विभाग अकरावा : काव्य - खतें
कोंडगल, तालुका- हैद्राबाद संस्थानातील गुलबर्गा जिल्ह्याच्या पूर्व भागांतील एक तालुका. या तालुक्याचे क्षेत्रफळ ६२२ चौरस मैल असून १९११ मध्ये या तालुक्याची लोकसंख्या १,१९,९४४ होती. या तालुक्यात २ शहरे असून १६३ खेडी आहेत. या खेड्यांपैकी ३५ खेडी जहागीर होती. या तालुक्याच्या जमीन महसूल १९०१ साली १,०१,००० होता. १९०५ मध्ये गुरुमलकाल तालुक्यातील ५९ खेडी कोइलकोंडा तालुक्यात समाविष्ट करण्यात आली. या तालुक्यात तांदूळ पुष्कळ पिकतो व तो मुख्यत: तलावाच्या पाण्यामुळे पिकतो. या तालुक्यात जहागीर म्हणजे तांडूर व कोसगी हे छोटे तालुका होत व यांत अनुक्रमे ६२ व ११ खेडी आहेत.
शहर- कोंडगल तालुक्याचे हे मुख्य ठिकाण होय. हे तांडूर स्टेशनपासून १२ मैलांवर आहे. या गावाची लोकसंख्या १९११ साली ६०६२ होती. या गावी तालुका कचेरी, पोलीस इन्स्पेक्टरची कचेरी, तालुका पोस्टऑफीस इत्यादी कचेर्या असून एक शाळा आहे. या गावात एक मशीद असून ती ३०० वर्षाची जुनी आहे, असें म्हणतात.