प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें  
      
कैकाडी- कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्र येथें या जातींची वस्ती साधारणतः असून १९११ सालीं मुंबई इलाख्यात ह्यांची संख्या ९६१४ होती. दरवडेखोरी व मुशाफरी याबद्दल कैकाड्यांची प्रसिद्धि आहे. अजूनहि चोर्‍या व घरफोडी करण्याचा त्यांचा व्यवसाय चालू असला तथापि अलीकडे त्यांची थोडी सुधारणा झाली आहे. आपले मूळ ठिकाण तेलंगण होय असें ते सांगतात आणि तेलगू व कानडी मिश्रित अशी त्यांची भाषा ऐकली की, तें तेलंगणचे असावे हें संभवनीय दिसतें. कैकाडी जातीतं भामटे व लमाण वगैरे गुन्हेगारहि शिरले असून काहींना अर्धवट मराठीहि बोलता येतें.

या जातींत नऊ पोटजाती आहेत. बोरीवाले, धनताळे, कामाठी, काइजी, लमाण, माकडवाले, उरूकैकाडी, वाइबेस व भामटे असे ते नऊ भाग आहेत. या सर्वांचा धंदा म्हणजे माकडें घेऊन फेरी करणें, टोपल्या करणें, जादूगिरी करणें व खिसे कातरणें किंवा अशाच स्वरूपाचा असतो. ओड व कोल्हाटी जातींशी त्यांचे सादृश्य दिसून येतें. उपरोक्त जातींशिवाय गोत्रांतर— विवाहामुळे झालेले काहीं भेद आढळतात. जाधव, माने, गायकवाड, माधावंत व पोवार असे पांच मुख्य वंश आहेत. जाधवांचे मधू व सपाटसर आणि मान्यांचे मानक व मालाजूर असे भेद आहेत. कांहीं ठिकाणीं वरील वंशाचीं नांवें हल्ली आडनावें बनली आहेत. मुख्य वंशांनां, सातपादी, मेलपादी, कावाडी, मेंढरेगुदी व संगाडी अशीं दुसरीं नांवें आहेत.

त्यांच्यांत बालविवाह रूढ असून बहुपत्‍नीत्वास मुभा ठेविली आहे. मुलाचा बाप प्रथम मागणी घालतो व वधूच्या बापास २५ ते १०० रुपयेपर्यंत देतो. लग्नाचा मुहूर्त व कार्य ब्राह्मणांकडून करविण्यांत येतें. पंचपालवी हें कैकाड्यांचे देवक असून त्याची लग्नाच्या दिवशीं स्थापना करितात. होम, मंगळसूत्र, कंकण वगैरे समारंभ कुणब्याप्रमाणेंच करण्यांत येतात. खानदेश व बेळगांव जिल्ह्यांत अशी चाल आहे कीं, नवर्‍यानें आपल्या बायकोच्या घरीं तीन मुलें होईपर्यंत राहून आपल्या सासर्‍याच्या कुटुंबास पोसलें पाहिजे. अशा अटीवर लग्न ठरल्यानंतर पुढें नवरा-बायकोंत कलह झाल्यास तिच्या आईबापास पोसण्याची जबाबदारी नवर्‍यावर असते. धनताळे कैकाड्यांत पंचाकडून लग्न ठरविण्यात येतें. पिंपळाची डहाळी एका घटांत घालून व त्यांत पाणी घालून, त्या घटांपुढे वधूवरास बसवितात. लोकांनी अक्षता टाकल्यानंतर लग्नविधि पूर्ण होतो. या जातींत विधवाविवाहास मोकळीक आहे. एक ब्राह्मण उपाध्याय व विधवा स्त्रियाच विधवेच्या लग्नांत भाग घेतात. एखाद्या अविवाहित पुरुषास विधवेशी लग्न कर्तव्य असेल तर त्यास प्रथम शमी वृक्षाशी लग्न करावे लागतें. नवरा-बायकोंत कलह झाल्यास काडीमोड करण्याची वहिवाट आहे.

कैकाडी हे हिंदुधर्मीय असून वारसासंबंधीं हिंदु कायद्याचाच अवलंब करितात. हिंदु देवतांनां मान देऊन हिंदु सणच ते पाळतात. बहिरोबा, भवानी, मरिआइ, फिरंगाई, तुकाई, यमाई वगैरे देवतांची ते उपासना करतात. सोनोरीचा बहिरोबा, जेजुरीचा खंडोबा, तुळजापुरची भवानी व मारुती या त्यांच्या कुलदेवता होत. आळंदी, जेजुरी, सोनोरी, तुळजापूर, पंढरपूर वगैरे ठिकाणीं ते यात्रेस जातात. गोसावी हे त्यांचे धर्मगुरू असून शकून, जादुगारी, चेटूक, कौल इत्यादिकांवर त्यांची श्रद्धा असते. एखादी सांथ उद्‍भवली कीं, बकरें किंवा रेडा बळी देतात. खानदेशचे कैकाडी दावुलमलिक नांवाच्या मुसुलमान साधूस फार मान देतात. या जातीचे उपाध्ये साधारणपणें देशस्थ ब्राह्मण असतात. कैकाडी लोक मृतांस पुरतात किंवा जाळतात. दहा दिवसपर्यंत सुतक पाळण्यांत येतें व प्रेतवाहकहि सुतक पाळतात. रक्षा भरणें, क्षौर करणें वगैरे सर्व विधी करण्यांत येतात. मृताची एक मूर्ति घरच्या देवांत पुजेकरितां ठेवण्यांत येते. श्राद्ध करण्याची चाल या लोकांत नाही.

कैकाड्यांची चोर म्हणून प्रसिद्धि असल्यानें त्यांच्यावर पोलिसांची नेहमी नजर असते. त्यांचा परंपरागत धंदा टोपल्या करणें हा होय. पक्षी व हरिण पकडण्याचीं जाळी तयार करणें, पक्ष्यांचे पिंजरे करणें, मुलांची खेळणीं तयार करणें वगैरेहि धंदे कैकाडी लोक करतात.

टोपल्यांतील साप लोकांना दाखवून काहीं लोक भिक्षा मागतात. वाळू, माती, विटा, कौलें वगैरे गाढवांवर लादून नेआण करण्याचें कामहि कांहं लोक करतात. कांहीं लोक शेती व मजुरी करूं लागले आहेत. बकरें, हरीण, ससे व डुक्कर यांवर उपजीविका करून ते दारूहि पितात. त्यांचा सामाजिक दर्जा कुणब्याहून अत्यंत हीन आहे.

या जातीचा उल्लेख दामाजीपंत मंगळवेढेकर यांच्या वेळीं (तेरावें शतक) झालेल्या एका ऐतिहासिक महजरांत स्पष्ट आढळतो. महारांनी गांवांतील कोणत्या लोकांपासून कोणकोणते हक्क वसूल करावेत याबद्दलच्या यादींत त्यांनी कैकाडी लोकांपासून, प्रत्येक लग्नास सवा दोन रुपये व मर्तिकाच्या प्रत्येक मढ्याबद्दल साडेतीन रुपये वसूल करावेत असा निर्देश केलेला आहे. [इति. मंड. चतु. सं. वृ. ६२]

वर्‍हाड मध्य प्रांतांतील कैकाडी— मध्यप्रांतांत यांची वस्ती जास्त आहे. हे कान्होबा रमजानास आपला पूर्वज समजतात व त्यानें आपल्या मुलास एक फांदी दिली व त्यावर निर्वाह करण्यास सांगितलें म्हणून आम्ही टोपल्या विणून निर्वाह करतो, अशी हें जीवनवृत्ति समजावतात. नेमाड जिल्ह्यांत यांच्या दोन जाती आहेत. एक मराठी व दुसरी फिरस्ता. मराठे कैकाडी दुसर्‍या वर्गास नीच समजतात. नागपुरांत यांच्या अनेक उपजाती आहेत. त्या :- कामाठी भामटी, कुणबी, तोकींवाला व बोरीवाला. यावरून अन्य जातींनीं आपल्यातून काढून दिलेले लोक कैकाडी जातींत शिरले असावे असें दिसते. वर्‍हाडांत यांच्या साडेबारा पोटजाती आहेत. नेमाडांत यांचे दोन वर्ग जादों व गायकवाड असे आहेत व हे परस्परांशीं विवाह करतात. दक्षिण जिल्ह्यांतून जादों, माने, कुमरे, जेष्टी, कलें, दाने व इतर असे अनेक वर्ग आहेत. यांचा मद्रासच्या कोरवा जातीशीं पूर्वी केव्हां तरी निकट संबंध असावा.

सगोत्र विवाह यांच्यांत निषिद्ध आहेत. मुलीचें लग्न ८ ते १२ वर्षांच्या वयांत होतें. मुलीला वर मिळत नसला तर दुसर्‍या कोणाच्या तरी लग्नांत अर्काच्या झाडाबरोबर किंवा अंगठीबरोबर तिचें लग्न करितात, व तें झाड फार जपून वाढवितात आणि ती आंगठी बोटांत घालतात. जर तें झाड मेलें किंवा आंगठी हरवली तर त्यांची उत्तरक्रिया करितात. २० ते १०० रुपयांपर्यंत मुलीचें शुल्क असतें. विधवेनें नवर्‍याच्या पाठच्या भावाबरोबर लग्न केलें पाहिजे व या पाठच्या भावाखेरीज इतर भावाबरोबर तिला लग्न करतां येत नाहीं. जर तिनें योग्य दिरास सोडून इतरास वरिलें तर त्या माणसानें तिच्या लग्नाचा अर्धा खर्च दिरास भरून दिला पाहिजे. विधवाविवाह तिच्या नवर्‍याकडेच झाला पाहिजे. प्रथम वरानें विधवेबरोबर लग्न करण्यापूर्वी रुईच्या झाडाबरोबर प्रथम विवाह केला पाहिजे. हे पुष्कळ बायका करतात. पण पहिल्या बायकोच्या परवानगीशिवाय दुसरें लग्न करतां येत नाहीं. व पहिली बायको नवर्‍याकडून `दुसरे लग्न केल्यावर मी चांगला वागेन’ असें कागदावर लिहून घेते. बहुधा पहिल्या बायकोचे आईबाप दुसरें लग्न करूं देत नाहींत. सबळ कारणें असलींच तर घटस्फोट करूं देतात. व पंचायतीच्या सह्यांसह एक फारखतीचा कागद तयार करतात. त्याबद्दल नवर्‍यास ८ ते १० रुपये भरावे लागतात. यांचा देव नाग आहे. हे खंडोबाची व मरीमाताची पूजा करतात. हे लोक फार अपवित्र समजले जातात. ब्राह्मण, वाणी व कलारसुद्धा यांस स्पर्श करीत नाहींत. यांस मंदिरांत येऊं देत नाहींत. यांची जातपंचाइत असून ती निरनिराळ्या अपराधांबद्दल शिक्षा करते. जर कोणा कैकाडिणीनें भिन्न जातीशीं व्यभिचार केला तर तिला नदीवर किंवा विहिरीवर नेतात. तिचें संपूर्ण क्षौर करतात. मग दोन दारांचें झोपडें मुद्दाम जवळच तयार करून ठेवलेलें असतें. त्यांत ती एका दाराने जातें व बाहेरून ते झोपडें पेटवितात. तें पेटत असतानां ती कांहीं वेळ झोंपडींत बसते. नंतर दुसर्‍या दारानें बाहेर पडते. मग एका लहान मुलास प्रथम तिच्या हातचें जेवण घालतात. असाच विधि मुंबईचे कोरवा लोक करतात. [रसेल व हिरालाल].

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .