विभाग अकरावा : काव्य - खतें
कोकिलाव्रत- आषाढ अधिक महिना आला असता सौभाग्यवृद्धीसाठी हे पौराणिक व्रत करण्याची त्रैवर्णिक स्त्रियांत चाल आहे. हे व्रत आषाढ पौर्णिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत करावयाचे असते. महिनाभर नक्तभोजन व ते कोकिलेचा शब्द ऐकून करावयाचे असे याचे विधान आहे. दक्षाच्या यज्ञास आमंत्रणावाचून पार्वती गेल्यानंतर तेथें तिचा अपमान झाल्यावर त्याठिकाणी दक्ष व वीरभद्र यांच्या युद्धामुळे यज्ञविध्वंस झाला. पार्वतीने यज्ञविध्वंस केल्यामुळे `तू तिर्यक योनीत कोकिला होशील' असा शंकरांनी तिला शाप दिला व सौभाग्यप्राप्त्यर्थ स्त्रिया तुझी पूजा करतील' असा उ:शाप दिला अशी वराहपुराणात कथा आहे.