प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें         

कोंबड्या- कोंबड्यांच्या मूळ उत्पत्तीविषयी शोध लावताना डार्विनने कोंबड्यांच्या सर्व जाती `गॅलसबँकिव्हा' नावाच्या कोंबड्यांपासून झाल्या असाव्यात असें म्हटले आहे. परंतु ब्रह्मदेश व कोचिन या जातींची उत्पत्ती त्या जातीपासून झालेली नाही एवढेच नव्हे तर त्या कोणापासून झालेल्या असाव्यात याचाहि अद्याप शोध लागलेला नाही. कसेही असो. सध्याच्या पाळीव कोंबड्या या रानटी कोंबड्यांपासून पैदा झालेल्या आहेत, असें म्हणण्यास हरकत नाही. रानटी कोंबड्यांची पाळीव कोंबड्यांशी तुलना केल्यास त्यामध्ये पुष्कळच फरक दिसून येतो. रानकोंबड्यांची नखे फार तीक्ष्ण असून त्या कोंबड्या मुळीच माणसाळत नाहीत. त्या फार थोडी अंडी घालितात व ती लहान असतात. परंतु पाळीव कोंबड्यांचे एकंदर वाढण्याचे वातावरण निराळे असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमानांत व इतर गोष्टींतही पुष्कळ फरक झालेला आहे. कोंबड्या, बदके वगैरे प्राणी काळजीपूर्वक बाळगून त्यांची जोपासना केल्यास तो एक फायदेशीर धंदा होईल ही कल्पनाही आपल्याकडील लोकांना अद्यापि नाही. परंतु पाश्चात्य देशांत या विषयाचा बराच अभ्यास झाला असून तेथील तज्ज्ञांच्या अनुभवाप्रमाणे तो कित्येक ठिकाणी पूर्ण यशस्वी तर कित्येक ठिकाणी नुकसानकारक झालेला आहे. सदरहू धंदा नुकसानकारक होण्याची मुख्य कारणे (१) या विषयासंबंधी अज्ञान, (२) अपुरी जागा, (३) मजुरीची महर्घता वगैरे होत. परंतु हिंदुस्थानात शेवटच्या दोन अडचणी विशेष आड येऊं शकत नाहीत. परंतु विषयाचे ज्ञान पुरे नसल्यामुळे हा धंदा मोठ्या प्रमाणावर करण्याचे धाडस कोणास होत नाही. म्हणून हा धंदा सध्यां अडाणी शेतकरी वर्गाच्या हाती राहिला आहे.

कोंबड्यांचा धंदा काळजीपूर्वक केल्यास तो फायदेशीर आहे एवढेच नव्हे तर त्यापासून मनाची करमणूकह होते. दुय्यम धंदा या दृष्टीने तर त्याचे महत्त्व फारच आहे. कारण भांडवल फारसे न लागता नेहमी खेळती रक्कम हाती रहाते व त्यामुळे कोणतीहि अडचण येत नाही. सदर पाळीव पक्ष्यांचा उपयोग तीन तर्‍हेने होतो. पहिला उपयोग : त्याचें मांस फार रुचकर असल्यामुळे बहुतेक सर्व जाती त्याचा उपयोग खाण्याकडे करितात. दुसरा उपयोग : निव्वळ अंडी विकण्यास मिळावीत या हेतूनेसुद्धा सदर पक्षी बाळगले जातात. तिसरा उपयोग : हे पक्षी पुष्कळ प्रमाणांत बाळगल्यास त्यांच्या शिटीचा उपयोग खताकडे चांगला होतो.

फ्रान्स, इंग्लंड वगैरे यूरोपियन राष्ट्रांमध्ये सदर पक्षी व त्यांची अंडी यांची आयात व निर्यात दरवर्षी लाखो रुपयांची होत असते. या सर्व पक्ष्यांची उत्पत्ती अंड्यापासूनच होते व ज्या मानाने अंड्यांची निगा घेतली जाते त्या मानाने त्यांतून पिल्ले कमी जास्त बाहेर पडतात. अंडी घालण्यापूर्वी सृष्टीनियमाप्रमाणे नर व मादी यांचा संयोग होतो व नंतर मादी रोज एक याप्रमाणे अंडी घालते. कोंबड्यांची पिल्ले नऊ-दहा महिन्यांची झाली म्हणजे ती वयात येतात व नंतर अंडी घालतात. अंड्यांचा उपयोग दोन प्रकारे करतात- (१) खाण्याकडे व (२) उबवून पिल्ले काढण्याकडे. यापैकी कोणताहि उपयोग झाला तरी अंडी उत्तम ठेवावी लागतात. अंडी उत्तम ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एखादी पेटी किंवा स्टॅन्ड करून त्यास भोके (अंड्यांच्या परिघाएवढी) पाडून त्यात अंडी निमुळता भाग खाली करून ठेवणे हा होय. अंडी अशा रीतीने ठेवल्याने त्यास भरपूर हवा मिळते व आंतील गर्भास धक्का लागत नाही. अंडी स्टॅन्डवर ठेवतांनां त्याजवर ती ज्या दिवशी घातलेली असतील ती तारीख घलून ठेवावी म्हणजे ती किती दिवसांची आहेत हे समजण्यास सोपे जाते व शिळी होऊन चाललेल्या अंड्यांचा अगोदर खप करता येतो. कोंबडीने अंडी घातली म्हणजे प्रथमत: त्यांचे दोन वर्ग करावे. विकावयाची असतील ती अंडी निराळी काढून ठेवावीत व उबवावयांची अंडी निराळी असावीत. उबवावयाकरिता ठेवावयाच्या अंड्यांचा आकार लंबवर्तुळासारखा असावा. ती फार मोठी अगर फार लहान नसावीत. त्यांच्या वरचे कवच फार जाड किंवा फार लहान नसावीत. त्यांच्या वरचे कवच फार पातळ असू नये. अंडी ८-१० दिवसांपेक्षा जास्त शिळी नसावीत. अंडी घालणे झाल्यावर त्या कोंबड्या इतर कोंबड्यांना सोडून निवांत ठिकाणी विश्रांतीसाठी जाऊन बसतात व त्या जागेतून त्या सहसा हालत नाहीत. अशा रीतीने कोंबड्या बसल्या म्हणजे त्यास खुडका आला असें म्हणतात. उबविण्याकरितां त्यांच्या खाली अंडी ठेवण्यास हीच वेळ योग्य होय. अंडी उबविण्यास कोंबड्या निवडणे त्या चांगल्या, मोठ्या व पुष्कळ पिसांच्या अशा असाव्यात. पहिलटपणाची कोंबडी सहसा निवडूं नये. कारण त्या अस्थिर असल्यामुळे अंडी सारखी उबली जात नाहीत. ज्या कोंबड्या गरीब व शांत स्वभावाच्या असतील त्यांसच अंडी उबविण्याकरिता निवडावे. अंडी उबवून त्यांतून पिल्ले बाहेर येण्यास २१ दिवस लागतात व इतके दिवसपर्यंत कोंबड्यांच्या खुडका टिकतो. या अवधीत त्यांनां जे अन्न द्यावयाचे ते चांगले, पौष्टिक व उष्णता उत्पन्न करणारे असावे. होता होईल तो सुके अन्न द्यावे, ओले देऊ नये.

अंडी उबवावयास ठेविली म्हणजे त्यांतील गर्भ दिवसें दिवस वांढू लागतो व त्यांतून २१ दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात. सर्वच अंड्यांमधून पिले येतात असें नाही. तर काही अगदीच वांझ ठरतात व काहीत अर्धवट गर्भ वाढून ती नासतात. थंडीच्या व पावसाळ्याच्या दिवसांत विशेषत:  अंडी उबविण्यास चांगले. उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी जशी उबली जावीत तशी उबली जात नाहीत.

अंडी बरोबर उबली की नाहीत हे पाहण्याची सोपी युक्ती म्हणजे एक चौरस फूट लांबीचा जाड कार्डबोर्ड घेऊन त्याच्या मध्यभागी अंड्यांच्या आकाराचे लंबवर्तुळाकृती भोक पाडावे, त्या भोकावर अंडे धरून त्यांतून दिव्याचा प्रकाश पहावा. ज्या अंड्यांत गर्भ वाढत नाही त्या अंड्यांतून दिव्याचा प्रकाश स्वच्छ दिसतो व पातळ पदार्थाखेरीज त्यांत दुसरे काही दिसत नाही. जातिवंत कोंबड्यांची पैदास करणे झाल्यास ती त्या जातीचे पक्षी आणून त्यांपासून करण्यापेक्षा अंडी विकत आणून केलेली चांगली. मात्र अंडी खात्रीलायक व ताजी असावीत. परदेशाहून अंडी आणणे झाल्यास ती आगगाडीतून आणली असता कमी धोक्याचे असते. मनुष्याच्या हाती आणणे शक्य असेंल तर फारच उत्तम. अंडी लांबून आणल्यानंतर त्यास २४ तास विश्रांती द्यावी व नंतर ती कोंबडीखाली उबविण्यास ठेवावी. परदेशी अंडी पाठविणे झाल्यास ती पेटीतून पाठवावी. १५ इंच लांब, बारा इंच रुंद व नऊ इंच उंच एवढ्या पेटीत सुमारे एक डझन अंडी चांगली राहू शकतात. ही अंडी एकमेकांस न चिकटतील अशी ठेवावीत. नंतर पेटीचे तोंड स्क्रूने बंद करून आगगाडीने पाठवावी. उबण्यास ठेविलेली अंडी २१ दिवसांनी फुटून त्यातून पिल्ले बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर प्रथमत: त्यांना अन्नापेक्षा उबार्‍याचीच जास्त जरूर असते; म्हणून त्यास २४-३६ तासपर्यंत कोंबडीखालून काढू नये. या अवधीत त्यास थोडेथोडे खाणे घालावे लागते. पहिले काही दिवसपर्यंत खाणे घालणे ते सुके, कुटलेले व अगदी साधे असें असावे. परंतु पुढे पिल्ले वाडू लागली म्हणजे त्यास चांगले पौष्टिक अन्न खावयास घालावे लागते. त्यास खाणे घालावयाचे ते केव्हांतरी एकदाच सर्व न घालता दिवसांतून ३।४ वेळ थोडेथोडे घालावे. गहू, हरभर्‍याची डाळ, अर्धे कच्चे शिजविलेले मांस, ताक वगैरे पदार्थ सवडीप्रमाणे मधूनमधून देत जावे. वाळू, चुना व गारेचे लहान लहान खडे यंची आवश्यकत कोंबड्यांना फार असते. इतर पदार्थांबरोबर हे पदार्थही ती खातात व यांचा उपयोग त्यास अन्न पचविण्यास होतो. कोंबड्यांना दात नसल्यामुळे अन्न चावून बारीक करण्याचे त्यास दुसरे काही साधन नाही. परंतु वाळू, गार वगैरे पदार्थांचे गिळलेल्या पदार्थांशी घर्षण होऊन अन्न पचन होते. यावरून या पदार्थांची आवश्यकता किती आहे हे सहज कळून येईल. चुन्याचा उपयोग अंड्यावरील कवची बनण्याकडे होतो. म्हणून त्यास चुन्याचा पुरवठा केला पाहिजे. ज्यावेळी कोंबड्या पाळणारांचा कोंबड्या बाळगण्यामध्ये काही विशिष्ट हेतू असतो, तेव्हा त्या हेतूस अनुसरून त्यास पिलांच्या अन्नामध्ये फेरफार करावा लागतो. उदाहरणार्थ :- कोंबड्या विक्रीकरिता तयार करावयाच्या आहेत असें असले तर त्या जितक्या लठ्ठ व वजनदार होतील व ज्या मानाने त्याचे मांस नाजूक, मऊ व चवदार होईल त्या मानाने त्यांस किंमत अधिक येईल. म्हणून ज्या अन्नाच्या योगाने त्यांच्या अंगात हे गुण वाढतील तेच अन्न त्यास द्यावे लागेल निरनिराळ्या पदार्थांच्या अंगी मांस वाढविण्याची शक्ती असेंल त्याच पदार्थांचे अंगी जास्त अंडी घालण्याचे सामर्थ्य वाढविण्याची शक्ति असेंलच असें नाही व त्याकरिता निराळ्याच अन्नाची योजना करावी लागेल. म्हणून प्रथमत: कोंबड्या कोणत्या उपयोगाकरिता तयार करावयाच्या तो हेतू ठरवून नंतर अन्नाची योजना केली पाहिजे.

पिले तीन महिन्यांची झाली म्हणजे त्यांची वाढ झपाट्याने होऊ लागते. ती वाढ तीन महिन्यांपासून ८ महिनेपर्यंत जास्त जोरात असते. म्हणून यावेळी त्यास चांगले कसदार अन्न खाऊ घालावे. खाली दिलेले अन्न तयार करून तीन महिन्यांच्या पिलांस खाऊ घातल्यास त्यापासून त्यांच्या शरीराची वाढ झपाट्याने होईल ते अन्न येणेप्रमाणे:-


धान्याचे नाव
वजन
बारीक कुटलेले गहू २ पौंड
सातूचे बारीक पीठ १ पौंड
हरभर्‍याचे व वाटाण्याचे पीठ १ पौंड
तांदळाचे पीठ ३ पौंड
गव्हाचा कोंडा ३ पौंड
जवसाची पेंड १/२ पौंड.

पिलांकरिता घरे व आवार- पिले एक-दोन आठवड्यांची होईपर्यंत ती आईस सोडून फारशी दूर जात नाहीत. म्हणून त्यांना हिंडण्यास लागणारे आवार मर्यादित असले तरी चालते. हे आवार सहा फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट उंच एवढे ठेवून चारी बाजूंनी तारेच्या जाळ्यांने बंद करावे व त्यास जोडूनच एक लहानसे म्हणजे तीन फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट उंच  एवढे फळ्यांचे घर असावे. एवढ्या आवारात एक कोंबडा व आठ दहा पिले सहज राहू शकतात. निव्वळ पिल्लेच ठेवल्यास १५।१६ पर्यंत राहू शकतात. हे घर वरचेवर निरनिराळ्या ठिकाणी उचलून ठेवावे. म्हणजे फुसरे, कृमी वगैरेंचा त्रास होणार नाही.

पिले साधारण मोठी झाल्यावर त्यांस चरावयास आवार मोठे लागते. तसेच त्यांचे कावळे, घारी, मुंगूस वगैरे प्राण्यांपासून रक्षण करावे लागते. हवेतील फेरफारांचा पिलांच्या प्रकृतीवर पुष्कळ परिणाम होतो म्हणून त्यावेळी त्यांस फार जपले पाहिजे.

नियमित खाणे, बेतशीर व व्यवस्थित व्यायाम आणि पुरेशी स्वतंत्रता या गोष्टी जशा पिलांना अवश्य आहेत तसेच त्यांची घरे स्वच्छ ठेवणे अवश्य आहे. कोंबड्यांचा धंदा यशस्वी न होण्याचे कारण बर्‍याच अंशी त्यांची घरे व आवारे स्वच्छ नसतात हे होय. तरी या बाबतीत शक्य ती खबरदारी घेणे जरुर आहे. कोंबड्यांचे संवर्धन उत्तम प्रकारे व्हावे व त्याजपासून शक्य तितका फायदा व्हावा अशी कोंबडी बाळगणारांची इच्छा असल्यास त्यांनी कोंबड्यांची संख्या अगदी मर्यादित ठेविली पाहिजे. कोंबड्या बाळगणार्‍या लोकांचे साधरणपणे दोन वर्ग करिता येतील. (१) निव्वळ धंदा या दृष्टीने कोंबडी बाळगणारे व (२) केवळ शुद्ध जातींची पैदास करण्याची आवड म्हणून कोंबडी बाळगणारे. पैकी पहिल्या वर्गातील लोक पिल्लांना अगर कोंबड्यांना चांगली किंमत येत असल्यास शक्य तितकी विकून टाकण्यांत कसूर करीत नाहीत. मग त्यांच्या संग्रहांतील उत्तम जात नाहीशी झाली तरी हरकत नाही. आणि दुसर्‍या वर्गातील लोक आपल्या संग्रहातील पिले पुढे कदाचित उत्तम निघतील या आशेने ती मुळीच विकीत नाहीत. तात्पर्य, एक वर्ग फाजील उधळेपणा करितो तर दुसरा फार काटकसर करतो. पहिल्या वर्गाची दृष्टी द्रव्यसंचयाकडे असते, तर दुसर्‍याची दृष्टी पिलांशी निकट संबंध, त्यांचे लाड वगैरे गोष्टींमुळे प्रेम उत्पन्न होऊन अंध झालेली असते. त्यामुळे कोंबड्यांचा धंदा जसा व्यवस्थित चालावयास पाहिजे तसा चालत नाही.

कोणती पिल्ले अगर कोंबडी विकावीत ते पुढे दिले आहे:- (१) जी पिले अशक्त असतील ती विकून टाकावीत. (२) कम अस्सल चातीची पिल्ले विकून टाकावीत व (३) कोंबडी ४।५ वर्षांची मोठी झाली म्हणजे विकावीत.

पिल्लांची कृत्रिम उत्पत्ति व त्यांचे संवर्धन- सामान्यत: व्यवहारांत कोणताहि धंदा मोठ्या प्रमाणावर करणे झाल्यास निव्वळ नैसर्गिक साधनांवरच अवलंबून राहून चालत नाही. त्यास यांत्रिक साधनांची जोड झाल्यास तो धंदा पुष्कळ किफायतशीर होऊन कामहि पुष्कळ होते. तीच गोष्ट कोंबड्यांच्या धंद्याची आहे. कोंबड्यांचा धंदा मोठ्या प्रमाणावर करणे झाल्यास अंडी उबविणे, पिलांचे संवर्धन करणे, वगैरेकरिता पाश्चात्य देशांत निरनिराळी यंत्रे तयार झाली आहेत. त्यापासून नैसर्गिक पद्धतीपेक्षा काम पुष्कळ होऊन परावलंबन कमी झाल्यामुळे त्रासहि बराचसा वाचतो. अंडी उबविण्याकरिता जे यंत्र शोधून काढले आहे त्यास इन्क्युवेटर असें म्हणतात. याच्या सहाय्याने एका खेपेस पुष्कळ अंडी उबविता येतात. हे वर्षातील कोणत्याही ऋतूंत चालते व पिल्ले निघण्याचे प्रमाण पुष्कळ अंशाने समाधानकारक पडते. हे यंत्र वापरतांना मुख्यत्वेकरून पुढील गोष्टींकडे लक्ष पुरविले पाहिजे. (१) उबवावयास ठेवावयाची अंडी ताजी असावती. ती उन्हाळ्यात तीन दिवसांपेक्षा व हिवाळ्यात सात दिवसांपेक्षा जास्त शिळी नसावीत. शिळी अंडी उबविण्यास ठेवली असता त्यांतून खात्रीपूर्वक पिले निघतीलच असें नाही. (२) यंत्रांतील उष्णता अगदी नियमित अंशावर ठेवणे; उष्णतेचे मान १०१ डिग्री पासून १०३ डिग्री अंशांपर्यंत असावे. त्याच्यावर जाऊ देऊं नये. (३) यंत्रामध्ये जरूर तितकी हवा राहील अशी खबरदारी घेतली पाहिजे. (४) दिवसांतून यंत्राचे खण दोन वेळा उघडणे. पहिले दहा दिवसपर्यंत अंडी दहा मिनिटे उघडी ठेवावीत, दहा दिवसांनंतर अंडी वीस मिनिटे अगर थंड होईतोपर्यंत उघडी ठेवावीत व खण पुन्हा झाकावा. (५) उष्णता १०२ अंशांपेक्षा जास्त असल्यास दिवा मालवावा व १०२ अंशांपेक्षा कमी होऊ लागल्यास पुन्हा लावावा. (६) उन्हाळ्यात अंडी उबविणे झाल्यास यंत्रांतील हवेत आर्द्रता असावी लागते. म्हणून अंड्यांवर जरूर भासल्यास थोडे पाणी शिंपडावे. पावसाळ्यात याची मुळीच जरूर लागत नाही. (७) अंडी उबविण्याचे काम झाल्यावर यंत्रातील खण, पाण्याची बशी आणि कॅनव्हस ही सर्व ऊन पाण्याने व साबणाने स्वच्छ धुवावी. (८) अंड्यांतून पिलें बाहेर निघत असताना खण वरचेवर उघडल्याने पिलांस थंडी होण्याचा संभव आहे. सबब ते वरचेवर उघडू नयेत. इतक्या गोष्टीकडे लक्ष पुरविल्यास अंडी चांगली उबून पिलांचे प्रमाणहि चांगले पडेल व कोंबडीस खुडका येण्याची वाट पाहावी लागणार नाही. यंत्रात अंडी २१ दिवसपर्यंत ठेवावी लागतात व २१ व्या दिवशी पिले बाहेर येऊ लागली म्हणजे त्यास तेथून काढून `शुष्कीकरणमंजूषे'त ठेवावी लागतात. ही मंजुषा अंडी उबविण्याच्या यंत्रासच जोडलेली असते. येथे ती ठेवली म्हणजे त्यांस भरपूर उष्णता मिळून ती चांगली कोरडी होतात. तेथें ती १२ पासून १६ तास ठेवल्यानंतर त्यास `धात्रीमंजूषे'त ठेवतात. धात्रीमंजूषेतील व शुष्कीकरण मंजूषेतील उष्णतेचे प्रमाण ६० पासून ९० अंशापेक्षा जास्त असू नये. धात्रीमंजूषेचा उपयोग कोंबडीखाली अंडी उबवून निघालेल्या पिलांचे संगोपन करण्याकडेही होतो. ही पिले तीन दिवसांपर्यंत कोंबडीखाली ठेवून चवथ्या दिवसापासून धात्रीमंजूषेत ठेवावीत. मंजूषा हे यंत्र म्हणजे एक प्रकारची पेटी असून त्यात ठराविक उष्णता राहील अशी व्यवस्था केलेली असते. या यंत्रास किंमत अधिक पडते. व ज्या मानाने त्यांत सोई अधिक त्या मानाने त्याची किंमत अधिकाधिक वाढत जाते. अर्थात असले यंत्र विकत घेणे शेतकर्‍यास परवडणारे नाही, परंतु त्याच्या ऐवजी खाली सांगितलेल्या पद्धतीने पेट्या तयार करून त्यांचा उपयोग धात्रीमंजूषेसारखा करता येईल व त्या फारच कमी खर्चात करता येतील. ती पद्धत येणेप्रमाणे :- अडीच फूट लांब, दीड फूट रुंद व दीड फूट उंच अशी एक पेटी तयार करावी. तिच्या दोन्ही बाजूस एक लहानसे दार असावे. पेटीची वरील बाजू तारेच्या जाळ्याने बंद करावी म्हणजे आत हवा व उजेड भरपूर जाईल. या जाळ्यापासून खाली तळापर्यंत लोळतील अशा दोन बोटे रुंदीच्या फ्ल्यानेलच्या पट्ट्या दोन दोन इंचांवर लावाव्यात. या पेटीच्या तळाशी स्वच्छ बारीक वाळूचा एक इंच जाड थर पसरावा व त्यावर बारीक तोडलेले गवत पसरावे. गवताऐवजी लाकडाचा भुसा असला तरी चालेल. पिलांना या पेटीत ठेवले असता ती फ्ल्यानेलच्या पट्ट्यात जाऊन बसतील व त्यास आपण जणू काय आईच्या पंखाखाली बसलो आहो की काय असा भास होईल. ही पेटी वरचेवर कढत पाण्याने किंवा फिनाइलने धुण्याची व्यवस्था केली पाहिजे. धात्री मंजुषेचा उपयोग पिले लहान आहेत तोपर्यंतच होत असतो. पिले मोठी होऊ लागली म्हणजे त्यास तेथून काढून एखाद्या खोलीत अगर लाकडी घरात ठेवावे. येथपर्यंत पिले अंड्यांतून बाहेर निघाल्यापासून तो ती जाणती होईपर्यंत त्यास काय खाणे घालावे व त्यांची निगा कशी राखावी यासंबंधी विवेचन झाले. आता पिले मोठी झाल्यावर त्यांचे खाणे काय असावे, त्यांची घरे कशी असावीत वगैरे गोष्टीसंबंधी विचार केला पाहिजे.

कोंबड्यांना जे खाणे घालावयाचे त्याचे शास्त्रदृष्ट्या पाच वर्ग करता येतील :- (१) धान्य, (२) हिरवे अन्न, (३) मांसल अन्न, (४) अन्नपचनसाहाय्यक द्रव्ये

व (५) द्रव पदार्थ. यांपैकी धान्य हा पहिला वर्ग होय. यांत जे पदार्थ येतात त्यांच्या गुणधर्माप्रमाणे तीन पोटवर्ग करता येतील.

पोटवर्ग पहिला- या वर्गातील धान्ये : गहूं, सातू, जव, हरभरे, वाटाणा, गव्हाचा कोंडा, उडीद, तूर वगैरे. त्यांचे गुणधर्म सत्वदृष्ट्या उच्च. याने मांसवृद्धीस मदत होते. हे अन्न पिलांना किंवा कोंबड्यांना घालणे झाल्यास ताकात, दुधात किंवा पाण्यात भिजवून ओले करून घालावे.

पोटविभाग दुसरा- यातील धान्यें:- भात, तांदूळ, कण्या, तांदळाचा कोंडा, बाजरी, ज्वारी वगैरे. ही शरीरातील उष्णता राखण्यास उत्तम व प्रकृतीस थंडावा आणणारी आहेत. यात सत्व कमी असते. लहान पिलांना बारीक करून घातले असता चांगले. अशक्त व आझारी कोंबड्यांनां चांगले.

पोटविभाग तिसरा:-  धान्य मका :- हे मेदोवृद्धि व मांसवृद्धि करण्यास उत्तम होय. हे ठेचून किंवा भरडून भिजवून घालणे. ज्या कोंबड्या लठ्ठ करून विकावयाच्या असतील त्यांसच हे द्यावे. अंडी घालणार्‍या कोंबड्यांस देऊ नये.

यानंतर दुसरा मुख्य वर्ग म्हणजे `हिरवे अन्न' हा होय. यात पुढील पदार्थ येऊं शकतात :- कोवळे गवत, कांदे, लसूण, घास, कोबीची पाने, बटाटे, वेलांचे कोवळे शेंडे, कांद्याच्या हिरव्या पाती वगैरे. हे अन्न कोंबड्यांस खावयास घातले असतां त्यांची प्रकृती सुदृढ व निरोगी रहाते. या अन्नाच्या अंगी मलावरोध नाहीसा करण्याची शक्ति असते. शिवाय अंडी मोठ्या आकाराची होऊन त्याचे प्रमाण वाढते व वांझपणा कमी होतो. मलावरोध नाहीसा झाल्याने आमांश, हगवण वगैरेंसारखे रोग होण्याची भीती नसते. असें अनेक फायदे या वर्गातील अन्नापासून आहेत.

पावसाळ्यांत जिकडे तिकडे हिरवे गार रान असल्यामुळे कोंबड्यांना कोवळे गवत पुष्कळ मिळते आणि म्हणून त्यास इतर पदार्थांची विशेष जरुर नसते. परंतु उन्हाळ्यात ज्यावेळी सर्व गवत सुकून जाते त्यावेळी वर सांगितलेल्या इतर पदार्थांचा उपयोग करणे आवश्यक असते.

कोंबड्यांना बटाटे खाण्यास घातले असता चरबीचे प्रमाण जास्त वाढते ती जास्त लठ्ठ होतात. तरी ज्या कोंबड्या अगर पिले विकावयाची असतील त्यांस हे खाणे घालावे. बटाटे घालावयाचे झाल्यास ते पाण्यात उकळून साल काढून गव्हाच्या कोंड्यात अगर पिठांत मिसळून द्यावे. कोंबड्यास बटाट्यांची साल कधीही खावयास घालूं नये.

कोबी, गाजर, लसूण, घास वगैरे घालावयाचे झाल्यास ते कच्च्या स्थितीत घातलेले चांगले. ते शिजविण्याचे अगर उकडण्याचे प्रयोजन नाही.

याखेरीज कोंबड्यांना कधी कधी मोहरी व अंबाडीचे बी आणि पेंड खावयास घालतात. थंडीच्या दिवसांत कोंबड्यांचे पंख गळत असतात. त्या वेळी मोहरी व अंबाडीचे बी खावयास घातलेले चांगले.

तिसरा वर्ग म्हणजे मांसल अन्न हा होय. या वर्गात निरनिराळ्या जनावरांचे मांस, बारीक केलेली ताजी हाडे किंवा हाडांचा चुरा, किडे, आळ्या हे पदार्थ येतात. या अन्नाच्या अंगी मांसवृद्धी व उष्णता उत्पन्न करण्याची शक्ती असल्यामुळे कोंबड्या चांगल्या तयार होतात. उन्हाळ्यात या अन्नाची विशेषशी जरुर नसते; परंतु हिवाळ्यात मात्र हे अन्न मधून मधून दिलेले चांगले. पावसाळ्यात कीटकोत्पत्ती फार होत असल्याने कोंबड्यांचे चरावयाचे आवार पुष्कळ असल्यास त्यास हे भक्ष आपोआप मिळते. परंतु मर्यादित जागेतच आणि घातलेल्या अन्नावरच कोंबड्या पाळलेल्या असतील तर मात्र मधून मधून हे अन्न घालणे जरुरीचे आहे. कोंबड्यांचा सर्वसाधारण नित्यक्रम पाहिल्यास असें दिसेल की, वरील अन्न मिळविण्यासाठी त्या स्वाभाविकपणे फार खटपट करीत असतात. झाडावर किंवा जमिनीत असलेल्या आळ्या, वाळवी, मुंगळे वगैरे दृष्टीस पडल्यास ती त्यांचा इतका फन्ना उडवितात की, त्या ठिकाणी एकहि कीड रहात नाही. कांही काही कोंबडी इतकी धीट असतात की, ती आपल्या जिवाची पर्वा न करितां सर्पाच्या जातीतील काही प्राण्यांवर हल्ला करून त्यांस सबंध गिळून टाकतात. लहान लहान बेडूक, उंदरांची लहान पिल्ले, मासळीचे वगैरे तुकडे, त्याच्याच पैकी मेलेली पिल्ले वगैरे पदार्थ त्यांस मिळाल्यास त्यांची नुसती चंगळ उडते. यावरून हे अन्न कोंबड्यांच्या आवश्यक अन्नापैकी एक आहे हे सांगणे नकोच.

कोंबड्या अन्नशोधार्थ इकडे तिकडे हिंडत असतांना गारेचे खडे, जाडी रेती वगैरे पदार्थ खात असतांना पुष्कळांनी पाहिले असेंल. कोंबड्यांनां दात नसल्यामुळे त्यास आपले अन्न सबंध गिळावे लागते व पोटात गेल्यावर बारीक होण्याचे एखादे साधन पाहिजे म्हणून त्यांनावरील पदार्थ खावे लागतात. पदार्थ पोटांत गेल्यावर पोटातील अन्नाशी त्यांचे घर्षण होऊन ते बारीक होते व म्हणून ते पचविण्यास सोपे जाते. प्रत्येक प्राण्यांत खाल्लेले अन्न बारीक करण्याची कांही तरी व्यवस्था परमेश्वराने केलेली असतेच. त्याचप्रमाणे कोंबड्या वगैरे पाळीव पक्ष्यांच्या बाबतीतही केलेली आहे. कारण जरी यांनां दांत वगैरेसारखी साधने अन्नाचे चर्वण करण्यास नाहीत तरी ते काम वाळूचे व गारेचे खडे बजावतात. तात्पर्य इतर पदार्थाप्रमाणें या पदार्थांचीहि कोंबड्यांचे जीवनास आवश्यकता आहे हें उघड होते.

वाळू,  गार या पदार्थांबरोबरच कोंबड्या चुन्याचे खडेहि शोधून खात असतात. कोंबड्यांची अंडी तपासून पाहिली तर त्यांची कवची चुन्याची बनलेली असते, असें दिसून येईल. हा चुन्हा कोंबड्या बाहेरूनच मिळवितात. तो त्यांच्या शरीरात उत्पन्न होत नाही. चुना भरपूर प्रमाणांत न मिळाल्यास अंड्यावरील कवची पातळ होते व अंडी जरा धक्का लागला तरी फुटतात. म्हणून अंडी चांगली व पुष्कळ मिळावीत अशी इच्छा असेंल तर कोंबड्यांस भरपूर चुना मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे.

पाचवा मुख्य वर्ग म्हणजे द्रव पदार्थ होत. यांत दूध, ताक, पाणी वगैरे पदार्थ येतात. पाण्याची आवश्यकता प्रत्येक प्राण्यास आहे. त्याप्रमाणे ती पक्ष्यासहि आहे. कोंबड्यांना पाणी ठराविक वेळेत पाजून चालत नाही. त्यांनां येतां-जातां वरचेवर थोडेथोडे पाणी पिण्याची सवय असते; म्हणून त्यांच्या आवारांत पाण्याची सोय करून ठेविली पाहिजे. पाण्याचे भांडे व आतील पाणी स्वच्छ ठेवण्याची खबरदारी घ्यावी लागते; कारण कोंबड्यांस बरेचसे रोग घाणेरडे पाणी पाजल्याने होतात. पाण्याच्या भांड्यात कोंबड्यांनी पाय बुडवूं नयेत व त्यास स्वच्छ पाणी प्यावयास मिळावे या करिता पाण्याच्या भांड्यांवर पत्र्याचे झाकण घालून त्यास कोंबड्याची चोच जाईल येवढाली वाटोळी भोके पाडावीत. म्हणजे त्यास त्यातील पाणी सहज पिता येईल. या पाण्यात थोडासा कापूर मिसळल्यास पाण्याच्या स्वच्छतेबद्दल वादच रहाणार नाही.

मलई काढून घेतलेले दूध शहरांत पुष्कळ स्वस्त मिळते. तरी मधून मधून ते कोंबड्यांना घातल्यास फार हितकर होते. तसेच ताक, दही वगैरेसारखे पदार्थ खेडेगावांतील लोकांनां बर्‍याच स्वस्त भावानें मिळतात. ते मधूनमधून कोंबड्यांना घातल्यास त्यांजपासून उत्पन्न चांगले मिळून त्या निरोगी बनतात. ताकाच्या योगानें कोंबड्यांचे मांस फारच रुचकर व नाजूक होतें. तसेच त्यांस अंडी घालण्याची इच्छा जास्त उत्पन्न होते. म्हणून तो पदार्थ संधि सापडल्यास त्यास घालण्याविषयी हयगय करूं नये. येथपर्यंत शास्त्रदृष्ट्या कोंबड्यांना घालावयाचे खाण्याचे किती वर्ग करता येतील व त्यांचे गुणधर्म काय याविषयी सांगितले; परंतु सर्वसाधारण मानाने पाहिले तर कोंबड्यांच्या खाण्याचे मुख्य दोन वर्ग करतां येतील:- एक सुके अन्न व दुसरा ओले (भिजवलेले अन्न), सुके अन्न, धान्य वगैरे देणे झाल्यास ते भाताच्या पेंढ्यांत, गवतात किंवा रेतीत पसरून टाकावे म्हणजे ते खाणें शोधून काढण्यास कोंबड्यांस बरीच मेहनत करावी लागेल व त्याचा परिणाम अर्थातच शरीरावर चांगला होईल. परंतु अन्न ओले असल्यास ते जमिनीवर न टाकता भांड्यांतून घालावे व ही भांडी नेहमी स्वच्छ ठेवावीत. कोंबड्यांना अन्न किती व कोणते घालावयाचे हें बहुतांशी ऋतुमानावर, कोंबड्यांच्या भोवतालच्या परिस्थितीवर व त्याजपासून मिळणार्‍या उत्पन्नावर अवलंबून राहील. जास्त उत्पन्न देणारी जी कोंबडी असतील त्यांस चांगले व भरपूर खणे घालावयाचे व इतर कोंबड्यांस साधारण मानाने घालावयाचे हे लक्षांत ठेविलें पाहिजे. तसेंच कोंबड्यांस चरण्याकरिता भरपूर आवार असेंल तर त्या मानाने खाण्याचें मान कमी करावयाचे व त्यांस अगदी मर्यादित जागेंत ठेवावयाचे असेंल तर खाणे भरपूर घालावयाचे हेही लक्षांत ठेविले पाहिजे. प्रत्येक खेपेस दर कोंबडीस जे खाणे घालावयाचे त्याविषयी सर्वसाधारण नियम म्हणजे `ती जेवढे अन्न उत्सुकतेने व अधाशीपणाने खाईल तेवढेच अन्न दर वेळेस घालावयाचे' हा होय. पुढे टाकलेले अन्न खाण्यात कोंबडीकडून दिरंगाई दिसू लागली की अन्न घालणे बंद करावे. कोंबड्यांना मर्यादित जागेत ठेविले असें धरून चालल्यास त्यांस भरपूर खाणे द्यावे लागेल असें वर सांगितले आहे. हे खाणे दिवसातून तीन वेळ दिले पाहिजे. मात्र हे देताना ते पचविण्यास कोंबड्या काही मेहनत करतात की नाही हे पाहिले पाहिजे. नाहीतर चांगले पौष्टिक अन्न भरपूर मिळून त्या मानाने मेहनत न झाल्यास कोंबड्याच्या शरीरात मेद वाढून त्या अंडी घालण्याच्या कामी अगदी निरुपयोगी ठरतील. सकाळी द्यावयाचे खाणे बर्‍याच अंशाने सात्विक असावे व त्यात पाचहि वर्गातील पदार्थ थोडथोड्या प्रमाणात मिसळलेले असावेत. उदाहरणार्थ गहूं, यव किंवा सातू यांचा भरडा दुधात अगर ताकात भिजवून साधारण ओलसर करावा. त्यांत थोडे मांसाचे शिजलेले तुकडे, कांद्याचे किंवा इतर वनस्पतींचे तुकडे, थोडे मीठ, ताज्या कोळशाची थोडी पूड, हाडाचा चुरा वगैरे जिन्नस घालावेत. हे अन्न फार देऊं नये. कारण ते जास्त दिल्यास आमांश, हगचण वगैरे रोग होण्याचा संभव असतो. मधून मधून हें अन्न बंद करून त्याच्या ऐवजी नुसते भात अगर अशा प्रकारचे एखादे धान्य द्यावे. दुसरे खाणे निवळ धान्याचेंच असावे व वरचेवर निरनिराळे धान्य मिसळून द्यावे. दुकानदाराच्या दुकानात मोजताना सडलेले निरनिराळे मिसळलेले धान्य पुष्कळ स्वस्त दरानें मिळण्याचा संभव आहे. तरी त्याचा उपयोग केला तरी चालेल. हें अन्न सुकेच खावयास घालावे. तिसरे खाणे संध्याकाळी घालावयाचे ते मात्र पुन्हां कसदार असावे. कारण त्या अन्नावर त्यांस सबंध रात्र काढावयाची असते. प्रत्येक कोंबडीस साधारण मानाने एक औंस पासून दोन औंस पर्यंत खावयास घालण्यास मुळींच हरकत नाही.

कोंबड्यांकरिता जागा व घरे- कोंबड्यांचा धंदा मोठ्या प्रमाणांवर करावयाचा असल्यास ज्याप्रमाणे त्यांच्या अन्नासंबंधी काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना ज्या ठिकाणी ठेवावयाचे ती जागा त्यांच्या वाढीस योग्य आहे की नाही हे पाहिले पाहिजे. हिंदुस्थानातील हवामान साधारण मानाने कोंबड्यांच्या वाढीस हितावह आहे. फक्त त्यांना ज्या जागी ठेवावयाचे ती जागा व त्याजवर बांधावयाची घरे ही नीट विचारपूर्वक बांधलेली असली म्हणजे झाले. मुख्यत्वेकरून ज्या जागेत पाण्याचा निचरा चांगला होतो व जी जागा उंचवठ्यावर असते, तसेच ज्या जागेत चुना, कंकर वगैरे फार सापडतो ती जागा घरे बांधावयास चांगली. दलदलीची व चिकणवट जमीन कोंबड्यांच्या वाढीस विघातक आहे. कोंबड्यांच्या घरांस उत्तम जागा पसंत करावयाची असल्यास एखाद्या टेंकडीची दक्षिण अगर आग्नेय बाजू पसंत करावी, कारण कोंबड्यांना उत्तरेकडून व पूर्वेकडून वाहणारा थंड वारा मानवत नाही. कोंबड्या व इतर पाळीव पक्षी हे जात्या फार नाजुक असल्यामुळे त्यांचे थंडी, ऊन, पाऊस वगैरें पासून संरक्षण करणे अवश्य आहे, व याकरिता कोंबड्यांच्या घरास जोडून एखादी पडवी (निवासस्थान) काढवी. या पडवीची पश्चिम बाजू बंद करावी म्हणजे पाऊस, ऊन वगैरेपासून कोंबड्यास बाधा होणारे नाही. तसेच कोंबड्यांच्या घरापुढील चरावयाचे अंगण विस्तृत असल्यास त्यांत लहान झाडे लावावीत म्हणजे त्यांच्या आश्रयास कोंबड्या येऊन बसतील. झुडपे लावणे शक्य नसेल तर कळकाच्या ६।७ फूट लांब व ४।५ फूट रुंद ताट्या करून त्यांस बांबूचे टेकू देऊन त्या ठिकठिकाणी उभ्या कराव्यात म्हणजे त्यांच्या आसर्‍यास कोंबड्या येऊन बसतील. येणेप्रमाणे कोंबड्यांच्या घरांकरितां जागा पसंत करून झाल्यावर त्यावर घर दाक्षिणाभिमुख बांधावे. ज्या मानाने कोंबड्यांची संख्या ठेवावयाची असेल त्या मानाने घरे लहान अगर मोठी बांधावी लागतील. पांच फूट लांब, पाच फूट रुंद व सहा फूट उंच येवढ्या जागेत मोठी पाच कोंबडी चांगल्या रीतीने राहूं शकतात. काही लोक एवढ्या जागेत वीस पर्यंत कोंबडी कोंडून ठेवितात, परंतु त्यायोगानें त्यांच्या प्रकृतीस अपाय होतो आणि अंडी घालण्याचे प्रमाणही कमी होत जाते. तसेंच इतकी कोंबडी एके ठिकाणी ठेवल्यास त्यांच्यांत मारामार्‍या होऊन अशक्त कोंबड्यांत व पिलांस त्याचा परिणाम भोगावा लागतो. असो. कोंबड्यांकरतां घरें बांधावयाची ती ज्या मानाने द्रव्याची सोय असेल त्या मानाने विटांची, फळ्यांची किंवा मातीची बांधावीत. विटांची बांधलेली घरे पुष्कळ काळपर्यंत टिकतात. परंतु प्रथमत: खर्च पुष्कळ करावा लागतो. विटांच्या भिंतींना आतून व बाहेरून सिमेंटाचा गिलावा करावा म्हणजे कोंबड्यांच्या शरीरावरील कृमीस रहाण्यास जागा मिळणार नाही. फळ्यांची घरें कमी खर्चाची असून ती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी ओढून नेण्यास सापडतात. या घरास वरचेवर डांबर, चुना वगैरे लावल्यास ती पुष्कळ वर्षे पर्यंत टिकतात व त्यांत कृमींची उत्पत्ति होत नाही. मातीची घरे फार दिवस टिकत तर नाहीतच, परंतु त्यात उलट उंदीर, घुशी, साप वगैरे प्राण्यांस रहाण्यास जागा मिळते. हे प्राणी लहान पिल्लांनां मारण्यास कमी करीत नाहीत. तसेच अंडी वगैरे घरांत ठेवलेली असल्यास ते ती उचलून नेतात. म्हणून होतां होईतों मातीची घरें बांधूं नयेत. कोंबड्यांना कधीकधी संसर्गजन्य रोग होतात व त्यांस उपाय म्हणजे रोगाने पछाडलेल्या कोंबड्यांस निरोगी कोंबड्यांपासून निराळे ठेवणे हाच होय. म्हणून एक मोठे घर बांधण्याच्या ऐवजी लहान लहान घरें एकमेकांपासून अंतरावर बांधल्यास उत्तम. कारण आजारी कोंबड्यांस एका घरांतून काढून दुसरीकडे नेऊन ठेवण्यास सोपें जाते व अशा रीतीनें संसर्गजन्य रोगाच्या वाढीस पुष्कळ प्रतिबंध होतो.

पक्षिगृहाचे छप्पर कौलारू किंवा फळ्यांचे असावें, पत्र्याचे असूं नये, कारण दोनप्रहरी उन्हाने पत्रे तापून आंत उष्मा फार होतो. पत्र्यांचाच उपयोग करणे झाल्यास निदान त्यांजवर गवत वगैरे घालावे. छप्पर व भिंत यामध्ये रहाणारी फट बंद करावी; नाहीतर तीतून उंदीर, मांजर, सर्व वगैरे प्राण्यांस आंत जाण्यास मार्ग मिळतो. पक्षिगृहांतील हवा खेळती रहावी व त्यांत भरपूर उजेड असावा म्हणून त्यास खिडक्या ठेऊन त्या तारेच्या जाळीने बंद कराव्यात. पक्षिगृहाचा दरवाजा लाकडी चौकटीचा व एक मनुष्यास आंत जातां येईल एवढा मोठा असावा. त्याचें दारहि तारेच्या जाळीचेंच केलेलें असावे. पक्षिगृहांतील जमीन चांगली पक्की असावी व त्याजवर सिमेंट केलेलें असावे. या जमिनीवर नेहमी वाळू किंवा दोन इंच जाडीचा मातीचा थर असावा. यांवर पडलेली शीट दररोज काढून एके ठिकाणी साठवावी. म्हणजे तिचा खतासारखा उपयोग करतां येईल. ही वाळू अगर माती दर १५ दिवसांनी बदलावी. पक्षिगृहांत एकंदर तीन किंवा चार निरनिराळे भाग करावे. एका भागांत फक्त मोठे पक्षीच ठेवण्याची व्यवस्था असावी. या भागात कोंबड्यांना बसण्याकरिता बांबूच्या काठ्या भिंतीत बसविलेल्या असाव्यात. जमिनीवर माती हातरणे व काढणे त्रासाचे वाटत असेंल तर काढतां घालतां येतील असें पत्रे खाली जमिनीवर हातरावे व ते रोज सकाळी बाहेर काढून झाडून, धुवून नंतर पुन्हा आंत ठेवावे. दुसरा भाग अंडी उबवणार्‍या कोंबड्यांकरितां राखून ठेवावा. या भागांत एक फूट लांब व एक फूट रुंद व एक फूट उंच अशी लहान लहान घरटी त्यात पेंढा किंवा माती घालून ठेवलेली असावीत. त्यांत अंडी उबविण्याकरिता मांडावीत. खुडका आलेल्या कोंबड्या आपल्या घरट्यांत जाऊन अंड्यांवर बसून ती उबवितील. या भागास जोडून एक स्वतंत्र आवार असावे व ते सर्व बाजूंनी बंद असावे, म्हणजे त्यांत फक्त खुडका आलेल्या व अंडी घालणार्‍या तेवढ्याच कोंबड्या ठेवता येतील व त्यांस इतर कोंबड्यांपासून विनाकारण त्रास होणार नाही.

तिसरा भाग पिलांकरिता राखून ठेवावा व त्यांत महिन्यापासून दीड महिना वयापर्यंतची कोंबडीची पिल्ले ठेवावींत. पिलांना बांबूचे काठीची जरूर लागत नाही. या भागास जोडून असणारे आवारहि स्वतंत्र असावें. व याची वरची बाजूही जाळ्याने झाकलेली असावी. कारण पिल्लांना कावळे, घारी वगैरेपासून फार भीति असते. याच भागांत धात्रीमंजूषा, शुष्कीकरणमंजूषा वगैरे असाव्यात. प्रत्येक भागातील आवारांत धूलिका स्नानाकरितां सोय केलेली असावी. तसेच पाणी, चुना, गारेचे खडे, जाडी रेती वगैरेंचाहि भरपूर पुरवठा असावा. पक्षिगृह बांधणे झाल्यास ते खाली दिलेल्या प्लॅनवर बांधावे.

खुणांचे स्पष्टीकरण :- * = खिडकी; x= दरवाजा; += अंडी उबविण्याची घरटी; - = अंडी उबविण्याची खोली १०'x १०'

वर दिलेल्या घरांत दहा कोंबड्या चांगल्या रीतीने राहू शकतात. सदर रीतीने घरे बांधणे फारच खर्चाचे आहे. म्हणून यापेक्षा स्वस्तांत घरे पाहिजे असल्यास ती खालील प्रमाणे करावीत. सहा फूट लांब तीन फूट रुंद व चार फूट उंच एवढा एक खोका घ्यावा. त्याच्या तळास व तीन बाजूंस फळ्या असाव्यात व पुढली बाजू व वरची बाजू तारेच्या जाळीने बंद करावी. वरच्या बाजूस तारेच्या जाळीची चौकट करून ती बिजागर्‍यांनी बसवून टाकावी. म्हणजे ते झाकण ट्रंकच्या झाकणासारखे उघडतां येईल. या पेटीच्या पुढील बाजूसहि एक लहानसें दार असावे म्हणजे कोंबड्यांनां त्यांतून आंत बाहेर जातां येईल. या पेटीत सहा इंच उंचीवर एक बांबूची काठी बसविलेली असावी. ही पेटी कोठे तरी सावलीत ठेवावी. असल्या एका पेटीत ५-६ कोंबड्या राहूं शकतात. पेट्या स्वच्छ ठेवण्याची फार खबरदारी घेतली पाहिजे.

पक्षिगृह बांधल्यानंतर ते स्वच्छ ठेवण्याविषयी फार खबरदारी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे पक्षिगृहातील इतर वस्तू, कोंबड्यांची घरटी, पांझरे, वासयष्ठ्या, खाण्याची व पाणी पाजण्याची भांडी वगैरे सामान रोजच्या रोज धुवून स्वच्छ ठेविले पाहिजे म्हणजे कृमींची उत्पत्ति किंवा वाढ फार होणार नाही.

कोंबड्यांचे मुख्य शत्रू म्हणजे उंदीर, साप वगैरे होत. घरे बरोबर रीतीने बंद केलेली नसल्यास ते आंत शिरून अंडी पळवितात व लहान पिलांनां मारून खातात. भिंती वगैरे चांगल्या बांधलेल्या असल्यास ते आपला मार्ग जमिनीतून काढतात. यास आळा घालण्याकरितां पक्षिगृहांतील जमीन खालील पद्धतीने करावी.

जमिनीस व सभोवतालच्या भिंतीस तीन फूट पुरेल एवढे तारेचे जाळे घेऊन ते पक्षिगृहांत पसरावे व त्यावर चार इंच जाडीचा मातीचा किंवा वाळूचा थर द्यावा व सभोवतालच्या भिंतीस सिमेंटचा गिलावा करावा. जाळ्याच्या ऐवजी पत्रे घातले तरी चालतात. जमीन करण्याची दुसरी पद्धत आहे ती अशी:- जमीन एक फूटपर्यंत खोल खणून तीतील माती बाहेर काढून ठेवावी. नंतर सहा इंच जाडीचा वाळू व कोळसे यांचा थर करावा व पुष्कळ पाणी घालून तो ठोकून काढावा. नंतर त्यावर बारीक मुरूम पसरून त्यांत डांबर ओतावे व ती जमीन कठिण व गुळगुळीत होईपर्यंत ठोकावी. म्हणजे तींत उंदरांना बिळे करतां येणार नाहीत.

येणेंप्रमाणे घरे बांधून झाल्यावर कोंबड्यांची अंडी उबविण्यास लागणारी साधने, त्यांना खाणे व पाणी यासाठी लागणारी भांडी, तसेच त्यांचे खाणे साठवून ठेवण्याचे कांही तरी साधन वगैरे गोष्टींची तजवीज करावयास पाहिजे. अंडी उबविण्याचे काम यंत्राच्या सहाय्याने करावयाचे असेंल तर त्याकरिता स्वतंत्र खोली असावी. या खोलीत हवा, उजेड वगैरे विपुल असावा. तसेंच उष्णतामान मापक यंत्र व हवेंतील सर्दपणा मापण्याचे यंत्र ही या खोलींत असावीत. खाणे घालण्याची भांडी नेहमी रुंद तोंडाची व लाकडी असावीत व त्यांस आंतून पत्रा मारलेला असावा. त्यांजवर झाकणाची सोय असावी. कोंबड्यांनां खाणे घालण्याची खोली स्वतंत्र असून खोलीत जे खाणें घालावयाचे तें सुकें असल्यास चोहोंकडे फेंकावे व ओले असल्यास  भांड्यांत घालावे. पाण्याच्या बादल्या, फावडी, टिकाव वगैरे साधने नेहमी तयार असावी. भाज्या वगैरे पदार्थ शिजवून घालावे लागतात तरी त्यांचीही व्यवस्था असावी.

पुंस्त्वहरण- कोंबड्यांचे जननेंद्रिय काढून घेणे यास `पुंस्त्वहरण' असें म्हणतात. जनावरांमध्ये याचा प्रघात बराच आहे आणि त्याजपासून फायदा होत असल्यामुळे आजकाल सर्व शेतकरी लोक बैलांच्या बाबतीत त्यांचा फार उपयोग करीत आहेत. पक्ष्यांच्या  बाबतीत सु्द्धा पूंस्त्वहरणक्रिया साध्य होते. ही गोष्ट कदाचित काहींना चमत्कारिक वाटेल, परंतु पाश्चात्य देशामध्ये याचा अनुभव पुष्कळांनी घेतलेला आहे व त्याजपासून द्रव्यदृष्टीने इतर बाबतीतही बराच फायदा होतो असाहि अनुभव आहे. असो. पुंस्त्वहरण केल्याने कोंबडे लठ्ठ होतात, त्याचे वजन वाढते आणि त्याचे मांस रसदार व अधिक नाजूक बनते. अर्थात त्यांची किंमत अधिक येते. जे कोंबडे पाचसहा महिन्यांचे झालेले असतील व ज्यांना विकून टाकावयाचा आपला बेत असेंल अशाच कोंबड्यांवर ही क्रिया करावी. ही क्रिया करण्यास योग्य काळ म्हणजे हिवाळा होय. ही क्रिया करण्यापूर्वी तीस लागणारी हत्यारे, पाणी वगैरे जिन्नस जवळ घेऊन बसावे व नंतर क्रियेस आरंभ करावा. ही क्रिया करावयास जे शस्त्र घ्यावयाचे ते तीक्ष्ण असावे. डॉक्टर लोकांचा एक वाकड्या पातीचा चाकू असतो तो या कामी फार चांगला. याखेरीज एक बळकट टांके घालण्याची सुई व मेण लावलेला दोरा किंवा बकर्‍याची तात या वस्तू सन्निध ठेवाव्यात. शस्त्रप्रयोग करतांना दोन मनुष्यांची जरूर लागते. शस्त्रक्रिया करणारा मनुष्य एका खुर्चीवर बसतो व कोंबड्याला आपल्या मांडीवर त्याच्या (कोंबड्याच्या) उजव्या बाजूवर निजवितो. असें केल्याने कोंबड्याची पाठ शस्त्रक्रिया करणार्‍या मनुष्याकडे वळते व कोंबड्याची डावी बाजू वरच्या बाजूस येते. (कोंबड्यास मांडीवर घेण्याच्या ऐवजी एखाद्या टेबलावर निजवावे. या टेबलाच्या फळीस लहान भोके पाडलेली असावीत. कोंबड्यास निजविल्यावर त्याचे पंख एका बाजूस करून त्यावरून दोरी बांधावी व ती पंखाजवळ असलेल्या भोकांतून ओवून तीस खाली वजन असावे. अशीच एक दोरी पायावरून व मांड्यांवरून घेऊन तेथें असलेल्या भोकांतून ओवून घ्यावी म्हणझे कोंबडा जागच्या जागी बांधला जाऊन दुसर्‍या मनुष्याची जरूर लागणार नाही.) नंतर दुसरा मनुष्य कोंबड्याची उजवी तंगडी व मांडी त्याच्या छातीवर ओढून दुसरी तंगडी शेपटीकडील बाजूस ओढून धरतो. कोंबड्याचें `वृषण' त्याच्या आतड्याखाली पाठीच्या कण्याजवळ असते व तें त्यास चिकटलेले असते हें काढून घेण्याकरिता शेवटच्या `बरगडी' जवळ तिला समांतर अशी एक चीर पाडावी लागते. ही चीर पाडण्यापूर्वी डाव्या कुशीवरील सर्व पिसे काढून टाकावीत. नंतर शेवटच्या बरगडीच्या पाठीमागे सुई टोचून तिच्या योगें तेथील कातडे वर उचलावे व शेवटच्या बरगडीस लागून चाकूने चिरावे. कातडें वर उचलल्यानें आंतील आंत्रांना धक्का लागत नाही. ही जखम आत बोट शिरकेल एवढी मोठी असावी. जखम रुंद रहावी व आतील भाग स्पष्ट दिसावे म्हणून स्प्रिंग असलेले चिमट्यासारखे एक हत्यार वापरावे. या जखमेतून आंत्राचा एखादा भाग वर आल्यास तो काळजीपूर्वक आत जागच्या जागी बसवावा. नंतर या जखमेत करांगुली किंवा करांगुलीच्या ऐवजी कित्येक वेळां एक प्रकारचा पुढे चीर असलेला चमचा वापरण्यात येतो. हा चमचा आत वृषणाच्या खाली घालावयाचा व वृषणास जोडून असलेली रक्तवाहिनी चमच्याच्या भेगेत येईल अशी खटपट करावयाची आणि नंतर चमचा एका बाजूस फिरवून आंत पीळ पाडून वृषण तोडावयाचे. करांगुलीने वृषण काढण्यापेक्षा ही पद्धत चांगली. कारण यात वृषण निसटून जाण्याची भीती नसते. वृषणाची योग्य जागा सापडल्यास ते बोटाला लागते व ते चार महिन्यांच्या वयाच्या कोंबड्याचे साधारणपणे घेवड्याच्या मोठ्या बियाएवढे असते. ते इकडेतिकडे हालण्यासारखे असतें व बोटाने धरावयास गेल्यास निसटून जाण्याचा संभव असतो. हे वृषण करांगुलीला लागले म्हणजे हलकेच ओंढावें व कण्यापासून वेगळे करावे. वृषण बाहेर काढतांना तें हातांतून निसटून आंत्रांत न जाईल अशी खबरदारी घेतली पाहिजे. वृषण शरीरांत राहिल्यास फारसा अपाय होत नाही. परंतु ते काढून टाकलेले चांगले. कारण त्यापासून शरीर सुजण्याचा संभव असतो. येणेप्रमाणे डावीकडील वृषण काढल्यावर त्याच पद्धतीने उजवीकडील वृषण काढावे. दोन्ही बाजूंची वृषणे काढून झाल्यावर जखमेचे तोंड सारखे जोडून त्यास ठिकठिकाणी टाके मारावेत. प्रत्येक टांका निरनिराळा मारण्याविषयी खबरदारी घेतली पाहिजे. तसेच ते मारतांना आतील आंत्रांना धक्का न लागेल अशी काळजी घेतली पाहिजे. शस्त्रक्रिया पुरी झाल्यावर कोंबड्यास स्वतंत्र व शांत अशा ठिकाणी तारेच्या पिंजर्‍यात ठेवावे व त्यास पाणी व मऊसर अन्न खावयास घालावे. भाकरी दुधात भिजवून घातली असतां चांगली. काही थोडे तास लोटल्यानंतर त्याची त्यास पूर्ण मुभा द्यावी; मात्र त्यास इतर कोंबड्यांत मिसळू देऊ नये आणि त्यास रात्री एखाद्या टोपलीखाली अगर पांझर्‍याखाली झाकून ठेवावा. अशा रीतीने चार-पाच दिवस गेल्यानंतर त्यास लठ्ठ करण्याकरिता पीवरीकरणमंजूषेत (फॅटिंग बॉक्स) ठेवावे. ही मंजूषा खालीलप्रमाणे करावी. सहा फूट लांब, सवा फूट रुंद व दोन फूट उंच एवढा एक खोका घेऊन त्यांत सारखे चार कप्पे पाडावेत. त्यांच्या तिन्ही बाजूस फळ्या असून चवथ्या बाजूस तारेची जाळी किंवा लोखंडी सळ्या माराव्या. पेटीच्या बुडाशी फळ्या न बसविता लोखंडी गज बसवावेत व त्याच्याखाली एक खण काढतां घालतां येण्याजोगा कोंबड्याची शीट गोळा करण्याकरिता असावा. प्रत्येक कप्प्यात एक कोंबडा ठेवावा. ही पेटी एका अंधार्‍या खोलीत ठेवावी किंवा उजेडात ठेवल्यास तीवर झांकण घालावे. या पेट्या नेहमी स्वच्छ ठेवण्याची खबरदारी ठेवली पाहिजे. या कोंबड्यांना जे खाणे घालावयाचे ते अंगात चरबी उत्पन्न करणारे असलें पाहिजे. मका, सातूचे पीठ, शिजलेला भात, तांदुळाचा अगर गव्हाचा कोंडा, बटाटे, ताक व इतर ताज्या व कोवळ्या वनस्पती यांच्या अंगी वरील गुण असल्यामुळे वरील पदार्थ आलटून पालटून खावयास घालावेत. तांदुळाचा अगर गव्हाचा कोंडा पाण्यांत कालवून त्यांत भिजलेले बटाटे घालून द्यावा. कधी कधी कोंड्यामध्ये सातूचे किंवा मक्याचे पीठ मिसळून ते पाण्यांत चांगले शिजवितात व थंड झाल्यावर कोंबड्यांस खाऊ घालतात. सदर खाणे खाऊ घालण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ती अशी :- एका वाटोळ्या उंच किंवा फनेलच्या आकाराच्या भांड्यात सातूचे व इतर कांही पदार्थांची पिठ घालून ती दुधांत कालवून पातळ करून नंतर त्यांत थोडी चरबी घालतात. सदर दूध किंचित आंबलेले असावे. हे मिश्रण चांगले ढवळून तयार करतात. या भांड्यास एक तोटी लावलेली असते व तीस एक रबराची नळी एक फूट लांब लावून तिच्या तोंडास पितळेची नळी बसविलेली असते. कपडे शिवण्याच्या यंत्रांत जशी पायाने यंत्र फिरविण्याची योजना केलेली असते. तशी योजना यातहि केलेली असते. पाय दाबूं लागले म्हणजे भांड्यास जोडलेल्या पंपाच्या सहाय्याने भांड्यांतील अन्न नळीत उतरते. कोंबड्याचे डोके डाव्या हातानें धरून उजव्या हाताने रबराच्या नळीस लावलेली पितळेची नळी त्याच्या गांज्यात (क्रॉप) तोंडातून घालतात व यंत्र फिरविण्यास आरंभ करतात. अर्थातच भांड्यांतील पातळ अन्न एकदम नळीच्या वाटे गांजांत जाते. गांजा भरला म्हणजे त्या कोंबड्यांना पुन्हा त्याच्या जागी ठेवतात. याप्रमाणे प्रत्येक कोंबड्यास खाणें ते घालतात.

कोंबड्यास दिवसातून चार वेळ खाणे घालावे. लठ्ठ होण्याकरिता ठेवलेल्या कोंबड्यांना पाणी फार लागते. म्हणून त्याचा पुरवठा नेहमी केला पाहिजे. कोंबड्यांना व्यविस्थत रीतीने खाणे घातल्यास त्यांचे वजन दर आठवड्यास एक-दोन पौंड तरी वाढले पाहिजे. दोन-तीन आठवडे कोंबड्यांस पीवरीकरणमंजूषेत ठेवले म्हणजे ते विक्रीस तयार होतात.

सर्वच कोंबडे पीवरीकरणमंजूषेत लठ्ठ होतात असें नाही; तर काहींची उलट स्थिति होते. म्हणजे ते लठ्ठ न होतां कृश होत जातात. म्हणून कोंबड्यांचे वरचेवर वजन घेतले पाहिजे. ही पीवरीकरणाची पद्धत पुंस्त्वहरण केलेले व तरुण कोंबडे यांनां जितकी लवकर लागू पडते तितकी ती म्हातार्‍या किंवा अशक्त कोंबड्यांना लागू पडत नाही म्हणून ही ज्यास मानवेल असेंच कोंबडे पसंत केले पाहिजेत.

वृषण काढलेले कोंबडे अगदी गरीब व मंद होतात. त्यांस भांडण वगैरे आवडत नाही. त्यांची शिंगोरी (शेंडी) व गलुल (कल्ले) ही कमी कमी होत जातात व त्यांचा लाल रंगही नाहिसा होतो. यांचे मांस फार नाजुक बनते व चांगले लठ्ठ होतात. अर्थात त्यांस किमतही जास्त येते. ते चांगले तयार झाले म्हणजे त्यांचा पिसारा फार चकचकीत व सुंदर दिसतो. कधी कधी हे कोंबडे इतके माणसाळतात की त्यांचा पिल्ले संभाळण्याकडे उपयोग करून घेतांत येतो. यांचा मुख्य उद्योग सपाटून खाणे व शक्य तितकें वाढणे हा असतो. खालील जातींच्या पिलांनां वृषण काढणे विशेष मानवतें.

१) ससेवस; २) वफ ऑरपिंग्टन; ३) प्लायमौथ रॉक; ४) लाइट ब्रह्मी.

जातीची निवड व सुधारणा- कोंबड्या व इतर पाळीव पक्षी बाळगणारे लोक धंदा सुरू करण्यापूर्वी काही तरी विशिष्ट हेतूने हे पक्षी बाळगीत असतात. उदाहरणार्थ काही लोक धंदा या दृष्टीने कोंबड्या वगैरे न बाळगता त्यांच्या दिखाऊपणामुळे व नाजुकपणामुळे त्या बाळगितात. अर्थात मग ते या प्रकारच्या कोंबड्यांपासून फायदा होतो की नुकसान होते इकडे मुळीच लक्ष देत नाहीत. दुसरा एक वर्ग असा निघेल की त्या लोकांचा हेतू दुहेरी असू शकेल म्हणजे ते साधल्यास दिखाऊ कोंबड्याहि बाळगतील व उत्पन्नहि घेतील. तिसरा असा एक वर्ग आहे की त्यांतील लोक निव्वळ फायद्याच्याच दृष्टीने कोंबड्या बाळगतात. त्यांत सुद्धा जे लोक फक्त अंड्यांचाच धंदा करणारे असतील ते अंडी घालणार्‍या कोंबड्यांचाच तेवढ्या बाळगतील व जे कोंबड्या तयार करून विकणारे लोक असतील ते लठ्ठ होणार्‍या कोंबड्यांच्या जाती बाळगतील. तात्पर्य ज्या हेतूने कोंबड्या पाळावयाच्या असतील त्यास योग्य अशा जातींचीच निवड होणे अवश्य आहे.

कोंबड्यांच्या एकंदर जाती किती, त्यातील हिंदुस्थानात बाळगण्यास लायक किती आहेत वगैरे गोष्टींचा विचार करण्यापूर्वी वर सांगितलेल्या निरनिराळ्या हेतूंस योग्य अशा कोणकोणत्या जाती आहेत, त्यासंबंधी प्रथम विचार करू.

दिसण्यांत सुंदर व नाजूक जाती:- (१) स्पॅनिश कोंबड) २) पोलिश जातीची कोंबडी (३) ब्यांटम्स (४) डार्किंग (५) हौडन. या जाती दिसण्यांत जरी फार सुंदर असतात तरी त्यांच्या नाजुकपणामुळे त्यांचे संगोपन करणे हिंदुस्थानांत फार कठीण जाते. पहिल्या दोन दोन जातींच्या कोंबड्यांची अंडी अगदी कमी प्रतीची व पांढर्‍या कवचीची असतात. ब्यांटम कोंबड्यांची अंडी जरी लहान असतात तरी ती फार स्वादिष्ट असतात. ब्यांटम कोंबड्या जात्या फार गरीब असल्यामुळे अंडी उबविण्यास फार योग्य असतात. हौडन जातीच्या कोंबड्या हिंदुस्थानांत विशेषेंकरून जेथें कोरडी हवा आहे अशा ठिकाणी वाढू शकतात. यांना खुडका लौकर येत नाही. म्हणून यांची अंडी दुसर्‍या कोंबड्याखाली उबवावी लागतात.

(२) हौसची हौस व घरची गरज भागेल एवढे उत्पन्न मिळावे अशी इच्छा असल्यास खालील जातींपैकी कोणत्याहि पंसत कराव्यात. ( (१) ब्रह्मी (बर्मा), (२) कोचीन, (३) लँगशन, (४) ऑरपिंग्टन, (५) प्लष्यमौथरॉत, (६) वायंडाट, (७) सिल्कीज नंबर एक, दोन, तीन व पांच या जाती स्थूलदेही असल्यामुळे जरी शांत व गरीब स्वभावाच्या असल्या व अंडी उबविण्यास योग्य असल्या तरी त्यांचा अवजडपणाच या कामी आड येतो. कारण त्यांच्या वजनानेच पुष्कळ वेळा अंडी फुटतात. नंबर सहा व सात या तितक्या अवजड नसल्यामुळें व त्यांचा स्वभाव शांत असल्याकारणानें व त्यांस खुडका धरतो म्हणून त्यांची अंडी उबविण्याचे कामी फाय उपयोग होतो. नंबर चारच्या कोंबड्या खुडका मुळीच धरीत नाहीत. यामुळें त्यांची अंडी दुसर्‍या कोंबड्यांखाली उबविणे भाग पडते.

(३) विक्रीकरिता कोंबडी तयार करावयाची अशा हेतूने जेव्हा कोंबडी बाळगावयाची असतील तेव्हा खालील जातींपैकी निवड करावी. (१) चितागाँग (२) लँगशन (३) आरींपग्टन (४) प्लायमौथरॉक (५) ब्रह्मी व (६) बायंडाट. यांच्या पिलांना पॉवरीकरण मंजूषेत घालून स्राणे घातले असतां ती ताबडतोब तयार होतात. चितागाँग जात फार रागीट असते व रागाच्या भरांत आपले पोर जवळ असले तरी मारण्यास मागे पुढे पहात नाही. वरील जातींतील कोणत्याहि कोंबड्यांचे तो दोन महिन्यांचा असताना पुंस्त्व हरण केल्यास तो लौकर तयार होतो.

(४) अंडी पुष्कळ घालणार्‍या व विक्रीत पुष्कळ किंमत येईल अशा कोंबड्या बाळगावयाच्या असतील तर खालील जातींपैकी पसंत कराव्या. (१) आपिंग्टन. (२) लँगशन, (३) बायंडाट (४) प्लायमौथ (५) ब्रह्मा (६) चितागाँग. यांपैकी काही जाती अंगाने फार स्थूल असतात व कांही अगदी लहान असतात. या जातींतील कोंबड्या अंडी घालण्याच्या कामी चांगल्या असें जरी सर्वसाधारण मानाने ठरले आहे तरीसुद्धा त्यामध्ये कधी कधी अपवाद दिसून येतात. तसेच ज्या जातींची अंडी घालण्याबद्दल मुळीच प्रसिद्धी नाही त्या जातींतील कोंबड्या अंडी पुष्कळ घालतात असें आढळून येते. परंतु साधारण मानाने विचार केल्यास असें दिसून येईल की अस्सल व शुद्ध जातीच्या कोंबड्या सहसा आपल्या जातीच्या ठरलेल्या गुणावगुणांस अपवाद होत नाहीत, असो. वर जे एकंदर निरनिराळे वर्ग सांगितले आहेत त्या सर्वांचा एकसमयावच्छेदे विचार केला तर काही जाती अशा आहेत की, त्या वरील सर्व वर्गांत येतात असें दिसून येईल. उदाहरणार्थ : लँगशन, आरपिंग्टन, ब्रह्मा, चितागांग, प्लायमौथ रॉक, वायंडाट वगैरे जाती थोड्याथोड्या प्रमाणात सर्व हेतू साध्य करतात व म्हणून कोणाहि साधारण मनुष्यास निवड करणे झाल्यास त्याने वरील पैकी कोणतीही एखादी निवडावी.

हिंदुस्थानांतील काही जाती- हिंदुस्थानात ज्या जातींचा प्रसार विशेषेकरून झालेला आहे, त्यापैकी लँगहॉर्न व हँबर्ग यांच्या एवढ्या आहेत. आरपिंग्टन ही जात अंडी घालण्याच्या कामी चांगली असल्यामुळे ती पुष्कळ पारशी व यूरेजिअन लोक घरच्या उपयोगा करिता म्हणून बाळगतात. तसेच काही शोकी लोक लढवय्ये कोंबडे हौसेने बाळगतात. चितागांग व गेम ह्या त्या जाती होत. बंगालमध्ये कोंबड्यांची जी एक विशिष्ट जात दृष्टीस पडते ती आकाराने  वायंडाट व प्लायमौथरॉक यांसारखी असते. परंतु ती जराशी लहान असते व निरनिराळ्या रंगांचा असते. या कोंबड्या व चितागाँग कोंबड्या यांचा संयोग केला असता होणारी प्रजा फार चांगली, मोठी व नाजूक अशी निपजते.

हिंदुस्थानच्या पश्चिम भागांत म्हणजे कोकण, मुंबई वगैरेंकडे साधारणपणे पावसाचे मान जास्त असल्यामुळे सर्व जातींची पैदास होणे शक्य नाही. अर्थातच बंगालच्या हवामानास टिकणारी जात कदाचित मुंबई व कोकणांत टिकण्याचाही संभव आहे. परंतु हल्ली प्रचारांत अशी जी एकच जात दृष्टीस पडते ती बसरा ही होय. या जातींच्या कोंबड्या अंडी पुष्कळ घालतात; ती आकाराने मोठी असून त्यांचा रंग तांबूस काळसर असतो व वजन सुमारे चार ते सहा तोळेपर्यंत असते. कोणतीहि अंडी चार तोळ्यांपेक्षा वजनांत कमी भरत असतील तर ती चांगली नाहीत असें समजावे. बसरा जातीच्या कोंबड्या अंगाने स्थूल असल्यामुळे त्यांना विशेष प्रकारचे खाणे दिल्यास ती लठ्ठ होतात व त्यास किंमतहि बरी येते.

कोंबड्यांच्या साधारणपणे बर्‍याच जाती असताना हिंदुस्थानातील लोक त्यापैकी निदान काही जाता तरी पूर्ण काळजी घेऊन वाढवीत नाहीत; याचे कारण एक तर असें की, उच्च व अस्सल जाती घेणे सर्वसाधारण लोकांच्या आटोक्याबाहेरचे असते व दुसरे कारण म्हणजे चांगली व सशास्त्र पद्धतीने कोंबड्यांची पैदास कशी करावी याबद्दल कोंबड्या पाळणार्‍या लोकांचे अज्ञान हे होय. स्वाभाविकपणे हलक्या किमतीची कोंबडी विकत घेण्याकडे त्यांची प्रवृति दिसून येते आणि कोणीकडून तरी थोडीशी अंडी व पिले विकावयास मिळाली म्हणजे तेवढ्यांत समाधान मानतात. परंतु त्यांनी जर खाली सांगितल्याप्रमाणे थोडेसे श्रम घेतले तर त्यांस अस्सल जात सहज तयार करता येईल व त्या मानाने त्यांस अर्थातच किंमत जास्त मिळेल. ती पद्धत अशी :- उत्तम जातीचा व अस्सल बीजाचा कोंबडा व त्याच जातीच्या काही कोंबड्या व इतर जातीच्या फक्त कोंबड्याच बाळगाव्यात. अस्सल जातीपासून मिळणारी अंडी अर्थातच अस्सल असणार. त्यांजपासून पाहिजे तर जास्त उत्पत्ति करावी. इतर कोंबड्यांपासून निघणारी अंडी विकून टाकावीत, अगर पिलांकरिता उबविण्यास ठेवावीत. मात्र पिले साधारण मोठी झाली म्हणजे लगेच विकून टाकावीत. कारण त्या पिलांपैकी एखादा कोंबडा असल्यास तो वाढूं दिल्यास कदाचित भेसळ होण्याचा संभव आहे. असें केल्याने उत्तम जात कायम राखली जाईल.

आपण जर खेडोखेडी हिंडून अस्सल जातीच्या कोंबड्या कोणाजवळ आहेत की काय याचा तपास करूं लागलो तर आपली अगदी निराशा होते व जिकडे तिकडे गांवठी लहान व खुज्या कोंबड्या दृष्टीस पडतात. जास्त वजनाच्या कोंबडीस जास्त किंमत येते, तसेच मोठ्या अंड्यास जास्त किंमत येते, या गोष्टी शेतकरी लोकांस माहीत असतांहि अंडी किंवा कोंबड्या कशा सुधारतां येतील या गोष्टीकडे त्यांचे मुळीच लक्ष जात नाही. तरी खालील पद्धत अंमलांत आणल्यास कोंबड्यांची अवलाद सुधारून शेतकरी लोकांचाहि फायदा होईल: गावठी कोंबड्यांचा चितागांग, लँगशन, आरपिंग्टन, बायंडाट किंवा ब्रह्मी या कोंबड्यांशी संयोग केल्यास होणार्‍या प्रजेत पुष्कळ सुधारणा होते. या गावठी कोंबड्यांपैकी दहा-बारा उत्तम कोंबड्या निवडून त्यांच्या कळपांत वर निर्दिष्ट केलेल्या जातींपैकी कोणत्याहि जातीचे दोन कोंबडे सोडावेत. या कोंबड्यांपासून जी प्रजा होईल त्या प्रजेपैकी कोंबडे तेवढे विकून टाकावेत. त्याचप्रमाणे बाकीची पिले मोठी झाली म्हणजे पहिल्या कोंबड्याहि विकून टाकाव्यात. म्हणजे नवीन झालेली पिले व कोंबडे शिल्लक रहातील. ही पिल्ले पुढे वयांत आल्यावर त्यांचा पुन्हा त्या कोंबड्यांशी संयोग होईल व त्यांच्या अंड्यांपासून होणार्‍या पिलांमध्ये बापाचे बरेच गुण उतरतील. अशा रीतीने वरचेवर संयोग करून कोंबड्यांचे पूर्ण गुण कोंबडीत येईपर्यंत ही क्रिया चालू ठेवावी. म्हणजे अखेरीस सर्व प्रजा अस्सल जातीच्या वळणावर जाईल. कोंबड्यांचे संयोग दाखविणारे कोष्टक पुढे दिले आहे:-

संयोग नंबर १:-

याप्रमाणे संयोग केल्यावर निघणारी प्रजा मोठी व वजनाने भारी व अंडी घालण्यांत उत्तम निघेल हे सांगणे नको. इतर पाळीव पक्ष्यांच्या धंद्याचे महत्त्व इतर राष्ट्रांतील लोकांना नुकते काही वर्षांपासून कळूं लागले आहे. इंग्लंड, फ्रान्स, स्कॉटलंड, आयर्लंड, कानडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, बेल्जम, डेन्मार्क, स्वीडन, साऊथ आफ्रिका वगैरे राष्ट्रांमध्ये हा धंदा मोठ्या प्रमाणांत करण्यांत येऊन तिकडे यासंबंधी दर वर्षी प्रदर्शनेही भरतात. या प्रदर्शनात उत्तम व अस्सल जातीच्या कोंबड्यांना तसेच उत्तम अंड्यांना पदक वगैरे काही तरी बक्षीस मिळते. अशा तर्‍हेची प्रदर्शने तिकडे वारंवार भरत असल्यामुळे कित्येक हौशी व श्रीमंत लोक पुष्कळ द्रव्य खर्च करून अस्सल जातीचे संगोपन करतात. इंग्लंडमध्ये सर्व श्रीमंत लोक, तसेच लॉर्ड लोक यांनी सुंदर व दिखाऊ जाती बाळगिल्या आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष राजे साहेबांनीही कोंबडी बाळगली आहेत. यावरून तिकडे लोकांना या धंद्याची किती गोडी लागली आहे ते सहज कळून येते.

यूरोपखंडातील बहुतेक लोक मांसाहारी असल्यामुळे या धंद्यास जास्त जोर आलेला असावा व मालाचा नेहमी खप होत असल्याने जितका माल अधिक उत्तम तितकी त्यास मागणी अधिक आणि अर्थातच किंमत अधिक. ही गोष्ट लक्षांत आल्यामुळे लोकांचे मन या धंद्याकडे वळणे साहजीकच आहे. एकट्या ग्रेट ब्रिटनमध्ये दरसाल १५ कोटी रुपयांचा सदर माल खपतो. फ्रान्समधील एका प्रधानानें या धंद्यापासून देशांत एकंदर किती पैसा उत्पन्न होतो याचा अंदाज केला तेव्हा तो १,३४,९६,००० पौंडपर्यंत झाला असें आढळून आले. यावरून हे धंदे तिकडे मोठ्या प्रमाणावर चालतात असें दिसून येते.

हिंदुस्थानांतील लोकांत या धंद्याचा प्रसार हळू हळू होऊं लागला आहे. तो विशेषेकरून आंग्लोइंडियन व रेल्वेकामगार यामध्ये दिसून येतो. शेतकरीवर्ग म्हणजे ज्याच्या ताब्यांत हा धंदा सदोदीत राहिला पाहिजे, त्या वर्गांत या धंद्याचा प्रसार मुळीच झालेला नाही, असें मोठ्या कष्टाने म्हणावे लागते. याची मुख्य कारणे म्हटली म्हणजे :- (१) अस्सल जातींचा अभाव; (२) भांडवलाचा अभाव व (३) पैदास कशी करावी याविषयी अज्ञान.

हिंदुस्थानांत अस्सल जाती फक्त तीन किंवा चार सापडतील. (१) चितागांग (२) असील (३) पसरा व (४) गेम. याखेरीज पुष्कळ निरनिराळ्या रंगांच्या व आकारांच्या गावठी कोंबड्या आढळून येतात व त्यास सर्वसाधारण `मुरगी’ हे नांव आहे. या जातीही निकटसंबंधोत्पत्ती (इन्ब्रीडिंग मुळे पुष्कळ र्‍हास पावल्या आहेत. याखेरीज दुसर्‍या जाती आणावयाच्या म्हणजे परदेशांतून आणल्याखेरीज गत्यंतर नसते व परदेशांतून कोंबडी आणण्यापासून कोंबडी बाळगणारांना विशेषसा फायदा होत नाही, एवढेच नव्हे तर कधी कधी नुकसान होते. कारण परदेशांतून कोंबड्या आणवल्या असता प्रवासातच त्यांतील कित्येक मरतात व ज्या थोड्याशा जगून इकडे येतात त्यांस येथील हवामान मानवल्यामुळे कांही दिवसांनी त्यांचाहि अंत होतो. किंमत जास्त यामुळे परदेशांतून कोंबड्या आणण्याचे धाडस कोणी सहसा करीत नाही. बरे इतक्या दूर ठिकाणाहून अंडी आणावयाची म्हटले तरी तेहि तितके सुकर नाही, कारण एक तर इतक्या लाबूंन आणलेल्या अंड्यांतील गर्भास बराच त्रास पोचून त्यामुळे तो तयार होत नाही व बहुतेक अंडी फुकट जातात. अशा स्थितीत हा धंदा ऊर्जितावस्थेस कसा आणावा हा एक प्रश्न आहे. परंतु स्वत: सरकारने अगर आमचेकडील मोठमोठ्या व श्रीमंत लोकांनी मनावर घेतल्यास हा प्रश्न सुटण्योगा आहे. सरकार शेतकीखाते काढून निरनिराळ्या पिकांसंबंधी प्रयोग करून ज्याप्रमाणे लोकांवर उपकार करीत आहे, त्याचप्रमाणे शेतकीखात्यातर्फेच ठिकठिकाणी कोंबड्यांच्या पैदासेच्या शाखा ठेवून त्या ठिकाणी निरनिराळ्या जातींच्या कोंबड्यांचा संयोग करून उत्तम व हिंदुस्थानांतील हवेस योग्य अशी अवलाद तयार करणे, ती स्वस्त दराने विकून तिचा प्रसार होतां होईतो चहूकडे करणे, खेडेगावांतील कोंबडी सुधारण्याकडे लोकांचे लक्ष लावणे, सहकारी तत्त्वावर कोंबड्यांचा धंदा काढून त्याच तत्त्वांवर त्यांचा क्रयक्रिय करणे वगैरे गोष्टीस लागणारे भांडवल सरकार जितके खर्च करूं शकेल तितके इतर लोकांच्या हातून होणे शक्य नाही. कांही तरी नियम करून खेडेगांवांतील लोकांस गावठी कोंबडे बाळगण्याची मनाई केली व त्याऐवजी ८।१० महिन्यांचे चितागांग, ऑरपिंग्टन किंवा लँगशन जातीचे कोंबडे आणून सरकार मालक या नात्याने त्या कोंबड्यांची जबाबदारी गावकर्‍यांवर घातल्यास कोंबडी सुधारण्यास फारसे दिवस लागणार नाहीत. एकदां अस्सल जात तयार झाल्यावर त्यापासून होणारी प्रजा मोठी, बळकट व अंडी घालण्याच्या कामी उत्तम होईल आणि पूर्वीच्या गावठी कोंबड्यांपेक्षा किंमतही दुप्पट येईल. तात्पर्य, खर्च फार न येता थोडासा वेळ खर्च करून चिकाटी दाखविल्यास हे काम सहज होण्याजोगे आहे. चितागांग जातीचे ५० लहान लहान कोंबडे विकत घेतल्यास त्यांना १५० रुपयांहून अधिक किंमत पडणार नाही व खेडेगावाचे मानाने हा खर्चही काही फार होणार नाही. सरकारने आपण भांडवल पुरवून सदर कोंबडे आणून दिल्यास व पुढे आपल्यातर्फे एक माणूस ठेवून त्याजकडून गावांतील सर्व गांवठी कोंबडे व मिश्र कोंबडे नाहीसे करण्याचे ठरविल्यास त्या गांवांत या धंद्याच्या बाबतीत मोठी क्रांती घडून येईल. तात्पर्य, भांडवल व ज्ञानाच्या अभावी दिसणारी उणीव सरकारने भरून काढली म्हणजे या धंद्याचा प्रसार होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. पुष्कळ वेळा असें आढळून येते की, अस्सल व कमअस्सल जात यांच्या संयोगांपासून होणारी प्रजा कणखर, जोमदार व काटक निघते. उदाहरणार्थ घोडा व गाढवी यांच्या संयोगापासून खेचर तयार होते.६ यांत गाढवाच्या काटकपणाचे गुण येऊन घोड्याच्या शरीरासारखा बांधा होतो. त्यामुळे याचा घोड्यासारखा बसण्यास व गाढवासारखा ओझे वहाण्यास असा दोन्ही कामांकडे उपयोग होतो. अशाच प्रकारचे कोंबड्यांच्या काही जातींचे संयोग केल्यास त्यांजपासून निघणारी प्रजा जास्त देखणी, काटक व पुष्कळ अंडी देणारी अशी निघते. परंतु हे संयोग करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत:-

(१) दोन जातींचे मिश्रण करावयाचे असल्यास होता होईतो कोंबडा व कोंबडी एकाच रंगाची, निदान जवळजवळ त्याच रंगाची असावीत. (२) लांब पायांच्या कोंबड्यांचा आखूड पायांच्या कोंबडीबरोबर व आखूड पायांच्या कोंबड्यांचा लांब पायांच्या कोंबडीबरोबर संयोग करावा. (३) संयोगाकरिता निवडावयाची कोंबडी सशक्त असावीत. येणेप्रमाणे नर व मादी निवडल्यानंतर खाली दिलेल्या कोणत्याहि दोन जातींचा संयोग करावा. (१) ब्रह्मी अगर कोचीन कोंबड्या व गेम किंवा चितागांग कोंबडे यांपासून पिले लठ्ठ होऊन त्यांचे मांस खाण्यास रुचकर लागते. (२) लँगशन, प्लाय मौथरॉक, बायंडाट किंवा ऑरपिंग्टन कोंबडे यांचा गेम किंवा चितागांग कोंबड्यांशी संयोग केल्यास पिले मोठी व विकण्यास योग्य अशी होतात. (३) काळी ब्रह्मी कोंबडी व काळा आरपिंग्टन अगर काळा लँगशन किंवा प्लायमौथरॉक कोंबडे यांच्या संयोगाने प्रजा अंडी घालणारी व खाण्यास योग्य होते. (४) फिकट रंगाची ब्रह्मी कोंबडी व पांढरा वायंडाट अगर पांढरा लँगशन अगर पांढरा प्लायमौथ रॉक अथवा पांढरा ऑरपिंग्टन यांपासून उत्तम अंडी घालणारी प्रजा तयार होते. (५) करड्या रंगाची कोचीन कोंबडी व करडा किंवा पांढरा ऑरपिंग्टन अगर पांढरा वायंडाट किंवा लँगशन अगर प्लायमौथ रॉक यांच्यापासूनची प्रजा कोचीन कोंबडीपेक्षा अधिक अंडी घालते व खाण्यास लायक होते. (६) करडी किंवा पांढरी लँगशन कोंबडी व पांढरा ऑरपिंग्टन किंवा पांढरा प्यायमौथरॉक अगर पांढरा वायंडाट यांची प्रजा अंडी घालणारी व खाण्यास लायक अशी होते. (७) काळी लँगशन कोंबडी व काळा ऑरपिंग्टन किंवा काळा मिनोर्का अथवा काळा वायंडाट यांची पिले व (८) इंडियन गेम आणि चितागाँग कोंबडीचा लँगशन ऑरपिंग्टन, ब्रह्मी किंवा कोचीन या कोंबड्यांशी संयोग केल्यास त्याची पिले खाण्यास योग्य व अंडी घालणारी होतात.

किती जाती पाळाव्या- बर्‍याच लोकांना निरनिराळ्या प्रकारच्या जाती आपणाजवळ असाव्या असे वाटत असते; परंतु त्या कायम राखण्याकडे व निर्भेळ ठेवण्याकडे त्यांचे लक्ष नसते; याचा परिणाम अर्थातच वाईट होतो. निरनिराळ्या जातींच्या कोंबड्या व कोंबडे एके ठिकाणी मिसळल्याने त्यापासून मिश्र जाती उत्पन्न होतात व एकदां भेसळ झाली म्हणजे मूळ जातींत असलेले गुण हळूहळू कमी होऊ लागतात. निरनिराळ्या जाती बाळगावयाच्या झाल्यास त्यांचा परस्परांशी कोणत्याहि प्रकारे संबंध न येईल अशा रीतीने त्या ठेविल्या पाहिजेत. ही खबरदारी घेणे शक्य नसेल तर पुष्कळ जाती ठेवून सर्वच बिघडविण्यापेक्षा एकच जात उत्तमशी निवडून ठेवणे फार चांगले. अशा जातीच्या पंचवीस ते चाळीस कोंबड्या विकत घेऊन पाच-सहा कोंबडे त्याच जातीचे त्यात मिसळावे. कोंबड्यांकरिता एकच घर बांधलेले असल्यास ही सर्व कोंबडी एकाच घरात ठेवावी लागतील. परंतु असे करण्यात एक मोठी अडचण येते ती ही की, कोंबड्या कोंबड्यांचे भांडण होण्याचा नेहमी संभव असतो; म्हणून त्या सर्वांना एकाच ठिकाणी ठेवण्यापेक्षा पाच-सहा कोंबड्या व एक कोंबडा यांचा एक कळप याप्रमाणे निरनिराळे कळप करून ठेवावे व आपला सर्व वेळ, पैसा व श्रम वगैरे खर्च करून जी काय सुधारणा करावीशी वाटत असेल ती या जातींत घडवून आणावी; म्हणजे श्रमांचे व पैशांचे चीज होऊन फायदाहि बराच राहील. सर्व जातींच्या कोंबड्या बाळगून त्यांची जात कायम ठेवणें हें फार कठिण काम आहे. कारण हें करण्यास पुष्कळ पैसा, हिंमत व शहाणपण व श्रम खर्च करावे लागतात व इतका खर्च करणे एका व्यक्तीच्या आटोक्याबाहेरचे असते. जर एखाद्या मनुष्याची सर्व जातींच्या कोंबड्या बाळगण्याची इच्छा असेल तर त्यानें प्रत्येक खेपेस एक एक जात घेऊन तिचा पूर्ण अभ्यास केल्यावर त्या जातीत ज्या काही सुधारणा करणे शक्य असेल त्या केल्यानंतर मग दुसरी जात घ्यावी. येणेप्रमाणे  ज्यास जितक्या जाती बाळगावयाच्या असतील तितक्या त्याने बाळगाव्या. कोणत्याहि जातीचे संवर्धन करण्यांत यश येणे किंवा न येणें हे त्या जातीसंबंधी जे ज्ञान असेल त्याजवर अवलंबून असते. निरनिराळ्या जातींची राहणी व जीवनक्रम ही अगदी भिन्न भिन्न असतात. जी गोष्ट एका जातीस अपायकारक होईल तीच दुसरीस हितकारक असू शकेल. त्याचप्रमाणे निरनिराळ्या जातीस खाणे निरनिराळ्या प्रकारचे द्यावे लागेल. उदाहरणार्थ काही कोंबड्या जात्याच फार चपळ असतात व त्यांना मेहनतीची व व्यायामाची आवश्यकता असते. त्या लवकर स्थूल होत नाहीत व त्यांना मांसवर्धक खाणेहि फार लागते. परंतु त्यांच्या अगदी उलट दुसर्‍या कोंबड्यांचा जीवनक्रम असतो. उदाहरणार्थ, कोचीन कोंबड्या या फार स्थूलदेही असून त्यांस व्यायाम फारसा नको असतो. यास उष्णताजनक अन्न फारसे लागत नाही, परंतु मांसवर्धक अन्न फार लागते. तात्पर्य या गोष्टी अनुभवावांचून कळत नाहीत. पुस्तके वाचून अर्थातच कांही थोडीशी मदत होते. परंतु विशेषत: स्वत:स मिळालेल्या अनुभवावर जितके यश संपादन करतां येईल तितकें ते दुसर्‍या कोणत्याहि गोष्टींपासून साध्य होणें शक्य नाही.

आतापर्यंत जे विवेचन केलें त्यावरून (१) निव्वळ जाती बाळगणे व (२) जाती बाळगून त्यात काही विशिष्ट सुधारणा करणे या दोन हेतूंपैकी कोणता तरी एक हेतु मनांत धरून कोंबड्या बाळगणारे लोक जाती बाळगतात हे उघड आहे. पैकी दुसरा हेतू मनात धरून जे लोक जाती बाळगणार असतील त्यांनी प्रथमत: त्यांच्यांत काय सुधारणा करावयास पाहिजेत व त्या कोणत्या तर्‍हेने करतां येतील याचा पूर्ण विचार करून व ते ध्येय सदैव डोळ्यांपुढे ठेवून त्या दृष्टीने आपली खटपट चालू ठेवली पाहिजे. एकच जात पाळल्यानें काय काय फायदे होतात ते वर संगितलेंच आहे. परंतु या फायद्याखेरीज आणखीसुद्धां काही फायदे एकच जात बाळगल्याने होतात. पहिला फायदा म्हणजे कोंबडे विकत घेण्यांत बचत. एकच जात असल्यास त्या त्या जातीचे एकदोन कोंबडे विकत घेतले तरी पुरतात. परंतु चार-पाच जाती ठेवल्यास प्रत्येक जात शुद्ध राखण्याकरिता म्हणून प्रत्येक जातीचे काही कोंबडे विकत घ्यावे लागतील. अर्थात त्या मानाने खर्च जास्त पडेल. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याच्याजवळ नेहमी अस्सल जात राहिल्याने त्यास पुष्कळ गिर्‍हाईक मिळते. पुष्कळ जाती बाळगणार्‍या मनुष्याकडे तितके गिर्‍हाईक जात नाही, कारण तेथें कदाचित भेसळ असेल अशी गिर्‍हाइकांस शंका येते. तशी स्थिति एकच जात बाळगणार्‍या मनुष्याची होत नाही. शिवाय प्रदर्शनामध्ये त्याचे नाव होऊन त्यास बक्षीस मिळते व हें एक त्याचें नांव वाढविण्यास कारण होते. असो; येथपर्यंत साधारणपणे जातीची निवड कशी करावी, निरनिराळे हेतू  साध्य होण्यास कोणत्या जाती योग्य आहेत, मिश्र संयोगापासून फायदे, उत्तम मिश्रसंयोग कोणते व जाती किती बाळगाव्या यासंबंधी विवेचन केलें. आता साधारण शेतकरी वर्गास बाळगण्यास फायदेशीर अशा जाती किती, त्यांची शररी रचना कशी व इतर गुणधर्म याविषयी थोडक्यांत विचार करू.

(१) ब्रह्मी:- ही जात उच्च जातीपैकी असून प्रत्येक कुंटुंबाने बाळगण्यास योग्य आहे. ही स्थूलदेही असून काटक असते. यांची अंडी मोठी व सतेज असतात. अंडी घालण्याच्या कामी ही जात चांगली असून त्यांची वाढ लवकर झपाट्याने होत असल्यामुळे त्यांना लठ्ठ केल्यास त्यांची किंमतहि चांगली येते. या जातीच्या कोंबड्या अगदी शांत स्वभावाच्या आणि माणसाळलेल्या असतात; या स्थूलदेही असल्यामुळे त्यांना फार उंच उडता येत नाही. चरण्याला थोडे आवार असले तरी चालते. अंडी उबविण्याच्या कामी व पुढे पिलांचा सांभाळ करण्याच्या कामी या फार योग्य आहे. यांचे वजन जात्याच जास्त असल्यामुळे त्यांच्या भाराने कधी कधी अंडे फुटण्याचा संभव असतो. या जातीचे काही कोंबडे फारच जलद वाढतात व वजनांत ७ ते १४ पौंड पर्यंत भरतात. यांच्या पायावर कोचीन कोंबड्यांप्रमाणे पिसे असतात. यांचा पिसारा फार मऊ असून फार तुकतुकीत असतो. त्यामुळे ती फार सुंदर दिसतात. यांच्यात त्यांच्या रंगावरून आणखी उपजाती झालेल्या आहे.

शरीरवर्णन:- यांचे डोके लहान व सरळ असून त्यावर मखमाली शिंगोरी (शेंडी) असते. छाती रुंद व पुढे आलेली असते. शेपटाची पिसे सरळ असून पंख्यासारखी पसरलेली असतात. चोंच बळकट व पिवळी किंवा काळी असते. मानेवरील पिसें पुष्कळ असून मानेवर लोळत असतात. कोंबडीच्या मांडीवरील व पाठीवरील पिसें पुष्कळ असून पाय आखूड व पिवळ्या रंगाचे असतात व त्यांस मधल्या नखीपर्यंत पिसें असतात. पायावर पिसे असणार्‍या कोंबड्यांना ओलसर जागेत ठेवल्यास थंडीची बाधा होते.

या जातीच्या काळ्या रंगाची, भुरकट रंगाची व हा पांढुरक्या रंगाची अशा तीन उपजाती आहेत. या जातीची मूळची उत्पत्ती हिंदुस्थानांतील असून पुढे तिचा प्रसार अमेरिका व इंग्लंड या देशांत झाला असावा असे काही लोकांचे मत आहे.

अमेरिकेंतील ब्रह्मी कोंबड्या इंग्लंडमधील ब्रह्मी कोंबड्यांपेक्षा अंडी अधिक घालतात. या जातीची उत्पत्ती मलाया व कोचीन कोंबड्यांपासून झाली असावी. कारण हीत दोनही जातींचे गुणधर्म दिसून येतात. यांना किंमत फारच पडते. कधी कधी दोन कोंबड्या व एक कोंबडा यास २५।३० रुपये पडतात.

(२)कोचीन कोंबड्या:- यांचा स्वभाव बहुतेक ब्रह्मी कोंबड्यांसारखा असतो. याहि शरीराने अवजड असून त्यांच्याप्रमाणे लवकर माणसाळणार्‍या व पिलांचा सांभाळ करणार्‍या असतात. यांची पिले काटक असून त्यांचे संगोपन करणे फारसे कठिण नसते. यांना इतर पिलांपासून निराळे ठेवल्यास यांची वाढ झपाट्याने होते. यांची पिले वाढविण्यास सोयीची असतात. परंतु त्यांचे मांस रुचकर नसते. ते फार लवकर जून होते. यांचा गेम किंवा चितागांग कोंबड्यांशी संयोग केला असतां त्यांची अंडी घालण्याची शक्ती वाढते. यांची शेंडी लहान असून तिला एकच आरी असते. डोळे काळे, पिवळे किंवा तांबडे असतात. मानेवरील पिसे लांब व पुष्कळ असून छाती रुंद व खोल आणि शेपूट लहान, खाली वाकलेले, पाय आखूड व त्यावर पिसे असतात.

इंग्लंडमध्ये रंग व आकार या दोन बाबतींत या जातीची पूर्ण सुधारणा झाली आहे पण ही सुधारणा करण्यांत त्यांच्या अंगचे अंडी घालण्याचे व नाजूक मांस असण्याचे मूळ गुण नाहिसे झाले आहेत. कोचीन जातीच्या पाच उपजाती आहेत. (१) पार्ट्रिज (२) ककू (३) पांडुवर्ण (४) पांढरी (५) काळी या होत.

पार्ट्रिज:- यांच्या शरीराचा खालचा भाग, मांड्या आणि शेपट्या काळ्या रंगाच्या असतात; आयाळ सोनेरी रंगाची असून प्रत्येक पिसाच्या मध्यभागी एक काळी रेषा असते. मादीची आयाळ गडद पिवळ्या रंगाची असते.

ककू:- या जातींचा पिच्छकलाप किंचित नीळसर रंगाचा असतो व त्यावर काळसर रंगाच्या रेषा असतात.

बफ:- या जातीचा रंग दालचिनीच्या रंगासारखा व कधी कधी गडद पिवळा असतो. दुसर्‍या दोन उपजाती त्यांच्या नांवाप्रमाणे अगदी शुभ्र किंवा अगदी काळ्या असतात. या जातींची मूळ उत्पत्ति चीन देशातील आहे. परंतु अलीकडे इंग्लंड, अमेरिका येथे यांचे संवर्धन फारच मोठ्या प्रमाणावर केलें जाते. दोन कोंबड्या व एक कोंबडा यांस सरासरीने पंचवीस तीस रुपये किंमत पडते.

(३)लँगशॅन- ही जात देखणी असून फार उपयोगी आहे. ही उत्तम व पुष्कळ अंडी घालणारी असल्याने व त्याचप्रमाणे या जातीचे मांसहि खाण्यास अत्यंत रुचकर असल्याने ही बाळगल्याने हौसच्या हौस भागून शिवाय दुहेरी फायदा होतो. अंडी घालण्याच्या कामात तर हिची बरोबरी करणारी दुसरी कोणतीहि जात सापडणार नाही. यांची अंडी फार सत्वपूर्ण असून काळसर रंगाची असतात. ही जात हिंदुस्थानात कोरड्या हवेच्या प्रदेशात व कमी पाऊस असणार्‍या प्रदेशात कोठेही बाळगली असता चांगली तयार होते. या जातीचे पंख फार लांब असल्यामुळे एके ठिकाणी स्वस्थ बसणे हीस आवडत नाही. आवारात कोंडून ठेविले असता ही उंच उडून बाहेर पडण्याचा प्रयत्‍न करतात व त्यांस पूर्ण स्वतंत्रता भोगू दिली नाही तर ती चांगली वाढत नाहीत. यांचे आवार एवढ्याकरिता मोठे ठेवावे लागते. यांची पिलेही तशीच काटक असतात. त्यांनां सुद्धा आईबरोबर चरण्यास सोडावे लागते. अगर अन्य तर्‍हेने त्यांस भरपूर व्यायाम होईल अशी व्यवस्था करावी लागते. या पिलांस चांगले खावयास घातले असता ती लवकर व लठ्ठ विक्रीस योग्य अशी होतात. यांच्या वाढीच्या मानाने त्यांच्या अंगावर पिसे येत नाहीत. काळ्या लँगशन जातीची पिले उपजल्याबरोबर फारच चमत्कारिक दिसतात. त्यांच्या डोक्यावर काळे केस असतात, तर त्यांची छाती आणि तोंड ही पांढर्‍या, काळ्या आणि इतर मिश्र रंगाच्या केसांनी झाकलेली असतात. कांही पिलांच्या पिसांचे रंग अगदी गडद असतात. तीन-चार महिने झाले म्हणजे हळूहळू हे रंग बदलून तकतकीत काळा रंग जिकडे तिकडे पसरतो.

शरीरवर्णन:- नराची शिंगोरी (शेंडी) एक आरीची व मध्यम आकाराची असते. मादीची शिंगोरी लहान असते. ही शिंगोरी नेहमी ताठ असते. छाती रुंद, भरलेली व पुढे आलेली असते. पाय मध्यम आकाराचे, काळे असून त्यावर थोडी पिसे असतात. शेपूट भरीव व उंच असते. नराचे वजन नऊ ते अकरा पौंड व मादीचे सहा ते आठ पौंड भरते. ही जातहि मूळची चीन देशातील असून पुढे तिचा प्रसार यूरोपखंडात झाला. या जातीच्या रंगावरून तिच्या चार उपजाती केल्या आहेत. त्या :- (१) काळी लँगशन (२) पांढरी लँगशन (३) पांडुवर्ग लँगशन व (४) निळी लँगशन या होत.

(४)प्लायमौथ रॉक:- ही जातहि वरीलप्रमाणेच उपयोगी आहे. कारण ही देखणी असून पुष्कळ अंडी घालण्याच्या व स्वादिष्ट आणि रुचकर मांसाच्या बाबतीत या जातीचा हातखंडा आहे. यांचाही स्वभाव वरील जातीप्रमाणेच शांत व माणसाळणारा असतो. यांसहि स्वतंत्रता आवडते. यांचे चरावयाचे आवार विस्तृत असेल त्या मानाने त्यांची वाढ फार झपाट्याने होते. ही जात काटक आहे. ही मूळ अगदी शुद्ध जात नसून मॅले व काळी लँगशन यांजपासून झालेली आहे. कारण या जातींत काही पक्ष्यांच्या पायावर पिसे असलेली व काहींची शिंगोरी मखमली असलेली अशी कोंबडी अद्यापि सापडतात. शरीरवर्णन :- शिंगोरी एक आरीची व लहान, छाती रुंद, शेपूट आंखूड, पाय आंखूड, बळकट, स्वच्छ व पिवळ्या रंगाचे. या जातीच्या चार उपजाती आहेत त्या :- (१) पांडुवर्ण (२) ककू (३) पांढरी व (४) काळी या होत. पैकी नंबर दोन व तीन उपजाती उत्तम समजतात. या जातींच्या दोन कोंबड्या व एक कोंबडा यांची किंमत तीस-पस्तीस रुपये येते. प्रदर्शनाकरिता तयार केलेल्या कोंबड्यांची किंमत पन्नास रुपये किंवा जास्तहि पडते. या जातींतील नराचे वजन साधारणमानाने आठ-दहा पौड भरतें व मादीचे वजन सहा ते आठ पौंडपर्यंत भरते. या जातीची पिलें पीवरीकरणमंजूषेत घातल्यास चांगली तयार होतात.

(५)वायंडाट:- ही जातहि लँगशनप्रमाणे सर्वोपयोगी आहे. परंतु हिचा वर सांगितलेल्या जातींपेक्षा जरा खाली नंबर लागेल. यांची पिलें लहानपणी फार नाजूक असल्यामुळे त्यांचे संगोपन करणें फार कठीण जाते. परंतु पुढे मोठेपणी ही फार काटक होतात. ही वजनांत इतर कोंबड्यांपेक्षा फार कमी भरतात. कोंबड्यांचे वजन ७ ते ९ पौंडपर्यंत व कोंबडी पाच ते सात पौंडपर्यंत भरते. शिंगोरी गुलाबी रंगाची असून डोक्यास चिकटलेली असते. पाय आखूड व पिवळ्या रंगांचे असून त्यावर पिसे नसतात. छाती भरीव असते. ही आकाराने प्लायमौथरॉकसारखीच दिसतात. या जातींत उपजाती चार आहेत. पैकी दोन फार दिखाऊ आहेत. ही जात मूळची अमेरिकन असून तिची उत्पत्ति ब्रह्मी, हँमबर्ग व इंडियन गेम यांच्यापासून झालेली असावी. कांही वायंडॉट कोंबड्यांच्या शिंगोर्‍या एक आरीच्या असून त्यांच्या पायांवर पिसे असल्याचे आढळून येते. परंतु हे गुण नसून दोष असतात हें लक्षात ठेविलें पाहिजे. सशास्त्रपद्धतीने संयोग घडवून आणल्यास हे दोष नाहीसे होतात. या जातीचा कोंबडा व दोन कोंबड्या यांची किंमत पंचवीस ते पन्नास रुपयांपर्यंत असते.

(६) हौडन:- ही जात दिखाऊ असून उपयोगी आहे. या कोंबड्या साधारणपणे अंडी बरी घालतात व यांचे मांसहि खाण्यालायक असते. कोरड्या हवेत व जमिनीवर त्यांचे संवर्धन चांगले होते. परंतु अतिवृष्टीच्या ठिकाणी ही जात टिकाव धरीत नाही. या जातींच्या माद्या अंडी उबवीत नाहीत, म्हणून त्यांची अंडी दुसर्‍या कोंबड्यांखाली उबवण्याकरिता ठेवावी लागतात. यांची शिंगोरी पानाच्या आकाराची असून ती मध्यभागी जाडशी दोन्ही बाजूंस लोंबती असते. चोंच काळी असते. शेपूट भरलेली, उंच व सरळ असते. तंगड्या बारीक व पांढर्‍या रंगाच्या आणि मांडी भरलेली व आंखूड असते. यांच्या पायास स्पष्ट दिसणारे एक पाचवे बोट असते. पिसारा काळा व शुभ्र वर्णाचा असून त्यांत हिरव्या रंगाची थोडी झांक मारीत असते.

शुद्ध हौडन जातीचे पक्ष बाळगणे धोक्याचे आहे, म्हणून ही जात बाळगणेच असेल तर त्यापैकी मिश्र पक्षीच बाळगलेले बरे. यांचा कोचीन, लँगशन किंवा ब्रह्मी कोंबड्यांशी संयोग केला असता होणारी प्रजा काटक व अंडी घालण्यास योग्य होऊन त्यांचे मांसहि चवदार असते. ही जात मूळची फ्रेंच आहे. या जातीच्या कोंबड्यांचे वजन पाच ते सात पौंड व मादीचे ४ ते ५ पौंड भरते. दोन कोंबड्या व एक कोंबडा यांची वीस ते चाळीस रुपयेपर्यंत किंमत असते.

(७) मॅले किंवा चितागाँग:- हिचे नाव, तिची मूळ उत्पत्ती मॅले पेनिनशुलामध्ये झाल्यामुळे व नंतर तिचे संवर्धन चितागाँगमध्ये झाल्यामुळे मॅले किंवा चितागाँग असे पडले आहे. या जातीचे पक्षी फार धिप्पाड असे असतात. काही काही पक्ष्यांची उंची दोन-अडीच फूटपर्यंत सुद्धा भरते. ही जात भारी रागीट आहे, त्यामुळे हिचें दुसर्‍या जातीशी किंवा तिच्या पिलांशी पटत नाही; म्हणून त्यास नेहमी निराळे ठेवणे भाग पडते. या जातींतील माद्या फारशी अंडी घालीत नाहीत, परंतु या पक्ष्यांचे मांस रुचकर असल्यामुळे व ही जात जात्या काटक असल्यामुळे पुष्कळ वेळा ही घरच्या उपयोगाकरिता व विक्रीकरिता म्हणून बाळगतात. ही जात स्वातंत्र्यप्रिय असल्यामुळे तिला लहानसे आवार पुरत नाही. या जातीची पिलें लहानपणी फार नाजूक असतात, त्यांची फार निगा ठेवावी लागते. पिलांचा स्वभावहि फार भांडखोर असल्यामुळे त्यांना इतर जातीच्या पिलांत मिसळल्यास त्यांची डोकी फोडण्यापर्यंत भांडणे होतात. या पिलांना सुद्धा नेहमी मोकळेपणाने रहाणे आवडते. पूर्ण स्वातंत्र्य देऊन भरपूर खाणे दिल्यास ही पिले फार झपाट्याने वाढतात. यांना मांसल अन्नाची फार आवड आहे व ते त्यांस पुष्कळ द्यावे लागते. कोंबडी व तिची पिले स्वतंत्र ठेवण्याचे साधन असल्यास कोंबडीस अंडी उबविण्यास बसविले तरी चालते. परंतु तशी सोय नसेल तर अंडी उबविण्याचे काम दुसर्‍या शांत स्वभावाच्या कोंबड्यांकडून करून घेतलेले चांगले. अंडी उबविण्यास योग्य वेळ म्हणजे जूनपासून डिसेंबरपर्यंत असते. या जातीच्या नराचे वजन आठ ते दहा पौंड भरते व मादीचे सहा ते आठ पौंड भरते.

शरीरवर्णन:- शिंगोरी लहान, सरळ व मऊ असून तीवर मांस असते. काही कोंबड्यांना मखमली शिंगोरी असते. डोके व चोच लांब असते. गलस्तन (कल्ले) अगदी लहान व मादीचे तर अदृश्य असते. डोळे पांढरे किंवा किंचत पिवळसर असतात. छादी रुंद व खोल असते. पृष्ठभाग शेपटीकडे उतरता होत गेलेला असतो. शेपूट लहान व भरलेले असते. तंगड्या पिवळ्या, सरळ, लांब व भरलेल्या असतात. पिसारा दाट व तुकतुकीत असतो. या जातीत रंगास विशेष प्राधान्य नाही. तथापि सोनेरी रंगाचे पक्षी उत्तम गणले जातात. उत्तम अशा दोन कोंबड्या व एक कोंबडा यांची किंमत दहा-पंधरा रुपयेपर्यंत असते.

अ‍ॅसिल किंवा झुंजणारे कोंबडे-  अ‍ॅसिल म्हणजे अस्सल व अ‍ॅसिलपक्षी म्हणजे शुद्ध व अस्सल `गेम’ जातीचे पक्षी होत. या जातीतील कोंबडे विशेषकरून लढण्यासंबंधी प्रसिद्ध आहेत. मोठमोठे श्रीमंत व शोकी लोक हौसेने हे कोंबडे बाळगतात. आपल्याकडे पूर्वीचे राजेरजवाडे झुंजणारे कोंबडे बाळगीत असल्याची पुष्कळ उदाहरणे सापडतात. दशकुमार चरितात कोंबडेझुंज उल्लेखिली आहे. या जातीतील माद्यांची अंडी घालण्यासंबंधी फारशी प्रसिद्धी नाही; परंतु या जातीतील कोंबड्यांचे मांस फारच रुचकर असल्यामुळे यांचा खाण्याकडे पुष्कळ उपयोग करितात. चितागाँग कोंबड्याप्रमाणे हे पक्षीही धिप्पाड व उंच असतात. यांच्या पिल्लांना सुद्धा स्वातंत्र्य आवडते. ती लहानपणी फार नाजूक असल्यामुळे त्यांची फार काळजी घ्यावी लागते. यांस मांसल अन्न मुद्दाम द्यावे लागते. चितागाँग पिल्लाप्रमाणे यांची पिलेही कलहप्रिय असतात. म्हणून यांना इतर पिलांत मिसळू न देता स्वतंत्र ठेवावे लागते. हैद्राबाद, म्हैसूर वगैरे ठिकाणी या जातीचे अस्सल कोंबडे मिळतात. हे वजनात बरेच भरतात. नराचे वजन नऊ-दहा पौंडपर्यंत व मादीचे वजन सात-आठ पौंडपर्यंत भरते. शरीरवर्णन :- या जातीची शिंगोरी लहान आणि मखमली व डोके लहान, चिंचोळे व लांब असतें. भिवया जाड असतात; छाती अतिशय रुंद व कठीण असते, तंगड्या थोड्या आंखूड असतात. शेपटाचा पिसारा लहान व खाली पडलेला असतो. साधारणमानानें चितागाँग व ही जात यांत बरेच सादृश्य असते व दोघांचे गुणधर्मही बहुतेक सारखेच असतात. हे पक्षी निरनिराळ्या रंगांचे असतात. परंतु शुद्ध पांढरा किंवा शुद्ध काळा रंग असलेले पक्षी फार उत्तम दिसतात. दुसर्‍या कोणत्याहि जातीचा आखार किंवा शक्ती वाढवावयाची असल्यास या जातींतील कोंबड्यांशी संयोग करावा. या पक्षांना मुंबईत `कुल्लम’ असे म्हणतात. यांचा कोचीन कोंबड्यांशी संयोग केला असतां त्यांपासून होणारी प्रजा खावयास योग्य अशी होते व त्यांस किंमत फार येते. या जातीची अंडी जरी थोडी मिळतात तरी ती सत्वपूर्ण असतात. या जातीच्या दोन कोंबड्या व एक कोंबडा यांची किंमत तीसपासून शंभर रुपयेपर्यंतहि येते. मिश्र बीजाच्या कोंबड्या इतत्रहि पुष्कळ सांपडतात. त्या `सुरती’ या नांवाने ओळखल्या जातात.

घागू- ही जात मिश्र असून हिची उत्पत्ति हिंदुस्थानांतच झालेली आहे. मॅले किंवा असील जातीचा कोंबडा व ब्रह्मी किंवा लँगशन जातीची कोंबडी यांच्या संयोगापासून ही जात झाली असावी. अलीकडे ही जात फारशी आढळण्यांत येत नाही. या जातीचे मांस खावयास बरे असते व अंडीही साधारण मानाने बरी मिळतात. ही जात काटक असते. हिला बंदिवास मुळीच खपत नही. अंडी उबविण्यात व पिलांचा सांभाळ करण्यास ही जात फार चांगली आहे. शरीरवर्णन :- शिंगोरी मखमली अगर एक आरीची व लहान, मान जाड, गळा पिशवीसारखा सैल व लोंबता. तंगड्या धुरकट पिवळ्या रंगाच्या व लांब असतात. हे पक्षी निरनिराळ्या रंगांचे आढळतात. उत्तम दोन कोंबड्या व एक कोंबडा यांची किंमत दहा-पंधरा रुपयेपर्यंत येते.

ऑरपिंग्टन:- ही जात प्लायमौथरॉक लँगशन व मिनोर्का यांच्या संयोगापासून झालेली आहे. या जातीचा विशेष हा की, तिजपासून पुष्कळ अंडी मिळतात. एवढेच नव्हे तर तिचे मांसही रुचकर व स्वादिष्ट असते. निरनिऱाल्या रंगांवरून तिच्या तीन उपजाती केलेल्या आहेत. (१) काळी ऑरपिंग्टन (२) करड्या रंगाची ऑरपिंग्टन व (३) पांढरी ऑरपिंग्टन. करड्या रंगाची ऑरपिंग्टन जात फार लोकिप्रय झालेली आहे. हिची उत्पत्ती करड्या रंगाची कोचीन, सोनेरी हँबवर्ग व डार्किंग यांच्यापासून झालेली आहे. ही जात अंडी घालण्यात सरस ठरलेली आहे. पांढरी ऑरपिंग्टन ही प्लायमौथरॉक आणि लेगहॉर्न (सर्व श्वेतवर्णाची) यांजपासून झालेली आहे. काळी ऑरपिंग्टन ही लँगशन, प्लायमौथरॉक व मिनोर्का यांच्यापासून झालेली आहे. या जातीचा आकार साधारणपणे लॅंगशन जातीसारख्याच असतो.  ऑरपिग्टन जात साधारणपणे प्लायमौथरॉक किंवा लँगशन कोंबडीच्या सारखी दिसते. या जातीतील पक्ष्यांच्या पायांवर जरी कोठें-कोठें पिसे असलेली आढळतात, तरी अस्सल जातीच्या पक्ष्यांच्या पायावर पिसे दिसत नाहीत. या पक्ष्यांची छाती रुंद व पाय आंखूड असतात. शिंगोरी एक आरीची किंवा गेंजी दिसून येते. पायाचा रंग पांढरा किंवा किंचित गुलाबी असतो. पिसारा पाठीमागे झुकलेला व सरळ असतो. य जातीची पिल्ले काटक असून फार जलद वाढतात. परंतु त्यांची काळजी घ्यावी लागते. ऑरपिंग्टन व प्लायमौथरॉक या जाती ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे ऑरपिंग्टनचे पाय पांढरे व प्लायमौथचे पिवळे असतात. तीन कोंबड्यांची किंमत पंचवीस ते पन्नास रुपये असते.

सिलेकी:- ही जात विशेषेंकरून दिखाऊपणा व मऊ पिसारा या गुणांबद्दल प्रसिद्ध आहे. फायद्याच्या दृष्टीने ही कोंबडी बाळगण्यात काही अर्थ नाही. अंडी उबविणे व पुढे पिलांचे संगोपन करणे या कामी ही कोंबडी फार चांगली असतात. ही जात्या काटक असल्यामुळे यांचे संगोपन करणे फारसे कठिण जात नाही. या जातीस व तिच्या पिलांना स्वतंत्रता लागते. पिलांना आईबरोबर हिंडू दिल्यास ती चांगली वाढतात. शिंगोर गेंजी (रोझ कोंब) नीळसर रंगाची व वाटोळी असते. गलस्तन (कल्ले) व लांब व नीळसर रंगाचे असतात. पायास नख्या कांहींस पांच तर काहींस चार सापडतात. पाच नख्या असणे उत्तम जातीचे लक्षण नव्हे. पायावर पिसे मुळीच असू नयेत किंवा असलीच तर थोडी असावीत. तीन पक्ष्यांस किंमत दहा पासून पंधरा रुपये पर्यंत पडते.

डार्किंग- ही जात नाजूक असल्यामुळें हिंदुस्थानांत फारकरून आढळत नाही. या जातीची अंडी थोडी असतात. यांचे मांस फारच रुचकर असते. यांची पिले फार नाजूक असून त्यांचे संगोपन करणें फार कठिण जाते.

शरीरवर्णन- या जातीची शिंगोरी एक आरीची किंवा गेंजी (रोझ कोंब) असून नराची ताठ व मादीची पडलेली व डोके मोठे असते. नराचे गलस्तन (कल्ले) मोठे व लोंबणारे व मादीचे तितके मोठे नसून वाटोळे असतात. तंगड्या आंखूड, बळकट व नखे आतल्या बाजूस वळलेली असतात.

मिनोर्का:- ही जात दिसण्यांत लेगहॉर्नसारखी दिसते, परंतु नरांची शिंगोरी मोठी असून तोंड व चेहरा तांबडा असतो. यांच्या पायावर पिसे नसतात. यांच्या दोन उपजाती आहेत. एक काळी मिनोर्का व दुसरी पांढरी मिनोर्का. पैकी दुसरी फार क्वचित आढळते. पहिली जात तिच्या काळा तकतकीत पिसार्‍यामुळे फार शोभिवंत दिसते. या जातीच्या कोंबड्या अंडी पुष्कळ व फार मोठी घालतात; परंतु यांचे मांस खाण्यास तितके रुचकर नसते. यांची पिले फार नाजूक असल्यामुळे त्यांचे संगोपन करणे फार कठिण जाते. मिनोर्का कोंबडीचा लँगशन कोंबड्यांशी संयोग केल्यास होणारी जात फार काटक होते. दोन कोंबड्या व एक कोंबडा यांची किंमत पंचवीसपासून पन्नास रुपयेपर्यंत येते.

लेगहॉर्न:- या जातीची कोंबडी साधारणत: गांवठी कोंबड्यांसारखीच लहान लहान असतात. अंडी घालण्याच्या कामी ही जात फारच प्रख्यात आहे; परंतु तिचे मांस खाण्यास मुळीच लायक नसते. इंडियन गेम, चितागाँग अगर लँगशन या जातीशीहि हिचा संयोग केल्यास यापासून होणार्‍या पिलाचे मांस खाण्यास बरे लागते. निरनिराळ्या रंगाप्रमाणे या जातीच्या पुष्कळ उपजाती आहेत. परंतु त्यांत पांढऱी व पिंगट लेगहॉर्न या दोन प्रख्यात आहेत. यांची अंडी साधारण मध्यम व पांढरी असतात. यांची शिंगोरी एक आरीची व ताठ उभी असते आणि तिजवरील दात सारख्या आकाराचे असतात. मादीची शिंगोरी एका बाजूस पडलेली असते. काही कोंबड्यांना गेंजी शिंगोरीहि असते. यांचे पाय पिवळे असतात, तोंड तांबडे असते. उत्तम नराचं वजन पाच-सहा पौंड भरते व मादीचे तीन पासून चार पौंड पर्यंत भरते. यापेक्षा सुद्धां कमी वजनाचीच कोंबडी या जातीत फार आढळतात. उत्तम तीन कोंबड्यांची किंमत पंचवीसपासून पन्नास रुपयेपर्यंत येते. निव्वळ अंड्यांचाच धंदा करणार्‍यांस ही जात बाळण्यास चांगली.

गिनी कोंबडी:- ही फार खादाड असून नेहमी कळप करून राहतात. दिवसाचा बहुतेक वेळ इकडे तिकडे अन्नशोधार्थ घालवून संध्याकाळच्या वेळी सर्वांनी एकत्र जमावयाचे असा यांचा कालक्रम असतो. हे पक्षी उडण्यांत जरी फारसे पटाईत नसतात तरी पळण्यांत फारच चपळ असतात. यांना नेहमी शांत ठिकाणी रहाणे आवडते. अंडी घालण्याच्या कामी हे पक्षी चांगले असून त्यांची अंडी सत्वपूर्ण असतात. साधारण कोंबड्यांपेक्षा हे अंडी जास्त घालतात. यांचे मांसहि खाण्यास चांगले असते. त्यांच्या माद्या इतर कोंबड्यांसारख्या खोलीत जाऊन आपल्या घरट्यांत अंडी घालीत नाहीत, तर त्या आपली घरटी शेताच्या कुंपणांत किंवा अशाच कोठे तरी गुप्‍त ठिकाणी करितात व तेथें अंडी घालतात. मादी अंडी घालीत असताना नर तेथें उभा राहून आसपास कोणी येते की काय ते पाहत असतो. त्यावरून मादी अंडी घालीत आहे असे ओळखता येते. नर व मादी ओळखावयाची मुख्य खूण म्हणजे नरास एक तुरा असतो व त्याचे गलुल (कल्ले) नीळसर तांबड्या रंगाचे असतात. यांच्याकरितां घरे करावयाची ती एक मोठे छप्पर काढून त्याच्या सभोवती तारेचे जाळे लावून बंद करावयाचे व आंत पुष्कळ बांबूच्या काठ्या, त्यास बसण्याकरिता मेढी पुरून त्यांवर बसवावयाच्या. यांची पिले फार नाजूक असल्यामुळे खाण्याच्या व इतर बाबतींत त्यांची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. मादी दर खेपेस तीस पासून चाळीस अंडी घालते. अंडी उबवणे झाल्यास ती कोंबड्याखाली उबविण्यास ठेवणे चांगले. अंडी उबून पिलें बाहेर येण्यास सव्वीस दिवस लागतात. पिले बाहेर आल्यावर त्यांना कोरड्या हवेत ठेवावे. त्यांस पहिल्या आठवड्यांत प्रत्येक तासास खाणे घालावे लागतें. उत्तम खाणें म्हणजे शिजविलेली अंडी, बारीक केलेले कांदे, वाळवी, शिजविलेले मांस व तांदुळाचे व गव्हाचे पीठ. जसजशी पिलें मोठी होत जातील तसतसें त्यांस बाहेर फिरू द्यावे व खाण्याचे मान कमी करावे. पूर्ण वाढ झाल्यावर दिवसांतून दोन वेळ गहू, तांदूळ वगैरेसारखे धान्य खाण्यास घातले म्हणजे झाले. बाकी सर्व व्यवस्था इतर कोंबड्यांप्रमाणेच करावी.

गिनी कोंबडी जात्या क्रूर पण भित्री असतात. त्यांस इतर कोंबड्यांत मिसळून ठेवल्यास ती त्यांस त्रास देतात. म्हणून त्यांस निराळें ठेवावें. गिनी कोंबडी जरी इतर कोंबडयांपेक्षां मोठी दिसतात तरी त्यांची पिसें काढून टाकल्यावर त्याचें वजन इतर कोंबडयांपेक्षां जास्त होत नाही.  गिनी कोंबडी जास्त काटक असल्यामुळें त्यांनां सहसा रोग होत नाहीत व झाल्यास उत्तम उपाय म्हणजे त्या मारून टाकणें हा होय.  ती फार भित्री असल्यामुळे त्यास धरावयास गेलें असतां ती फार तडफड करितात व त्यामुळें त्यांस फार इजा होते.  म्हणून आजारी गिनी कोंबडयांना होतां होई तों निराळें ठेवावें व बरी नच झाल्यास शेवटचा उपाय अमलांत आणावा.

टर्की कोंबडी- यांना वयांत यावयास तीन वर्षे लागतात व त्याचें वजन चांगली काळजी घेतल्यास तीस ते चाळीस पौंड भरतें.  नर तीन वर्षांचा व मादी दोन वर्षांची झाली म्हणजे संयोग होऊं द्यावा.  निकटसंबधोत्पत्ति होणें श्रेयस्कर नाही म्हणून होता होईतो ती होऊं देऊं नये.  चार माद्यास एक नर याप्रमाणें ही कोंबडी ठेवावीत.  मादीला गिनी कोंबडयाप्रमाणेंच आपली घरटी चोरून एकांतात करण्याची सवय असते, परंतु त्यांच्याकरिता पानाचें वगैरे घरटें करून तेथे एखादे कृत्रिम अंडे ठेवल्यास ती तेथें जाऊन आपली अंडी घालते.

टर्की कोंबडयांतील नर जात्या फार क्रूर असतात.  ते वेळप्रसंगी मुले व मोठी माणसे यावरहि हल्ला करण्यास भीत नाहीत.  तसेंच दुसर्‍या कोंबडयाशी किंवा टर्की नराशी झुंज लागल्यास ते मरेपर्यंत मागे हटत नाहीत.  त्याच्या या क्रूर स्वभावाचा परिणाम मादीवर सुध्दा झालेला असतो आणि म्हणून नर आपली अंडी फोडून खाऊन टाकील या भीतीनें ती नरास अगदी कळणार नाहींत अशा रीतीने अंडी घालते.  अंडी घालण्याचा प्रसंग आला म्हणजे मादी एक विशेष प्रकारचा आवाज करते.  त्यावेळी मालकानें जपून राहून ती अंडी कोठें घालते इकडे लक्ष द्यावें.  मादी एक दिवसाआड व कधी कधी दररोजहि अंडी घालते व दर खेपेस १५ ते वीसपर्यंत अंडी घालते.  ही अंडी त्यास मादीखाली उबवावयास ठेवल्यास ती त्यांची काळजी घेते.  अंडयांवर बसली असतां तिला वरचेवर खाणें लागते व तिला बाहेर सोडावें लागतें.  ती स्वतः खाण्याकरितां म्हणून अंडी सोडून जात नाही व खाणें न मिळाल्यास ती उपाशी मरते.  ही अंडी कोंबडयाखालीहि उबवितात.  अंडी उबून पिलें बाहेर येण्यास २८ दिवस लागतात. पिलें बाहेर आल्यावर काही दिवस त्यांची काळजी घ्यावी लागते.  पिलांचें खाणें गिनी कोंबडयांच्या पिलांप्रमाणेंच असावें. आईला मात्र गव्हाचा कोंडा व तांदुळाचें पीठ खावयास घालावें.  पिलांना प्रत्येक दोन तासांस खाणें घालावें लागते.  यांची घरें गिनी कोंबडयांप्रमाणेंच साधी बांधावीत.  त्यांस इतर कोंबडयांपासून निराळें ठेवावें.  यांच्या जाती आहेत त्या - (१) ब्राँझ टकीं, ही सर्वात मोठी आहे.  (२)  काळी टर्की, ही लवकर लठ्ठ होते.  (३)  करडी टर्की, ही नाजूक असते.  (४)  पांढरी टर्की, ही फारच सुंदर व मोठी असते.

टर्की कोंबडी एकदा मोठी झाली म्हणजे त्यानां सहसा रोग होत नाहीत.  पण झालेच तर इतर कोंबडयांच्या रोगांवर सांगितलेल्या उपायाचीच योजना करावी.

टर्की कोंबडी लठ्ठ करणें झाल्यास त्यांना एका स्वतंत्र खोलीत वाळू, चुना, विटाची भुकटी वगैरेचा पुरवठा करून तीत ठेवावें.  त्यास दिवसातून चार खेळ खाणें घालावें व तें मका, सातु, तांदूळ, गहूं वगैरेपैकी असावे.  बटाटे, कांदे, कोबी वगैरे इतर पदार्थ भरपूर घालावे.  त्यास लठ्ठ होण्यास दीड महिना लागतो.

हंस- हे पक्षी ज्याच्याजवळ पुष्कळ माळ वगैर चरावयास आहेत त्यास बाळगण्यास चांगले.  ते जात्या काटक असून आजारी क्वचितच पडतात.  ते पुष्कळ वर्षे पर्यंत  (कधी कधी वीस वर्षेपर्यंत सुध्दा)  जगतात.  यांच्या पोटजाती पुष्कळ आहेत.  त्यापैकी टौलौज, एम्डेन आणि आफ्रिकन अशा तीन मुख्य आहेत.  इन्डियन किंवा चायना म्हणून जी एक जात आहे ती इकडे पुष्कळ आढळते.  ही जात फार ओरडणारी असून त्रासदायक असते.  यानां जागा पुष्कळ लागते म्हणून यांची घरें नेहमी मोठी बांधावीत.  बारा फूट लांब व नऊ फूट रूंद एवढया जागेंत बारा पक्षी राहूं शकतात म्हणजे प्रत्येकाला नऊ चौरस फूट (स्केअर)  जागा लागतें.  यांनाहि बदकाप्रमाणें पाण्यांच्या टाकीची अवश्यकता आहे.  याचे कळप ठेवावयाचे झाल्यास प्रत्येक नरास तीन माद्या या प्रमाणात ठेवावे.  अंडी उबविण्याकरिता मादीखाली ठेवणें चांगले.  कोंबडीखालीहि ती उबविण्यास ठेविली तरी चालतात अंडी उबविण्यास मादी बसली म्हणजे तिच्या खाण्याची तजवीज पाहिली पाहिजे.  कारण ती सहसा अंडयांवरून उठत नाही व वेळेवर खाणे न मिळाल्यास उपाशी राहून मरते.  अंडी २९ व्या दिवशी फुटून पिले बाहेर येतात.  त्यांना २४ तासपर्यंत खाणें वगैरे देऊं नये.  नंतर सातूचें पीठ, गव्हाचें पीठ, तांदुळाचे पीठ, थोडेसें बारीक केलेलें गवत वगैरे दुधांत मिसळून खावयास द्यावें.  प्रथमतः वरचेवर खाणें घालावें लागते.  परंतु पुढें हळूहळू ती हिंडती फिरती झाल्यावर तें कमी करावें.  मोठ्या पक्ष्यांनां गव्हांचा कोंडा, सातू, भात वगैरे खाणें घालावे.  या पांखरास रोग वगैरे फारसे नाहीत, व ते एकदां झाले म्हणजे बरे करणें शक्य नाही.

कोंबडयांचे रोग व त्यांवर उपाय-  कोंबडयांनां होणार्‍या रोगांचे मुख्यत्वेंकरून तीन वर्ग करतां येतील (१) सर्वसाधारण किरकोळ रोग, (२) भयंकर परंतु सांसर्गिक नसणारे रोग व (३) सांसर्गिक रोग यांपैकी पहिल्या दुसर्‍या वर्गांतील रोग ताबडतोब उपाय केला असतां बरे होतात. तिसर्‍या वर्गांतील रोग सांसर्गिक असल्यामुळे त्यांत पुष्कळ वेळा यश येत नाही. शिवाय कोंबड्यांची काळजीही फार घ्यावी लागते व कधी कधी तर सर्व कोंबड्यांचा नाश होईल या भीतीने आजारी असलेल्या कोंबड्या ठार मारून टाकाव्या लागतात. असो; वर सांगितलेल्या निरनिराळ्या वर्गांतील रोगांविषयी आता थोडासा विचार करू.

(१) पिसे जाणे:-  यावर उपाय, त्यांना स्वतंत्र ठेवणे, मऊ अन्न देणे; गव्हाचा किंवा सातूचा भरडा दुधांत मिसळून देणे, स्वच्छता राखणे व हिरवे अन्न खावयास घालणे.

(२) मऊ अंडी घालणे:- याची कारणे फार खाणे व चुन्याची कमतरता. यावर उपाय, कारणे नाहीशी करणे.

(३) पायावरील खवले वाढणे:-  कारण कृमी. यावर उपाय - रोज सकाळी कोंबड्यांचे पाय रॉकेल किंवा जवसाचे तेल यांच्या मिश्रणांत बुडवावे व त्यावर पोल्ट्री पावडर चोळीत जावी. (४) मऊ गांजा किंवा पेटारा :- याचे कारण अजीर्ण. चिन्हे :- गांजा हातास बिलबिलीत लागणे व त्यात पाणी आहे असा भास होणे. उपाय- कोंबड्यांस उलटे धरून गांजा हाताने चिवडून सर्व अन्न पोटावाटे काढावे. गांजांतील अन्न कठिण झालेले असल्यास शस्त्रक्रिया करणे अवश्य आहे. (५) पिसे खाणें :- उपाय, थोडा हिंग किंवा रॉकेल पिसें तोडलेल्या जागेस लावावा. लसूण पुष्कळ खावयास घालावा. (६) अंडी खाणे :- कारण- चुना, वाळू व मांसल अन्न भरपूर न मिळणे. यास उपाय, कारणे दूर करणे; तेवढ्यानें सवय गेली नाही तर अंडे एका बाजूने फोडून त्यांत फिनाईल व मोहरी घालावी. कोंबडीने एकदां हे खाल्ले म्हणजे पुन्हां ती अंडी खाण्याच्या भानगडीत पडणार नाही. याशिवाय शेवटचा उपाय म्हणजे ठार मारणे हा होय. (७) फिकट बळस- नर व मादी अशक्त असतील तर अंडी वरील प्रकारची निघतात. उपाय:- कोंबड्यांस हिरवे अन्न पुष्कळ खावयास घालणे व त्यास पूर्ण स्वतंत्रता देणे. (८) फेपरें – याची कारणे (१) अतिशय खाणे (२) नेहमी कोंडून ठेवणे व (३) झुंज लागली असतांही हा रोग होतो. यास उपाय:- पंखाखालील हाडाजवळची एखादी रक्तवाहिनी कापून काढणे, एप्सम सॉल्ट थोडेथोडे देणे, नेहमी अंधारांत ठेवणे व सातू खावयास घालणे. (९) पायफुगी:- पायाचा तळवा सुजून त्यामध्ये पू होतो व कोंबड्यांना चालता येत नाही; उपाय :- पोटीस लावून पिकविणे; नंतर सगळा दर्द काढून टाकून जखम धुवून त्यात आयडोफॉर्म व व्हॅसेलिन ही भरणे. (१०) पेटके येणे:- कारण- सर्द व थंड हवा. यावर उपाय- कारण नाहीसे करणे; लिंबाचा पाला पाण्यांत मीठ टाकून त्यांत उकळावा व त्यानें पाय चोळावेत. उष्णता उत्पन्न करणारे व पौष्टिक असें अन्न खाऊं घालावे. (११) पोटफुगी :- याची कारणे – (१) अति खाणे (२) कातडे वगैरे गिळणे अगर कागद, हाड वगैरे खाणे. यास उपाय- मऊ गांजा झाला असता करतात तोच. याखेरीज ऊन पाणी वरचेवर पाजून किंवा सॅलड तेल पाजून आंतील पदार्थ निघाले तर पहावे. (१२) मेंदूची सूज - यावर काही उपाय नाही. (१३) अर्धांगवायू किवां पक्षाघात :- कांही उपाय नाही. कारणे :- (१) अंडी मोठी असणे. (२) कोंबडी लठ्ठ असल्यामुळे व (३) अंडी येण्याचा मार्ग सुजल्यामुळे. चिन्हे – अस्वस्थता. उपाय : गुदद्वारास एरंडेल लावावे व आत पिचकारी मारावी, आधण आलेल्या पाण्यावर कोंबडीस धरावे. एप्समसॉल्ट एक चमचाभर द्यावे. खाणे थोडे व हलके घालावे. (१५) संधिवात :- हा पेटक्यासारखाच रोग आहे. सर्व सांध्यास सूज येते व कोंबड्यास चालता येत नाही. उपाय- पेटक्याप्रमाणे. (१६) कृमी:- हे तीन प्रकारचे आहेत. (१) फुसरे. हे अगदी बारीक असून पिसांत पुष्कळ भरलेले असतात. कोंबड्यांच्या कातड्याचा जो कोंडा वरचेवर निघतो, त्यावर हे आपली उपजीविका करतात. यांपासून पिलांना त्रास होतो. (२) चपटे- हे उवांसारखे असतात. पंखाच्या मुळात लहान लहान भोके पाडून त्यांत हे राहतात. यांची उपजीविका कातड्यावरच होते. (३) टोके- हे तांबडे-लाल असून मुख्यत्वे करून डोकें, डोळे, कल्ला, शिंगोरी वगैरे भागांवर असतात. हे त्या भागास इतके चिकटून बसतात की, ते मेल्याशिवाय निघत नाहीत. ते आतले रक्त शोषून घेतात व त्यामुळे कोंबडी मरतात. कारण- मुख्यत्वेकरून कोंबड्यांच्या घरात अस्वच्छता असल्यामुळें हे किडे होतात. याच्या नाशाचे उपाय- घरे दर आठ अगर पंधरा दिवसांनी फिनाईलच्या पाण्याने स्वच्छ धुवावी. ती विटांची बांधली असल्यास शेण व रॉकेल एके ठिकाणी करून त्याने सारवावी व घरांत कॅर्बोलिक पावडर टाकावी. कोंबडी व पिले यास वरचेवर नॅपथेलिन किंवा गंधक चोळावा व त्यांच्या खोलीत अगर शेजारी कोरड्या मातीचे किंवा राखेचे घमेले भरून ठेवलेले असावे. कोंबड्यांच्या घरांतील जमीन वर्षातून एकदा तरी करावी. टोके झालेल्या कोंबड्यांस इतर कोंबड्यांपासून निराळे ठेवावे व सर्व टोके हाताने काढून टाकावे. फुसरे, चपटे यांस नॅपथेलिनची पूड चांगली लागू पडते. याखेरीज पाहिजे असल्यास पुढे दिलेले मिश्रण थोडेथोडे चोळावे. टरपेन तेल २ भाग, कापूर १ भाग व खोबरेल १२ भाग जखमा झाल्याबरोबर त्या स्वच्छ धुवून त्यात हळद किंवा आयडोफार्म भरावा. झिंक  अ‍ॅक्साईडचाहि उपयोग करावा. (१७) मोड :- कोंबड्यांचे शेपट्याजवळ एक गांठ असते तीस मोड म्हणतात. ही सुजली म्हणजे हळकुंड किंवा कारवी पेटवून भाजतात. परंतु हे करणे क्रूरपणाचे आहे. तरी असे करू नये. (ले. रा. आर.डी. खांडेकर)

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .