विभाग अकरावा : काव्य - खतें
कोंगू देश- या देशास कोंगु, कोंडुमंडलम, कोंगुनाडु अशीही दुसरी नांवे आहेत. दक्षिणेकडील हल्लीचे कोइंबमतूर व सालेम या जिल्ह्यांचा समावेश या प्रदेशांत होतो. प्रथमत: हा प्रदेश पल्लवांच्या ताब्यात होता. त्यांच्यापासून पाण्ड्यांनी तो (९८०) घेतला. आदित्य पाण्ड्याला कोंगुदेश राजाक्कल अशी पदवी होती. चोलांनी (राजराज ९८५-१०१६) तो जिंकून घेतला. नंतर होयसळांनीही त्याचा ताबा घेतला (११३०). याचा उल्लेख केरळ देशाबरोबर करीत असत. चेर राजांची नाणी अत्यंत दुर्मिळ असून ती या कोंगुदेशात सांपडतात. (अय़्यर व स्मिथ प्रा. हिं.).