विभाग अकरावा : काव्य - खतें
क्यौक्तन- दक्षिण ब्रह्मदेशांत हंथवड्डी जिल्ह्यांतील एक तालुका. हा रंगून नदी व मार्ताबान आखात यांच्यामध्यें असून याचें क्षेत्रफळ ३०४ चौ.मै. आहे. थोडा कड्यांचा प्रदेश खेरीजकरून बाकी तालुका सपाट आहे. क्यौक्तन हें तालुक्याचें मुख्य ठिकाण ह्मव्वून नदीच्या कांठीं असून येथून ५ मैलांवर ह्मव्वून रंगून नदीला मिळते. तालुक्याच्या पश्चिमेस सिरियम नांवाचें एक ऐतिहासिक गांव असून त्याची लो.सं. १९११ त १०८९७ होती. १९११ सालीं सदर तालुक्याची वस्ती ६८८८७ होती. खेड्यांची संख्या ९० आहे. १९०३-०४ सालीं लागवडीखालीं २३७ चौ.मै. क्षेत्रफळ होतें. सार्याचें ४५९००० रु. होतें.