प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें         

कोटा, संस्थान- राजपुतान्याच्या आग्नेय भागातील एक संस्थान. या संस्थानाचे क्षेत्रफळ ५६८४ चौरस मैल व लो.सं. (१९२१) ६,३०,०६०. उत्तरेस जयपूर संस्थान व अलीगड जिल्हा; पश्चिमेस बुंदी व उदेपूर ही संस्थाने; नैर्ऋत्येस इंदूर संस्थानचे रामपूर मानपूर जिल्हे. झालवाडा व ग्वाल्हेरचा अगर तहशील; पूर्वेस ग्वाल्हेर संस्थान व छप्रा जिल्हा, दक्षिणेस खिलचीपूर व राजगड संस्थानें ही आहेत. या संस्थानची लांबी ११५ मैल व रुंदी ११० मैल आहे. माळव्याच्या पठारीपासून जी उतरण लागते त्या उतरणीवर हा प्रदेश वसलेला आहे. या प्रदेशातून चंबळा व तिला मिळणार्‍या नद्या या उत्तरवहिन्या होऊन वहात जातात. या संस्थानच्या दक्षिण भागांतून वायव्य दिशेकडून आग्नेय दिशेकडे मुकुंदवार नांवाची एक टेकड्यांची माळ पसरलेली आहे व त्या रांगेची उंची समुद्राच्या पृष्ठभागापासून १४०० ते १६०० फूट आहे. या टेकड्यांवर खुजी झाडे असून शिवाय झाडझुडपांची रेलचेल आहे. यांतून शिकारीला योग्य अशी पुष्कळ हिंस्र जनावरें आहेत. संस्थानच्या उत्तर भागात इदर गडानजीकही पुष्कळ टेंकड्या असून त्यांची उंची १५० फूट आहे. शहाबाद जिल्ह्याच्या पूर्वभागांतील टेकड्यांची उंची सर्वात अधिक म्हणजे १८०० फूट आहे. चंबळा, काळी सिंद व पार्वती या या संस्थानांतील तीन मुख्य नद्या होत. पार्वती नदीला अद्रू नावाच्या खेड्याजवळ अंधेरी नदी मिळाली असून या ठिकाणी पार्वती नदीला एक मोठे धरण बांधण्यात आले आहे व या धरणापासून कालवे काढण्यात आले आहेत. या कालव्यांच्या योगाने जवळ जवळ ४० खेड्यांनां अगर ६।७ हजार एकर जमिनीला पाणीपुरवठा होतो. या तीन नद्यांशिवाय परवान, उजर, सुक्री, बाणगंगा, कूल व कुनू या दुय्यम नद्या आहेत. संस्थानच्या उत्तर भागात मळीची जमीन असून कोटाजवळ विंद्य पर्वतातील रेताड दगडासारखे दगड सापडतात. वाघ, चित्ते, काळे अस्वल, तरस, लांडगे, रानटी कुत्रे, ही हिंस्र जनावरे येथे आहेत. याशिवाय सांबर, चितळ, नीळगाई, काळवीट, हरिण हीहि जनावरे आढळत. महादीर रोझी, लांची, गुंच इत्यादि माशांच्या जाती आहेत.

हवा व पर्जन्यमान- नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत हवा फार सुखकारक असते. मार्च महिन्यांत उकाड्याला सुरुवात होते व जूनमध्ये तर फारच कडक उन्हाळा पडतो. जुलै महिन्यापासून बरसातीला आरंभ होतो व ऑक्टोबरपर्यंत पावसाळा असतो. या दिवसांतील हवा रोगट असते. १९०५ मध्ये मे महिन्यातील उष्णमान ११५ डिग्री व डिसेंबर मधील मान ४९ डिग्री होते. संस्थानातील निरनिराळ्या भागांत पर्जन्यमान निरनिराळे आहे. संस्थानचे साधारण पर्जन्यमान ३७ इंच आहे.

इतिहास- कोटा संस्थानचे राजघराणे हे चव्हाण रजपूत जातीच्या हाडा नामक शाखेचे आहे. १३४२ मध्ये बुंदीचा राजा रावदेव याने प्रथम कोटाच्या टापूंत आपल्या हाडाघराण्याचे नांव गाजविले. कोटे नांवाच्या एका भिल्ल जातीपासून त्याने हा प्रदेश जिंकून घेतला. याच्या वंशजांच्या ताब्यात हा मुलुख १५३० पर्यंत होता व नंतर तो प्रदेश बुंदीच्या राव सुरजमल्लाने आपल्या ताब्यात आणिला. १७ व्या शतकाच्या प्रारंभी राव राजा रतनसिंग याने कोटा व त्याच्या आसपासचा मुलुख आपला दुसरा मुलगा माधवसिंग याला जहागिर दिला. जहांगिरच्या विरुद्ध त्याचा मुलगा कुरम याने बंड उभारले. त्यावेळी रावराजा रतनसिंग व माधवसिंग या पितापुत्रांच्या जोडीने हे बंड मोडण्याच्या कामी बादशाहाला मदत केली. त्यामुळे जहांगिर याने रतनसिंगाला बर्‍हाणूरची सुभेदारी व माधवसिंगाला कोटा शहर व ३६० खेडी अशी मिळून अडीच लाखांची जहागीर वंशपरंपरा तोडून दिली. शहाजहानने सुद्धा ती तशीच पुढे चालविली. माधवसिंगाच्या कारकीर्दीत कोटा हे स्वतंत्र संस्थान बनून त्या संस्थानचा राजा माधवसिंग झाला. माधवसिंगाच्या मागून त्याचा मुलगा मुकुंदसिंह हा गादीवर आला. १६५८ मध्ये औरंगझेबाशी फत्तेहाबाद येथे जी लढाई झाली तीत मुकुंदसिंह व त्याचे चार भाऊ यांनी फार पराक्रम गाजविला. या लढाईत सर्वात कनिष्ठ भाऊ किशोरसिंग हा सोडून बाकी सर्व भाऊ मारले गेले. पुढे १६५८ साली जगात्सिंह हा गादीवर आला. तो निपुत्रिक असल्याने त्याच्या मागून प्रेमसिंह हा गादीवर बसला. पण हा दुर्वर्तनी व नालायक असल्याने अवघ्या सहा महिन्यांच्या आत त्याला पदच्युत करण्यांत आले. पहिला किशोरसिंग हा १६७० मध्ये राज्यारूढ झाला. औरंगझेबाच्या सैन्याबरोबर दक्षिणेच्या स्वारीत तो गेला होता. या स्वारीत त्याने चांगले नाव गाजविले. तो अर्काटच्या वेढ्यात मारला गेला. त्याचा मुलगा पहिला रामसिंग याने औरंगझेबाच्या मरणानंतर शहाअलम बहादुरशहा व अजमशहा यांच्यामध्ये राज्यासंबंधी भांडण चालले असता अजमशहाचा पक्ष उचलून धरला. १९०० मध्ये जाजौ येथे जी लढाई झाली तीत तो पडला. त्याच्या मागून भीमसिंग हा गादीवर आला. याने सय्यद बंधूंचा पक्ष घेतल्यामुळे त्याला पंचहजाराची मनसबी मिळाली. त्याने आपल्या संस्थानाचा बराच विस्तार केला. याने प्रथमत: आपल्याला महाराव हा किताब धारण केला. निझाम उल्मुकाने दक्षिणेवर स्वारी केली असता त्याने निझामउल्मुकाला विरोध केला पण तो त्या लढाईत १७२० साली मारला गेला.

त्याच्या मागून त्याचा मुलगा अर्जुनसिंग व अर्जुनसिंगानंतर दुर्जनसिंग हा गादीवर आला. याने १७२४ ते १७५६ इथक्या अवधीत राज्य केले व आपल्या राज्याचा मुलुख वाढविला (१७५६-१७५९). अजितसिंगाने राज्य केल्यानंतर १७५९ मध्ये पहिला छत्रसाल हा राज्यावर आला. १७६१ साली जयपूरच्या राजाने या संस्थानांवर स्वारी केली. पण त्यात जयपूरच्या सैन्याचा पूर्णपणे पराभव झाला. या लढाईत झालिमसिंह नावाच्या एका तरुण सरदाराने चांगला पराक्रम गाजविला. महाराज छत्रसाल याच्यामागून त्याचा भाऊ गुमानसिंग हा राज्यावर आला. याच्या अमदानीत मराठ्यांनी कोटाच्या दक्षिण भागावर स्वारी केली. पण झालिमसिंगाच्या मध्यस्थीने मराठ्यांनी ६ लाख रुपये खंडणी घेण्याचे कबूल करून कोटामधून आपला पाय मागे घेतला.

गुमानसिंगाच्या मागून उमेदसिंग हा गादीवर बसला. त्याने १७७१-१८१९ पर्यंत राज्य केले. पण झालिमसिंग हाच खरा राजा होता. राजपुतान्यांत त्याचें वजन फार असे. त्याने कोटा संस्थानांत उत्तम शासनपद्धती अंमलात आणली. सैन्यात उत्कृष्ट कवाइतीची पद्धत अस्तित्वांत आणली. जमीनमहसुलाची नवीन व उपयुक्त अशी पद्धत काढून त्याने कोटा संस्थानाला चांगले भरभराटीचे स्वरूप प्राप्‍त करून दिले. १८१७ मध्ये झालिमसिंहाच्या मध्यस्थीने तहनामा होऊन कोटा हे ब्रिटिशांच्या ताब्यात आले व मराठ्यांना कोटा संस्थान खंडणी देत असे ती यापुढे ब्रिटिशांना मिळावयाची असे ठरले. झालिमसिंग व त्याच्या वंशजाना प्रधानकीची जागा कायमची देण्यात आली व त्यांच्या हातात संस्थानचा राज्यकारभार रहावा असे ठरले. पण काही काळ लोटल्यानंतर दुसरा किशोरसिंग हा (१८१९ ते २८) गादीवर आला. त्याने झालिमसिंगांच्या वंशजाला राज्यकारभारांत भाग घेऊ देण्याचे नाकारले. त्यामुळे ब्रिटिश सरकारला किशोरसिंगाविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले. मंगरोल येथे १८२१ मध्ये जी लढाई झाली तीत किशोरसिंगाचा पराभव होऊन त्याने झालिमसिंगाच्या वंशजांना राज्यकारभाराचा अधिकार देण्याचे कबूल केले. पुढे दुसर्‍या रामसिंगाच्या कारकीर्दीत पुन: एकदा रामसिंग व झालिमसिंगाचा वंशज मदनसिंग यांच्यामध्ये तंटाबखेडा उत्पन्न झाला. शेवटी झालिमसिंगाच्या वंशजासाठी झालवाडाची स्वतंत्र जहागीर देण्यात येऊन हा लढा मिटविण्यात आला.

अर्थातच १८३८ मध्ये झालवाडाची स्वतंत्र जहागीर निर्माण झाल्यावर पुन: एकदा ब्रिटिशांचा व कोटाचा करारमदार ठरला व त्यांत कोटा संस्थानने पूर्वीच्या खंडणीपैकी ८०००० रुपये कमी द्यावे असे ठरले. ब्रिटिशांच्या मदतीसाठी म्हणून एक स्वतंत्र तुकटी कोटाच्या खर्चाने उभारण्यात यावी म्हणून एक अट घालण्यात आली. १८५७ मध्ये या तुकडीने इंग्रजांविरुद्ध बंड केले व पोलिटिकल एझंट व त्याच्या मुलाची या सैन्याने कत्तल केली. रामसिंगाने या एजंटाचा जीव वाचविण्याच्या कामी काही खटपट केली नाही. या सबबीवर त्याचा १७ तोफांचा मान कमी करून १३ तोफांचा करण्यात आला. पण पुढे १८६६ मध्ये पुन: १७ तोफांचा मान रामसिंगास देण्यात आला. १८६६ मध्ये दुसरा छत्रसाल हा गादीवर आला. याच्या कारकीर्दीत राज्यकारभारात फार गोंधळ माजून राहिला व कर्जाची रक्कम ९० लाखापर्यंत गेली. तेव्हा छत्रसालच्या विनंतीवरून ब्रिटिश सरकारने १८७४ साली संस्थानची व्यवस्था पाहण्याकरिता सर फैझअल्लीखान यास प्रधान नेमले व त्याने राजपुताना एजंटाच्या साहाय्याने संस्थानचा कारभार चालवावा असे ठरले. या फैझअल्लीने थोड्याच वर्षांत संस्थानचे कर्ज फेडून चांगली सुधारणा घडवून आणली. छत्रसालच्या मरणानंतर १८८९ मध्ये त्याचा मुलगा महाराजा छगनसिंह हा गादीवर बसला. त्याला १८९६ मध्ये मुखत्यारी मिळाली. १९०० मध्ये त्याला के.सी.एस.आय. हा किताब देण्यात आला. लेफ्टनंट कर्नल हा लष्करी बहुमानाचा किताबहि त्याला मिळालेला आहे. झालवाडा जहागिरीच्या १७ जिल्ह्यांपैकी १५ जिल्हे याला पुन: परत मिळाले व झालवाडाच्या जहागिरीकडे २ जिल्हे देण्यात आले. ही याच्या कारकीर्दीतली महत्वाची गोष्ट होय. याशिवाय याच्या कारकीर्दीतील सुधारणा म्हणजे ब्रिटिश पोस्ट ऑफिसांची स्थापना, ब्रिटिश चलनी नाण्यांना मिळालेली मान्यता इत्यादी होत. १८१७ च्या तहान्वये २,९०,००० रुपये खंडणी म्हणून संस्थानकडून ब्रिटिश सरकारास मिळत असत. पण हल्ली २,३४,७३० रुपये खंडणी मिळते.

शासनपद्धती- शासनपद्धतीच्या दृष्टीने संस्थानचे १९ निझामत व ६ तहशिली असें भाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक निझामतीवर एक नाझीम नावाचा अधिकारी व तहशिलीवर एकेक तहशीलदार असतो व त्यांच्या हाताखाली नायब निझाम व नायब तहशीलदार नेमलेले असतात. संस्थानचा सर्व कारभार महाराजा आपल्या दिवाणाच्या साहाय्याने पहातो. तहशीलदारांना तिसर्‍या वर्गाच्या मॅजिस्ट्रेटचे अधिकार असतात. नाझिमांना दुसर्‍या वर्गाच्या मॅजिस्ट्रेटचा अधिकार असतो. यांच्यावर फौजदार म्हणून पोटजिल्हा अधिकारी नेमलेले असून त्यांच्याकडे अपीले करावयाची असतात. फौजदारांवरचा अधिकारी सेशन्स जज्य हा असतो व सर्वात वरिष्ठ कोर्ट म्हणजे `महक्म खास' असून त्याचा मुख्य स्वत: महाराजा असतो. महाराजाला फाशी देण्याचा अधिकार असतो. संस्थानचे वार्षिक उत्पन्न अंदाजे ४२ लाखांचे असून खर्च ३४ लाख आहे. संस्थानात जहागीर, मुआफी व खालसा असें तीन जमीनीचे प्रकार आहेत. संस्थानातील एकंदर जमिनीपैकी एकचतुर्थांश जमीन पहिल्या दोन प्रकारची मिळून आहे. जहागिरदारांना महाराजाच्या संमतीने दत्तक घेण्याचा अधिकार आहे. जहागिरदारांपैकी बर्‍याच जहागिरदारांना संस्थानला कर द्यावा लागतो व काहींना संस्थानासाठी लष्कर पुरवावे लागते. मुआफी जमिनी या नोकरी इनाम म्हणून देण्यात येतात व देवस्थान अगर सार्वजनिक कार्यासाठी देण्यात येतात. त्यांच्यावर कर नसतो. खालसा जमिनीवर संस्थानचा पूर्ण ताबा असतो. कोरड्या जमिनीपाठीमागे एकरी ४ आणि ६ पै ते ५ रु. ८ आणे व पाण्याखालील जमिनीमागे एकरी सवा रुपयापासून १७।। रुपयांपर्यंत सारा असतो. १५००० सैन्य पदरी ठेवण्याच्या महाराजाला अधिकार आहे. १९०५ साली महाराजांचे सैन्य अंदाजे ८००० होते. या सैन्यावर १९०५ साली ४,८०,००० रुपये खर्च करण्यात आले. दरबारला ब्रिटिशांचे सैन्य ठेवल्याबद्दल २० लाख रुपये द्यावे लागतात. पोलिसांत शहर पोलीस व जिल्हा पोलीस असें दोन भेद आहेत. कोतवाल शहर पोलिसांचा मुख्य असतो. जिल्ह्याचे सहा भाग पाडून प्रत्येक भागावर एकेक असिस्टंट सुपरिंटेंडेंट नेमलेला असतो. १९०५ साली संस्थानातील पोलीस ठाण्यांची संख्या ३९ होती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक छोटा तुरुंग असून राजधानीत एक मध्यवर्ती तुरुंग आहे. १९०४-५ साली संस्थानांत २१ दवाखाने होते.

लोक- १९२१ च्या खानेसुमारीत कोटाची लो.सं. ६,३०,०६० होती. दहा सालामागची लो.सं. सुमारे ९ हजाराने जास्त होती. संस्थानात ४ शहरे व २५५४ खेडी आहेत. कोटा, बारण, मांग्रोल व संगोड ही शहरे आहेत. संस्थानांत निझामत व तहशील मिळून २३ भाग आहेत. संस्थानांतील मुख्य भाषा राजस्थानी असून हारोटी, माळवी, ढुंढारी याही भाषा प्रचारात आहेत. या संस्थानांत चमार जातीची लोक सं. अधिक आहे. १८११ साली ही लोकसंख्या ६८,३०१ इतकी होती. यांचा धंदा चामडी रंगविणे, चामड्याचे काम करणे व शेतकी करणे हा असें. त्यांच्या खालोखाल मीना लोकांची वस्ती ५७,४७० होती. हे धिप्पाड व साहसी आहेत. पूर्वी त्यांचा धंदा लुटालूट करण्याचा असें पण हल्ली त्यांनी शेतकी करण्यास सुरुवात केली आहे. धाकर लोकांची संख्या ४३,१४७ इतकी असून ते शेतकीवरच आपली उफजीविका करतात. ब्राह्मणांनी वस्ती ३९४७० असून त्यांचा धंदा उपाध्येगिरी व नोकरी करण्याचा आले. माळी लोकांची संख्या ४८,६७० इतकी असून त्यांचा धंदा बागाइतींचा आहे. याशिवाय त्यांच्यापैकी पुष्कळ लोक शेतकीवर सुद्धा आपली वृत्ति चालवितात. गुजर हे गुराढोरांच्या क्रयविक्रयाचा धंदा करतात. इ.स. १९११ साली त्यांची संख्या ३८९६३ होती. याशिवाय महाजन (२,०६,५८५) व रजपूत (१४,७४७) या जाती आहेत. महाजन लोक व्यापार व सावकारी वगैरे धंदे करतात. रजपूतांचा धंदा म्हणजे लष्करी नोकरीचा आहे व इतर धंदा करणे त्यांना कमीपणाचे वाटते.

या संस्थानची जमीन फार सुपीक असून जमिनीला पाणी मिळण्याचीही या ठिकणी चांगली सोय आहे. काळी व उतरमाल व बरी अशा जमिनीच्या तीन जाती आहेत. काळी व उतरमाल या जाती फार सुपीक आहेत व कालव्याच्या अगर विहिरीच्या पाण्याशिवाय सुद्धा केवळ पर्जन्याच्या साहाय्याने या जमिनींतून गहू, चणे इत्यादी धान्ये चांगली पिकतात. १९०५ साली ३३१५ चौरस मैल जमीन शेतकीसाठी उपयोगात आली. त्यांत ३८१ चौरस मैलांत ज्वारी, ३५९ चौ. मैलांत गहू, तसेच ३९७ चौरस मैलांत चणे आणि ३३ चौरस मैलांत कापूस पेरण्यांत आला. सुद संस्थानात होणारी गुरांची निपज फार हलक्या दर्जाची असते. चांगल्या गुरांची आयात माळव्यामधून होते. येथील घोडे फार खुजे असतात. मेंढ्यांची व शेळ्यांची पैदास पुष्कळ होते. पार्वती नदीला धरण्यात आलेले धरण मोठे आहे. शिवाय संस्थानात एकंदर ३५० तळी आहेत. अक्लोरासागर तलाव हा सर्वात मोठा असून क्षेत्रफळ ३।। चौरस मैल आहे. संस्थानांतील जंगलांत सागवान फार थोडे आढळते. बाभूळ, वड, बेल धाक, ढोंक्रा, गूलर, जामुन, जम्बोलण, कदंब, महू, निम्ब, पिंपळ, साल, सेमल व तेंडू ही झाडें या जंगलांत आढळतात. इ.स. १९०४-५ साली जंगलांचे उत्पन्न ३३३०० रुपये आले.

व्यापार व दळणवळण- कापड विणण्याचा धंदा येथे मोठ्या प्रमाणात आढळतो. कोटा येथे तयार होणारी मलमल फार प्रसिद्ध आहे. मलमल पांढरी व रंगीत व जरीची सुद्धां तयार करण्यांत येते. चिटेंही उत्तम प्रकारची तयार होतात. बारण येथील रंगाचे कारखाने व खेळणी प्रसिद्ध आहेत. या शिवाय हलक्या दर्जाचा कागद, घोड्यावर व हत्तीवर घालण्याचे कलाबूतचे कापड, हस्तिदंती काम, भांडी वगैरे जिन्नसही या संस्थानांत तयार होतात.

संस्थानची सालीना सरासरी आयात २०० लाखांची व निर्गत ३।। लाखांची होते. धान्य, अफू, कापूस व कातडी इत्यादी जिन्नस संस्थानातून बाहेर जातात व परदेशी कापड, मीठ, तांदूळ, साखर, गूळ, लोखंड, फळे, कागद इत्यादी जिनसांची आयात होते. या संस्थानचा मुंबई, कलकत्ता, कानपूर, राजपुतान्यातील संस्थाने इत्यादी प्रदेशांशी व्यापार चालतो. येथील अफू माळव्यातील अफूच्या तोडीची असते व ती चीनकडेही पाठवण्यांत येते. कोटा शहर व बारण शहर ही संस्थानातील व्यापाराची शहरे आहेत. संस्थानात जी.आय.पी. रेल्वेचा बीना-वारग हा फाटा गेला असून या फाट्याचा भाग दरबारच्या मालकीचा आहे. या फाट्याची संस्थानात चार स्टेशने आहेत. याच्या शिवाय नागड्यापासून मथुरेपर्यंत जाणारी रेल्वे तयार होत असून ती कोटामधून गेली आहे. १९०४ मध्ये, संस्थानातील खडीच्या रस्त्याची लांबी १४३ मैल होती व साध्या रस्त्याची लांबी ४१० मैल होती. बारण, बुंदी, झालरापाटण या शहराकडे जाणारे रस्ते खडीचे आहेत.

साक्षरता- १९११ साली संस्थानांतील साक्षर लोकांची संख्या १९३७७ होती. त्यापैकी ७९४ बायका होत्या; म्हणजे साक्षरतेचे प्रमाण शेकडा २ हे पडले. १९२०-२१ साली संस्थानात १०५ मुलांच्या, व १७ मुलींच्या शाळा होत्या. मुलांच्या शाळांपैकी १ हायस्कूल, ३ आंग्लोव्हर्न्याक्युलर, १ मिडल, १ संस्कृत, १ ट्रेनिंग, १ उच्च प्राथमिक व ९७ व्हर्नाक्युलर शाळा होत्या. शिक्षणाप्रीत्यर्थ संस्थान सरकार १।। लाख रुपये खर्च करते. संस्थानात शिक्षण मोफत दिले जाते. एवढेंच नव्हे तर पुस्तके, कागद, शाई इत्यादी देखील मोफत पुरविण्यात येतात; तरी पण शिक्षणाच्या बाबतीत संस्थानातील लोक घ्यावी तितकी काळजी घेत नाहीत.

शहर- कोटा संस्थानच्या राजधानीचे शहर. हे चंबळा नदीच्या काठी वसलेले आहे. चौदाव्या शतकाच्या आरंभी बुंदीच्या रावदेव राजाने येथील भिल्ल लोकांचा पराभव करून हे शहर वसविले. माधवसिंगांच्या कारकीर्दीत कोटा संस्थानची हे शहर राजधानी बनले. कोटा हे भरभराटीचे शहर असून, राजपुतान्यात जी आठ प्रमुख शहरे आहेत त्यात या शहराची गणना होते. याच्या पूर्व, दक्षिण व उत्तर दिशेला तटबंदी असून पश्चिमेस समोरून चंबळा नदी वाहत गेली आहे. शहराभोवती सहा मोठे बुरुजी दरवाजे असून ते रात्री ११ वाजता बंद करण्यात येतात. या शहराचे कोटा, लाडपूर व रामपूर असें तीन भाग पडतात. शहरामध्ये पुष्कळ देवालये असून मथुराजीचें देवालय फार प्रसिद्ध आहे. यातील मूर्ती गोकुळांतून आणलेली आहे असें म्हणतात. येथील नीलकंठ महादेवाची मूर्ति ही सर्वात जुनी आहे, असें दिसून येते. येथील लोकसंख्या वाढण्याऐवजी कमीच होत आहे असें खानेसुमारीवरून दिसून येते. याची मुख्य कारणे म्हटली म्हणजे कोटा हे रेल्वेपासून बरेच दूर आहे व येथे असणार्‍या किशोरसागर तलावाचे पाणी जमिनीत गुरून हवा दमट झाल्यामुळे रोगराईचा येथे फार त्रास होतो ही होत.

येथे पांढरी व रंगीत उत्कृष्ट मलमल तयार होते. दर फेब्रुवारी महिन्यात येथे औद्योगिक प्रदर्शन भरते. त्यामुळे शहरात कोणकोणते धंदे चालू आहेत याची माहिती आपोआपच मिळू शकते. १८७४ मध्ये या शहराला म्युनिसिपालिटीचे हक्क देण्यात आले. या ठिकाणी दरबारने चालविलेल्या शिक्षणसंस्था आहेत. महाराव हायस्कूल व सरदारांसाठी असलेले हायस्कूल ही दोन्हीही अलाहाबाद विश्वविद्यालयाला जोडलेली आहेत. हायस्कूलला जोडून पटवारी (क्षेत्रमापन)चे शिक्षण देण्याचा वर्ग निघाला आहे. येथे २ इस्पितळे आहेत. त्यांपैकी `व्हिक्टोरिया हॉस्पिटल' हे स्त्रियांकरता आहे. येथील पाहण्याजोगी स्थळे म्हणजे महाराजांचा राजवाडा (उमेरभवन), मोठमोठी उद्याने, अमरनिवास, ब्रिजविलास व छत्तरपूर ही होत.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .