विभाग अकरावा : काव्य - खतें
कोंडवीडू गाणदेव- हा कोंडवीडू देशाचा गाणदेव नावाचा राजा शके १३७७ च्या सुमारास होऊन गेला.याचा आजा चंद्रदेव व बाप गुहिलदेवपाल हा होय. हुल्श याने याला ओरिसाच्या कपिल गजपतीचा समकालीन मानला आहे. परंतु तो त्याचा समकालीन नसून कपिलाचा वंशज असावा असें म्हणतात. (गाणदेवाचा ताम्रपट.)