विभाग अकरावा : काव्य - खतें
कोंगाळव- हे कूर्ग प्रांताचे तामीळ जहागीरदार. यांचा व होयसळ राजांचा नेहमी खटका उडत असे. नृपकाम होयसळने (१०२२), बिट्टीदेवाने (११३०), बोकण्णाने (११५५) व वरिबल्लाळाने (११६०) यांच्यावर हल्ले करून त्यांना आपल्या ताब्यात आणण्याचे प्रयत्न केले; परंतु हे लोक कायमचे त्यांच्याकडून जिंकले गेले नाहीत. (अय्यर प्रा. हिं.)