विभाग अकरावा : काव्य - खतें
कोसगी:- हैद्राबाद संस्थानांतील गुलबर्गा जिल्ह्यामध्यें सर सालरजंगच्या घराण्याकडे जी जहागिरी आहे त्या जहागिरीचें मुख्य ठिकाण. याची लोकसंख्या १९०१ साली ८२२८ होती. या ठिकाणीं एक पोलीस ठाणें, एक दवाखाना व एक सरकारी शाळा आहे. या ठिकाणी सुमारे दीड हजार माग असून सुती व रेशमी लुगडी मोठय़ा प्रमाणांवर तयार होतात.