प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें         

कोंट, ऑगस्ट (१७९८-१८५७)- हा प्रत्यक्ष ज्ञानवादी फ्रेंच तत्त्ववेत्ता माँटपेलियर येथे जन्मला. त्या शहरातल्या शाळेत त्याचे शिक्षण प्रथण झाले व १८१४ मध्ये इकोल पॉलिटेक्निक या विद्यालयात तो गेला. १८१६ मध्ये पॅरिस येथे राहून गणित विषय शिकवून तो पोटास मिळवू लागला. या वयात बेंजामिन फ्रँक्लिनला तो अगदी देवाप्रमाणे मानीत असे. पॅरिसमध्ये त्याला वार्षिक प्राप्‍ती ८० पौंड होत असे आणि तारुण्यातील सुखोपभोग घेण्याची आवड असूनहि अधिक पैसा मिळविण्याकरिता स्वातंत्र्य गमावण्यास तो तयार नव्हता. म्हणून थोडक्या खर्चात तो रहात असे.

१८१८ मध्ये सेंटसायमन ह्या विद्वानाशी त्याचा परिचय होऊन त्याच्या आचारविचारांवर महत्त्वाचा परिणाम झाला. राजकीय गोष्टींनाही नियमबद्ध शास्त्र असू शकते आणि तत्त्वज्ञानाचे अंतिम ध्येय मानवसमाजाचे कल्याण होय, या दोन मूलभूत कल्पना कोंटने सेंट सायमनपासूनच घेतल्या व त्याच्याच शिकवणुकीने समाजाची नैतिक, धार्मिक व राजकीय पुनर्घटना कोणत्या तत्त्वानुसार व्हावयास पाहिजे त्याचा विचार करण्यास तो प्रवृत्त झाला.

१८२५ मध्ये कोंटने कॅरोलाइन मॅसिनबरोबर लग्न केले. पण हा संबंध त्याला सुखावह झाला नाही. १८२६ मध्ये प्रत्यक्ष ज्ञानवादी तत्त्वज्ञाना (पॉझिटिव्ह फिलॉसफी) संबंधाने त्याने आपले विचार पॅरिसमधील लोकांपुढे व्याख्यानमालेद्वारे मांडले. ही पहिलीच त्याची व्याख्याने इतकी सरस झाली की, विश्वरचनाशास्त्रज्ञ हंबोल्ट, भूमितीशास्त्रज्ञ पॉइनसॉट, इंद्रियविज्ञानशास्त्रज्ञ ब्लेनव्हिन वगैरे थोर विद्वान ती ऐकण्यास येत असत. दुर्दैवाने या मालेतल्या तिसर्‍या व्याख्यानानंतर कोंटचा मेंदू एकाएकी बिघडला. या आजारीपणात त्याने त्रासून सीन नदीत उडी टाकली, पण वेळेवर मदत पोहोचल्यामुळे तो वाचला. १८२८ मध्ये त्याने आपली व्याख्यानमाला पुरी केली व १८३० मध्ये आपल्या `प्रत्यक्ष ज्ञानवादी तत्त्वज्ञान' या ग्रंथाचा पहिला भाग प्रसिद्ध केला. त्याचा शेवटचा सहावा भाग १८४२ मध्ये प्रसिद्ध झाला. ही मध्यंतरीची बारा वर्षे त्याची सतत दीर्घोद्योगांत गेली व सांपत्तिक दृष्ट्या सर्व हयातीत हाच त्याचा काळ साधारण बरा गेला. १८३३ मध्ये पॅरिस येथील इकोल पॉलिटेक्निक विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा परीक्षक त्याला नेमण्यात आले. त्याचे व दुसर्‍या गणिताच्या शिकवण्यांचे मिळून त्याला सालीना ४०० पौंड वेतन मिळू लागले.

१८३१ पासून १८४८ पर्यंत कामाचा बोजा फार असतानाही तो ज्योतिषशास्त्रावर मोफत सार्वजनिक व्याख्याने देत असे. याच भावनेखातर त्याने राष्ट्रीय संरक्षक सैन्यात नोकरी करण्याचे नाकारून तुरुंगवास पत्करला व जुलै महिन्यात स्थापन झालेल्या राजसत्तेविरुद्ध शस्त्र धरण्याचे नाकारले. उलटपक्षी तो लोकसत्ताक राज्याचा पुरस्कर्ता असल्यामुळे त्याने राजसत्तेचे संरक्षण करण्याची शपथ घेण्याचेही नाकारले. त्याच्या आयुष्यातला करमणुकीचा एकच विषय संगीत नाट्यप्रयोग पाहणे हा होय. तारुण्यारंभी दु:खपर्यावसायी नाटकांचा तो शौकी होता, नंतर तो सुखपर्यवसायी नाटकांना जात असे. शेवटी संगीत नाटकांनाच तो फक्त जाऊ लागला. पण अखेर सांपत्तिक स्थिती इतकी खालावली की, या सुखसाधनाला लागणारा खर्चही त्याला झेपेना.

१८४२ मध्ये प्रत्यक्ष ज्ञानवादी तत्त्वज्ञान या त्याच्या ग्रंथाचा शेवटचा भाग बाहेर पडला. बारा वर्षांच्या दीर्घ परिश्रमांचा मोबदला म्हणून कसलेही समाधान न होता उलट कित्येक त्रासदायक गोष्टीच उपस्थित झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्याचे बायकोशी पटत नाहीसे होऊन अखेर १८८२ मध्ये त्यांनी एकमेकांना सोडचिठ्ठी दिली. दुसरी गोष्ट ही की, त्याच्या ग्रंथाच्या प्रकाशकाने ६ व्या भागात त्याच्या परवानगीवाचून काही मजकूर छापला, त्याबद्दल फिर्याद लावून स्वत:च्या तर्फे निकाल त्याने करून घेतला. तिसरी गोष्ट म्हणजे ६ व्या भागाच्या प्रस्तावनेत पॉलिटेक्निक स्कूलच्या व्यवस्थापक मंडळीवर त्याने टीका केली व त्यामुळे परीक्षकाची जागा जाऊन त्याची वार्षिक प्राप्‍ती निम्म्याने कमी झाली. १८४२ च्या पूर्वीपासूनच जे.एस. मिल्ल व कोट यांचा पत्रव्यवहार चालू झालेला होता. आणि कोटचा प्रत्यक्षज्ञानवादी तत्त्वज्ञान हा ग्रंथ वाचल्याने मिल्लला स्वत:चा तर्कशास्त्रावरील ग्रंथ लिहिण्यात बरीच मदत झाली होती. हे स्वत: मिल्लने लिहून ठेवलेले आहे. स्त्रीपुरुषांच्या समानतेबद्दलहि दोघांचा बराच वादविवाद चालू असे. मिल्ल वगैरे इंग्रज लेखक त्याला पैशाची नेहमी मदत करीत. कोटच्या ठिकणी फारशी कृतज्ञताबुद्धी नव्हती, असे म्हणावे लागेल.

१८४५ मध्ये मॅडम क्लॉटिल्ड डी व्हॉक्स या स्त्रीशी त्याचा परिचय झाला. तिचा नवरा आमरण गलबतारील नोकरीत गुंतला होता. तिच्या पत्रांवरून पाहता ती फार हुशार व सुस्वभावी होती व ती अखेरपर्यंत जगती तर कोटच्या उतारवयातील कार्यावर तिचा फार चांगला परिणाम झाला असता, असे म्हणतात. परंतु एक वर्षानंतर ती मरण पावली. मॅडम डी व्हॉक्सच्या मरणाने कोटची मन:स्थिती काय झाली होती हेंही प्रसिद्ध आहे. तिच्या मरणानंतर दर बुधवारी कोट तिच्या थडग्याच्या दर्शनास जात असे, व त्यांच्यामधील प्रेमसंबंधाला कोटच्या शिष्यांनी डान्टे-बियाट्रिसची उपमा दिलेली आहे.

पॉझिटिव्ह फिलॉसफी हा ग्रंथ पुरा झाल्यावर १८५१ पासून १८५४ पर्यंत कोटने आपला सिस्टीम ऑफ पॉझिटिव्ह पॉलिटी (प्रत्यक्षज्ञानवादी राजनीतिशास्त्र) हा ग्रंथ चार भागांत प्रसिद्ध केला. १८४८ च्या राज्यक्रांतीमुळे तयार झालेल्या राजकीय वातावरणाचा फायदा घेऊन त्याने पॉझिटिव्ह सोसायटी या नावाची संस्था काढली व तिला ज‌ॅकोबिन क्लबाप्रमाणे सामर्थ्यवान बनविण्याची आकांक्षा धरली. त्याने १८४९ त पॉझिटिव्हिस्ट कॅलेंडर प्रसिद्ध केले. त्यात ख्रिस्ती साधूंच्या नावाऐवजी ज्यांनी जगातील सुधारणेच्या प्रगतीस मदत केली अशा थोर पुरुषांची नावे दिलेली आहेत. १८४९, १८५०, १८५१ या तीन साली त्याने तीन व्याख्यानमाला गुंफून आपला `साक्षात् वाद' श्रोत्यांपुढे जोरदार भाषेत मांडला. तिसर्‍या व्याख्यानमालेच्या अखेरीस त्याने पुढीलप्रमाणे सडेतोड उद्गार काढले, ``अखिल भूत व भविष्य काळ यांना साक्षी ठेवून अखिल मानव जातीचे कल्याणकर्ते- तात्विक व व्यावहारिक दोन्ही बाबतींतील लोकसेवक- या जगाची अखिल नियंत्रणसत्ता आपल्या हाती घेण्याकरिता पुढे येत आहेत. नैतिक, बौद्धिक व भौतिक या तिन्ही प्रकारच्या व्यवसायांची सर्व खात्यांमध्ये ईश्वरी शक्ती म्हणून म्हणतात ती त्याना स्वत: आपणच बनावयाचे आहे. आणि म्हणून ईश्वराचे प्रेषित असल्याचा बहाणा करून जे कॅथॉलिक, प्रोटेस्टंट किंवा डीइस्ट वगैरे धर्मपंथी लोक आजपर्यंत राज्यसत्ता बळकावून बसलेले आहेत ते सर्व मागासलेले व समाजात विनाकारण बखेडा माजविणारे असल्यामुळे त्यांचे तेथून कायमचे उच्चाटन करावयाचे आहे.''

१८५२ मध्ये कॅटेकिझम ऑफ पॉझिटिव्हिझम हे पुस्तक त्याने प्रसिद्ध केले व त्याच्या प्रस्तावनेत लुई नेपोलियनचे पार्लमेंटरी राज्यव्यवस्था बाजूस सारून एक तांत्रिक लोकसत्ताक पद्धती स्थापन केल्याबद्दल अभिनंदन केले. पुढे तो निकोलस बादशहाला अखिल ख्रिस्ती जगातला अद्वितीय मुत्सद्दी मानू लागला. १८५७ सप्टेंबर ५ रोजी कोट चाळपुळीच्या रोगाने मरण पावला.

कोटची विलक्षण बुद्धिमत्ता व प्रतिकूल परिस्थितीतहि काम करण्याची जबरदस्त चिकाटी याबद्दल कोणालाही आदर वाटतो. त्याची भाषा अवजड, कंटाळवाणी व कृत्रिम असे. त्याच्या सर्व ग्रंथांत वाचकांना चित्ताकर्षक वाटणारी गोष्ट म्हणजे फक्त त्याचे विचार व ग्रंथांतला अत्यंत महत्त्वाचा व व्यापक विषय. त्याच्या विचारातही उतारवयात वैयिक्तक दुराग्रहाची व केवळ तात्विकपणाची छटा फार असे. कारण त्याने `पॉझिटिव्ह फिलॉसफी' हा ग्रंथ संपल्यापासून स्वत:चे ज्ञानभांडार परिपूर्ण असल्याचे ठरवून वृत्तपत्रें, मासिके, शास्त्रीय ग्रंथ व नवे शोध याविषयीचे कोणतेही नवे पुस्तक वाचण्याचे अजीबात बंद केले होते. कोटचे समाजशास्त्र `अर्थशास्त्र' या लेखात (ज्ञानकोष, विभाग ७ पा. ४६२) संक्षेपाने दिलेच आहे. त्याच्या मध्यवर्ती प्रमुख कल्पना म्हणजे पुढील होय.

व्यक्तीप्रमाणे मानववंशहि ऐश्वरिक, आध्यात्मिक व प्रात्यक्षिक अशा तीन बौद्धिक अवस्थांतून जातच असतो. या प्रत्येक कल्पनावस्थेत विश्वचमत्काराचे कर्तृत्व निरनिराळ्या कर्त्यांकडे दिले असते. एका कल्पनेचा जगावरचा पगडा उठल्यानंतर दुसरी आपला पगडा बसविते. आज प्रत्येक सिद्ध केलेल्या गोष्टींवरच मनुष्याचा विश्वास बसतो. कोट देव वगैरे जाणत नाही. आपल्या `फिलासॉफी पॉझिटिव्ह' मध्ये त्याने सामाजिक स्थितिशास्त्र व सामाजिक गतिशास्त्र यामध्ये मोठा भेद पाडला आहे. पहिले सामाजिक सह-अस्तित्वाचे तर दुसरे समाजिक प्रगतीचे नियम अभ्यासिते. कोट समाजशास्त्राला सर्व शास्त्रांत पहिले स्थान देतो. तथापि त्याला या शास्त्राचे फारच थोडे ज्ञान होते.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .