विभाग अकरावा : काव्य - खतें
कोटा तालुका- वर्हाड- मध्य प्रांत. बस्तर संस्थानांतील दक्षिणेकडील तालुका १७० ते ४८' व १८० ते ५७' उ. अक्षांश आणि ८०० ४७' ते ८२० २'. पू.रे. क्षेत्रफळ ९६८ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ७७३६. दक्षिण व पश्चिम भाग डोंगराळ असून मुख्य नदी सावरीनाला ही आहे. यात कोंट्याच्या वर दोन मैलापासून गोदावरीच्या संगमापर्यंत नाव चालविता येते. या तालुक्यात ताडाची झाडे फार असून त्यापासून ताडी काढितात. या तालुक्यात ३० चौ. मैल क्षेत्रफळाचा एक सपाट प्रदेश चोहोंकडून टेकड्यांच्या रांगांनी वेष्टिला आहे. मुरिया लोकांची वस्ती जास्ती असून तांदूळ व ज्वारी ही मुख्य पिके आहेत. तालुक्याचे मुख्य ठिकाण कोटा गाव आहे. (छत्तीसगड फ्युडेटरी स्टेटस ग्या.)