विभाग अकरावा : काव्य - खतें
कोटद्वार- संयुक्त प्रांताच्या गढवाल जिल्ह्यातील `खो' नदीच्या काठी मोठ्या व्यापाराच्या पेठेचे गाव. या जिल्ह्यांतील दक्षिण भागात मैदानातील प्रदेशांतून सुती कापड, साखर, मीठ, भांडी वगैरे माल या गावांतून पुरविला जातो. तसेच तिबेटांतील मालाच्या देवघेवीचे हे मध्यवर्ती गाव असून येथून मैदानी मुलुखांत मोहरी, शिरसीचे बी, हळद, मिरच्या वगैरे जिन्नस जातात. भोतिया लोक सवागी वगैरे खनिज द्रव्ये येथे आणून येथून कापड, तंबाखू, साखर व द्विदल धान्ये घेऊन जातात. येथे पोलीस ठाणे, दवाखाना व अमेरिकेच्या मेथॉडिस्टाचे मिशन आहे.