प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें    
       
कोलार- जिल्हा- म्हैसूर संस्थानच्या पूर्व भागांतील एक जिल्हा. या जिल्ह्यांचे क्षेत्रफळ १९११ सालीं ३,१६,४१२ चौरस मैल होतें.

सीमा:- उत्तरेसं, अनंतपूर व कडाप्पा जिल्हे; पूर्वेस कडाप्पा व उत्तर अर्काट हे जिल्हे; दक्षिणेस सालेमचा जिल्हा; व पश्चिमेस, बंगलोर व तुंकूर जिल्हे.

स्वरूपवर्णन:- पूर्वघाटांच्या दक्षिणेस व ईशान्येस हा जिल्हा चिकटला आहे. या घाटांतून पालार व पेन्नेर नद्या वहात गेल्या आहेत. वायव्येस, नंदिद्रुगच्या भोंवतालच्या प्रदेशांत अर्कावती, चित्रावती, पेन्नेर, पालार, पापघ्नी व पोनोर या नद्या उगम पावल्या आहेत. नंदिद्रुगपासून उत्तरेस एक पर्वताची रांग गेली असून तिची उंची ४८५१ फूट आहे. या पर्वताचे पेनुकोंड हें सर्वांत उंच शिखर होय. या जिल्ह्याच्या मध्यभागांतून, टयाकल, रेवाक्केलरो, कोलार (४०२६ फूट), रहमानगड (४२२७), अंबाजी दुर्ग (४३८९) व डोकूलकोंड ह्या रांगा उत्तरेस पसरलेल्या आहेत. पूर्वेस व ईशान्येसही लहान लहान टेकड्यांचें जाळें पसरलेलें आहें; व त्यामुळें पुष्कळ खोरीं बनलेली आहेत. जिल्ह्याच्या पूर्व व मध्य भागांत पालार नदीचीं खोरीं असून त्यांमधील जमीन सुपीक आहे.

भूस्तर:- या जिल्ह्यांतील दगड जम्बूर जातीचा असून त्यांत अभ्रकाचे दगड मधून मधून विखुरले आहेत. नंदिद्रुगमधील दगड हे ग्रानाइट (वज्रतुंड) दगडाच्या जातीचे आहेत. बौरिंगपेट तलुक्यांतून जी टेकड्यांची मालिका गेली आहे तींत ठिसूळ दगड सांपडतात. हे वरून चपटे असतात. या जिल्ह्याच्या दक्षिणभागांत कोलार गोल्ड फील्डस् आहेत.

वनस्पती:- बंगलोर जिल्ह्याप्रमाणेंच या जिल्ह्यांतहि बरेच तलाव असल्यानें, वनस्पतींची समृद्धि आहे. पाण्यांत व पाण्याच्या बाजूनें पुष्कळ प्रकारचीं गवतें व मुळ्या सांपडतात. नंदिद्रुगच्या टेंकड्यांवरहि अनेक प्रकारच्या वनस्पती व झाडें आहेत. या टेंकड्यांवरील झाडें खूपच उंचच्या उंच असतात. या झाडांच्या आश्रयानें निरनिराळ्या प्रकारच्या लता व वेली उगवलेल्या असतात.

हवा व पर्जन्यमान:- येथील हवा बंगलोर जिल्ह्यांतील हवेसारखीच आहे. पण बंगलोरपेक्षा येथील पर्जन्याचें प्रमाण थोडें कमी आहे. सर्व जिल्ह्यांचीच हवा निरोगी आहे. त्यांतल्या त्यांत चिकवल्लापूर व कोलार या शहरांची व त्याच्या आसपासची हवा फार सुरेख आहे. पण चिकबल्लापूर येथें प्लेगचा त्रास वारंवार सोसावा लागतो. या जिल्ह्यांत बाहेरगांवच्या लोकांची नेहमी येजा असल्याने कॉलरा व इतर सांसर्गिक रोगांचा येथें बराच फैलाव आहे; पण हे साथीचे रोग बंद करण्यासाठी आरोग्यसंरक्षक खत्याने शक्य ती व्यवस्था करण्याचे प्रयत्‍न चालविले आहेत. येथील पर्जन्याचे सरासरी मान २९ इंच आहे.

इतिहास:- या जिल्ह्याचा जो इतिहास उपलब्ध आहे त्यावरून या जिल्ह्यावर अगदीं प्रथम महाबली अगर बाण या लोकांची सत्ता होती. हे महाबली आपल्याला बलीचे वंशज असे मानीत. यांची राजधानी उत्तर अर्काट मधील पंडुबी पुरी ही होती. हा जिल्हा धरून सर्व तेलगु मुलुखावर, पल्लवांचे राज्य पसरलेंलें होतें; व हे महाबली अगर बाण राजे हे पल्लवांचे मांडलिक होते. त्यानंतर वैदुंब घराण्याचीहि या जिल्ह्यावर सत्ता असावी असें दिसतें. दुसर्‍या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गंग घराण्याच्या ताब्यात होता. नंतर ९९८ मध्ये कोल लोकांनी गंगघराण्याची सत्ता नाहींशी करून आपलें वर्चस्व बसविलें. त्यांच्या कारकीर्दीत या जिल्ह्याला निकरिलि चोलमंडल हें नांव पडलें. १११६ च्या सुमारास या कोलांची सत्ता संपुष्टांत येऊन, होयसळ घराण्याचीं सत्ता या जिल्ह्यावर पसरली. १२५४ मध्यें या घराण्याची दोन घराणीं होऊन, सोमेश्वराचा मुलगा रामनाथ याच्याकडे हा जिल्हा आला. पण ही वाटणी फार दिवस टिकली नाहीं. होयसळ घराण्याचा राजा तिसरा बल्लाळ याच्या कारकीर्दीत पुन्हां पूर्वीचा सर्व प्रांत एकट्या बल्लाळांच्याच ताब्यांत आला. विजयानगरची सत्ता ज्या वेळीं या जिल्ह्यावर पसरली त्यावेळीं मुलबागल ही या राज्याची राजधानी झाली. १५ व्या शतकाच्या अखेरीस बहामनी सुलतानानें विजयानगरच्या मुलुखांत धुमाकूळ घातला असता सालुव नरसिंह नावाच्या विजयनगरच्या सेनापतीनें या बहामनी सुलतानाची स्वारी मोठ्या शौर्यानें परतविली व स्वत:च विजयानगरचें सिंहासन बळकावलें. पुढें बर्‍याच वर्षांनीं तम्मे गौडा नांवाच्या एका मांडलिक राजानें सुगतूर येथें आपली सत्ता स्थापन केली व या त्याच्या कृत्याबद्दल विजयानगरच्या राजानें त्याला कोलार जिल्ह्याचा पूर्वभाग बक्षीस दिला. १४७६ मध्यें दुसर्‍या एका मांडलिक राजानें पश्चिमेस चिकबल्लापुर नांवाचें संस्थान स्थापन केलें. १७ व्या शतकांत कोलार जिल्हा विजापूरच्या ताब्यांत जाऊन विजापूरकरांनी या मुलुखावर शहाजीची नेमणूक केली. हा जिल्हा मोगलांच्या ताब्यात जवळ जवळ ७० वर्षे होता. नंतर तो मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढें अनुक्रमे कडाप्पाचा नवाब, अडोनीचा नवाब, सलाबतजंग यांच्या तो ताब्यांत गेला. १७६१ मध्यें सलाबतजंग यानें हा जिल्हा हैदर अल्लीला दिला. १७६८ मध्यें ब्रिटिशांच्या ताब्यांतही कांहीं काळ हा किल्ला होता, पण १७७० मध्यें मराठ्यांनीं पुन्हां तो जिंकून घेतला. पुढें हैदरानें पुन्हां तो आपल्या ताब्यांत घेतला. पण १७९१ मध्यें ब्रिटिशांनी तो जिंकून घेतला. शेवटीं १७९१ मध्यें ब्रिटिशांनीं तो म्हैसूरकरांनां देऊन टाकला. या जिल्ह्यांतील अवनी, बेटमंगल व टेकल या ठिकाणी प्राचीन काळचे अवशेष सांपडतात. नोनमंगल येथें १८९७ मध्यें एक जैनांचें देवालय सांपडलें. त्यामध्यें चौथ्या अगर पांचव्या शतकांतील शिलालेख आढलून आले. तसेंच त्या देवळांत वाद्यें, लहान लहान मूर्ती व इतर वस्तूहि सांपडल्या. नंदी येथील नंदीश्वराचें देवालय व कोलार येथील कोलारम्माचें देवालय हींहि जुनीं आहेत. नंदीश्वराच्या देवळांतील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. हीं दोन्ही देवळें कोलाच्या काळचीं म्हणजे ११ व्या शतकांतील दिसतात. कोलार शहरांत हैदरअल्लीच्या घराण्यांतील एका प्रसिद्ध पुरुषाचें थडगें आहे. सर्व जिल्ह्यांत जे शिलालेख सांपडले आहेत व ते हल्लीं छापण्यांत आले आहेत.

शेतकी:- पठारावरील जमीन तांबडी व रेवाळ असून त्यांत जंबूर व ग्रानाईट दगड पसरलेले आहेत. दर्‍याखोर्‍यांतील जमीन सुपीक आहे. या जिल्ह्यांत बागाइत जमीनहि पुष्कळ आहे. रागी, तांदूळ, धान्यें, ऊंस व बटाटे हीं मुख्य पिकें आहेत. १९०३-४ सालीं जंगलाचें क्षेत्रफळ १३५ चौरस मैल होतें व त्याचे कराचें उत्पन्न ४७,००० रुपये झालें.

व्यापार व दळणवळण:- कोलार येथील सोन्याच्या खाणी वगळून दिल्यास इतर धंदेहि येथें बरेच आहेत. गोरीबिदनूर येथें साखरेचा कारखाना आहे. कोलार येथें धंदेशिक्षणाची शाळा आहे. कोलार, चिकबल्लार, सिद्रघट्ट तालुक्यातं रेशणाचे कारखाने पुष्कळ आहेत. १९०४ मध्यें १४२१ लहान कारखाने ब्लँकेटें तयार करण्याचे होते. याशिवाय लांकडी काम, लोखंडी काम, तांबे पितळेचीं भांडीं तयार करण्याचें काम इत्यादि पुष्कळ प्रकारचीं कामें येथें होतात. जिल्ह्यांत १९०४ सालीं २९३ तेलाच्या चक्क्या व २०९ साखरेचे करखाने होत्या. मुलबागल या शहरीं साखर उत्कृष्ट तयार होते. मद्रास रेल्वेच्या बंगलोरचा फांटा या जिल्ह्यांतून सर्व ठिकाणी गेला आहे.

साक्षरता:- १९११ सालीं लोकसंख्येपैकीं ४०,९१० लोक साक्षर होते. म्हणजे साक्षरतेचें प्रमाण शेंकडा ५ असें पडलें. इंग्लिश जाणणार्‍या लोकांची संख्या २६८९ होती. १९०३-४ मध्यें या जिल्ह्यांत ४१३ शाळा होत्या.

तालुका- कोलार जिल्ह्यांतील एक तालुका. याचें क्षेत्रफळ २,८२,०५४ चौरस मैल आहे. १९११ सालीं या तालुक्याची लोकसंख्या ८०,९६१ होती. तालुक्यांत कोलार नांवाचें शहर व २९२ खेडी आहेत. १९०३-४ सालीं जमिनीच्या वसुलाचें उत्पन्न १,७१,००० रुपये होतें. या तालुक्याच्या पूर्व भागाच्या हद्दीवरून पालार ही नदी वहात जाते. पश्चिमेस कोलार व वोक्कलेरी या टेंकड्या आहेत. या तालुक्यातं व विशेषत: दक्षिणभागांत पुष्कळ मोठे तलाव व विहिरी आहेत. तालुक्यांतील व कोलारच्या टेंकड्यांवरील पठारांतील जमीन सुपीक आहे. पुष्कळ खेड्यांतून रेशमी किड्यांच्या संवर्धनाचा धंदा आढळून येतो.

शहर:- कोलार जिल्ह्याचें व कोलार तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें शहर बौरिंगपेट स्टेशनापासून उत्तरेस ११ मैलांवर आहे. य शहराची लोकसंख्या १९११ सालीं ८१९३ होती. कोलार हें फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. याचें पूर्वीचें नांव कुवलालपूर असें होतें व त्याचें पुढें कोलाल व कोलार असें रूपांतर झालें. येथील कोलारम्माचें प्रसिद्ध देवालय ज्यावेळीं अकराव्या शतकांत कोलांनी गंग घराण्याचें वर्चस्व नष्ट केलें त्यावेळचें असून ते राजेंद्र कोल नांवाच्या राजानें बांधलें असें म्हणतात. १२ व्या शतकांत कोलांची सत्ता होयसळ राजानें बळकावली व कोलांना म्हैसूरमधन हांकलून दिलें. या संबंधीचा इतिहास कोलार जिल्ह्यावरील लेखांत दिलेला आहे. या शहरीं हैदरअल्लीच्या बापाचें एक थडगें असून त्याची व्यवस्था ठेवण्याबद्दल स्वतंत्र इनाम आहे. या शहराच्या भोंवतालचा तट कांहीं वर्षांपूर्वी पाडण्यांत आला व शहराभोंवतीचा खंदकहि बुजविण्यांत आला. त्याच सुमारास पुष्कळ रस्ते बांधण्यांत आले. रेल्वे सुरू होण्यापूर्वी मद्रासच्या रस्त्यावरील कोलार हें रहदारीचें शहर होतें. या शहरांत विंचू फार आहेत. कोरम्मा देवळाच्या प्रवेशद्वाराखालीं जें भुयार आहे त्यांत विंचू आहेत असें म्हणतात. देवाला नैवेद्य म्हणून जे जिन्नस देण्यांत येतात त्यांत रुप्याचा तयार केलेला एक विंचू नेहमीं अर्पण करण्यांत येतो. रेशमाच्या किड्यांसाठी मलबेरी वृक्षांची लागवड येथें फार करण्यांत येते. लोंकरी बुरणुसें करण्याचा येथें धंदा आहे. येथें दोन हायस्कुलें आहेत व मेथॉडिस्ट एपिस्कोपल संस्थेची अनाथांसाठीं एक धंदेशिक्षणाची शाळा आहे. १८७० मध्यें या शहराला म्युनिसिपालिटी देण्यात आली.

गोल्ड फील्ड (सोन्याच्या खाणी) – कोलार जिल्ह्याच्या आग्नेय भागांतील एक शहर. बौरिंगपेट स्टेशनपासून हें १० मैलांवर वसलेलें आहे. बोरिंगपेटपासून येथपर्यंत कोलार गोल्डफील्ड रेल्वे आहे. याच्या पश्चिमेस लहान-मोठ्या बर्‍याच टेंकड्या पसरलेल्या आहेत. यांचें क्षेत्रफळ १९११ सालीं १४.८८ चौरस मैल असून लोकसंख्या ११,१८४ होती. या प्रदेशांतील सोन्याच्या खाणीविषयी. प्राचीन काळापासून प्रसिद्धी होती. टिपू सुलतानानें या खाणी खणण्याचा प्रयत्‍न केला होता. पण तो निष्फळ झाला. १८०२ सालीं लेफ्टनंट वारन यानें प्रथमत:  इंग्रजांच्या नजरेस ही गोष्ट आणली. १८७३ मध्यें मेजर लावेल यानें म्हैसूर सरकारपासून या खाणी खणण्याचा वीस वर्षांचा मालकी हक्क मिळविला. पण हें काम एकट्याच्या भांडवलावर निभावणार नाहीं असें पाहून त्यानें म्हैसूर सरकारच्या संमतीनें कोलार कनसेशनेरीयर्स नांवाच्या एका मंडळाला ३० वर्षांच्या मुदतीनें २० चौरस मैलांचा प्रदेश कौलानें दिला. १८८१ मध्यें या मंडळाला लंडन येथील प्रसिध्द खाणी शास्त्रांतील पारंगत अशा मेसर्स टेलर अँड को या शास्त्रज्ञ एंजिनियरांची मदत मिळाली. नंदिद्रुग येथील खाणी खणण्याचें काम कॅप्टन प्लूनर या अनुभविक खणीतज्ज्ञाने सुरू केलें. पण भांडवलाच्या अभावी १८८३ साली तें काम बंद पडलें. पण त्याच साली कॅप्टन प्लूमर यानें जॉन टेलरच्या प्रोत्साहनानें तें काम आपल्या अंगावर घेतलें व त्याच्या नशिबानें त्याला यांत यश आलें. १८८५ मध्ये कोलार येथील खाणींची सोन्याबद्दल चोहोंकडे प्रसिद्धि झाली. म्हैसूरदरबारानें आपला त्यांत हिस्सा ठेवून खाणीच्या वरील कौलाचे दर कमी केले. १९०४ च्या अखेरीस एकंदर २१० लक्ष पौंडांच्या किंमतीचें सोनें या खाणींतून बाहेर पडलें. त्यापैकीं दहा लक्ष पौंड म्हैसूर सरकारला व ९० लक्ष डेव्हिडेंड म्हणून वाटण्यांत आले. १९०४ मध्यें या खाणींत ११ कंपन्या काम करीत होत्या. त्यापैकीं म्हैसूर, चँपियनरीफ, उरेगम, नंदिद्रुग व बालाघांट या पांच कंपन्या डिव्हिडंड वाटीत असत. या निरनिराळ्या कंपन्यांतर्फे खाणीवर ५१० युरोपियन, ४१५ यूरेशियन व २७,००० हिंदू लोक काम करीत होते. १९१८ सालीं हिंदुस्थानांत निघालेल्या सोन्यापैकी ९४ टक्के कोलार गोल्डफील्डचें होतें व त्याची किंमत  २९० लक्ष रुपये होती. या खणींच्या धंद्याला प्रोत्साहन देण्यासाठीं म्हैसूर संस्थाननें अनेक साधें निर्माण केली. १८९४ मध्यें बोरिंगपेट जंक्शन पासून खाणींकडे जाणारा एक रेल्वेचा फांटा बांधण्यांत आला. १८९९ मध्यें आरोग्यसंरक्षक खातें निर्माण करण्यांत येऊन ७ लोकांचें एक मंडळ नेमण्यांत आलें. १९०० सालीं म्हैसूर सरकारनें या खाणींच्या संरक्षणार्थ पोलीसठाणेंही निर्माण केलें. १९०२ मध्यें कावेरी नदीच्या पाण्याच्या सहाय्यानें खाणींच्यासाठीं विजेच्या प्रकाशाची सोय करून देण्यांत आली. प्रथम ४१८५ हॉर्स पावरची वीज उत्पन्न होत होती. पण १९०५ मध्यें ती जवळजवळ ८००० पर्यंत वाढविण्यांत आली व हल्ली आणखी २००० पावर वाढविण्याची योजना चालली आहे. खाणींतील लोकांनां पाण्याची सोय म्हणून पालार नदीच्या काठांवर असलेल्या बेटमंगल तलावापासून पाणी नेण्यांत आलें आहे. प्रार्थनामंदिरें, क्लब, मोठमोठीं दुकानें हीं या ठिकाणी स्थापन झालीं आहेत. १८९५ सालापासूनच येथें एक स्वतंत्र शहर वसविण्याची कल्पना संस्थानच्या डोक्यांत घोळत होती. १९०१ सालीं तिला मूर्त स्वरूप देण्यांत आलें. नवीन शहराला राबर्टसनपेट हें नांव देण्यांत आलें. या शहराच्या आसपास खाणींतील मजुरांच्या चाळी आहेत. या शहरांत मोठमोठे रस्ते बांधण्यांत आले असून विहिरी वगैरे खणण्यांत आल्या आहेत.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .