विभाग अकरावा : काव्य - खतें
केळवाडी— हें बदामीच्या उत्तरेस ११ व कट्टगिरीच्या पूर्वेस चार मैलांवर एक खेडें आहे. येथें रंगनाथाचें एक देऊळ आहे. या ठिकाणीं फाल्गुनांत यात्रा भरत असते. रंगनाथाच्या देवळांत एक जुना कानडी सिंद घराण्याचा (१२१०-१२८०) लेख आहे. या घराण्याचा या तालुक्यावर अंमल होता. [फ्लीट-कॅनरीज डिनॅस्टीज]