प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें          

कोर्ट- कोर्ट या इंग्रजी शब्दाचा मूळ अर्थ कुंपण घातलेली खुली जागा असा आहे. हल्ली याचा अंगण हा एक व न्यायसभा हा दुसरा असे दोन अर्थ प्रचारांत आहेत.

इंग्लंड- पूर्वी इंग्लंडमध्ये सर्व न्यायसभा नुसता न्याय निवाडा करणार्‍या नव्हत्या. परगणान्यायसभा म्हणजे जमीनदार व कांही अधिकारी अशांचे एक निवडक मंडळच होते व या मंडळाचा राजकीय, न्यायसभा व कायदेमंडळ या तिन्ही बाबतीत अधिकार चालत असे. परंतु आतां न्यायसभांना न्यायनिवाड्याशिवाय दुसरे कोणतेहि अधिकार राहिले नाहीत. न्यायकचेरीतील प्रत्येक खटल्यांत तीन पक्ष असलेच पाहिजेत. एक वादी, दुसरा प्रतिवादी व तिसरा न्यायाधीश. कायदेपंडितांच्या भाषेत बोलावयाचे म्हणजे न्यायाच्या बाबतीतील सर्व अधिकार राजाचे असतात आणि तो प्रत्येक न्यायकचेरीत हजर राहतो. परंतु एकाच वेळेस निरनिराळ्या ठिकाणी हजर राहणे अशक्य अशल्यामुळे, तो आपले प्रतिनिधी नेमतो. तेच न्यायाधीश होत. त्यांचे अधिकार पार्लमेंट सभा अथवा लेटर्स पेटेंट यांजकडून मिळालेले असोत किंवा परंपरागत असोत, त्यांनां राजाची संमति मिळालेली असते. ही गोष्ट निर्विवाद आहे. पूर्वी न्यायनिवाडा करणे हे राजाच्या कामापैकी एक काम असे आणि चवथ्या एडवर्डच्या कारकीर्दीपर्यंत राजा त्याकरितां दौर्‍यावर जात असे. पुढे स्वतंत्र न्यायसभा स्थापन झाल्यानंतरदेखील राजा व त्याचें सल्लागार मंडळ यांकडे कांही अधिकार राखून ठेवले होते. इंग्लंडच्या राजाचें प्रत्यक्ष न्यायदानाचें शेवटले कृत्य म्हणजे पहिल्या जेम्सनें चान्सरी व कॉमन लॉ या दोन कोर्टातील तंटा तोडल्याचे होय. पार्लमेंटरी राज्यपद्धति सुरू झाल्यापासून कोर्टाच्या अधिकारावर कायदेमंडळाचे नियंत्रण असते व राजा त्या मंडळाचा सभासद असल्यामुळें त्याचा न्यायखात्याशी अप्रत्यक्ष संबंध येतो.

न्यायकचेर्‍यांचे निरनिराळ्या दृष्टीनें निरनिराळे भाग पडतात. (१) पहिला भाग म्हणजे वरिष्ठ व कनिष्ठ हा होय. कॉमन लॉ, चान्सरी व हायकोर्ट ही वरिष्ठ कोर्टे होत व जिल्हा व परगणा ही कनिष्ठ कोर्टे होत. (२) दुसरा प्रकार म्हणजे दप्‍तरी व बिनदप्‍तरी कोर्टे. पहिल्या प्रकारच्या कोर्टांतील निवाडे व्यवस्थित व सविस्तर लिहिलेले असतात आणि ते नेहमी कायम ठेवतात. त्या निवाड्यांस कोणी हरताळ लावूं शकत नाही आणि ते निवाडे अबाधित असल्यामुळे त्यांबद्दल कोणी शंका घेतल्यास त्यांस शिक्षा करण्याचा त्या कोर्टास अधिकार आहे. (३) कोर्टाचा तिसरा प्रकार म्हणजे दिवाणी व फौजदारी. (४) चवथा प्रकार म्हणजे मुख्य खटले चालविणारी कोर्टे व निवाड्यांचा विचार करणारे हायकोर्ट. हे नवे खटले चालविते व कनिष्ठ कोर्टाच्या निवाड्याचा फेरविचार करते. त्या कोर्टावर दुसरे अपील कोर्ट आहे व त्यावर लॉर्डांची सभा ही होय. (५) याच्या शिवाय वरील कोणत्याहि विभागांत न पडणारी किरकोळ कामाची कोर्टे होत. उदाहरणार्थ:- डरहॅम, लँकेस्टर येथील किरकोळ कामाची कोर्टे.

फौजदारी कोर्टे- (१) सर्वात खालच्या दर्जाची फौजदारी कोर्ट म्हटली म्हणजे जस्टिस ऑफ दि पीस ही पदवी मिळालेल्या लोकांनी चालविलेल्या कचेर्‍या. त्यांना बारीक सारीक गुन्ह्यांची चौकशी करण्याचा अधिकार दिलेला असतो. लंडनसारख्या मोठ्या शहरांत पगारी मॅजिस्ट्रेट नेमलेले असतात. जस्टिस ऑफ दि पीस हे मोठाले गुन्हे चौकशीकरिता वरिष्ठ कोर्टाकडे पाठवूं शकतात. (२) त्रैमासिक अदालतींना मोठ्या गुन्ह्यांची चौकशी करण्याचा अधिकार दिलेला असतो. या कोर्टांना जे खटले चालविता येत नाहीत, त्यांची एक यादी प्रसिद्ध केलेली असते. (३) या अदालती वर्षातून फक्त दोनदा एकेक परगण्यांत काम करितात. परंतु १८७६ व १८७७ च्या कायद्यानें एकापेक्षां अधिक परगण्याकरितां एक अदालत काम करू शकते. न्यायाच्या बाबतीत लंडन शहराचा एक विशिष्ट दर्जा असल्यामुळे त्याठिकाणी इ.स. १८३४ च्या फौजदारी कोर्टाच्या कायद्यान्वये फौजदारी स्वरूपाचें एक वरिष्ठ कोर्ट आहे. या कोर्टाचे न्यायाधीश निरनिराळ्या दर्जाचे निवडलेले असतात. व हे कोर्ट इ.स. १९०७ साली बांधलेल्या लंडन कोर्टाच्या इमारतीत भरतें. फौजदारी वरिष्ठ कोर्टाकडे कायद्याच्या किंवा वस्तुस्थितीच्या मुद्द्यावर अपील करता येते.

दिवाणी कोर्टे- काही किरकोळ बाबी सोडून दिल्यास दिवाणी स्वरूपाचे सर्व दावे परगणा कोर्ट व हायकोर्ट यांपुढे चालतात. ज्युडिकेचर कायद्यानें फेरफार केल्यामुळें आतां दिवाणी कोर्टाची रचना खाली लिहिल्याप्रमाणे आहे. वरिष्ठ दर्जाचे एक कोर्ट आहे. त्याचें हायकोर्ट व अपील कोर्ट असे दोन कायमचे भाग आहेत. पहिल्या म्हणजे हायकोर्टात आरमारी, वारसा, घटस्फोट, किरकोळ व चान्सरी कोर्टांतील दावे वगैरे स्वरूपाचे काम चालतें. आणि अपील कोर्टाकडे सर्व दर्जाच्या कोर्टाकडील अपिलांचे काम असते. लॉर्डोच्या सभेत इंग्लंडच्या कोर्टावरील अपिलांचा विचार केला जातो. (१८७६ च्या कायद्यान्वये) आणि ज्यावेळेस पार्लमेंट सभा बरखास्त किंवा अनिश्चित कालपर्यंत तहकूब झाली असेल त्यावेळेस स्कॉटलंड व आयर्लंडमधील अपिले ऐकण्याचें काम चालते. इंग्लंडमधील न्यायखात्याचा हा एक विशेष आहे कीं, तेथील सर्व कोर्टे एकाच सत्तेपासून म्हणजे राजा व त्याचें सल्लागार मंडळ यांपासून उत्पन्न झाली. इतर कामांत राजा व त्याचें मंडळ हेंहि काम करीत असे. पुढे क्युरिआ रेजिस म्हणून एक मंडळ निर्माण झाले व त्याला फक्त न्यायाचेच काम दिले. जमीनमहसुलाच्या बाबतीत उत्पन्न होणार्‍या तंट्यांचा निवाडा करणारे एक्सचेकर नांवाचे स्वतंत्र कोर्ट निर्माण झाले. मॅग्नाचार्टाच्या योगाने राजा नसेल अशा ठिकाणी देखील कोर्टे स्थापन झाली. क्युरिआ रेजिस याची वसुली आणि किरकोळ ही दोन उपांगे झाल्यावर राजाचें म्हणून एक स्वतंत्र कोर्ट झालें, त्याला किंग्ज बेंच म्हणतात. अशा रीतीनें एकाच सत्तेपासून सारख्या अधिकाराची तीन कोर्टे अस्तित्वांत आली. परंतु राजाचा न्यायाच्या बाबतीत वरिष्ठ अधिकार शिल्लक राहिलाच व तो न्यायाध्यक्षाकडे गेला. याच पद्धतीवर इ.स. १८३२ साली स्थापन झालेले प्रिव्ही कौन्सिल होय. याकडे वरिष्ठ कोर्टाचे सर्व अधिकार आहेत. लॉर्डाच्या सभेला जो अपिले ऐकण्याचा अधिकार आहे तो पूर्वीच्या राष्ट्रीय मंडळाचा अवशेष आहे.

अमेरिकन संयुक्त संस्थानें- या ठिकाणची न्यायपद्धति तेथील राज्यघटनेने कायदेमंडळ आणि अम्मलबजावणी खातें यांपासून स्वतंत्र अशी केली आहे. तेथील कोर्टे तीन प्रकारची आहेत. (१) मुख्य कोर्ट, (२) फिरती कोर्टे (३) व जिल्हा कोर्टे. पहिलें तेथील शासनपद्धतीने निर्माण केलें आहे. त्या कोर्टात इ.स. १९०९ साली नऊ न्यायाधीश होते. ते अध्यक्षाच्या शिफारशीनें मुख्य सभेने नेमले होते. त्यांची नेमणूक तहाहयांत असते व फक्त गैरवर्तणुकीमुळेच कायते त्यांनां कामावरून दूर करतां येतें. या दृष्टीने त्यांच्या नेमणुका इंग्लंडमधील न्यायाधिशांच्या नेमणुकांपेक्षां जास्त भक्कम पायावर केल्या असतात. हे कोर्ट वाशिंग्टन येथे ऑक्टोबर ते जुलैपर्यंत दरवर्षी भरते. सेशन्स राजधानीच्या ठिकाणी भरवितात. या ठिकाणी असा एक नियम आहे की, कोणताहि निकाल सहा न्यायाधिशांनी मिळून सांगितला पाहिजे. यामुळे कोर्टामध्ये एकापेक्षां जास्त न्यायासने होऊ शकत नाहीत. या नियमामुळे प्रत्येक खटल्याची जरी कसून चौकशी केली जाते तरी न्यायदानाच्या बाबतीत दिरंगाई होते. प्रत्येक खटल्याचा दोनदा विचार केला जातो. प्रथम मताधिक्य कोणत्या बाजूस आहे हे ठरविण्याकरितां प्रत्येकास विचार करावा लागतो व तें निश्चित झाल्यावर कोर्टाने तें कायम करण्याच्या वेळी त्याचा पुन्हां विचार केला जातो.

शासनपद्धतीने दिलेल्या अधिकारान्वयें तेथील राष्ट्रीय सभेनें कनिष्ठ कोर्टे निर्माण केली आहेत. एकंदर एकोणतीस न्यायाधीश मिळून निरनिराळ्या नऊ टापूंत काम करतात आणि प्रत्येक टापूवरची देखरेख वरिष्ठ कोर्टाच्या एकेका न्यायाधीशाकडे दिलेली असते. या कोर्टावरील अपील कोर्टात तीन न्यायाधीश असतात. (१) वरिष्ठ कोर्टातील, (२) परगणा कोर्टातील व (३) फिरत्या कोर्टातील. कांही खटल्यांवर खालच्या कोर्टातून वरिष्ठ कोर्टात अपील करता येते व काहींत खालच्या अपीलकोर्टाच्या निकालाविरुद्ध वरिष्ठ कोर्टाकडे अपील करता येते. जिल्हा कोर्टे एकंदर नव्वद आहेत. बहुतेकांत एकच न्यायाधीश असतो. त्या ठिकाणी स्थानिक सरकारविरुद्ध असलेल्या तक्रारी ऐकण्याकरिता एक निराळे कोर्ट निर्माण केलें आहे. हे एक न्यायखात्याचा भाग नसून राष्ट्रीय सभेने न्यायखात्याचे काम कमी करण्याकरितां निर्माण केलें आहे.

अधिकाराच्या बाबतीत संयुक्त कोर्टे व संस्थानी कोर्टे यांत फरक आहे. संयुक्त कोर्टाकडे फक्त पुढीलप्रमाणे कामे असतात :- (१) संयुक्त संस्थानांचे कायदे, त्यांच्या संमतीने केलेले तहनामे व यांच्या बाबतीत उद्भवणारे कायद्याचे प्रश्न; (२) वकिलाती किंवा सार्वजनिक प्रधान; (३) समुद्रमर्यादा; (४) ज्या भांडणांत संयुक्त संस्थाने हा एक पक्ष आहे; (५) दोन संस्थाने एक संस्थान व दुसर्‍या संस्थानाची प्रजा, निरनिराळ्या संस्थानांतील प्रजा, संस्थान किंवा त्यांतील प्रजा, संस्थान किंवा त्याची प्रजा आणि परराष्ट्रीय किंवा त्यांतील प्रजा यांमध्ये असलेले खटले. परराष्ट्राबरोबर असलेल्या खटल्यांचे बाबतीत हल्ली वरील कोर्टाचे अधिकार जरा संकुचित केलें आहेत. वरिष्ठ कोर्टाचा अधिकार हा वकिलाती आणि संस्थानासंस्थानांतील तंटे यांच्या बाबतीत मुख्य चौकशी कोर्टासारखा आहे व इतर बाबतीत अपील कोर्टाचा आहे. जर एखाद्या संस्थानी कोर्टापुढे चाललेल्या खटल्यांत कायद्यासंबंधी काही प्रश्न उपस्थित झाला व त्या कायद्याचे म्हणणे अमान्य झाले, तर पक्षकारास आपला खटला फेडरेल कोर्टाकडे वर्ग करून घेता येतो. जर एखाद्या खटल्यांत एखादा तह, संयुक्त संस्थानांचे अधिकार, एखादा कायदा किंवा त्याची युक्तायुक्तता किंवा राज्य घटनान्वये मिळालेली पदवी, अधिकार वगैरे यासंबंधी वाद असेल त्या वेळेस सर्व खटले वरिष्ठ कोर्टाकडे वर्ग करण्यांत येतात.

राष्ट्रीय सभेचा एखादा कायदा किंवा संस्थानी कानू बरोबर किंवा चूक म्हणण्याचा जो अधिकार फेडरेशनच्या घटनेने वरिष्ठ कोर्टाचा दिलेला आहे हेंच अमेरिकेतील न्याय पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. कारण असा अधिकार त्या कोर्टास लोकांनीच दिसा आहे. फेडरेशनच्या घटनेशी विसंगत असलेले सर्व कायदे रद्द आहेत असे म्हणण्याचा अधिकार वरिष्ठ कोर्टाला आहे व तो असणे जरूर आहे. फेडरल कोर्टे घटनेसंबंधी प्रश्नावर कधीही आपले मत देत नाहीत. कोर्टापुढे जर तोच प्रश्न असेल तर चालू खटल्यापुरतेंच मत देतात.

हिंदुस्थान- हायकोर्ट ही हिंदुस्थानसरकारच्या हुकुमाने स्थापन झाली आहेत. त्यांचा अधिकार त्या त्या प्रांतांतील दिवाणी किंवा फौजदारी वगैरे सर्व कोर्टांवर चालतो. हायकोर्टांना इलाख्याच्या शहराच्या हद्दीतील दिवाणी अगर फौजदारी स्वरूपाचे सर्व दावे अगर खटले चालविता येतात. त्या मर्यादेच्या बाहेरील पाच हजारांवरील दाव्यांतील सर्व अपिले व त्याच्या आतील दाव्यांतील जिल्हा जज्जाकडील अपिलांच्या निकालांविरुद्ध अपिले करण्याचा अधिकार आहे व त्या मर्यादे बाहेरील फौजदारी खटले इच्छा अगर जरूर असल्यास आपल्याकडे घेतां येतात. इलाख्याच्या ठिकाणी सुद्धां दिवाणी अगर फौजदारी स्वरूपाच्या खटल्याशिवाय आरमारी, नादारी, घटस्फोट मृत्युपत्रे वगैरे सर्व स्वरूपाचे दावे चालविण्याचा अधिकार आहे. सर्व हायकोर्टांत जास्तीत जास्त पंधरा न्यायाधीश नेमण्याचा अधिकार विलायतच्या राजाकडे आहे. त्यापैकी एक सरन्यायाधीश असतो. त्यापैकी एक तृतीयांश इंडियन सिव्हिल सर्व्हिसमधील असावे लागतात, एक तृतीयांश विलायतेतील बॅरिस्टरपैकी असावे लागतात व बाकीचे त्या त्या हायकोर्टातील पाच वर्षे काम केलेल्या बॅरिस्टरातून किंवा दहा वर्षे काम केलेल्या वकिलांतून निवडतात. हे न्यायाधीश हिंदुस्थानांतील सरकारास जबाबदार नसतात. हायकोर्टाच्या कामाकरिता निरनिराळे भाग केलेले असतात. एका न्यायाधिशाकडे हायकोर्टाच्या दिवाणी स्थलमर्यादेंतील दिवाणी दावे ऐकण्याचे काम दिलेले असते. मुंबई इलाख्यांत ते दावे दोन हजारांपेक्षा जास्त किंमतीचे असावे लागतात. त्याच्या निकालाविरुद्ध अपील प्रिव्ही कौन्सिलकडे असतें. एकाकडे मृत्युपत्रे, आरमारी, वारसा वगैरे संबंधी कामे असतात. इलाख्यांतील दुसरी अपीले ऐकण्याकरितां सर न्यायाधीश व एक मदतगार असे असतात. एकाकडे मधून मधून फौजदारी सेशन ऐकण्याचे काम दिलेले असते. वरील स्वरूपाच्या एकेका कोर्टानें काम होत नसेल तर एकेका स्वरूपाची दोन-दोन तीन-तीन कोर्टे सुरू करण्याचा अधिकार सरन्यायाधिशास आहे. त्याचप्रमाणे इलाख्याच्या ठिकाणी व जेथे जरूर आहे अशा मोठाल्या व्यापाराच्या शहरी किरकोळ दाव्यांचे एक निराळे कोर्ट स्थापन केलेले असते. त्या कोर्टात फक्त पैशांच्या देवघेवीचे खटले संक्षिप्‍त पद्धतीने चालतात. मुंबईस याची आर्थिक मर्यादा दोन हजार रुपये आहे. पुणे व अहमदाबाद या ठिकाणी एक हजार रुपये आहे. पुणे व अहमदाबाद या ठिकाणी एक हजार रूपये आहे ही मर्यादा इतर जिल्ह्यांत सबजज्जास पांचशे रुपयेपर्यंत देवघेवीचे दावे संक्षिप्‍त पद्धतीनें चालविण्याचा अधिकार हायकोर्ट जरूर तेथें देते. त्यांच्या निकालावर अपील नसते. हायकोर्टामार्फत फेर चौकशी होते. मध्यप्रांत व सिंधप्रांत या ठिकाणी ज्युडिशिअल कमिशनरची कोर्टे आहेत. त्यांचे निकालाविरुद्ध अपील प्रिव्ही कौन्सिलकडेच होते. परंतु त्यांना हायकोर्ट म्हणत नाहीत. रंगून येथे चीफ जज्जाचें कोर्ट आहे. प्रिंव्ही कौन्सिलचे निकाल हिंदुस्थानांतील सर्व कोर्टावर बंधनकारक असतात. हायकोर्टाचे निकाल त्याच्या अधिकारांतील सर्व कोर्टावर बंधनकारक असतात परंतु एकाचे दुसर्‍यावर बंधनकारक नसून शिफारसीपुरते असतात. प्रत्येक हायकोर्टाचा त्या त्या प्रांतांतील वकीलांवर धंद्याचे बाबतीत अधिकार चालतो व वाईट वर्तणुकीकरिता सनदा रद्द करतां येतात. योग्य न्यायाकरितां कोणत्याहि मनुष्यास कोर्टात येऊन जबानी देण्यास भाग पाडण्याचा अधिकार कोर्टास असतो. त्याचप्रमाणे कोर्टात काम चालू असतां कामास अडथळा केल्यास किंवा जबानी देण्याचें नाकारल्यास किंवा जबानी देतानां उद्दामपणा केल्यास त्यास दोनशे रुपये दंड व दंड न दिल्यास एक महिना शिक्षा देण्याचा अधिकार दिवाणी, फौजदारी व मुलकी या सर्व कोर्टांस आहे. हायकोर्टाची न्यायदानाच्या बाबतीत बेअदबी केली गेल्यास गुन्हेगारास अनियमित शिक्षा देण्याचा अधिकार हायकोर्टास आहे.

दिवाणी कोर्टे- हिंदुस्थानात हल्ली कलकत्ता, मद्रास, मुंबई, अलाहाबाद, पाटणा, लाहोर (सिंधप्रांत, मध्यप्रांत) या ठिकाणी हायकोर्टे आहेत. ही निरनिराळ्या वेळी स्थापन झाली आहेत. त्यांच्या मर्यादेत त्यांच्या अधिकाराखाली निरनिराळी कोर्टे आहेत. प्रत्येक जिल्ह्यांत एक जिल्हा कोर्ट, एक सबजज्ज कोर्ट (पहिला वर्ग मुन्सफ) व जरूर तेवढी मुन्सफ कोर्टे असतात. (बहुतकरून प्रत्येक तालुक्यांत एक) व ती स्थापण्याचा प्रांतिक सरकारास अधिकार आहे.

अधिकार- जिल्हा कोर्टाला कांही विशिष्ट फिर्यादी चालवितां येतात व पालन करणार नेमणे वगैरे किरकोळ कामें करतां येतात. बाकीच्या म्हणजे ज्यांची किंमत पाच हजार रुपयांच्यापेक्षा कमी आहे, अशा दाव्यावरील अपिले ऐकण्याचा अधिकार त्यास आहे. सबजज्जाला (यास काही प्रांतांत मुन्सफ वर्ग एक असे म्हणतात.) दिवाणी स्वरूपाचे वाटेल त्या किंमतीचे दावे चालवितां येतात. मुंबई इलाख्यांत सबजज्ज वर्ग दोन यास पाच हजार रुपये किंमतीपर्यंत दिवाणी स्वरूपाचे कोणतेहि दावे चालवितां येतात. मद्रास इलाख्यांत ही मर्यादा अडीच हजार रुपये आहे व बंगालमध्यें एक हजार रुपये आहे. त्यांची क्षेत्रमर्यादा ज्या तालुक्याकरितां ते नेमलेले असतात त्या तालुक्यापुरती असते. सबजज्जाच्या अधिकाराची क्षेत्रमर्यादा सर्व जिल्ह्याइतकी असते. ज्या दाव्यांच्या निकालावर कायद्याने अपील आहे अशा पाच हजार रुपये किमतीच्या दाव्यांच्या निकालावर जिल्हा जज्जांकडे अपील करता येते. पाच हजारांपेक्षा जास्त किंमतीच्या दाव्यांतील अपिले त्या त्या इलाख्याच्या हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध विलायतेंतील प्रिव्ही कौन्सिलकडे अपील करता येते. परंतु त्यांत दाव्याची किंमत दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पाहिजे किंवा कायद्याचा महत्त्वाचा प्रश्न असून हायकोर्टाने शिफारस केली पाहिजे.

फौजदारी कोर्टे- हिंदुस्थानांत प्रत्येक इलाख्यांत एक-एक हायकोर्ट आहे. त्याच्या देखरेखीखाली पुढील फौजदारी कोर्टे आहेत, (१) सेशन कोर्ट, (२) इलाखा मॅजिस्ट्रेट कोर्ट, (३) पहिला, दुसरा व तिसरा वर्ग मॅजिस्ट्रेट कोर्टे ही होत. प्रत्येक प्रांताला एक सेशन कोर्ट असते. प्रांत म्हणजे बहुतेक सर्व ठिकाणी जिल्हा होय. परंतु कांही ठिकाणी दोन जिल्हे मिळून एकच सेशन कोर्ट असतें व त्याला प्रांत म्हणतात. इलाख्याचे ठिकाण हे एक जिल्हाच समजले जाते व स्वतंत्र जिल्ह्याप्रमाणे त्या ठिकाणी कोर्टे असतात. प्रांतिक सरकारास हिंदुस्थान सरकारच्या परवानगीने जिल्ह्याची संख्या किंवा मर्यादा ठरविता येते. जिल्ह्याचे भाग मात्र स्वतंत्रपणे पाडता येतात. प्रत्येक सेशन्सच्या विभागात एक-एक सेशन जज्ज नेमण्याचा अधिकार प्रांतिक सरकारास आहे. त्याचप्रमाणे सेशन जज्जास जोडीदार किंवा मदतगार देण्याचाही किंवा एकास दुसर्‍या भागांतील सेशन जज्जाचा मदतगार नेमण्याचा अधिकार आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्यें एक पहिल्या वर्गाचा मॅजिस्ट्रेट प्रांतिक सरकार नेमते व त्यास जिल्हा मॅजिस्ट्रेट म्हणतात. हाच अधिकारी मुलकी खात्यातील कलेक्टर असतो. त्याच्या हाताखाली पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या वर्गाचे मॅजिस्ट्रेट प्रांतिक सरकार नेमते. विशिष्ट कामाकरिता किंवा दोन अथवा दोहोंपेक्षा जास्त पहिल्या, दुसर्‍या किंवा तिसर्‍या वर्गाच्या मॅजिस्ट्रेटाचे अधिकार देऊन बेंच नेमण्याचा अधिकार प्रांतिक सरकारास आहे. त्याच्या पैकी ज्याचे अधिकार सर्वात जास्त असतील तितके अधिकार सर्व बेंचास प्राप्‍त होतात. जिल्ह्याचे ठिकाण मोठे असल्यास त्या ठिकाणी एक शहर मॅजिस्ट्रेट असतो व तो बहुतेक पहिल्या वर्गाचा असतो. जिल्हा मॅजिस्ट्रेटचा अधिकार जिल्ह्यांतील सर्व मॅजिस्ट्रेटांवर व बेंचावर चालतो. परंतु अपील किंवा फेरचौकशी यांच्या बाबतीत सेशन जज्जाचा जिल्हा मॅजिस्ट्रेटासुद्धा सर्वांवर अधिकार चालतो. इलाख्याच्या ठिकाणी वरच्या प्रमाणें जे मॅजिस्ट्रेट नेमलेले असतात त्यांनां इलाखा मॅजिस्ट्रेट म्हणतात. त्यापैकी एक मुख्य असतो. त्याची नेमणूक प्रांतिक सरकार करते. त्यांच्या अधिकाराची क्षेत्रमर्यादा इलाख्याचे शहर, त्या ठिकाणी बंदर असल्यास तेथें व एखादी जहाजे चालण्यासारखी नदी जर त्या ठिकणी येऊन मिळत असेल तर तिच्या खाडीत इतकी आहे. अशां पैकी दोन किंवा दोहोंपेक्षा जास्तजणांचे बेंच नेमतां येते. याचप्रमाणे इलाखा शहराच्या ठिकाणी हिंदुस्थान सरकार किंवा प्रांतिक सरकार यांनी नेमलेले जस्टिस ऑफ दि पीस असतात.

अधिकार- हिंदुस्थानच्या फौजदारी गुन्ह्यांच्या कायद्यात दिलेल्या सर्व गुन्ह्यांची चौकशी करण्याचा अधिकार हायकोर्ट व सेशन कोर्ट यांनी व गुन्ह्यांच्या चकशीच्या कायद्याच्या २ र्‍या परिशिष्टात दिलेल्या एखाद्या कोर्टास आहे. ब्रह्मदेश, औंध, मध्य प्रांत, कुर्ग-आसाम आणि सिंध या ठिकाणी फाशीच्या शिक्षेशिवाय इतर शिक्षा असलेल्या सर्व गुन्ह्यांची चौकशी करण्याचा अधिकार पहिला वर्ग मॅजिस्ट्रेटांना देण्यांत येतो. हायकोर्टाला फौजदारी गुन्ह्यांच्या कायद्यात सांगितलेली वाटेल ती शिक्षा देण्याचा अधिकार आहे. सेशन जज्जालाहि तितकाच अधिकार आहे; परंतु फाशीच्या शिक्षेला मात्र हायकोर्टाची परवानगी लागते. त्याच्या मदतगारास फाशी, सात वर्षे काळेपाणी किंवा तुरुंग याशिवाय बाकीची कोणतीही शिक्षा देता येते.

इलाखा मॅजिस्ट्रेट किंवा पहिला वर्ग मॅजिस्ट्रेट यांना दोन वर्षे तुरुंग, एक हजार रुपये दंड किंवा फटके इतकी जास्तीत जास्त शिक्षा देता येते. दुसरा वर्ग मॅजिस्ट्रेटांना सहा महिने तुरुंगवास, दोनशे रुपये दंड व कायद्याने देता येण्याइतका एकांतवास इतकी जास्तीत जास्त शिक्षा देता येते. तिसरा वर्ग मॅजिस्ट्रेटास एक महिना तुरुंग आणि पन्नास रुपये दंड इतकी जास्तीत जास्त शिक्षा देता येते. वरील सर्व मॅजिस्ट्रेटांना गुन्हेगारांने दंड न दिल्यास शिक्षा देता येते. मात्र ती त्यांच्या अधिकारांपेक्षा जास्त असता कामा नये. सेशन कोर्टातील खटले काही जिल्ह्यांत पंचांच्या व काही जिल्ह्यांत सल्लागारांच्या मदतीने चालतात. पंचांनी एकमताने दिलेला निकाल न्यायाधिशांस बंधनकारक असतो, तसा सल्लागारांचा नसतो. त्यांचे जर पंचांच्या मताशी जुळत नसेल तर त्याला ती गोष्ट हायकोर्टाकडे कळवावी लागते व हायकोर्टालाहि प्रत्यक्ष अन्याय होतोसे वाटेल तरच पंचांच्या निकालाविरुद्ध जाता येते. प्रत्येक महत्त्वाच्या खटल्यात खालच्या कोर्टाविरुद्ध वरच्या कोर्टात अपील करतां येते. त्या कोर्टाला अपील रद्द करण्याचा, पुन्हा चौकशीचा हुकूम करण्याचा, गुन्हेगारांस सोडून देण्याचा, आरोप किंवा शिक्षा बदलण्याचा अधिकार आहे. परंतु खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा अपिलानंतर वाढविण्याचा अधिकार नाही. दुसरा किंवा तिसरा वर्ग मॅजिस्ट्रेटाच्या निकालाविरुद्ध अपील जिल्हा मॅजिस्ट्रेटाकडे नसते पहिला वर्ग मॅजिस्ट्रेटाच्या किंवा मदतगार सेशन जज्जचा निकालाविरुद्ध अपील सेशन जज्जाकडे असते. सेशन जज्ज किंवा इलाखा मॅजिस्ट्रेट यांचे निकालाविरुद्ध अपील हायकोर्टाकडे व हायकोर्टाच्या निकालनविरूध्द प्रिव्ही कौन्सिलकडे अपील करण्याचा हक्क अलीकडे बंद केला आहे. (ले. रा. द. गो. फडके)

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .