प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें
           
कोहाट, जिल्हा:- वायव्य सरहद्दीवरील प्रांतांतील एक जिल्हा. याचें क्षे. फ. इ.स. १९११ साली २६९५ चौ. मैल होतें. उत्तरेस पेशावर जिल्हा, जोवाकी पर्वत; वायव्येस ओरकैझ तीराह; नैऋत्येस वझीरीस्तान; आग्नेयीस बन्नू व मियानवाली जिल्हे; पूर्वेस सिंधु नदी. या जिल्ह्याची जास्तीत जास्त लांबी १०४ मैल व रुंदी ५० मैल आहे. या जिल्ह्यांत तृतीय युगांतील पाषाणांचे थरच्या थर आढळतात. हे पाषाण रेताड दगडाचे असून त्या दगडाच्या थरांत चपटय़ा खडूच्या दगडांचेहि कण सांपडतात. रेताड दगडांची दक्षिण भागांत समृद्धी आहे व उत्तर भागांतही समृद्धी आहे. व उत्तर भागांत खडूच्या दगडांचें वैपुल्य आहे. या चपटय़ा खडूच्या थराखालीं शेंदेलोण मुबलक सापडते. हे शेंदेलोण विशेषत: बहाद्दुर खेल येथें पुष्कळ सांपडते. येथें याचे थर १००० फूट जाडीचे आहेत. याचा रंग तांबूस असून हे शेंदेलोण फार शुद्ध असते.

हा जिल्हा उंचीवर असल्याने येथे उन्हाळा थोडा काळ असतो. पण तेवढय़ा काळांत आपली चुणूक भासविल्याशिवाय तो राहात नाहीं. वसंत व शरद हे ऋतू फार बहारीचे असतात. हिवाळ्यांत थंडी कडक असते व मीरांझी पर्वताच्या दर्‍यातून थंड वार्‍याचे प्रवाह सारखे येत असल्यामुळे, ते अंगाला झोंबून फार त्रास होतो. उन्हाळा व थंडी दोन्हीही कडक स्वरूपाचीं असल्यामुळें न्युमोनियाची साथ येथे वरचेवर येते. शिवाय मलेरियाचा रोग तर येथें कायमचाच तळ देऊन बसलेला आहे.

बाबर बादशहानें आपल्या आयुष्यांतील आठवणी लिहिल्या आहेत त्यांत प्रथमत: या जिल्ह्याचा उल्लेख केलेला आढळतो. हल्लीप्रमाणेंच त्यावेळींहि या जिल्ह्यांत पठाण लोकांच्या बंगष व खट्टक या दोन जातींची मुख्यत्वेकरून वस्ती होती. या बंगष जातींच्या लोकांना, गर्देझहून गिलझैच्या प्रदेशांत हांकून लावण्यात आल्यानें त्या लोकांनी १४ व्या शतकाच्या सुमारास कुरम खोर्‍यात आश्रय घेतला; व तेथून मिरांझी व कोहाटच्या मुलुखांत तेथील मूळचे लोक जे ओरकैझ यांच्याशीं लढाया करून त्यांना हळू हळू मागें वायव्य सरहद्दीवरील टेकडय़ांपलीकडे हांकून लावून मिरांझी व कोहाट या मुलुखावर आपली सत्ता प्रस्थापित केली अशी आख्यायिका आहे. खट्टक लोक हे मूळचे सुलेमान पर्वतांत राहणारे पण तेराव्या शतकाच्या सुमारास त्यांनी आपलें वसतिस्थान सोडून बन्नू जिल्ह्यांत वस्ती केली. पण बन्नू जिल्ह्यांतील मूळचे रहिवाशी जे बन्नूची त्यांच्यांशी यांचे पटेनासें होऊन त्यांनी सुमारे १५ व्या शतकाच्या सुमारास कोहाट जिल्ह्यांत वस्ती केली. इ.स. १५०५ साली लूट करण्याच्या इच्छेने बाबरनें या जिल्ह्यावर स्वारी केली व कोहाट व हंगू हे प्रांत लुटले. पण अशी रीतीने कोहाट जिल्हा जरी मोंगलाच्या ताब्यांत गेला तरी, मोंगलांचा या जिल्ह्यावरील अंमल नावापुरताच होता. अकबराच्या कारकीर्दीत मलिक अकोर नावाच्या एका खट्टक जातीच्या सरदारानें काबूल नदीच्या दक्षिणेस असलेल्या मुलुखाचें लुटालुटीपासून रक्षण करण्याचे अकबराजवळ कबूल केले व याचा मोबदला म्हणून अकबरानें त्याला अकोरच्या प्रदेशावर कर बसविण्याचे अधिकार दिले व इतर थोडासा मुलूखहि त्याला तोडून दिला; एवढेंच नव्हें तर या प्रांतांवर अकोरच्या वंशजांचाहि हक्क चालावा ही गोष्टहि त्याने मान्य केली.

सन १७४७ मध्यें दुराणी साम्राज्याच्या सत्तेखाली कोहाट प्रांत आला; तरी पण त्या प्रांताचा कारभार बंगष व खट्टक जातींच्या लोकांच्याच ताब्यांत असे. १९ व्या शतकाच्या प्रारंभी सरदार समदखान नावाच्या बारकझै जातीच्या एका सरदारानें कोहाट व हंगू हा देश आपल्या ताब्यांत आणिला.  पण १८२८ मध्यें या सरदारांच्या वंशजांना पेशावरच्या सरदार लोकांनी हाकून लाविलें. या पेशावरच्या सरदारांत सुलतान महंमदखान हा प्रमुख सरदार होता. टेरी तहशील ही अहमदशहा दुराणीच्या ताब्यांत आल्यावर अकोरच्या घराण्याचा कनिष्ठ पुत्र हा या तहसिलीचा कारभार पाहात असे व हीच पद्धत रूढ झाल्यामुळे या तहशिलीवर राज्य करणारे मांडलिक घराणे अकोरच्या मुख्य घराण्याशी तुटकपणाने वागूं लागले व त्या घराण्यांतील राजांनी स्वतंत्र होण्याचा यत्‍न आरंभिला. पण यामुळे अकोरच्या मुख्य घराण्यांत व या मांडलिक घराण्यांत टेरी तहशिलीवर कोणी सत्ता चालवावी या संबंधांत वरचेवर भांडणे, खून, मारामार्‍या होऊं लागल्या व अशा रीतीनें जिकडे तिकडे अंदाधुंदी माजली.

पण लवकरच या प्रांतावर शिखांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. तरी पण या प्रांतांतील लोकांपासून नियमानें कर वसूल करण्याची या शिखांच्या अंगी धमक नव्हतीं. तेव्हां रणजितसिंगानें सुलतान महंमुदखान नांवाच्या एका इसमाला पेशावरचा सुभेदार नेमून त्याला कोहाट, हंगू व टेरी हे प्रांत बक्षीस दिले. महमदखानानें टेरी तालुक्याची व्यवस्था रसूलखान नावाच्या एका माणसाकडे सोपविली व बाकीच्या दोन्ही प्रांतांचा कारभार तो स्वत: आपल्या मुलाच्या साहाय्यावें पाहूं लागला. १८४३ मध्यें रसूलखान वारल्यानंतर त्याचा दत्तक मुलगा ख्वाजा महंमदखान हा गादीवर बसला. दुसरे शीख युद्ध ज्या वेळी सुरू झाले त्यावेळी पेशावर येथील शिखांनीही इंग्रजांविरुद्ध हत्यार उपसलें. त्यावेळी, पेशावर येथील अंमलदार जॉर्ज लॉरेन्स याने कोहाट येथे आश्रय घेतला; पण सुलतान महंमदखान याने त्याला शिखांच्या स्वाधीन केले. सुलतान महंमदखानानें शिखांचा पक्ष धरला होता, पण ख्वाजा महंमदखान हा मात्र इंग्रजांच्या पक्षास मिळाला. पुढें या युद्धांत इंग्रजांची सरशी झाल्यामुळे सुलतान महंमदखान हा आपल्या अनुयायांसह काबूल येथे पळून गेला व त्यामुळे कोहाट व पंजाब हे प्रदेश ब्रिटिश राज्याला जोडण्यात आले. ख्वाजा महंमदखानानें मात्र ब्रिटिशांचा पक्ष धरला होता म्हणून टेरी तहशील ही त्याच्याकडेच ठेवण्यात आली व १८७२ मध्यें त्याला नबाब व के.सी.एस.आय. हे हुद्दे देण्यात आले. हा १८८९ मध्ये वारला व त्याच्या पश्चात त्याचा मुलगा खान बहादूर अब्दुल गफूरखान हा गादीवर आला. १८५१ मध्ये ब्रिटिश सरकारनें जाहीरनामा काढून मिरांझी पर्वताचा टापू आपल्या राज्याला जोडल्याचें जाहीर केलें. पण या टापूंत राहणार्‍या पहाडी जाती अीतशय बाणेदार असल्याने त्या इंग्रज लोकांचे वर्चस्व कबूल करीनात व त्यांना करही देईनात. तेव्हा १८५५ मध्ये इंग्रजांनी ४००० लोकांची एक तुकडी त्यांच्यावर पाठविली. त्यामुळें डोंगरांतील मिरांझी लोकांना इंग्रजांना शरण येणे भाग पडलें. अशा रीतीनें कुरम नदीपर्यंतचा सर्व मुलूख पादाक्रांत केल्यावर, कोहाट ते पेशावरपर्यंतचा व बहादूरखेलच्या मार्गाने, बग्नूपर्यंतचा रस्ता असे दोन रस्ते तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामांत डोंगराळ जातींनी बरीच विघ्नें आणळीं. पण शेवटी तें रस्ते कसेबसे करण्यात आले.

कोहाट जिल्ह्यांत कोहाट, टेरी व हंगू अशा तीन तहशिली आहेत. जिल्ह्यांत एक गांव व २९० खोडी आहेत. (लो. सं. इ.स. १९११ साली २,१४,१२३). १९११ सालीं या जिल्ह्याची लोकसंख्या २,२२,६१० होती; त्यापैकी १,१९,०८१ पुरुष व १,०३,९०९ स्त्रिया होत्या. कोहाट तहशिलीची लोकसंख्या ७४१६२० असून टेरी व हंगू यांची १०४४६२ व ४४०६६ इतकी लोकसंख्या होती. कोहाट हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे. या जिल्ह्यांत मुसलमान (२०८८६८); हिंदू (१०८४८), शीख (२७३९) व ख्रिश्चन (२२१) असे चार वर्णाचे मुख्यत: लोक आहेत.

धंदे:- जिल्ह्यांतील शेंकडा ६८ लोकांचा धंदा शेतकीचा आहे. या जिल्ह्यांतील दर्‍याखोर्‍याच्या पायथ्याशी असलेली जमीन चिकण मातीची असून ती सुपीक आहे. जमीनींतून दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी व जून ते ऑगस्ट अशीं दोन पिकें काढण्यांत येतात. १९०३-४ साली ४६१ चौरस मैल जमीन लागवडीखाली होती व त्यापैकी ६१ चौरस मैलांनां कालवे, तलाव अगर विहिरी इत्यादी साधनांनी पाणीपुरवठा केला जात होता. जमिनीतील मुख्य पीक म्हणजे गव्हाचे व बाजरीचें होय. याशिवाय चणे, मका, कडधान्यें व ज्वारी इत्यादींचेही उत्पन्न होते. तांदूळ व कापूस यांचे फारच थोडें उत्पन्न आहे. गुरांची निपज चांगली नसते. ती मुख्यत: पंजाबांतून आणिली जातात. उंटाची निपज येथे मोठय़ा प्रमाणांत आढळते. जाड शेपटीच्या व साध्या या दोन्हीं प्रकारच्या मेंढय़ा व शेळ्या या जिल्ह्यांत पुष्कळ आहेत. येथील घोडे पांढर्‍या वर्णाचे असतात. या जिल्ह्यांत डिट्रिक्ट बोर्ड व म्युनिसिपालिटी यांनी घोडय़ाच्या व गाढवाच्या दोन पागा ठेवल्या आहेत. जिल्ह्यांतील जंगल सुमारे ७४ मैल आहे व त्याच्यावर एक स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आला आहे. जंगलांत मझ्री ऊर्फ देवदारू झाडांची बरीच समृद्धि आढळते; याशिवाय शिशवी, बकैन, पलोसी इत्यादी झाडेही आहेत. जट्ट, मालगीन, खरक व बहाद्दरखेल या ठिकाणी सैंधवाच्या खाणीच्या खाणी आहेत. यांनी जवळजवळ ५० मैल लांब व २० मैल रुंदीचा टापू व्यापिला आहे. १९०३-४ साली १५,३०७ टन सैंधवाचा खप झाला. तसेंच या जिल्ह्यांत पेट्रोलियमचे तीन लहानसें झरे आहेत. कोसट नदीच्या दक्षिणेकडील भागांत गंधक सापडतें. कलाकौशल्याच्या बाबतींत हा जिल्हा मागासलेला आहे. पूर्वी येथे रायफल्स (एक प्रकारची बंदूक) तयार होत असत, पण त्याला उत्तेजन न मिळाल्यामुळे तो धंदा बसला आहे. कापड विणण्याचे काम सर्व भागांतून होतें. कोहाट गावात व त्याच्या आसपास रेशमाची अगर सुती पागोटी फारच उत्तम तर्‍हेची तयार केली जातात. देवदारूच्या दोर्‍या, चटया, टोपल्या इत्यादी वस्तू करण्याच्या कामी उपयोग करण्यात येतो. उंटावर ठेवण्याकरता लागणार्‍या लोकरी पिशव्याही येथें चांगल्या तयार होतात. तसेंच कातडीं वहाणा अगर जोडेही येथें उत्तम तर्‍हेचे तयार होतात. या जिल्ह्याचा तीराह व काबूलशी खुशालगड- कोहाट- थल रेल्वेनें बराच मोठा व्यापार चालतो. सैंधव, धान्य, चटया, दोर्‍या इत्यादी वस्तू बाहेरगावी जातात. कापड व लोखंड यांची आयात होतें. कोहाट, थल, व नर्याद ही तीन व्यापारी ठिकाणें आहेत. खुशालगड ते थलपर्यंतची रेल्वे १९०३ साली सुरू झाली. पेशावर ते कोहट व बन्नू येथपर्यंत टांग्यानें टपालाची ने-आण होते. १७९ मैल खडीचा रस्ता असून ५७९ मैल साधा रस्ता आहे. याशिवाय खुशालगडापासून कोहाटच्या मार्गानें थलपर्यंत व खुशालगडापासून ते अटकपर्यंत असे दोन रस्ते आहेत.

शासन पद्धती:- या जिल्ह्याच्या कारभारासाठी तीन तहशिली पाडण्यात आल्या असून त्या प्रत्येकीवर एक तहशिलदार व एक दुय्यम तहशिलदार असे अधिकारी नेमलेले आहेत. डेप्युटी कमिशनरला डिट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचे फौजदारी अधिकार व डिट्रिक्ट दिवाणी अधिकार असतात. याच्या हाताखाली एक दुय्यम न्यायाधीश असून त्याला अपील चालविण्याचेही अधिकार असतात. याशिवाय कोहाट येथे एक मुन्सफ व टेरी येथे एक दिवाणी न्यायाधीश असतो. या जिल्ह्यांत गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे.

टेरी तहशिलीनें कोहाट जिल्ह्याचा अर्धा भाग व्यापिला आहे. ब्रिटिश राज्याशी ही तहशील जोडण्यांत आल्यानंतर तेथील खानानें ३३००० रुपये वसून ब्रिटिश सरकारला द्यावा असे ठरले. पण पुढें तो वसूल २०००० पर्यंत करण्यात आला. १९०० त मिरांझी टापूचीही आकारणी ठरविण्यात आली. अशा रीतीने इ.स. १९०१-४ त या सर्व जिल्ह्याचा एकंदर वसूल ८३००० रुपये झाला. या जिल्ह्यांत फक्त कोहाट या एकाच गावांत म्युनिसिपालिटी आहे. १९०४ त या गावाचा वसूल १४१०० रुपये व खर्च १६००० रुपये झाला. १९११ सालच्या खानेसुमारींत एकंदर लोकसंख्येत शेंकडा तीन या प्रमाणांत म्हणजे ६९१२ लोकांना लिहितां वाचतां येत होते. कोहाट येथे एक दवाखाना व खास स्त्रियांसाठी एक औषधालय असून शिवाय हंगू व टेरी या ठिकाणी एक एक दवाखाना आहे.

तहशील:- कोहाट जिल्ह्यांतील तहशील. हिचें क्षेत्रफळ १९११ सालीं चौरस मैल होते. या तहशिलीचे दोन भाग आहेत. पैकी पश्चिम भागांत कोहाट शहर व कँटोनमेंट असून या भागांतून कोहाट नदी वहात गेली आहे. दुसरा भाग म्हणजे एक सपाट मैदान आहे. या तहशिलीची लोकसंख्या ७४,१६२ होती. १९०३-४ सालांत या तहशिलीचा वसूल ९०००० रुपये होता. या तहशिलींत कोहाट हे तहशिलीचें मुख्य ठिकाण व ८५ खेडीं आहेत.

गांव:- कोहाट जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. खुशालगडाहून ३० मैलांवर हे आहे. इ.स. १९११ सालीं या शहराची वस्ती २२६५४ असून त्यापैकी कँटोटमेंटची ७५०३ होती. त्याच्या पैकी १५९३० मुसुलमान; ४८५० हिंदू, १६९३ शीख व १६८ ख्रिश्चन धर्माचे लोक होते. ब्रिटिश राज्याला कोहाट जिल्हा जोडण्यांत आल्यानंतर हें शहर अस्तित्वांत आले. हे शहर उंचसखल जागी वसलें आहे. लष्कर व पोलीस ठाणें ही उंच जागेवर वसलीं आहेत. येथे लष्करी शिपायांच्या चार तुकडय़ा व तोफखाना आहे. इ.स. १८७३ मध्ये या शहराला म्युनिसिपालटी देण्यात आली. या शहराचें सर्वसाधारण उत्पन्न ४१००० असून खर्च ३६००० रुपये आहे. या ठिकाणी एक आंग्लोव्हर्नाक्युलर हायस्कूल, एक पुरुषांसाठी व एक स्त्रियांसाठी दवाखाना आहे. या शहराला व्यापारी दृष्टय़ा मुळीच महत्त्व नाही. या शहराच्या नजीक जंगलखेल या खेडय़ात बंदुका तयार करण्याचा धंदा पूर्वी होता तो हल्ली नामशेष झाला आहे.

येथे इ.स. १९२४ च्या सप्टेंबर मध्ये हिंदू मुसुलमानांत दंगा झाला त्यावेळी सरकारांस हिंदूंचे संरक्षण करता न आल्यामुळे बर्‍याच लोकांस स्थानत्याग करावा लागला.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .