विभाग अकरावा : काव्य - खतें
कोटगिरी- मद्रास इलाख्यांतील निलगिरी जिल्ह्याच्या कुन्नूर तालुक्यातील एक हवा खाण्याचे ठिकाण. हे निलगिरीच्या पठाराच्या ईशान्येस उटकमंडपासून १८ मैलांवर व कुन्नूरपासून १२ मैलांवर आहे. याची लोकसंख्या १९०१ मध्ये ५१०० होती. पंधरा दिवसांतून एकदा या ठिकाणी कुन्नूरचा हा तहशिलदार आपले फौजदारी कोर्ट भरवतो. उटकमंडपेक्षा येथील हवा अधिक चांगली असे कित्येकाचे मत आहे. याच्या नजीकच दिम्हट्टीचे आरोग्यस्थान आहे. पण हल्ली ते मोडण्यात आले आहे.