विभाग अकरावा : काव्य - खतें
क्यौकक्यी- दक्षिण ब्रह्मदेशांत टोंगु जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तालुका. क्षेत्रफळ १०४८ चौ.मै. १९११ सालीं लो.सं. ४०४४७. खेड्यांची सं. २४५. तालुक्याचें मुख्य शहर कयक्की (लो.सं. १६५०). लागवड क्षेत्रफळ ५५ चौ.मै. काळीचें उत्पन्न ९२००० रुपये. हा तालुका मोठा असून पश्चिमेस सित्तंग नदीपासून पूर्वेस सालवीन जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत पसरलेला आहे.