यांत आलें. या वसाहतींत झांझिबारचा मात्र समावेश करण्यांत आला नाहीं. त्याला केनिया प्रोटेक्टोरेट असें स्वतंत्र नांव देण्यांत आलें. यानंतर वसाहतीच्या संरक्षणासाठी बंदरें बांधणें, रेल्वे बांधणें, इत्यादी सार्वजनिक कार्यासाठीं मोठें कर्ज काढण्यांत आलें.

पण राज्यकारभारामध्यें जी अदलाबदल झाली व त्यांत गोर्‍यांनां जे अधिक हक्क मिळाले त्यामुळें केनियांतील रहिवाशांमध्यें मात्र असंतोष माजण्यास सुरुवात झाली. वास्तविक पहातां गोर्‍या लोकांपेक्षां दुपटी तिप्पटीनें, काळ्यांची संख्या अधिक, पण राज्यकारभारामध्यें त्यांना मज्जाव होता. ब्रिटिशांच्या नेहमींच्या धोरणाला धरूनच हें होतें, पण काळ्या रहिवाशांनां हें न खपून त्यांनीं याविरुद्ध चळवळीस सुरुवात केली. राष्ट्रीयत्वाची ज्योत त्यांच्यांमध्यें हळू हळू पेटूं लागली होती. या लोकांनीं गोर्‍या लोकांच्या बरोबरीनें आपल्यास हक्क मिळावे यासाठीं चळवळ सुरू केली. पण केनियांतील गोर्‍या लोकांनां हें कसें खपणार? आपण केनिया वसाहतीची वाढ केली तेव्हां आपणाला केनियाच्या राज्यकारभारांत अधिक हक्क असलेच पाहिजेत असा या गोर्‍या लोकांनी कांगावा करण्यास सुरुवात केली. शिवाय आपण वर्णदृष्ट्या या काळ्या लोकांपेक्षां श्रेष्ठ आहों असेंहि त्यांनीं प्रतिपादण्यास आरंभ केला. या वर्णविषयक श्रेष्ठत्वाच्या विधानाला जरी वसाहत सरकारनें कबुली दिली नाही तरी राज्यकारभारांत गोर्‍या लोकांचा हक्क अधिक असणें जरूर आहे या मतास मात्र वसाहत सरकारनें दुजोरा दिला. यावेळीं लॉर्ड मिलनर हे वसाहतमंत्री होते. त्यांनीं या गोर्‍या लोकांच्या दोन्ही विधानांनां आपली संमति दिली व गोर्‍या लोकांसाठी केनियामधील उंचवट्याचा जो चांगला प्रदेश आहे तो वसाहत करण्यासाठीं त्यांना स्वतंत्र द्यावा अशी तोड सुचविली. पण याचा केनियांतील हिंदी रहिवाशांनी तीव्र निषेध केला व आपल्याला गोर्‍या लोकांबरोबर समान हक्क मिळावेत अशी न्याय्य मागणी पुढें मांडली. सुदैवानें हिंदुस्थान सरकारनें व भारत मंत्र्यांनी हिंदी लोकांची बाजू घेतली. हिंदुस्थान सरकारनें पार्लमेंटाकडे १९२० च्या ऑक्टोबर महिन्यांत एक खलिता पाठविला त्यांत वर्णमूलक श्रेष्ठत्वाला अजीबात फांटा देण्यांत येऊन सर्वांनां मतदानाचे समान हक्क देण्यांत यावेत असा मजकूर होता. १९२१ च्या जूनमध्यें चर्चिल हे वसाहत मंत्री झाले व त्यांनीं वर्णविषयक श्रेष्ठत्वाला अजीबात फांटा दिल्याचें जाहीर केलें.

लोकसंख्या- १९२० मध्यें केनिया वसाहतींत गोर्‍यांची लोकसंख्या ५५७०, आशियाटिक लोकांची १७४२७ व अरबांची ८००० होती. मूळच्या रहिवाशांची एकंदर संख्या २६,२०,००० इतकी होती. मोंबासा हें केनियांतील मुख्य बंदर होय. त्याची लोकसंख्या ३२००० होती. नैरोबी राजधानीची लोकवस्ती १५,२७४ असून त्यांत २०२० यूरोपियन व ५००० हिंदू होते.

व्यापार— १९१८-१९१९ या वर्षांत ३३,९७,००० पौंडांची आयात व २४,९8,००० पौंडांची निर्गत झाली. वसाहतीचें उत्पन्न १५,४८,००० पौंड व खर्च १५,७०,००० इतका झाला. १९२०-२१ मध्यें, उत्पन्न व खर्च ३१,९२,००० पौंड होता.

केनियांतील हिंदी लोक— सर्व्हंट ऑफ इंडिया सोसयटीचे सभासद रा, वझे हे केनियांत जाऊन आल्यावर तेथील लोकांसंबंधी पुढील माहिती त्यांनीं ज्ञानप्रकाशांत प्रसिद्ध केली आहे:- केनियांत सुमारे २२,००० हिंदी लोक आहेत. त्यांत गुजराथी लोकांचा विशेष भरणा आहे. गुजराथी लोकांच्या खालोखाल पंजाबी लोकांची संख्या आहे. दक्षिणी अगर मद्रासी लोक केनियांत एकंदरींत फारच कमी आहेत. पंजाबी लोकांची संख्या सुमारें सहा हजार आहे. त्यांपैकीं बहुतेक लोक कारागिरी करणारे आहेत. गुजराथी लोकांत लहानमोठा व्यापार करणारे बरेच लोक आहेत.

केनियांतील डोंगरपठारावरील चांगली व सुपीक जमीन यूरोपियन लोकांनीं आपल्या मालकीची केली आहे. यूरोपियनांनी आपल्याकडे घेतलेल्या उंच पठारावरील सुपीक जमीन एकूणऐशी लक्ष एकर आहे. पण तींत ते सर्वत्र लागवड करतात असें नाहीं. केनियांतील लोलँड म्हणजे सखल अशा जमिनी हिंदी लोकांच्या वाट्यांस बहुतेक आलेल्या आहेत. केनियांतील बर्‍याच हिंदी लोकांना स्वतःची शेतीवाडी नसल्याकारणानें तेथें कायम राहणें अशक्य होऊन जातें. बोहरी व आगाखानी जातीचे कांहीं लोक तेथें कायमची वस्ती करून राहिले आहेत. पण एकंदरीनें पाहिलें तर व्यापार व इतर धंदे यावर उपजीविका करणार्‍या हिंदी लोकांची संख्या बरीच मोठी आहे. सरकारी वरिष्ठ नोकर्‍यांत हिंदी लोकांचां प्रवेश होणे मुळीच शक्य नसतें. कारकुनांच्या जागा हिंदी लोकांनां मिळतात. पण त्या मिळण्यास सुद्धां बरेच प्रयास पडतात. यूरोपियन लोकांनां मात्र वाटेल त्या हुद्याच्या जागा मिळूं शकतात, व त्यांचें अमुक शिक्षण झालें असलें पाहिजे अशीहि कायद्यानें आडकाठी घालण्यांत आलेला नाही. कलोनियल सेक्रेटरींनां वाटेल त्या इसमास वाटेल तेथें नेमण्याचा अधिकार आहे. वरच्या दर्जाच्या नोकर्‍या मिळण्यास एखाद्या परीक्षेची अट ठेवण्यात येईल तर हिंदी लोकहि सदर परीक्षेंत यूरोपियन लोकांशी स्पर्धा करून वरच्या नोकर्‍या मिळवूं शकतील.

केनियांतील रेल्वेवरील नौकरीच्या जागा मात्र बर्‍याचशा हिंदी लोकांकडेच आहेत असें म्हटलें तरी चालेल. तिकडे हिंदी डॉक्टर, बॅरिस्टर वगैरे लोक आहेत. पण त्यांची संख्या फारच थोडी आहे. यूरोपियन डॉक्टराकडे कांहीं हिंदी रोगी औषध घेण्याकरितां जातात. पण हिंदी डॉक्टराकडे एक देखील यूरोपियन पेशन्ट कधींहि येत नाही. हिंदी लोकांकरितां बर्‍याच शाळा स्थापन करण्यांत आल्या आहेत. धर्मशिक्षणाच्या बाबतींतहि सरकारची आडकाठी मुळींच नाहीं. मिशनरी लोकांनां धर्मशिक्षणाची मुभा द्यावी लागते म्हणून हिंदी लोकांनांहि तशी सवलत मिळते. शिक्षण खात्याच्या ग्रँट्स-इन-कोडचे नियम चांगले आहेत यांत शंका नाहीं.

शाळांतून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारें १००० इतकीच आहे. तेथील हिंदी लोकसंख्येच्या मानानें हिंदी विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. दुय्यम प्रतीच्या शिक्षणाच्या शाळा तेथें काढतां येण्यासारख्या आहेत. यूरोपियन लोकांच्या शाळांची संख्या तिकडे हिंदी लोकांच्या शाळांच्या संख्येपेक्षां चौपट आहे.

केनियामध्यें १९२२ पासून हिंदी मंडळींनी यूरोपियनांस मिळालेलें अधिकाराधिक्य काढून टाकण्यासाठीं चळवळ सुरू केली. या चळवळींत कर न देण्याची चळवळ होतीच. १९२३ च्या जानेवारी १२ ला हिंदी मंडळींच्या बर्‍याचशा मागण्या देणारा एक आदेश कलोनिअल सेक्रेटरीकडून आला असें नौरोबीच्या स्टंडर्ड पत्रांत प्रसिद्ध झालें व त्याच्याबरोबर यूरोपियन वसाहतीनें मोठ्या जोरानें निषेध केला व दंगे करण्याची धमकी दिली. या आदेशाची बातमी आल्यानंतर केनियांतील हिंदी लोकांनीं करबंदीची चळवळ बंद ठेवली. पुढें जानेवारी ३० ला तेथील गव्हर्नरानें कलोनिअल सेक्रेटरीची योजना पुढें ठेविली. त्या योजनेनें यूरोपियनास सात-आठ प्रतिनिधी पाठवितां येतील व हिंदी मंडळींस चार पाठवतां येतील अशा प्रकारच्या अटी ठेवून; एकच मतदारांची यादी असावी, हिंदी लोकांच्या आगमनास अडचणी नसाव्या पण डोंगर पठार मात्र गोर्‍यांसाठी राखून ठेवावें असें होतें. यूरोपीय नागरिक ही तडजोड स्वीकारावयास बिलकुल तयार नव्हते पण हिदी मंडळीं हे तात्पुरतें स्वीकारावयास तयार होती. यूरोपीय व हिंदी ही दोन्ही मंडळी आपल्या मागणींत कांहीं एक कमी करावयास तयार नव्हतीं. याच सुमारास वूइकली डेमोक्राट म्हणून एका साप्ताहिक पत्राच्या सीताराम आचार्य नांवाच्या संपादकास यूरोपियन स्त्रियांविरुद्ध लेख लिहिल्याबद्दल घालवून देण्याचा हुकूम सुटला. फेब्रुवारीत गव्हर्नर कलोनिअल सेक्रेटरीशीं संगनमत करण्यासाठीं गेला. त्यामुळें पुन्हां तडजोडीस वाव मिळाला. रा. श्रीनिवासशास्त्री, बाळकृष्ण सिताराम कामत, जमनादास द्वारकादास व जीवनजी याचीं केनिया प्रश्नासंबंधानें इंग्लंडांत जाऊन खल करण्यासाठीं मध्यवर्ति कायदेमंडळाकडून कमिटी नेमण्यांत आली आणि केनिया प्रश्नाविषयीं देशभर चळवळ करण्यांत आली.

केनियाच्या यूरोपियन लोकांनींहि डेप्युटेशन पाठविलेंच होतें. जूनच्या अंताला कलोनिअल सरकारनें कायम ठराव केला. त्यांत जातीवार सभासदांचे तत्व मान्य करण्यांत आलें. लेजीस्लेटिव्ह असेंब्लींत पांच हिदीं व अकरा यूरोपियन निवडलेले सभासद असावे. पठारावरील जागा गोर्‍या आणि सखलप्रदेशांतील इंडियन लोकांसाठी राखून ठेवण्यांत आली. या तर्‍हेचा निर्णय हिंदुस्थानांत कोणासच आवडला नाहीं. यांत नागरिकत्वाचे दोन दर्जे पाडण्याची पद्धत दिसून येते असा ना. शास्त्री यांनी शेरा मारला. केनियाचें डेप्युटेशन ऑगस्ट १९२३ मध्यें परत आलें. त्या डेप्युटेशननें हिंदी लोकांसंबंधी न्याय हा यूरोपियन वसाहतवाल्यांच्या दंग्याच्या भीतीमुळे दुर्लक्षिला गेला असें मत दिलें. या सुमारास हिंदुस्थानांत बरीच मोठी चळवळ झाली. यानंतर इंपीरियल कान्फरन्समध्यें व राष्ट्रसंघापुढें हिंदुस्थानचें गार्‍हाणें मांडण्याचा आशावाद कांहीं दिवस चालू होता. इंपीरियल कान्फरन्समध्यें १ दिवस याकरितां म्हणजे वसाहतींत हिंदी मंडळींचा दर्जा यासंबंधानें वादविवादासाठी राखून ठेवला. पण त्याचा कांहींच उपयोग झाला नाहीं. हिंदुस्थानसरकारनें वसाहतीच्या विशिष्ट सरकारास प्रत्यक्ष लिहिण्यास हरकत नाहीं एवढेंच मिळवून हिंदुस्थानचे प्रतिनिधि डॉ. सप्र परत आले.

१९२४ मध्यें केनियांत हिंदी मंडळींची कांग्रेस किलिंडिनी येथें भरली. सौ. सरोजिनी नायडू या अध्यक्ष म्हणून गेल्या होत्या. त्या प्रसंगामुळें केनियाकडे हिंदुस्थानचे लक्ष जिवंत राहिलें. त्या वेळेस मिसेस नायडूनीं आपली रहाणी सुधारण्याकडे लक्ष ठेवण्याचा उपदेश केला. मेमध्यें केनिया कौन्सिल उघडलें, त्यावेळीं हिंदुस्थानी सभासद कौन्सिलला गेले नाहीत.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .