विभाग अकरावा : काव्य - खतें
कोटगळ- वर्हाड मध्यप्रांत. जिल्हा चांदा. उत्तरेस आणि पूर्वेस द्रुग जिल्हा, दक्षिणस मुरमगाव जमीनदारी, पश्चिमेस पलासगड. एके ठिकाणी ही जमीनदारी जवळच असलेल्या अंबागड चौकीचा एक भाग होता. परंतु सुमारे २५० वर्षांपूर्वी ही जमीनदारी निराळी झाली. हीत एकंदर २५ खेडी असून पैकी बारा खेड्यांची अद्याप पाहणी झाली नाही. लो.सं. (१९०१) १९३८. लागवडीखाली जमीन एकंदर ४००० एकर असून भाताचे पीक मुख्य आहे. एकंदर उत्पन्न २३०० रु.,टाकोळी ९० रु., इतर ६६ रुपये. जमीनदार खातुलवार गोंड असून त्याचे नाव फतेरग बापू आहे. जमीनदारीची स्थिती बरी आहे. (चांदा गॅ.)