विभाग अकरावा : काव्य - खतें
कोंडाणे- मुंबई इलाख्यातील कुलाबा जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील एक खेडे. हे कर्जतच्या आग्नेयेस ४ मैलांवर आहे. हे राजमाची टेकडीच्या पायथ्याशी वसलेले आहे. याची लो.सं. १९०१ साली १५८ होती. येथे ख्रिस्तपूर्व २०० वर्षांच्या सुमारची बौद्धांची लेणी असून ती प्रेक्षणीय आहेत. ही लेणी एकंदर चार असून यात एक बुद्धाची मूर्ती आहे. येथे एक ख्रिस्तपूर्व २ र्या शतकातील शिलालेख असून त्यावर `कन्हाचा (कृष्णाचा) शिष्य बलक याने तयार केलेली' असा मजकूर आहे.