प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें    
      
कोरिया- आशिया खंडातील पूर्वेकडचा एक देश. क्षेत्रफळ सुमारे ८४००० चौ. मै. असून लोकसंख्या (१९११) १६९९८१९१ आहे. परकीय लोकांत मोठा भरणा चिनी लोकंचा (१८९७२) आहे. त्याखेरीज ब्रिटिश प्रजाजन (२२३), अमेरिकन (५९७), फ्रेंच (१०७) व जर्मन (५७) आहेतच. अलीकडे जपानी लोक फार येऊ लागले आहेत.

कोरियाची हवा कोरडी व उत्साहवर्धक असन जपानांतल्याप्रमाणें या ठिकाणी भूकंप अगर प्रचंड झंझावात सुटणें अशा प्रकारचे चमत्कार दृष्टीस पडत नाहीत. उत्तरेकडील कोरियाचा प्रदेश डोंगराळ आहे, पण दक्षिण व पश्चिम या दिशांच्या मुलुखात सपाट मैदाने, मोठ्या नद्या असून फ्यूसन, मोक्यो, चेमुल्पो आणि छिनांपो अशी चांगली बंदरे वसलेली आहेत. उत्तरेकडील भागांत खनिजपदार्थांची समृद्धि आहे, तर नैर्ऋत्येकडील टापूंत शेतकीला अनुकूल अशी जमीन आहे. कोरिया हे भौगोलिक दृष्ट्या फार चांगल्या ठिकाणी वसलेले आहे व त्यामुळें चीन, जपान, सायबेरिया या भागांत कोरियाला आपला व्यापार सुलभ रीतीने चालवितां येतो. कोरिया व उत्तर आशिया यांच्यामध्ये हल्ली आगगाडी चालू झाली आहे.

भाषा व धर्म- कोरियन लोकांची भाषा मोंगोलोतार्तर व जपानी यांमधली आहे. हीत चिनी शब्दांचा पुष्कळ भरणा असून लिहिण्याकरितां लिपीची योजना आहे. सरकारी दप्‍तर जपानी भाषेत असतें. लोकांत धार्मिक भावना कमी आहे. तथापि चीन देशांतल्याप्रमाणेच पूर्वजांची उपासना मोठ्या नेमानें पाळली जाते. कोरियांत बरेचसे बौद्धमठ आहेत, पण यांकडे कोणी फारसे लक्ष देत नाही.

शिक्षण- चिनी साहित्य व कन्फ्यूशियन तत्त्व यांचे ज्ञान उच्च दर्जाच्या लोकांत जे पूर्वी अवश्य मानले जाई ते आतां जपानी वर्चस्वामुळे लोपत चालले असून त्याची जागा चांगल्या व्यावहारिक शिक्षणानें पटकाविली आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या चळवळी या ठिकाणीहि आहेतच. त्यामुळे बाटलेले ख्रिस्ती कोरियांत पुष्कळ दिसतात. तसेंच मुलांमुलींच्या अनेक मिशनरी शाळा देशभर पसरल्या आहेत. पण या सर्व शाळा सरकारी शिक्षणखात्याच्या देखरेखीखाली असतात. यांत्रिक व औद्योगिक संस्थाहि झपाट्यानें निघत आहेत. सुइजेन येथे एक शेतकी शाळा स्थापन झाली आहे. इ.स. १९१४ साली सर्व तर्‍हेच्या एकंदर ४०५ सरकारी शाळा होत्या. खासगी शाळा १२३० होत्या. सेबुलमध्ये १ कोरियन दैनिक व २ जपानी पत्रे निघतात. चेमगुल्यो येथे आणखी काही निघतात. सेबुलला एक सरकारी इंग्रजी दैनिक प्रसिद्ध होते. वृत्तपत्रांवर जपानी सरकारचा मोठा कटाक्ष असतो. त्यामुळे स्वतंत्र विचारांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही.

महसूल व खर्च- सन १९१६ मध्ये कोरियाचा महसूल ४७६४५५९ व जादा महसूल २३,४३,७५४८ येन झाला व १९२०-२१ साली साधा महसूल ६९३४७८२० व जादा ५४४६२१२३ येन इतका झाला. १९१६-१७ मध्ये कोरियाचा वार्षिक खर्च ५७५६२७१० येन व १९२०-२१ साली ११,३३,२८,३३४ येन इतका झाला.

व्यापार- चेमुल्यो, फुसन, वौसन, चिन्नंपो, मोकपो, कुन्सन, सॉग्चिन, पिंगयंग वगैरे बंदरे होत. १९१०-२० सालांच्या दरम्यान कोरियाची परराष्ट्रीय व्यापार बर्‍याच मोठ्या प्रमाणांत झाला. याला मुख्य कारणे म्हणजे जलमार्गाने व पायमार्गाने वाहतुकीची उत्तम सोय, जकातीची सवलत व महायुद्धामुळे वाढलेली मागणी ही होत. इ.स. १९१२ साली कोरियांतून जपानमध्ये ५६१६६०८ येन किंमतीच्या मालाची व परराष्ट्रांत १५३६९००९ येन इतक्या किंमतीच्या मालाची निर्गत झाली. तर १९१९ मध्ये अनुक्रमे १९८१६९१७ व १९९८४८८५४ येन इतक्या किंमतीच्या मालाची निर्गत झाली. १९१२ त जपानमधून व परराष्ट्रांमधून अनुक्रमे २६३९४३४ येन, ४०७१६०१३ येन किंमतीची आय़ात झाली व १९१९ मध्ये अनुक्रमे ९५८६८६४० व १८४९१७९७८ येन किंमतीच्या मालाची आयात झाली.

शेतकी व उद्योगधंदे- कोरिया हा केवळ शेतकीचा प्रदेश आहे. लागवडीत आलेली जमीन सरासरी ७७७०००० एकर आहे. पण शेतकी करण्याची पद्धत सुधारलेली नाही. तांदूळ, गहू व इतर धान्ये होतात. कोरियांतून जिनसेंग नांवाची वनस्पति विपुल प्रमाणांत होते. त्याची अधिक वाढ करण्याकरतां इ.स. १९०८ साली जपानने एक खास अधिकारी नेमला. तसेंच पिकांतील रोगांचा नाश करण्यासाठी व शेतकीची वाढ करण्यासाठी शेतकरी मंडळे स्थापण्यांत आली. इ.स. १९०८-२० या अवधीत शेतकीला उपयुक्त जमिनीची इ.स. १९०८ सालापेक्षा पंधरापट वाढ झाली व इ.स. १९२० साली चिनसेंग वनस्पतीचे उत्पन्न २०००००० येन झाले. मीठ तयार करण्याचे कामही सरकारने आपल्याच ताब्यांत घेतले. इ.स. १९१८ साली १०२३९६१४१ पौंड मीठ तयार झाले. १९२० साली याहीपेक्षा अधिक मीठ तयार करण्याचें सरकारनें प्रयत्‍न चालविले. तंबाखूचा व्यापार कोरियामध्ये फार प्राचीन काळापासून आहे. त्यांतही बरीच प्रगति झाली आहे. इ.स. १९१९ मध्ये तंबाखूची लागवड ४२५२५ एकर जमीनींत होत होती व १४५०११६९ येन इतक्या किमतीची तंबाखू त्या साली तयार झाली.

मलबेरी झाडांची लागवड व रेशमी किड्यांची जोपासना याही बाबतीत सरकारने बरीच खटपट चालविली आहे. १९१८ रेशमी किड्यांचे कोषे (९०९०४२०) ५०००००० येन किमतीचें बाहेर गेले. तरी पण रेशमाचा व्यापार कोरियामध्यें अद्यापि बाल्यावस्थेत आहे.

गुरेंढोरें- गुराढोरांचीहि जोपासना कोरियांत सर्व ठिकाणी केली जाते. शेतकीच्या कामी बैलांचा उपयोग करण्यांत येतो. कोरियांतील गाई दूध कमी देतात व यांचा मांसाकडेच उपयोग करण्यांत येतो. गाईची कांतडी बाहेर देशांत मोठ्या प्रमाणांत पाठवण्यांत येतात. कोरियांत चांगल्या प्रकारचे घोडे उत्पन्न होत नाहीत. पण त्याबद्दल सरकारने बरेच प्रयत्‍न चालविले आहेत. तसेच खेचरे, गाढवे, कोंबडी, मेंढ्या इत्यादि जनावरांचाहि चांगल्या प्रकारची निपज व्हावी याबद्दलही सरकारची खटपट चालू आहे.

फळांच्या लागवडीसंबंधानें समाधानकारक स्थिती आहे. इ.स. १९१३ मध्यें पीअर, जांभळे, चेसनट यांच्या झाडांची जितकी संख्या होती त्याच्या दुप्पट वाढ १९१८ त झाली आहे.

खनिजपदार्थ:- कोरिया जपानला जोडण्याच्या पूर्वी खनिज पदार्थ काढण्याचे काम बहुतेक परकीय राष्ट्रेच करीत असत. इ.स.पूर्वी चार अमेरिकन, २ इंग्लिश व इतर राष्ट्रांच्या एक-दोन कंपन्या यांनी खाणींचा धंदा व्यापून टाकला होता. कोरियांत सोन्याच्या खाणीच मुख्यत: आहेत. इ.स. १९१६ च्या एप्रिल १ तारखेपासून जपानने परकीय लोकांनां खाणीसंबंधाचे हक्क देण्याचे बंद केलें. इ.स. १९१० पूर्वी ज्या कंपन्यांकडे खाणी होत्या, त्या कंपनींना मात्र हाकलून देण्यांत आले नाही. सोनें, चांदी, जस्त, तांबे, शिसे, लोखंड, कोळसा इत्यादि खनिज पदार्थ कोरियांत सापडतात. इ.स. १९१९ मध्यें खाणीपासून होणारे उत्पन्न २५४१४५१० येन झाले.

कारखाने- कारखान्यांची कोरियांत वाण आहे. तरी पण नवीन धंदे अस्तित्वांत येऊं लागले असून कापूस वटण्याच्या गिरण्या, तांदूळाचा भुसा काढण्याच्या गिरण्या, विजेचे कारखाने अस्तित्वांत येऊं लागले आहेत. वनगाई प्रांतांत क्युनिपो या ठिकाणी लोखंडाचा कारखाना निघाला आहे. त्यांतून निरनिराळा लोखंडाचा माल २३५००० टन बाहेर पडतो. पल्प तयार करण्याचा कारखाना शिनविडर येथे निघाला असून कमरपट्टे, घोड्याच्या जिनाचे कातडें इत्यादि कांतडी चांगली तयार होतात.

दळणवळणाची साधनें- इ. स. पूर्वी कोरियांतील रस्त्यांची स्थिती अगदी समाधानकारक नव्हती. पण जपाननें कोरिया आपल्या ताब्यांत घेतल्यावर जवळ जवळ ५००० मैलांचा रस्ता तयार केला. १९१९-२० मध्ये कोरियात ११५३ मैल रेल्वेचे जाळे होते. १९१० पासून टपालगृहांचीहि वाढ बरीच झाली आहे. इ.स. १९२० सली कोरियांत ५६२ पोस्टें होती. ४८७० मैल इतक्या टांपूत तारा चालू झाल्या आहेत.

इतिहास- पूर्वी कोरिया देशांतले लोक अगदी रानटी स्थितींत असून, दर्‍या खोर्‍यांत श्वापदांप्रमाणे रहात असत. या लोकांत अगदी पहिल्याने सुधारणा घडवून आणणारा पुरुष किटझेनामक चिनी गृहस्थ असून तो इसवी सनापूर्वी ११२२ मध्ये हजारो चिनी लोकांसह कोरियमध्ये झाला व त्यानें येथील रानटी लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून त्यांच्यात चिनी तर्‍हेची संस्कृति घडवून आणली. याच्या वंशजांनी इसवीसनापूर्वी चवथ्या शतकापर्यंत राज्य केलें. पुढे इसवीसनानंतर १० व्या शतकापर्यंत अंत:कलहामुळे व परराष्ट्रीयांच्या स्वार्‍यांमुळे हा देश त्रस्त झाला. तरी अशा अंदाधुंदीच्या काळांतहि लेखनकलेचा प्रादुर्भाव, वाङ्मयाची अभिवृद्धी, बौद्ध धर्माचा प्रसार इत्यादि सुधारणा अबाधितपणे होऊं शकल्या. इ.स. ९१३ मध्यें या देशांतील यादवीचा नायनाट `वँग’ नामक एतद्देशीय वीरानें करून, यात राष्ट्रीय घटना घडवून आणली व याला `कोरिया’ हें नांव देऊन यांतील बौद्ध धर्माला राष्ट्रीय स्वरूप दिले. याच्या वेळी कोरियाची राजधानी `साँगडो’ नामक शहरी होती.

पुढे इ. स. १३९२ मध्ये `वँग’ च्या घराण्याचे वर्चस्व लोपले व `नितैजो’ अथवा `लिटन’ नामक राजाचा अंमल सुरू झाला. कोरियांत इ.स. १९१० पर्यंत जे राजे राज्य करीत आले, त्यांचा मूळ पुरुष हाच होय. यानें चीन देशाच्या त्या वेळच्या `मिंग’ नामक बादशहाशी सख्य केलें व त्याचे मांडलिकत्व पत्करून त्याच्याकडून `कोरिया देशाचा सम्राट’ अशी मान्यता मिळविली. यानें सुरळीत राज्यव्यवस्थेकरितां जी योजना अमलांत आणली तीच इ.स. १८९५ पर्यंत या देशांत चालू होती; व सध्यांहि काही अंशी चालू आहे. यानें बर्‍याच चांगल्या सुधारणा घडवून आणल्या. मानवयज्ञाच्या व वृद्धांना जिवंत गाडण्याच्या दुष्ट चाली बंद केल्या. चिनी वाङ्मयांत परीक्षा घेणे सुरू करून त्यांत जे उत्तीर्ण होत त्यांना राज्यांतील मोठमोठ्या हुद्याच्या नोकर्‍या देण्याची पद्धत सुरू केली आणि चीनमधील `कन्फ्यूशियस धर्मगुरूंची शिक्षणविषयक, शासनविषयक व सामाजिक पद्धती अमलात आणून `कन्फ्यूशियस’ पंथासच राष्ट्रीय धर्माचे स्वरूप दिले. कोरियावर या सुधारणांचा पगडा पुढें पाच शतकांपर्यंत चांगला टिकला व येथील प्रजा सुखानें वास्तव्य करीत होती. पण नंतर कोरियाचें दुर्दैव ओढवलें आणि त्यावर इ.स. १५९२ मध्ये जपानचे परचक्र आलें. त्यास करियानें चीनच्या साहाय्यानें १ वर्षेपर्यंत तोंड दिलें. पण अखेरीस यांतील स्किल व बरीच जुनी शहरे जपानच्या हस्तगत झाली. जवळ जवळ सर्व देश ओसाड झाला आणि यांतील कलाकौशल्याचे भांडार व कलानिपुण पुरुष जपानमध्ये नेण्यांत आले. शेवटी इ.स. १५९८ त कोरियाच्या फुसन नामक बंदरांतील माशांचा व्यापार करण्याचा हक्क जपानला असावा आणि याशिवाय कोरियानें जपानला दरवर्षी मोठी खंडणी द्यावी, या अटीवर हे भयंकर युद्ध थांबले. या जबरदस्त आघातामुळे कोरियाची घडी जी एकदां बिघडली तिचा जम पुन्हां कधीच नीट जमला नाही.

नंतर इ. स. १८६६, १८६७ व १८७१ या वर्षी फ्रेंच व अमेरिकन लोकांनी या देशांत येऊन, धर्मप्रसाराच्या मिषाने कांही राजकीय धोरण लढवून आपली तुंबडी भरण्याचा प्रयत्‍न केला, पण त्यांना मुळीच दाद मिळाली नाही. पुढे इ.स. १८७६ मध्ये चीन देशाच्या संमतीने जपानने कोरियाशी तह घडवून आणला व तहान्वये फुसन मध्यें आपली वसाहत करून व्यापाराचे बस्तान नीट बसविलें आणि इ.स. १८८० मध्ये `वॉनसन’ (गेनसन) व `चेमुलयो’ ही दोन बंदरे व्यापाराकरितां करवून घेतली. इ.स. १८८२ मध्ये चीननें आपले व्यापाराचे व सरहद्दीसंबंधी नियम प्रसिद्ध केलें आणि अमेरिकेने कोरियाशी व्यापारी तह जुळवून आणला. कोरियाच्या पडत्या कालाचा इतर राष्ट्रांनी असा फायदा घेतला, असे पाहतांच यूरोपीय राष्ट्रांनी आपले घोडे पुढें दामटले. इ.स. १८८३ मध्ये जर्मनी व `ग्रेट ब्रिटन’ इ.स. १८८४ मध्ये इटली व रशिया, इ.स. १८८६ मध्ये `फ्रान्स’ आणि इ.स. १८९२ मध्ये `ऑस्ट्रिया’ या राष्ट्रांनी कोरियाशी व्यापारी तह केलें आणि `सिऊल’ राजधानीचे बंदर व्यापाराकरिता खुले करवून घेतले. इ.स. १८९७ व १८९९ च्या दरम्यानच्या अवधीत यांच्या कारस्थानाचे वजन कोरियावर चांगलेच पडले व आणखी कांही बंदरे या परकीय व्यापार्‍यांस खुली झाली. एवंच सर्व कोरिया देश आतां परराष्ट्रीयांस मोकळा झाला.

आतां या राष्ट्राशी एकामागून एक झालेल्या व्यापारी घडामोडीत जो काळ निघून गेला त्या अवधीत म्हणजे इ.स. १८८२ ते १८९७ च्या दरम्यान कोरियाची अंत:स्थिती कशी काय होती इकडे आपण वळूं. इ.स. १८८२ त येथील बादशहाच्या बापाने म्हणजे तैवोन कुनानें कट करून जपानी वकीलांच्या ठाण्यावर हल्ला केला; पण तो यशस्वी न झाल्यामुळे त्याच्या नुकसानीच्या भरपाईदाखल कोरियाला बरीच मोठी रक्कम जपानला द्यावी लागली. नंतर यादवी बोकाळून तीत काही मुत्सद्दी बळी पडले व पुढें इ.स. १८९४ मध्ये तर मोठे बंड झाले. ते मोडण्याकरिता बादशहाला चीनची मदत मागावी लागली. चीनने मदत पाटविली.  पूर्वीच्या चीन व जपानमध्ये झालेल्या तहान्वये जपानला आपला हेतू कळविला. जपाननेंही ही संधि साधून आपले सैन्य कोरियांत उतरविले. सिऊल राजधानी व तहांत नमूद केलेली सर्व बंदरे आपल्या ताब्यांत घेतली आणि ते बंड कायमचे मोडण्याकरितां ज्या काही राजकीय सुधारणा पाहिजे होत्या, त्यांचा मसुदा चीनने व जपानने मिळून करावा अशी सूचना पुढे आणली. पण त्या सुधारणा कोरियानेच कराव्या, त्यांत कोणीहि ढवळाढवळ करूं नये आणि ही तडजोड होण्याच्या पूर्वी जपाननें आपले सैन्य कोरियांतून काढून घ्यावे असे त्या सूचनेस चीनचे उत्तर मिळाले. जपानला चीनची ही योजना पटली नाही, म्हणून ती त्याने अमान्य केली व राजाच्या महालावर हल्ला करून तो आपल्या ताब्यांत घेतला. याचा परिणाम असा झाला की, पुढें चीन व जपान यांमध्यें युद्ध जुंपलें. या युद्धांत जपानला विजय मिळाला, व कोरियांतील चीनचें वर्चस्व पार नष्ट होऊन त्याच्या जागी जपानचें वर्चस्व प्रस्थापित झालें. तेव्हांपासून पुढें कोरियांमध्ये जपानी सल्लागारांच्या मदतीने बर्‍याच चांगल्या सुधारणा अमलांत आल्या; आय व व्यय खाते सुधारण्यांत आले, इतर खात्यांतील अवाढव्य खर्चाची योग्य छाटाछाट करण्यांत आली. करांची आकारणी समतेच्या तत्त्वावर झाली, टपालाची व शिक्षण देण्याची पद्धत अमलात आली, लग्न करण्याची वयोमर्यादा वाढविण्यांत आली आणि आणखी इतर बारीक सारीक सामाजिक सुधारणा घडून आल्या. एकूण कोरियाच्या राजकीय, सामाजिक, शिक्षणविषयक वगैरे सर्व बाबींत सुधारणा घडून आल्या व त्यांत जपानचा हात होता.

पण हें जपानचें वजन फक्त १८ महिनेच टिकलें. कारण इ.स. १८९५ च्या ऑक्टोबर महिन्यांत `तैवान कुनने’ जपानी सैन्याच्या साहाय्यानें राजवाड्यावर छापा घातला व बादशहास कैद केलें. परंतु पुढे चार महिन्यांनी बादशहा तुरुंगांतून निसटला व रशियाच्या वकिलाचें जेथें ठाणे होते तेथें पळून गेला. तो तेथें इ.स. १८९७ पर्यंत राहिला. याचा परिणाम असा झाला की जपानचें कोरियामधील वजन कमी झालें, प्रतिगामी चळवळ सुरू झाली आणि बादशहाने रशियाच्या मदतीनें आपल्यावरील जपानचा दाब पार झुगारून देऊन आपली सत्ता पूर्ववत अनियंत्रित करून घेतली. या रशियाच्या ढवळाढवळीमुळें बादशहाच्या वाढलेल्या अनियंत्रित सत्तेचा परिणाम असा झाला की कोरियांत अंदाधुंदी माजली. पुन्हां रशियाची जपानच्या कोरियामधील व्यापाराचा नाश करण्याची कावेबाज मसलत जारीनें चालूंच होती. यामुळें जपानला शेवटी रशियाचे विरुद्ध हातीं शस्त्र धरावे लागलें. या रूसोजपानी युद्धांत (१९०४-५) जपान विजयी झाला व तेव्हांपासून त्यांचे कोरियांत पूर्ववत वजन प्रस्थापित झालें. पण कोरियांतील लोकांनां जपानचे वजन नको होतें. त्यामुळे येथें वारंवार दंगे होत असत व बादशहाहि जपानविरुद्ध कट करीत असे. पण शेवटी इ.स. १९०६ मध्यें बादशहाला अपयश येऊन आपले अधिकार आपल्या मुलाला द्यावे लागले. एवढें झालें तरीहि कोरियाचें जपानला प्रतिगामी असलेले वातावरण निवळेना. तेव्हां इ.स. १९१० मध्यें हा देश जपाननें आपल्या पूर्ण ताब्यांत घेऊन राजाला पदच्युत केलें. आतां कोरिया सर्वस्वी जपानचा आहे.

१९१० च्या ऑगस्ट महिन्याच्या २२ व्या तारखेस कोरिया हें जपानी साम्राज्यांतर्गत संस्थान म्हणून ठरले व त्याला पुरातन काळी लावण्यांत येत असलेले `चोसेन’ हे नांव पुन्हां देण्यांत आले. जपानी साम्राज्याचा एक भाग झाल्यामुळे कोरियाचे स्वातंत्र्य नष्ट झालें. तरी पण जपानी लोकांच्या राज्यपद्धतीशी व प्रागतिक धोरणाशी कोरियन लोकांचा निकट संबंध येऊं लागल्यामुळें कोरियाचीहि सर्वांगीण प्रगति आस्ते आस्ते होऊं लागली. याच वेळी कोरियांतील व कोरियाच्या बाहेरील इतर लोकांचा असा एक पक्ष होता कीं, जो कोरियाचें स्वातंत्र्य नष्ट केल्याबद्दल जपानी लोकांवर एक सारखा जळफळत होता. स्वातंत्र्यापुढें किरकोळ सुधारणा तुच्छ आहेत. स्वातंत्र्याविषयी राष्ट्राची प्रगति व्यर्थ होय, अशा प्रकारची विचारसरणी हा पक्ष मांडीत होता व त्यांत पुष्कळ तथ्य होते ही गोष्टहि निर्विवाद आहे. तथापि पारतंत्र्याच्या स्थितीतहि इतर कांही दृष्टींनी कोरियाची प्रगति होत होती हेंही नाकबूल करून भागणार नाही. कोरिया जपानला जोडण्यांत आल्यावर त्याची राज्यव्यवस्था पाहण्याकरतां जनरल टेरायुची याला व्हाइसराय म्हणून नेमण्यात आलें व त्याच्या मदतीला यमागाटा याची नेमणूक झाली. १९१६ मध्ये जनरल टेरायुची याच्या जागी जनरल काउंट हसेगवा हा आला. कोरियामध्यें या सुमारास बरेच दंगे होत होते. चोर व दरवडेखोरांच्या टोळ्या चहूंकडे पसरल्या होत्या. त्यामुळे रहिवाश्यांच्या जीवाला व मालमत्तेला वारंवार धोका पोचत असे. याचा बंदोबस्त करण्याकरतां, काउंट हसेगवा यांनी पोलिस शिपाई व लष्करी शिपाई यांचे एकीकरण करून चोर, दरवडेखोर वगैरे लोकांवर धाक घालण्याची तरतूद केली. १९१९ पर्यंत म्हणजे कोरिया जपानशी जोडण्यांत आल्यापासून सुमारे ८।९ वर्षे कोरियामध्ये अराजक लोकांचा विशेषसा त्रास नव्हता. पण १९१९ साली मात्र अराजक लोकांच्या दंग्याला सुरुवात होऊन असंतोषाचा वणवा चहूंकडे थोडक्या काळांत पसरला. या दंग्याला व असंतोषाला दोन-तीन कारणेंही होती. एक तर महायुद्धांत समता व स्वातंत्र्य इत्यादि जी उदात्त तत्त्वें विल्सन साहेबांनी पुढे मांडली, त्यांचा परिणाम कोरियन लोकांच्या मनावर होऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळावे अशी कोरियनांची साहजिकच प्रवृत्ति झाली. दुसरें कारण म्हणजे जपानी लोकांनी राज्यकर्त्यांच्या नेहमीच्या वहिवाटीला अनुसरून कोरियामध्ये सुधारणा करण्याच्या व कोरियन लोकांनां राज्यकारभारांत हक्क देण्याच्या बाबतीत हळू हळू मागचे पाऊल घेण्यास सुरुवात केली. यामुळे अधिक असंतोष पसरून बर्‍याच ठिकाणी दंगेधोपे झाले. पण जपाननें सैन्याच्या जोरावर ते दंगे मोडून टाकले व कोरियन लोकांनां सुधारणेचा हप्ता देण्याची त्यांनी तजवीज केली. या हप्त्यांत तीन-चार प्रमुख गोष्टी होत्या. (१) त्यावेळेपावेतों एखादा सेनापति हा कोरियाचा व्हाइसरॉय म्हणून राज्यशकट हांकीत असे; ती पद्धत यापुढे बंद होऊन सिव्हिलियन नेमण्याचें ठरलें. (२) कोरियाचा व्हाइसरॉय यानें जपानच्या मुख्य प्रधानाला जबाबदार रहावयाचें ठरलें. (३) सेनापतीचें काम स्वतंत्र अधिकार्‍याकडे देण्यांत यावयाचें ठरलें. (४) व लष्करी शिपायांच्या बदली साधे पोलीस हे शांतता ठेवण्याच्या कामी नेमावयाचें ठरले. त्याचप्रमाणे जनरल हसेगवच्या जागी बॅरन सॅटो याची नेमणूक व्हाइसराय म्हणून झाली व त्याच्या मदतीला डॉ. पिडझूनो याला देण्यांत आले. याशिवाय शिक्षण, उद्योगधंदे व सिव्हिल सर्व्हिस या बाबतींत जपानी लोकांनां जे हक्क होते तितकेच हक्क हळू हळू कोरियन लोकांनांही देण्यांत येतील असें, फर्मान जपानच्या त्यावेळच्या प्रधानानें (हारानें) प्रसिद्ध केलें. अशा रीतीनें पुन्हां कोरियामध्यें कशीबशी शांतता प्रस्थापित झाली. मधून मधून जाळपोळ, मारामारी इत्यादि प्रकार स्वातंत्र्येच्छू उर्फ अराजक लोकांनी चालू ठेवलेच होते व १९२० साली तर जपानी वकिलाला, त्याच्या परिवाराला व इतर जपानी लोकांना कोरियन बंडखोरांनी ठार मारलें तरी पण हळू हळू हा असंतोष कमी होत होता.

महात्मा गांधींनी जशी हिंदुस्थानांत असहकारिता पुकारिली तद्वत कोरियन राष्ट्रीय पक्षानेंहि जपान सरकारशी असहकारिता करण्याचें ठरविले. १९२३ च्या अखेरीस जपानांत मोठा भूकंप झाला. तेव्हां तेथील कोरियनांनां या अनर्थाचे जबाबदार धरून त्यांचा अमानुष छळ केला. पण कोरियनांची मुस्कटदाबी केली गेल्याने त्याचा जगांत गवगवा झाला नाही. या सर्व गोष्टींवरून कोरिया शांतपणे जपानच्या कक्षेंत फार दिवस राहीलसे वाटत नाही. (चोसेन (कोरिया) राज्यपद्धतीचे वार्षिक अहवाल, अ‍ॅलनथिंग्स कोरियन : मिसेस बिशप- कोरिया अँड हर नेबर्स; ग्रिप्स दि हर्मिट नेशन; हॅमिल्टन- कोरिया; लाँगफोर्ड- दि स्टोरी ओफ कोरिया.)

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .