विभाग अकरावा : काव्य - खतें
क्यैकटो, तालुका- दक्षिण ब्रह्मदेशांस थेटन जिल्ह्यांतील एक तालुका. याचें क्षेत्रफल ५०८ चौ. मै. तालुक्याचें मुख्य ठिकाण क्यैकटो. याची लो.सं. इ.स. १९११ सालीं ६१२७ होती. या तालुक्यामधून सितंग-क्यैकटो कालवा गेलेला असून तालुक्याचा उत्तर व पूर्व भाग पहाडी परंतु सुपीक आहे. १९०३-४ साली लागवडीचें क्षेत्रफळ १२० चौ.मै. होते व सर्याचे उत्पन्न १,२५,५०० होतें.
गाव- दक्षिण ब्रह्मदेशांत थेटन जिल्ह्यांतील क्यैकटो पोटिवभागाचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें कदत नदीच्या कांठीं आहे. कड्याच्या पायथ्याशीं क्यैकटो शहर मार्ताबानच्या आखातापर्यंत दक्षिणेस पसरलेलें आहे. याची लो.सं. सालीं १९११ ६१२७ असून येथील व्यापार भरभराटीत आहे. इ.स. १८८९ सालीं येथें म्यु.क. स्थापना झाली. तचें १९०३-४ सालीं उत्पन्न २०,३०० रु. झाले व खर्च २२३०० रु. झाला होता.