विभाग अकरावा : काव्य - खतें
कोंकणपूर- ह्युएनत्संग या शहरी गेला होता. त्याने हे शहर द्रविडदेशापासून १६६ कोसांवर असल्याचे लिहिले आहे. त्यावरून ते तुंगभद्राकाठचे अनागोंदी असावे असे एक मत आहे व दुसरे मत, ते हल्लीचे बनवासी असावे असे आहे. विजयानगरचे राज्य स्थापण्यापूर्वी अनागोंदी ही यादवराजांची राजधआनी होती. कोंकणप्रांताची ही राजधानी ह्युएनत्संगच्या वेळी होती व त्याचा कोंकणप्रांतही (हल्लीच्या पेक्षा जास्त) मोठा होता (कोंकण पहा). अनागोंदी हीच किष्किंधा असाही एक प्राचीन समज आहे. [भार. भूवर्ण; विलक्स-म्हैसूर १.१४].