विभाग अकरावा : काव्य - खतें
केळवाडा— राजपुतान्यामध्यें उदेपूर संस्थानांतील कुमलगड परगण्याचें मुख्य ठिकाण. हें उदेपूरच्या उत्तरेस ३८ मैलांवर असून कुमलगड किल्ल्याच्या दक्षिणेस २।। मैलांवर आहे. हें अरवली पर्वताच्या मध्यभागीं वसलेले आहे. याची लोकसंख्या १९०१ सालीं १२०४ होती. चौदाव्या शतकाच्या आरंभीं, अल्लाउद्दिनानें चितोडगडाला वेढा दिला. त्यावेळीं राणा लक्ष्मणसिंह व त्याचे सात भाऊ ठार झाले. तेव्हां राणा अजयसिंह यानें या ठिकाणचा आश्रय घेतला होता.