विभाग अकरावा : काव्य - खतें
कोठूर- मुंबई. नाशिक जिल्हा. निफाडच्या दक्षिणेस तीन मैलांवर असून येथे एक मल्हारेश्वराचे देऊळ आहे. यामध्ये दोन (इसवी १७१७ व १७२७) शिलालेख आहेत. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे मेव्हणे (पत्नी राधाबाई यांचे भाऊ) मल्हारराव बरवे यांनी दोन वाडे, दोन घाट, दोन धर्मशाळा व बाणेश्वराचे देवालय येथे बांधले आहे. मल्हारराव बरव्याचे वंशज येथे राहतात. (बाँबे. ग्या.)