विभाग अकरावा : काव्य - खतें
कोठी- मध्य हिंदुस्थानात बाघेलखंडाच्या पोलिटिकल एजन्टाच्या देखरेखीखाली असलेले एक सनदी संस्थान आहे. येथील संस्थानिक बाघेल रजपूत असून त्याने येथील मूळच्या भार राजाला हाकलून देऊन येथे जहाजीर स्थापिली. येथील संस्थानिकांच्या राजानिष्ठादी गुणांचे बक्षीस म्हणून त्यास इंग्रजांकडून राजा बहादूर ही पदवी मिळाली आहे. येथील जमीन चांगली सुपीक असून तीत साधारणत: सर्व धान्ये पिकतात.