विभाग अकरावा : काव्य - खतें
कोटकपुरा- पंजाबच्या फरीदकोट संस्थानातील तहसिलीचे मुख्य ठिकाण हे फरीदकोटपासून ७ मैलांवर असून येथे नॉर्थ वेस्टर्न (वायव्येकडील) रेल्वेचे व राजपुताना माळवा रेल्वे स्टेशन आहे. लो.स. (१९११) १०६४. प्रथमत: हे अगदी खेडे होते, पण चौधरी कपूरसिंग याने नजीकच्या कोट इसाखान गावातून लोक बोलावून येथे वस्ती करविली. १८४७ त हे गाव महाराजा रणजितसिंगाने फरीदकोट संस्थानास परत दिले. येथे धान्याचा मोठा व्यापार चालत असून एक बाजारहि आहे.