प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें    
    
केशवचंद्र सेन- ब्रह्मो समाजाचा एक पुढारी. केशव याचा जन्म कलकत्ता शहरांत इ.स. १८३८ या सालीं नोव्हेंबर महिन्याच्या १९ व्या तारखेस झाला. याचें कुल ब्राह्मणेतर वैद्य जातीचें. केशवच्या मातोश्रीचें नांव शरोदा सुंदरी. पिता पिआरीमोहन वारला तेव्हां केशव दहा वर्षांचा होता. केशवाला एक वडिल व एक धाटका असे दोन बंधू होते. यांनी आपली जन्मभाषा बंगाली हिचा थोडाबहुत अभ्यास केला. नंतर सात वर्षांचें वय असतां सन १८४५ साली हिंदुकॉलेज नांवाच्या विद्यालयांत तो जाऊ लागला. पुढें कांहीं वर्षांनीं मेट्रापालिटन कॉलेज नांवाचें एक नवीन विद्यालय स्थापन झालें. येथें त्यानें १८५८ पर्यंत अभ्यास केला. ह्याच वर्षी केशव ह्या पाठशाळेंतून निघाला. केशवाचा विवाह सन १८५६ सालीं झाला, तेव्हां त्याचें वय १८ वर्षांचें होतें. याच्या वयास पुरीं अठरा वर्षे झालीं नाहींत तोंच त्याचा वक्तृत्वप्रभाव अनुभवास येऊं लागला. समवयी मुलांच्या सभा स्थापन करून त्यांत व्याख्यानें देण्याचा व भाषणें करण्याचा त्यास मोठा नाद असे. अशा प्रकारच्या अनेक सभा त्यानें स्थापन केल्या होत्या. त्यांत तो तासांचे तास मोठमोठ्या गहन विषयांवर आवेशानें भाषणें करी. याच्या घराजवळ पंडित राजवल्लभ नांवाच्या एका पंतोजीची एक बंगाली शाळा होती. एके दिवशीं राजवल्लभानें केशवाला ब्राह्मधर्मसंबंधीं एक पुस्तक दिलें, तें वाचून त्यास विलक्षण आनंद झाला व फार समाधान वाटलें. तेव्हांपासून केशवाचें लक्ष ब्राह्मसमाजाकडे लागलें. त्यावेळीं नुस्ता आदिसमाजच होता. त्याचें प्रमुखत्व देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे होतें. देवेंद्र हे श्रीमान असून सरदारी कुलांतील पुरुष होते. कुलीन घराण्यांतील तरुण मण्डळी ब्राह्मसमाजांत आणण्याविषयीं त्यांचा फार प्रयत्‍न असे. केशवहि श्रीमान व कुलीन घराण्यांतील असल्यामुळें देवेंद्रनाथांची व त्याची साधारण तोंडओळख होती. प्रत्यक्ष परिचय मात्र नव्हता. याच सुमारास केशवनें `गुडविल फ्रॅटर्निटी’ नांवाची एक मंडळी स्थापन केली होती. तींत मोठमोठ्यांचीं मुलें जात असत. तेथें देवेंद्रनाथ हेहि कधीं कधीं निमंत्रणावरून जात व अध्यक्षस्थान स्वीकारून मुलांस उत्तेजन देत. तेव्हां त्या सभेंत केशवाचें बालपणचें वक्तृत्व ऐकून व त्याचा उत्साह व आवेश पाहून त्याच्याविषयीं देवेंद्रनाथांच्या मनांत विलक्षण प्रेम उत्पन्न होई. राजवल्लभानें दिलेलें ब्राह्मधर्मविषयक पुस्तक केशवच्या हातांत पडलें तें याच संधीस. त्याच्या वाचनानें केशवचें मन ब्राह्मसमाजाकडे वळलें आणि लवकरच त्यानें ब्राह्मधर्माची दीक्षा घेतली (१८५०).

केशवचंद्र आदिसमाजाचा सभासद झाल्या दिवसापासून त्याच्यावर देवेंद्रनाथांचा विशेष लोभ जडत चालला. ह्या दोन महापुरुषांचें एकमेकांवर इतकें प्रेम होतें तरी त्यांच्या स्वभावांत व गुणांत पुष्कळ गोष्टींच्या संबंधानें भिन्नता होती. हे दोन पुरुष परस्परभिन्न परंतु ब्राह्मसमाजांत त्यांचें ऐक्य झालें व दोघेहि भक्तिमान व धर्मशील असल्यामुळें एकमेकांवर त्यांचें अलौकिक प्रेम जडलें. केशवचंद्र ब्रह्मसमाजाचा सभासद झाला व देवेंद्रनाथांशी त्याचा प्रेमभाव वाढत चालला हें पाहून केशवाच्या घरच्या माणसांस फारच वाईट वाटलें. तेव्हांपासून तीं त्याचा छल करूं लागलीं. हा सर्व छल केशव निमूटपणें सहन करी. इकडे देवेंद्रांच्या सहवासानें केशवच्या धार्मिक स्वभावास विलक्षण बळकटी आली. तो दिवसाचा आपला बराच काल देवेंद्रांच्या समागमांत घालवी. त्यांच्या सहवासांत राहून त्यांच्या बरोबर उपासना, संभाषण, धर्मचर्चा केल्यानें केशवाचा अधिकार वाढत चालला, तो इतका कीं त्याचा विश्वास, उत्साह व धर्मभाव पहून देवेंद्रनाथांनीं त्यास ब्रह्मानंद हें नांव दिलें.

आदिसमाजांत केशवचा अधिकार शेवटीं इतका वाढला कीं, सन १८६२ च्या एप्रिल महिन्याच्या १३ व्या तारखेस महर्षि देवेंद्रनाथांनीं त्याला ब्राह्मसमाजाचे आचार्य नेमिलें. समाजाचे प्रधानाचार्य स्वतः महर्षीच होते. इतर कित्येक आचार्य असत, त्यांस `उपाचार्य’ ही संज्ञा होती.

देवेंद्र आणि केशव यांमधील अलौकिक प्रेमभाव फार दिवस टिकला नाहीं. जातिभेद व जानवें ही काढून टाकण्याचा केशवचंद्र व त्याचे अनुयायी यांचा आग्रह असे. म्हणून ब्राह्म समाजाच्या आचार्य वर्गांत जनवें घातलेला मनुष्य असतां कामा नये असा त्यानें हेका धरिला. देवेंद्रनाथ जुन्या विचारांचे व वळणाचे असल्यानें त्यांनां या गोष्टी उघडपणें बंद करणें आवडेना तेव्हां केशव आदिसमाजांतून निघाला व त्यानें भारतवर्षीय ब्राह्मसमाजाची स्थापना केली. हा नवीन पंथ निघाल्यावर देवेंद्रांच्या पंथाला आदिब्रह्मोसमाज म्हणूं लागले.

भारतवर्षीय समाजांत केशवच्या धर्मबुद्धीचा एकसारखा विकास होत गेला. त्याची प्रार्थना, त्याची उपासना, त्याचे उपदेश इतके प्रेमळ असत कीं ते ऐकून त्याचा श्रोतृसमाज सद्‍गदित होऊन टपटप अश्रुपात करी, त्याचें आवेशयुक्त भाषण ऐकून त्याचे शत्रूहि थक्क होत असें सांगतात. त्याची निस्सीम भक्ति आणि विलक्षण वैराग्य यांच्यायोगें त्यानें एक नवीन शिष्यवर्ग तयार केला.  त्याच्या भक्तिभावाची जसजशी उन्नति होत गेली तसतसें त्याच्या वैराग्यास राष्ट्रीय स्वरूप प्राप्‍त झालें. त्यानें भगवें वस्त्र धारण केलें व हातामध्यें करताल व एकतारी घेऊन आपल्या शिष्यवर्गासह गांवंतून नगरसंकीर्तन करीत फिरण्याचा क्रम चालविला. इ. स. १८६८ सालीं सर्व हिंदुस्थानांतील मुख्य मुख्य स्थानीं जाऊन ब्राह्म धर्माचा उपदेश करावयाच्या उद्देशानें केशव चंद्र प्रवासास निघाले.

सन १८७० मध्यें केशवनीं विलायतेस जाण्याचा निश्चय केला. ते फेब्रुवारीं महिन्याच्या १५ व्या तारखेस कलकत्याहून निघाले व त्याच वर्षाच्या आक्टोबर महिन्याच्या १५ वीस परत मुंबईस आले. इंग्लंडाहून आल्यानंतर पांच सहा वर्षेपर्यंत सामाजिक सुधारणेच्या संबंधानें केशवांनी फार मेहनत केली. विद्येचा प्रसार करून विचार जागृत करण्याकरितां त्यांनीं अनेक शाळा, कॉलेजें, पुस्तकालयें, सभा, मंडळ्या स्थापन केल्या. ह्या सर्व कामी लोकांनी व सरकारी अधिकार्‍यांनी त्यांस पुष्कळ साहाय्य केलें. आपल्या स्त्रियांची उन्नति होण्याकरितां त्यांनीं ``भामाहितैषिणी सभा’’ या नांवाची एक स्त्रियांची सभा स्थापन केली व `भामाबोधिनी’ नांवाचे एक वर्तमानपत्रहि सुरू केलें. १८७३ सालीं ``ब्राह्म विवाहाचा कायदा’’ पास झाला. त्यांतहि त्यांचें अंग होतें.

सामाजिक सुधारणेच्या ह्या गोष्टी होत असतां समाजाच्या कामांत यत्किंचितहि खंड पडला नव्हता. तथापि वरील गोष्टींची व्यवस्था झाल्याबरोबर त्यांनीं समाजाच्या धर्मोन्नतीचें काम पुनः हातीं घेतलें. ह्या कार्याकरितां १८७६ सालीं कलकत्यापासून थोड्या अंतरावर एक बाग तयार करून तीस `साधनकानन’ असें नांव दिलें. ह्या ठिकाणीं ते व त्यांचा निकट शिष्यवर्ग दिवसाचा बहुतेक काल भजन, भक्ति, ध्यान व उपासना यांत घालवीत.

सन १८७८ पर्यंत भारतवर्षीय ब्राह्मसमाजाची धर्मोन्नति एकसारखी चालली होती. परंतु त्याबरोबरच केशवचंद्राच्या विरुद्ध असणांरा पक्ष बळावत चालला. तशांत सन १८७८ सालीं केशवाच्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या महाराजांशीं झाला. आपल्या समाजाच्या मताविरुद्ध केशवचंद्रांनीं १६ वर्षांहून लहान असणार्‍या कूचबिहारच्या महाराजाला आपली १३ वर्षांची मुलगी हिंदुविवाह संस्कार करून दिली. म्हणून त्यांचे बरेच अनुयायी रागावले व नवीन साधारणब्रह्मोसमाज निर्माण झाला. कुचबिहार प्रकरणाचें वावटळ शांत झालें नाहीं तोंच केशवांनीं पुनः घोर ``वैराग्यसाधनास’’ आरंभ केला. सर्व धर्मांचें ऐक्य करणें हा जो ब्राह्मसमाजाचा मुख्य कार्यभाग तो आपण नवविधान धर्मांच्या योगें पूर्ण करीत आहों अशी स्वतःची समजूत करून घेतली. हे धर्मैक्य साधारण जनांच्या देखील एकदम लक्षांत यावें म्हणून केशवनीं अनेक संस्कार व कर्मे लावून दिलीं. सन १८८१ त नवविधानध्वजारोपण या नांवाचा एक संस्कार त्यांनी केला, त्यांत ह्या नवविधानांचा हेतु उत्तम रीतीनें स्पष्ट करून सांगितला. यामध्यें सर्व राष्ट्रें, सर्व लोक, सर्व धर्म सर्व लोकाचार, सर्व भक्तिमार्ग, सर्व वैराग्यसाधें यांचें ऐक्य झालें आहे; ह्या ऐक्याचें दर्शक अशी जी ही जयध्वजा तिच्या संरक्षणार्थ हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, पार्शी इत्यादि सर्व द्वेषभाव विसरावा आणि एक अंतःकरणानें, एक भावानें विश्वजननीस शरण जावें असें स्पष्ट करून सांगितलें. यांचें `नवविधान’ नावाचें पत्र ते एकटे चालवीत. कुचबिहार प्रकरणापासून त्यांच्याविषयी लोक हवें तें बोलत व लिहीत. 'नवविधान' उदयास आल्या दिवसापासून तर या निदांत्मक लेखांचा अगदीं कहर उसळला होता. ता. ८ जानेवारी १८८४ या दिवशी ब्रह्मानंद केशवचंद्र सेन यांनीं देह ठेविला.

केशवचंद्रांच्या अंगीं चांगले नैसर्गिक गुण होते. त्यांचा लोकांवर मोठा परिणाम होत असे. विशेषतः त्यांचा धार्मिक बाणा व नैतिक आचरण लोकांनां मोहून टाकी व यामुळेंच केशवांच्या अनेक चुकांकडे त्यांच्या अनुयायांनी दुर्लक्ष्य केलें. आपलें मत दुसर्‍याला पटवून देण्यांत त्यांचा हातखंडा असे. यांचें भारतीय धर्मग्रंथांचें ज्ञान बेताचेंच होतें व गुरूपणाच्या ढोंगधत्तुर्‍यापासून व ब्राह्मणमत्सरापासून हे अलिप्‍त नव्हते. त्यांचे विचार, विशेषतः आयुष्याच्या अंतिम काळांतील, त्रुटित व विसंगत असत. कोठल्याहि कामांत त्यांना सुव्यवस्था करितां येत नसे. प्रत्येक कार्यांत त्यांचा प्रत्यक्ष संबंध असल्यानें ते गेल्यावर त्यांच्या सार्‍या घडामोडी बंद पडल्या. त्यांच्या स्वभावांत मनमोकळेपणा थोडाच असल्याकारणानें त्यांचे अनुयायी बरेचसे साशंक असत व त्यांचे नवीन विचार एकदम ऐकून त्यांनां सखेदाश्चर्य वाटे. पण ते विचार फार दिवस केशवचंद्रांच्या मनांत घोळलेले असत.

ख्रिस्तीमताचा त्यांच्या मनावर लहानपणापासून फार परिणाम झाला होता. कलकत्ता युनिव्हर्सिटीचे माजी रजिस्टार के. सी. बानर्जी नेहमी म्हणत कीं, केशव ख्रिस्ती होऊन मेले. बानर्जी हे केशवचंद्रांचे परममित्र असल्यानें त्यांचें म्हणणें अजिबात विचारांबाहेर टाकून चालणार नाही. आपल्या नवविधानांत त्यांनीं बरेच ख्रिस्ती संस्कार घातले आहेत. अशा रीतीनें ख्रिस्ती संप्रदायाचें अनुकरण करून ब्राह्मसमाजांतील एक भाग केशवांनीं बनविला.

केशवचंद्र व दयानंद हे जरी समकालीन होते तरी या दोहोंची तुलना कोणत्याच तर्‍हेनें करतां येणार नाहीं. केशवचंद्रांची भारतीय धार्मिक विचारविकासाच्या दृष्टीने किंमत फारशी नाहीं व सामान्य संसारिक मोहांमुळें त्यांचें चरित्र कोणास स्फूर्तिदायक झालें नाहीं. (`ब्राह्मसमाज’ पहा).

[स्लेटर- केशव चंद्रसेन अँड ब्राह्म समाज; मुझुमदार- दि लाईफ अँड टीचिंग्स ऑफ केशवचंद्र सेन; शिवनाथ शास्त्री- दि न्यू डिस्पेन्सेशन; ब. भ. नगरकर- नवसंहिता]

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .