विभाग अकरावा : काव्य - खतें
कोट्रा किंवा सांगानी- काठेवाड पोलिटिकल एजन्सीमधील चौथ्या वर्गाचे लहान मांडलिक संस्थान. क्षेत्रफळ ७४ चौरस मैल व लोकसंख्या (१९०१) ८,८३५ असून यात २० खेडी आहेत. गोंडलच्या कुंभोजीचा मुलगा सांगोजी हा या संस्थानचा संस्थापक होय. पुढे याचे नातू जासोजी व सर्तनजी यांनी कोट्रा हे ठिकाण काठी लोकांपासून जिंकून घेतले (१७५०) व तेथेंच राजधानी स्थापली.