विभाग अकरावा : काव्य - खतें
कोकोबेटें- कोको ही बंगालच्या उपसागरांतील दोन बेटे असून अंदमान बेटाच्या ईशान्येस ४५ मैलांवर वसली आहेत. यांचा दक्षिण ब्रह्मदेशातील हंतवड्डी जिल्ह्यात समावेश होतो. मोठ्या बेटांचे क्षेत्रफळ १४ चौरस मैल असून लहान २।। मैल लांब व एक मैल रुंद आहे. ही बेटे सपाट असून त्यांत पाण्याची टंचाई आहे व त्यावर लोकवस्ती नसून ती नारळाची झाडे व जंगलें यांनी व्यापिली आहेत. या बेटांतील वनस्पतींचे उत्पन्न सरकार मक्त्याने देते.