विभाग अकरावा : काव्य - खतें
कोट्टापट्टम- मद्रास इलाखा गुंतुर जिल्हा ओंगोले तालुक्यातील समुद्रकाठचे गाव. एके काळी व्यापाराच्या भरभराटीचे हे ठिकाण होते. गावातील रस्ते व घरे पद्धतशीर रीतीने बांधली असून गावाची रचना फार सुंदर आहे. बकिंगहॅम कालवा तयार झाल्यापासून या गावाचे व्यापारी महत्त्व नष्ट झाल्याकारणाने येथील कित्येक रहिवासी मद्रास व इतर ठिकाणी राहावयास गेले. येथील लोकसंख्येत कोमटी लोकांचा बराच भरणा आहे. येथे एक शिवालय व एक विष्णुमंदिर असून त्याच्या उत्सवासाठी भव्य व सुंदर रथ केलेले आहेत.