प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें    
       
कोसल:- याचा उल्लेख वैदिक वाङ्मयांत येतो (ज्ञानकोश विभाग ३ पृष्ठ २१० पहा). कोसल या नांवाचे दोन देश प्राचीनकाळी प्रख्यात होते; एक उत्तरकोसल व दुसरा दक्षिणकोसल. उत्तरकोसल हा फार प्राचीन होता. तो म्हणजे हल्लीचा घोगरानदीच्या उत्तरेकडील अयोध्याप्रांत होय. जैन, बौद्ध व ब्राह्मण या तिन्ही वाङ्मयांत या कोसलाचा उल्लेख येतो. रामायणाच्या पूर्वीपासून हा देश प्रख्यात आहे. कोसल राजकन्या कौसल्या ही रामाची आई होय. वायुपुराणावरून लवानें या प्रदेशावर राज्य केले असल्याचें ठरतें. बौद्ध वाङ्मयांत येथील राजांची सत्ता कपिलवस्तूवरही होती असें म्हटलें आहे. त्यांत कोसल व मगध यांचा नेहमीं संबंध येतो. या प्रदेशांतच बुद्धाचें पूर्वचरित्र झालें व तेथेंच त्याने आपल्या धर्माची ध्वजा प्रथम फडकविली. पौराणिक काळांत काशीच्या राज्याची प्रसिद्धी होती. परंतु, त्यानंतर ऐतिहासिक काळाच्या प्रारंभीच कोसलच्या राज्याच्या ख्यातीस (ख्रि. पू. ६ वें शतक) सुरुवात झाली. त्या वेळी सार्‍या उत्तर हिंदुस्थानांत कोसलाचेंच राज्य महत्त्वाचे होते. या कोसलची राजधानी श्रावस्ती होय. ही नेपाळांत हिमालयाच्या पायथ्याशीं होती. ह्युएनत्संग याचा मतानें व फाहियान याच्या तर्कावरून हल्लीचे साहेट माहेट (हल्लीच्या उत्तर अयोध्या प्रांतांतील गोंड बहिरच जिल्ह्याच्या सरहद्दीवरील गांव) हीच पूर्वीची श्रावस्ती होय असे म्हणतात. ही रापती (रावती) नदीच्या कांठी आहे. महाभारतांत सभापर्वांत उत्तरकोसल देश भीमानें जिंकल्याचा उल्लेख आहे. इक्ष्वाकू (सूर्यवंशी)चा आठवा पुरुष (वंशज) श्रावस्त यानें श्रावस्ती स्थापिली. अश्वमेधपर्वांत कोसलाचें नांव आले आहे. वराहमिहिरानेंही कोसल (फक्त एकच) उल्लेखिला आहे. कालिदासानें अयोध्येस उत्तरकोसलाची राजधानी म्हटलें आहे. वर दिलेल्या साहेटमाहेट येथें  कनिंगहॅमला एक बुद्धाचा पुतळा आढळला. त्यावरील लेखांत श्रावस्ती अशीं अक्षरें होतीं. त्यावरून हेंच गाव श्रावस्ती असे ठरलें. येथे जुने अवशेष पुष्कळ आहेत. ह्युएनत्संगच्या वेळी हे मोडकळीस आलेले शहर रामाच्याही पूर्वीचे आहे. बुद्धाच्या वेळी प्रसेनजित राजाची राजधानी होती. बुद्धाच्या बर्‍याच कथा या प्रांतांत घडलेल्या आहेत. बिंबिसार राजाची राणी कोसल राजकन्या होती. बुद्धानंतर ५ शतकें या शहराचा इतिहास सापडत नाही. तदनंतरचा तेथील विक्रमादित्य नांवाचा एक राजा बौद्धधर्मद्वेष्टा म्हणून प्रख्यात आहे. याचा काल (अदमासें) इ.स. १०० चा आहे. नंतर तिसर्‍या व चवथ्या शतकांतील खिरधार राजे यांची नांवें आढळतात. परंतु हे स्वतंत्र नसून गुप्तांचे (मगधच्या) मांडलिक असावेत. तदनंतर श्रावस्तीचें महत्त्व कमी झाले. फाहिआनच्या वेळीं येथे फक्त २०० घरें होतीं. याची शेवै, सेवेट, सावभ्यी, साहेट, सावित्री असी निरनिराळी नांवे आहेत. हल्ली येथे जंगल आहे. ह्युएनत्संगने या कोसल राज्याचा घेर ३३४ कोस सांगितला होता. यावरून हा दक्षिणउत्तर घोगरा, हिमालय व पश्चिमपूर्व कर्णाला, धवलगिरीपर्यंतचा प्रदेश होय. चंद्रगुप्‍त मौर्याने हा देश जिंकला होता. कांही ठिकाणी इंद्रप्रस्थ मध्य धरून पूर्वकोसलाचेहि ईशान्य कोसल व आग्नेय कोसल असे दोन पोटमाग होते असा उल्लेख येतो. ब्राह्मणकाळी व महाभारतकाळी सूर्यवंशी क्षत्रियांची राज्यें हिंदुस्थानांत फक्त पूर्वेस होती. त्यांपैकीच कोसल-विदेह हें एक होय. ब्राह्मणग्रंथांत याचा उल्लेख अभिमानपूर्वक येतो. कुरुपांचालाहून हे लोक भिन्न होते. हे तत्त्वज्ञानी होते. ग्रीयर्सन व मॅक्डोनेल यांच्या मतें यांची भाषा जवळ जमळ पंजाबी भाषेसारखी असून ते सूर्यवंशी क्षत्रिय होते.

आता दक्षिण कोसल म्हणून दुसरा एक प्रांत आहे, त्याची माहिती अशी:- हा महानदीच्या खोर्‍यात, गोदावरी व महानदी यांच्यामधील पूर्वेकडील (हल्लीचा छोटानागपूर) प्रांत होय. रामायण, महाभारत यांतहि या दक्षिण कोसलाचा उल्लेख येतो. रामानें कुशाला (रामाचा पुत्र) हे राज्य दिले होते व त्याची राजधानी कुशावती ही या प्रांतांत विन्घ्यतटेप्रांती होती. महाभारतांत दक्षिणापथांत सहदेव विजयांत ह्या कोसकाचा उल्लेख आहे. रत्‍नावली नाटकांत व ह्युएनत्संगाच्या वर्णनांतहि याची राजधानी मणिपूर होती असे एके ठिकाणी म्हटलें आहे. हा प्रांत समुद्रगुप्तानें जिंकिला होता, त्यावेळी येथील राजा महेंद्र नावाचा होता. काहींच्या मतें हल्लीचा छत्तीसगड, अमरकंटक व कांकर हा प्रांत म्हणजे दक्षिणकोसल होय. यांतच गज्जिहाना नगरी होती असे म्हणतात.

या प्राचीन दक्षिण कोसलाचे प्राचीन राजे हैहय होत. हे सहस्रार्जुनाचे वंशज होते. ते रामायणकालीन होते. यांची व अयोध्येच्या सगर राजांची युद्धे झालेली आहेत. या हैहयांना काही (विशेषत: परकीय) इतिहासकार हय नांवाचे बाह्य शक समजतात. परंतु ते खोटे आहे असे रा. वैद्य म्हणतात. हे शुद्ध सोमवंशीय क्षत्रिय होते. ह्युएनत्संगहि त्यांना स्पष्ट क्षत्रियच म्हणतो. ते उंच व रंगाने काळे होते. सोमवंशांतील बहुतेक लोक काळे (श्रीकृष्णासारखे) असत. या हैहयांची दोन मोठी राज्यें होती. एक मणिपूरचे महाकोसलाचें व दुसरे त्रिपूरचे चेदीचें. त्रिपूरचे राजे कलचुरी हैहय होते. त्यांनी पुढे शिशुपालाच्या चेदी वंशाचें राज्य जिंकल्यामुळे त्यांना चेदी असें म्हणू लागले. वास्तविक ते कलचुरी हैहय होत. पुढे चेदी राज्यांतील प्रख्यात किल्ला कलिंजर हा त्यांनी जिंकल्यामुळे यांना ‘कलिजरपुरवराधीश्वर’ म्हणत. यांचा उल्लेख ह्युएननें महाकोसलासारखा स्पष्ट केला नाही. बाली जिल्ह्यांतील हैहय रजपूत हे सोमवंशी व रंगानें काळे असून मध्य प्रांतांतील सार्‍या क्षत्रियांत त्यांचा दर्जा पहिल्या प्रतीचा आहे. रतनपूर येथे या हैहयांची राजधानी बर्‍याच काळापासून होती. हीच बहुधा ह्युएननें पाहिली असावी. मंडळाच्या ताम्रपटावरून रतनपूरच्या राजांचे राज्य छत्तीसगडावर इ.स. १४४ पासून सुरू होते ते अठराव्या शतकापर्यंत (मराठय़ांच्या मुलुखगिरीपर्यंत) अव्याहत होतें. जबलपूरच्या ताम्रपटांत येथील काही राजांची नावें येतात. त्यांच्यात प्रख्यात असा पहिला कोक्कलदेव होऊन गेला. त्याच्या आधीचे छत्तीसगडचे हे हैहय बौद्धधर्मी होते. ह्युएनचा राजा बौद्धधर्मी होता. सुप्रसिद्ध बौद्धधर्माचार्य नागार्जून या कोसलदेशचा होता. सारांश हर्षांच्या आधी व नंतरहि कोसलांत बौद्धधर्म प्रचलित होता. आठव्या शतकांत येथें धर्मक्रांती होऊन बौद्धधर्माचें उच्चाटन झालें. या हैहय घराण्यांतील राजांच्या वंशावळी बिनचूक सापडत नाहीत. कोक्कल हा सनातनधर्मी होता. त्रिपूरचे चेदी ऊर्फ कलचुरी हैहय यांनी आपला स्वत:चा एक शक इ.स. २४८ च्या सप्टेंबरच्या पाचव्या तारखेस सुरू केला. हैहयांची ही राज्यें पर्वतांनी वेष्टित असल्यामुळे एक हजार वर्षे बिनधोक टिकली होती. त्यांना पहिला व शेवटचा तडाखा मराठय़ांनी दिला. त्यांच्या बखरी साधारण सांपडतात; परंतु त्यांत खरी माहिती थोडीच असते.

छत्तीसगड प्रांत म्हणजे महाकोसल. या छत्तीसगडांत एक एक गड असलेले ३६ भाग आहेत. त्यात पुढील चार भाग मुख्य आहेत. (१) शिवनाथ नदीचें खोरे, (२) हसदा नदीचें खोरें, (३) महा नदीचें खोरें व (४) रायपूर प्रांत. येथील मुख्य धान्यें तांदूळ, गहूं, कडधान्य व गळिताचीं धान्यें होत. जंगलांत वाघ, डुकर व रेडे फार आहेत; बंगालच्या बाजूस हत्तीही पुष्कळ आहेत. जंगलांत गौंड, भूम्ये व आबीग हे रानटी लोक राहतात. हे घाटांवरील लोकांत मिसळत नाहींत. घाटांवर बहुतेक चांभार लोक असून ते शेतकी करतात. यांचा धर्म सत्‍नामी आहे. याशिवाय ब्राह्मण, रजपूत कूर्मी व राऊत या येथील प्रमुख जाती आहेत. या प्रांतांत आगगाडी फार थोडी आहे. पूर्वी इकडे प्रांत सुपीक असल्यानें अतोनात धान्य पिके  व वाहतुकीचे रस्ते कमी असल्याने ते तेथेच पडून कुजे. त्यावेळी वाहतूक वंजारी लोक करीत असत.

पूर्वी येथे (बखरीच्या माहितीवरून) सत्यांग नावाच्या हैद्यत्य राजा होता. त्याच्या नंतर सुद्युम्नराजा झाला. त्याला तीन पुत्र होते. त्याने तिघांना आपलें राज्य माहिष्मती (मांडला), चंद्रपूर (चांदा), मणिपूर (रतनपूर) याप्रमाणे वाटून दिले. रतनपूर म्हणजेच छत्तीसगड. येथील दहवा राजा कर्णपाल याने स. ११५-१९४ पर्यंत राज्य करून व अमरकंटक येथे शहर वसवून देवळें बांधिली. स. ३०० च्या सुमारास मदनपाल नावाच्या राजानें अमर कॅटकाजवळ धनपूर शहर व अजमीर किल्ला बांधला व किल्ल्याचे अवशेष अजून आहेत. पुढें आठव्या शतकांत सुरदेव व ब्रह्मदेव या भावांनी हें राज्य वाटून घेतलें. रतनपुरची थोरली पाती व रायपुरची छोटी पाती होय. विलासपुर सुरगुजाव, संबळपुर येथील संस्थानिक रतनपूरचे मांडलिक असून राजपुरचे मांडलिक बस्तर व कंकरचे राजे आहेत मराठय़ांच्या स्वार्‍यापर्यंत हीच परिस्थिती होती.

मणिपूर हें (जुनी राजधानी) रतनपुरचे उत्तरेस ७।। कोसांवर, लफा पर्वतांच्या माथ्यावर वसलेले आहे. त्याची उंची ३४०० फूट आहे. येथे किल्ला, टांक्या, देवळे व वाडे यांचे अवशेष अद्यापि आहेत. संवत ८९५ ते १६२० पर्यंतच्या तेथील ब्राह्मणी कथांत, राज्यांतील बांधलेली देवळें व वसविलेली नगरें यांच्या नामावलीखेरीज, निरनिराळ्या राजांच्या कल्पित गुणांचे वर्णन आढळते. या कथा अद्यापि छापलेल्या नाहींत. स. १५६३ त, अकबराचे कारकीर्दीत येथे मुसुलमान घुसले; तेव्हा रतनपुरचा राजा कल्याणसिंग हा अकबराचा मांडलिक बनला. या वेळेपासून मराठय़ांच्या वेळेपर्यंत याच्या वंशजानी तेथे राज्य केले. मराठय़ांच्या स्वार्‍यांत रतनपुर व रायपुर ही दोन्हीं राज्यें मोडिली व नागपुरची भोसलेशाही झाली. हलली एक-दोन लहान संस्थानिक (हैहयवंशीय) या प्रांतांत आहेत. हैहय घराण्यांत फार पराक्रमी राजे झाले नाहींत व त्यांचीं घराणीही हल्ली फारशी उरलेली नाहीत. इकडील राज्यांच्या पूर्व वैभवाची व सामर्थ्याची साक्ष, इकडील प्रांतांतील राजीम, सुपूर व कवरीनारायण या ठिकाणच्या मोठमोठय़ा देवळांच्या अवशेषांवरून व तेथील शिलालेखांवरून पटतें. या हैहयवंशांतील एक सुरदेव नावाचा राजा पराक्रमी निपजला होता. त्याने स. ९९८ त तैलंगण जिंकला होता. स. १०६५ तील एका शिलालेखांत, श्रीकल्ल चेंदीश्वर, रत्‍नराज, पृथ्वीदेव, जज्जलदेव अशी राजांची नावें आढळतात. या प्रांतांतील आतांपर्यंत सापडलेली फार जुनी नाणीं या पृथ्वीदेवाची असून, ती बहुतेक सोन्याची व फार थोडीं तांब्यांची आहेत. तांब्याच्या नाण्यांवर हनुमानाची मूर्ती असून, सोन्याच्या नाण्यांवरील आकृती अस्पष्ट आहे. जज्जलदेव व रत्‍नदेव यांचीही काही नाणीं आढळली आहेत. त्यावरून त्यांचा काल अनुक्रमे स. ११२० व स. ११४० येतो. यापेक्षा, हैहय राजांचा व त्याबरोबरच या दक्षिणकोसल देशाचा देण्याजोगा इतिहास आढळत नाही. (स्मिथ-अय्यर-वैद्य. मध्य. भा. पु. १-२; इं. ग्या. पु. १५; ज.रा.ए.सो. १९००, ०९, १८; वायुपुराण वाल्मी. रामायण; महाभारत; रघुवंश; भा.भु.व.; प्रा. कोश; अ. कोश; त्रिकांडशे; हंटर-ओरि. इति; म. प्रां. ग्राझि; कुक; ग्रँट-ग्यझि; कनिंगह्याम.)

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .