विभाग अकरावा : काव्य - खतें
कोडमगी- मुंबई इलाखा. धारवाड जिल्हा. कोडच्या दक्षिणेस अकरा मैलांवर एक खेडे आहे. येथील बयल बसप्पाच्या देवळात इ.स. ११५८ सालचा एक शिलालेख व सिद्धरामेश्वराच्या देवळात दोन शिलालेख आहेत. पैकी एक इ.स. १०८० सालचा असून दुसर्यावरील तारीख लागत नाही. (धारवाड ग्या.)