प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें    
       
कोश:-  कोश याचा मूळचा अर्थ एखाद्या भाषेंतील अक्षरानुक्रमाने अगर दुसर्‍या कोणत्या तरी ठरावीक पद्धतीचें शब्दांचा संग्रह करून त्या शब्दांचें त्याच भाषेंत अगर दुसर्‍या एखाद्या भाषेंत विवरण करणारा ग्रंथ असा आहे. कोशामध्यें त्या त्या भाषेंतील सर्व प्रकारच्या शब्दांचा भरणा असतो. प्रथमत: अशा प्रकारचे सर्व शब्द कोशांत देण्याची वहिवाट असे. पुढें जेव्हां भाषेंमध्यें नवीन नवीन शब्दांचा अंदाजाबाहेर भरणा होऊं लागला. त्यावेळी अशा सर्व शब्दांचे सांगोपांग रीतीनें विवरण करणारा कोश करणें फार जड जाऊ लागलें. तेव्हां निरनिराळ्या विषयांमधील शब्दांचा स्वतंत्र कोश करण्याची कल्पना उदयांस आली. त्याप्रमाणे निरनिराळ्या विषयांला वाहून घेणारे स्वतंत्र कोश निर्माण होऊ लागलें. बायबलचा कोश, तत्त्वज्ञानाचा कोश, स्थळांचा कोश असे कोश प्रत्येक भाषेंत निर्माण झाले. कोशाचें विस्तृत स्वरूप म्हणजे ज्ञानकोश होय. अशा प्रकारच्या ज्ञानकोशामध्यें सर्व महत्त्वाच्या विषयांची विस्तृत माहिती आलेली असतें.

भारतीय- भारतीय कोशकल्पनेचा उगम आपल्याला प्रथमत: निघंटुमध्यें पहावयास सापडतो. धातुपाठ, उणादिसूत्रें, गणपाठ व लिंगानुशासन अशा क्रमानें कोशाला हल्लीचें स्वरूप प्राप्‍त झाले आहे. निघण्टूमध्ये धातुचाच विचार केलेला आहे तर कोशामध्यें केवळ नामें व अन्वयें यांचाच समावेश झालेला आढळतो. निघंटूमध्यें वैदिक ऋचांचाच स्पष्ट उल्लेख आलेला आहे तर कोशांमध्ये सर्व वाङ्मयांतील शब्दांचा संग्रह केलेला आढळतो.

आज आपल्याला हिंदुस्थानांत जे प्राचीन कोश पहावयास मिळतात त्यांच्या रचनेचा हेतु, वैदिक निघंटूच्या रचनेच्या हेतूहून भिन्न आहे असें दिसून येतें. वैदिक निघंटू हा वैदिक ऋचांच्या स्पष्टीकरणार्थ रचिण्यांत आला, तर कवींनां काव्यरचनेला उपयोग व्हावा यासाठी कोशांची कल्पना उदयास आली. काव्य व कोश यांचा फार निकट संबंध आहे. कवींच्या उपयोगासाठी कोशरचना केल्याबद्दलचे उल्लेख कोशकार वारंवार करतात. बरेचसे कोश खुद्द कवींनीच निर्माण केले असल्याचें आपल्याला दिसून येतें. मुरारि, मयूर, बाण, श्रीहर्ष व बिल्हण या कवींनी स्वत: स्वतंत्र कोश लिहिले आहेत. श्रीहर्षानें श्लेषोपयोगी शब्दांचा कोश लिहिला असून त्याचें नांव श्लेषार्थपदसंग्रह असें आहे. अमरकोशाचा कर्ता अमरसिंह हा स्वत: कवीच होता. हे कोश बहुधा श्लोकांत लिहिलेले असत. या कोशांत सर्व शास्त्रांमधील शब्दांचा संग्रह केलेला असे. त्यामुळे कवीला मुद्दाम त्या त्या शास्त्राचा स्वतंत्र अभ्यास करण्याचें कारणच पडत नसे. ऊशवाय हे कोश बहुधा श्र्लोकांतच लिहिलेले असल्यामुळें ते पाठ करण्यास फार सोपे जात. असे भारतीय कोशाचे मुख्यत: दोन वर्ग पडतात. (१) समानार्थी शब्दांचा ज्यांत संग्रह केला आहे असा कोश, (२) अनेकार्थवाची शब्दांचा ज्यांत संग्रह आहे असा कोश. पण अशा प्रकारचे हे दोन भिन्न वर्ग जरी आहेत तरी बहुतेक कोशांत या दोन्ही वर्गाची सरमिसळ झालेली दिसते. कोशांमधील शब्दांची व्यवस्था मात्र निरनिराळ्या पद्धतीनें केलेली आढळते. ज्या वस्तूला पर्यायशब्द पुष्कळ असतील ती वस्तू अगोदर व जिला पर्यायशब्द कमी असतील ती वस्तू नंतर अशी पद्धत काहीं कोशांत आढळते, तर कांही कोशांत अक्षरविल्हेवारीनें रचना केलेली दिसते. कांहींत अक्षरांच्या कमीअधिक संख्येवरून कोशांतील शब्दांची मांडणी करण्यांत येते. पण बर्‍याच कोशांमध्ये या निरनिराळ्या पद्धती एकसमयावच्छेदेंकरूनच उपयोगांत आणलेल्या दिसतात. अनेकार्थवाची शब्दकोशांत एक शब्द व त्याचे निरनिराळे अर्थ हे प्रथमा विभक्तींत दिलेले आढळतात. कांही कोशांत शब्दांचे अर्थ व शब्दांचीं लिंगें अशीं दोन्ही दिलेली आढळतात. कांहीं कोशांत लिंगानुशासन हें शेवटीं परिशिष्टांत दिलेलें दिसून येतें. क्वचित प्रसंगी लिंगांप्रमाणें शब्दांची मांडणी केलेली पहावयास सापडतें.

अगदीं प्राचीन कोश हल्ली संपूर्ण असे उपलब्ध नाहींत. शिवाय खण्डश: कां होईना जे उपलब्ध आहेत त्यांमध्यें शब्दांची मांडणी एका विशिष्ट पद्धतीनें झालेलीहि आढळून येत नाही. शब्दांचे अर्थ फार संक्षिप्‍त तर्‍हेनें दिलेले असतात. अगदीं प्राचीनांतला प्राचीन कोश म्हणजे मध्य आशियांत काशगर येथें सांपडलेलें आठ पानांचें एक चोपडें होय. हें चोपडें संपूर्ण उपलब्ध नाहीं. या अपूर्ण चोपडय़ाचा कर्ता बौद्धधर्मीय असावा असें दिसतें. याशिवाय निरनिराळ्या ग्रंथांमधून जे उल्लेख आढळून येतात त्यांवरून पूर्वी पुष्कळ कोश असावेत असें दिसून येतें. काशिकेमध्यें नानार्थ कोशाचा उल्लेख आलेला आहे. याशिवाय कात्यायनाची नाममाला, वाचस्पतीचा शब्दार्णव, विक्रमादित्याचा संसारावर्त, व्याड्रीची उत्पलिनी, इत्यादी फार प्राचीन काळच्या कोशांची नांवे आपल्याला आढळून येतात. पण या सर्वांना मागें टाकणारा कोश म्हणजे अमरसिंहविरचित नामलिंगानुशासन ऊर्फ अमरकोश होय. हा अमरसिंह जरी बौद्धधर्मीय होता तरी अमरकोशांत बौद्ध नांवांचा म्हणण्यासारखा भरणा आढळून येत नाही. या अमरसिंहाचें विक्रमादित्याच्या दरबारांतील नवरत्नांमध्यें जरी नांव आलेलें आढळलें तरी त्यावरून त्याच्या कालाचा नक्की निर्णय होऊं शकत नाही. कालिदासाच्या काव्यांतून त्यानें बरेच शब्द घेतले आहेत. त्यावरून तो कालिदासानंतरचा असावा हे उघड होतें. हा बहुतेक सहाव्या ते आठव्या शतकाच्या दरम्यान झाला असावा असें दिसतेंय अमरकोश हा समानार्थवाची शब्दकोश असून त्याची तीन कांडें आहेत. पहिल्या कांडांत आकाश, देव, अंतरिक्ष, तारे, काल, नाद, भाषा, शब्द, गायन, नृत्य, पाताळ, सर्प, समुद्र, पाणी, इत्यादी शब्दांचे पर्याय शब्द आले असून दुसर्‍या कांडांत पृथ्वी, नगर, पर्वत, अरण्य, वृक्षलता, प्राणी, मनुष्य, नातीगोती, रोग, अवयव वस्त्र, आभरण, वर्ण, जाती, धंदे इत्यादींचे विवेचन आहे. तिसर्‍या कांडांत विशेषणें, अन्वयें, अनेकाथर्वांची शब्दसंग्रह यांचा समावेश झाला आहे. अग्निपुराणांत जो कोशसदृश भाग आला आहे त्याची मांडणी अमरकोशासारखीच असून, अमरकोशावरूनच तो भाग उद्धृत करून घेतला असावा असें दिसतें. अमरकोशाच्या धर्तीवरच इतर कोशांची मांगणी झालेली आढळून येते. अमरकोशावर जवळ जवळ ५० टीका झाल्या, पण त्यापैकी फारच थोडय़ा उपलब्ध आहेत. क्षीरस्वामींची टीका विशेष महत्त्वाची आहे. १५ व्या शतकांत बृहस्पतिराय मुकुटमणि यांनें अमरकोशावर फार मोठी टीका लिहिली. त्या टीकेच्या आरंभी त्यानें आपण ही टीका आपल्या अगोदर होऊन गेलेल्या १६ टीकांच्या आधारें लिहिला असें म्हटलें आहे व आपल्या टीकाग्रंथांत त्यानें जवळ जवळ २७० ग्रंथ व ग्रंथकारांचा उल्लेख केला आहे.

या अमरकोशाला पुरुषोत्तमदेवानें त्रिकांडशेष नांवाची एक पुरवणी जोडली. या पुरवणीमध्यें बौद्धसंस्कृतवाङ्मयांतील महत्त्वाचे शब्द आलेले आहेत. शिलालेखांत आढळणारे शब्द व प्राकृत शब्दहि या पुरवणीत आलेले आढळतात. याशिवाय याच पुरुषोत्तमदेवानें हारावली नांवाचा एक कोश लिहिला असून यांत पूर्वीच्या पुरवणी कोशांतल्यापेक्षां देखील अधिक महत्त्वाच्या शब्दांचा संग्रह केलेला आहे. हा कोश लिहिण्याला आपणाला १२ वर्षे खपावं लागलें असें पुरुषोत्तमदेव म्हणतो. याचा काळ नक्की ठरवितां येत नाही, तरी पण महायानपंथाच्या भरभराटीच्या कांळी हा झाला असावा असें वाटतें.

अनेकार्यवाची शब्दकोशांत, शाश्वताचा अनेकार्यसमुच्चय: हा कोश प्राचीन व महत्त्वाचा आहे. या कोशाची रचनाहि प्राचीन तर्‍हेची आहे. ज्या शब्दांच्या अर्थाला एक संबध श्लोक लागेल ते शब्द अगोदर; त्याच्या खालोखाल अर्धी ओळ ज्याला पुरेल असे शब्द, अशा तर्‍हेची विचित्र मांडणी याच्यात आढळते. कोशाच्या शेवटीं परिशिष्ट असून अव्ययासंबंधी एक स्वतंत्र प्रकरण आहे. शाश्वताच्या काळासंबंधी नक्की कांहींच सांगता येत नाही.

शाश्वताच्या page no क 811 and 812 insert

निश्चित रुपरेखा आखण्यांत आली. त्यानंतर कोशास लागणारें साहित्य कोणत्या तर्‍हेने मिळवावें, त्यांत कशाकशाचा अंतर्भाव व्हावा यासंबंधीचेही निश्चित धोरण ठरवण्यात आले व त्याच्या बरोबर त्याची मांडणीही कशा पद्धतीची असावी याचेंही सामान्य स्वरूप आखण्यांत आले. जुन्या कोशामध्यें मुख्यत्वेंकरून त्या भाषेंत त्या त्या काळीं प्रचलित असलेले व वाङ्मयामध्यें नेहमी येणारे तेवढेच शब्द ग्रथित करण्याची वहिवाट असे. अशाप्रकारचा कोश म्हणजे जॉन्सनने केलेला कोश होय. या जॉन्सनच्या कोशामध्यें तत्कालीन समाजांत व वाङ्मयांत रूढ असलेल्या शब्दांचाच संग्रह केला गेला आहे. जॉन्सननें आंखून दिलेली ही कोशाची कल्पना जवळ जवळ एक शतकभर अस्तित्वांत होती. पण त्यानंतर या संकुचित कोशकल्पनेच्या विरुद्ध चळवळ सुरूं झाली. १८५७ मध्ये आर्चबिशप ट्रेंचने फायलालॉडिकल सोसायटीच्या पुढें एक निबंध वाचून त्यांत त्या वेळची कोश तयार करण्याची पद्धत किती संकुचित होती हे त्यानें सप्रमाण सिद्ध केलें. या निबंधात तो म्हणतो, ‘कोश’ या शब्दाचा खरा अर्थ भाषेंतील सर्व शब्द एके ठिकाणी ग्रथित करणे हा होय. भाषेंतील उपयुक्त शब्दांचाच संग्रह करणे ही कल्पना कोशकारानें आपल्या डोळ्यांपुढे ठेवून चालावयाचें नाहीं. उपयुक्त शब्दांचा संग्रह करणे, अगर अनुपयुक्त अशा सर्व शब्दांचा संग्रह करणें एवढेंच कोशकाराचें काम आहे. तो भाषेचा इतिहासकार आहे. अमका शब्द घेणें, तमका शब्द न घेणे हे त्याचें काम नव्हें. ही ट्रेंचची कल्पना जर्मनीत त्याच्या पूर्वीपासूनच प्रचारांत येऊं लागली होती. या ट्रेंचच्या तत्त्वाप्रमाणेंच जर्मनींत जेकब व विल्हेल्म ग्रिम यांनी कोश तयार करण्यास सुरुवातहि केली होती.

दुसरें एक जें तत्त्व ट्रेंचनें आपल्या निबंधांत ग्रंथित केलें होतें तें म्हणजे कोशांत केवळ शब्दांचा अर्थ न देतां त्या शब्दांची सांगोपांग माहिती देण्यात यावी हें होय. पूर्वीच्या कोशांत शब्दाचा ऐचिहासिक दृष्टय़ा कसकसा अर्थ बदलत गेला याचें विवरण करण्यांत येत नसे. पण तुसवात्मक भाषाशास्त्राचा उदय झाल्यापासून शब्दाच्या इतिहासाला महत्त्व प्राप्‍त होऊं लागलें व त्या कल्पनेला अनुसरून ट्रेंचनें आपली कल्पना आपल्या निबंधांत पुढें मांडली.

शब्दाचा इतिहास देण्याचें तत्त्व मान्य केलें कीं त्याबरोबर शब्दाच्या निरनिराळ्या अर्थाची बोधक अशी वाक्यें देण्याची पद्धत पाडण्याचें श्रेय डॉक्टर जॉन्सनलाच देणे जरूर आहे. त्यानंतर रिचर्डसननें १८३५-३६ सालीं तयार केलेल्या कोशांत कल्पना विकास पावल्याचें दृष्टोत्पत्तीस येतें. अशा प्रकारची अर्थबोधक वाक्यें उद्धृत केल्यानें विशिष्ट काळी विशिष्ट शब्दांचा विशिष्ट अर्थ कसा होता हे समजणें फार सुलभ होतें. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे शब्दाचा धात्वर्थ देणें ही होय. शब्द कसा निर्माण झाला, कोणत्या धातूपासून तो तयार झाला हें सांगितल्याशिवाय शब्दाची माहिती पूर्ण झाली असें म्हणता येणार नाहीं. या शब्दाच्या उत्पत्तिशास्त्रानें तत्समान अशा शब्दावर चांगला प्रकाश पडतो. एकाच धातूपासून निरनिराळे शब्द कसे बनले याचें आपल्याला उत्कृष्ट ज्ञान होतें. याशिवाय शब्दाचा उच्चार देणें वगैरे किरकोळ गोष्टीहि कोशांत येणें जरूर आहे. पण वर सांगितलेल्या सर्व तत्त्वांचा समावेश करून त्याबरहुकूम कोश तयार करणें हें अशक्य नसलें तरी अतिशय अवघड काम आहे यांत शंका नाहीं. अशा प्रकारचा नमुनेदार कोश अद्यापि कोणत्याहि भाषेंत झाल्याचें दिसून येत नाहीं. शिवाय अशा प्रकारचा कोश तयार करणें एकटय़ा-दुकट्याचें काम नाहीं. त्याला निरनिराळ्या विषयांत पारंगत असलेलीं अशीं विद्वान मंडळीं एकत्र झालीं पाहिजेत. हल्ली कोश तयार करतांना निरनिराळे विद्वान नेमण्यांत येतात व अशी पद्धत अमलांत येणे अगदीं स्वाभाविकच आहे.

अशा प्रकारच्या तत्वाबरहुकूम तयार झालेला कोश म्हणजे ऑक्सफोर्ड न्यू इंग्लिश डिक्शनरी होय. हा कोश तयार करण्याची कल्पना ट्रेंचच्या निबंधावरून उदयास आली व त्याप्रमाणे कोश तयार करण्याचे काम सुरू झाले. हर्बर्ट कॉलेरिड याला मुख्य संपादक नेमण्यात आले. हर्बर्ट कॉलेरिज हा १८६१ साली वारला. त्याच्यानंतर मुख्य संपादकाच्या जागी डॉ. फर्निव्हल याची नेमणूक झाली. १८७८ पर्यंत या संपादकीय मंडळाकडून २०,००,००० अर्थबोधक वाक्यें गोळा करण्यापलीकडे कांहीच झालें नाहीं. पुढें १८७८ सालीं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने हा कोश प्रसिद्ध करण्याचें काम अंगावर घेऊन डॉ. मरे यांच्याकडे तें काम सोपविण्यांत आले. १२ व्या शतकानंतरचे जे जे शब्द असतील ते सर्व या कोशांत ग्रंथित करावयाचे असें ठरविण्यांत आलें. या कोशाचे दहा विभाग करावयाचे असें ठरलें व त्याप्रमाणे १९८४ मध्यें या कोशाचा पहिला विभाग प्रसिद्ध झाला.

या कोशाइतका जवळ जवळ पूर्णतेस वापलेला दुसरा कोश नाहीं असें म्हटलें असतां वावगें होणार नाही. जर्मनीमध्यें जेकब आणि विल्हेल्म ग्रिम यांनी जो कोश तयार केला तो देखील न्यू इंग्लिश डिक्शनरीप्रमाणेच नमुनेदार झाला आहे. तरी पण न्यू इंग्लिश डिक्शनरीपेक्षा यांत अधिस दोष आहेत. उदाहरणार्थ, या जर्मन डिक्शनरींत शब्दांचे उच्चार दिलेली नाहींत व व्युत्पत्तीसंबंधानें बिनचूक माहिती दिलेली आढळत नाहीं. अर्थबोधक वाक्यें उत्कृष्ट प्रकारची नाहींत व एकंदर कोशाची रचनाही जितकी व्यवस्थित असावी तितकी नाही. फ्रेंच भाषेंतील लिट्रे यानें तयार केलेला कोश जर्मीनीमधील कोशापेक्षां अनेक बाबतीत अपूर्ण आहे. पण एकटय़ानें तयार केलेला कोश या नात्यानें त्याचें महत्त्व आहे. बर्लिन, गॉटिंजन, लैप्झिक, म्युनिच व व्हिएन्ना या विद्यापीठांच्या देखरेखीखाली तयार झालेला मेसारस लिंग्वा लॅटिना हा महत्त्वाचा कोश आहे. यांत दुसर्‍या शतकापर्यंत सर्व लॅटिन ग्रंथकारांच्या ग्रंथांतील प्रत्येक शब्द व त्याची अर्थबोधक वाक्यें उद्धृत केली आहेत. त्याचप्रमाणे दुसर्‍या शतकापासून तो सातव्या शतकापर्यंतच्या सर्व लॉटिन ग्रंथांतील वचनें उद्धृत करण्यात आलीं आहेत. हे सर्व कोश तयार करताना कोशकारांनी आपल्यापुढें लोकांची गरज व त्याचबरोबर विद्वानांचीही गरज भागविण्याचे ध्येय ठेवलें होतें. या दृष्टीनें कोशाचा विकास ज्ञानकोशांत होऊं लागला. अशा प्रकारें कोश व ज्ञान कोश या दोनहि प्रकारांचे संमिश्रण पिरे लरौसे याच्या ‘ग्रँड डिक्शनोएर युनिव्हर्सल डू सियेक्ले’ यामध्ये सापडते. या कोशाचे १५ भाग प्रसिद्ध झाले. अशाच प्रकारचा इंग्लिश भाषेंतील प्रयत्‍न म्हणजे सेंचरी डिक्शनरी हा होय. हा कोश अमेरिकेंत डॉ. व्हिटनें यांच्या देखरेखीखाली तयार झाला. याचे सहा भाग असून ते १८८९-१८९१ सालांत प्रसिद्ध झाले. यांत न्यू इंग्लिश डिक्शनरीपेक्षां देखील, शब्दांचे अधिक बरोबर अर्थ दिलें आहेत.

चिनी:- या भाषेंत कोशांचा सुकाळ आहे. ‘खोवन’ हा डु शीन याचा कोश सर्वांत जुना असून ख्रि. श. १५० मध्यें लिहिलेला आहे. त्यानंतर ५३० मध्यें कु यें बंग यानें यू पीन नांवाचा एक कोश तयार केला. पी बन यव फू हा प्रचंड कोश हन लिन या विद्यापीठाच्या ६६ विद्वानांनी मिळून लिहिला. यांत अर्थबोधक वचनांची रेलचेल आहे. या कोशाचें इंग्लिश भाषेंत भाषांतर करावयाचें म्हटल्यास अष्टपत्री १००० पानांचें ४० भाग काढावें लागतील. हा कोश १७११ मध्यें प्रसिद्ध झाला. त्यानंतर १७१६ मध्यें, हन सिन विद्यापीठाच्या तीस विद्वानांनी मिळून कांघी झे तीन हा कोश तयार केला व त्याला स्वत: कांघी बादशहानेंच प्रस्तावना लिहिली आहे. हा कोश अद्यापि चीनमध्यें प्रमाणभूत गणला जातो.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .