विभाग अकरावा : काव्य - खतें
कोटगड- पंजाबात सिमला जिल्ह्यांतील कोटखाई व कोटगड हे दोन प्रदेश मिळून एक पोटतहसील होते. लो.सं. (१९११) १०८४३. मुख्य ठिकाण कोटखाइ. या तहसिलीच्या सर्व बाजूला सिमल्याची डोंगरी संस्थाने आहेत. बहुतेक भाग डोंगराळ आहे. कोटगड `हातु' डोंगराच्या एका ओळीवर आहे.