विभाग अकरावा : काव्य - खतें
क्रिसा- ग्रीसमधील प्राचीन शहर. हें फोसीस या प्रांतांत असून पारनेस पर्वताच्या एका शिखरावर वसलें आहे. होमरनें या शहराचा उल्लेख केला आहे. पुढें क्रिसिआच्या आखातावर सीर्हा बंदर बांधलें जाऊन त्याचें महत्व जसजसे वाढत गेलें तसतशी या शहराची महती कमी होत गेली. अम्फीसीटी येथील मंत्रिमंडळाने क्रिसिअनांबरोबर युद्ध करून क्रिसा शहर धुळीस मिळविलें. इ.स.पूर्वी ३२९ त मॅसिडोनच्या फिलिपशी फिरून युद्ध उपस्थित होऊन क्रीसाचा मागमूसहि राहिला नाही. अर्वाचीन क्रिसा म्हणजे प्राचीन क्रिसा असावेसें वाटतें.