विभाग अकरावा : काव्य - खतें
कोटपुतळी.- राजपुतान्यांत जयपूर संस्थानच्या टोरावति निझामतीत जयपूरच्या ईशान्येस सुमारे ६० मैलांवर वसावी किंवा साहेबी नदीजवळ याच नावच्या परगण्याचे मुख्य ठिकाण. कोट व पुतळी ही दोन गावे मिळून कोट पुतळी गाव झाले आहे. लो.सं. (१९०१) ६८७९. हे मराठ्यांच्या ताब्यात होते त्यावेळी येथे एक किल्ला व दुसरी तटबंदीची महत्त्वाची ठिकाणी होती ती अद्याप कायम आहेत. येथे पोष्ट व तार कचेरी, कित्येक शाळा व व्हिक्टोरिया ज्युबिली इस्पितळ ही आहेत. जवळच ८ मैलांवर काळ्या संगमरवरी दगडाची खाण आहे.