विभाग अकरावा : काव्य - खतें
केलडी- म्हैसूर संस्थानांत शिमोगा जिल्ह्यांत सागर तालुक्यांतील एक खेडें. हें सागरच्या पूर्वेस ४ मैलांवर वसलेलें आहे. लोकसंख्या अजमासें १६००. हैदरअल्लीनें १७६३ मध्यें स्वारी करून हांकून देईपर्यंत म्हैसूरच्या वायव्येस व घाटाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांवर जे राजे राज्य करीत असत त्यांचें हें मूलस्थान होय. विजयानगरचें राज्य मोडल्यानंतर या राजांनीं स्वातंत्र्य मिळविलें. या राजांची प्रथम इक्केरी येथें व नंतर बेदलूर येथें राजधानी होती.