प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें
             
क्रूगर- (१८२५-१९०४). स्टेफॅनस, जोहॅनसपॉल क्रूगर, हा ट्रान्सव्हाल रिपब्लिकचा प्रेसिडेंट; केप कॉलनींतील कोल्सबर्ग येथें १८२५ आक्टोबर ता. १० रोजी जन्मला. क्रूगर घराण्याचा मूळ पुरुष जॅकब क्रूगर नांवाचा जर्मन असून त्या घराण्यांतील मंडळी डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीनें केपकडे सन १७१३ सालीं रहावयास गेलेली होती. इ.स. १८३५-४० च्या सुमारास पॉल क्रूगर आपल्या आईबापाबरोबर केपकॉलनी सोडून ऑरेंजच्या उत्तरेकडील प्रदेशांत रहावयास गेला. लहानपणापासूनच तो धाडसी होता. रानटी व सुधारलेल्या अशा दोन्ही जातींच्या संमिश्र समाजांत तो वाढला होता त्यामुळें सतत लढाया, शिकारी असल्या व्यवसायांत तो गुंतलेला असल्यानें त्याचें शिक्षण लिहिणें- वाचणे व डच प्रेस्बिटेरियनपंथाचे धार्मिक ज्ञानसंपादन यापलीकडे फारसें झालें नव्हतें.

क्रूगर लहानपणीच मेटंबेल व झुलु यांच्याबरोबर होणार्‍या लढायांत भाग घेई; त्याच्या चवदाव्या वर्षी त्याच्या घरची सर्व मंडळी व्हॉलनदीच्या उत्तरेस रहावयास गेली. (ट्रांन्सव्हाल स्टेट स्थापन करणारांपैकीं ते होते) तेव्हापासून सैन्यांत त्याचा दर्जा वाढता वाढता सत्ताविसाव्या वर्षी बेच्युआनाच्या मोहिमेंत तो सैन्याचा कमांडल झाला. लढाया नसतील त्यावेळीं तो दूरवर (झांबेरी नदीपर्यंत) शिकारीवर जात असे. १८५२ मध्यें ट्रान्सव्हालचें स्वातंत्र्य ग्रेटब्रिटनने मान्य केलें. येथपासून पुढें अनेक वर्षे तेथें अराजकता माजलेली होती. शिवाय ऑरेंज फ्रीस्टेटचें राज्य मोडून दोन्ही देशांचा राज्यसंघ स्थापण्याचा प्रयत्‍न प्रेटोरियस-क्रूगर- पक्ष करीत होता. यापुढील या देशाच्या इतिहासांत क्रूगरचें नांव अगदी प्रामुख्यानें येतें. १८६४ मध्यें प्रेटोरियस प्रेसिडेंट हता व क्रूगरला सैन्याचें कमांडर जनरल नेमण्यांत आले. १८७० मध्यें डच व ब्रिटिश यांच्यांतील एका सरहद्दीसंबंधींच्या वादग्रस्त प्रश्नाचा निकाल असमाधानकारक लागल्यामुळें प्रेटोरियसचा पक्ष पदच्युत होऊन थॉमस बर्गर्स नांवाचा इसम प्रेसिडेंट झाला. त्या कारकीर्दीत क्रूगरनें बर्गर्सच्या विरोधीपक्षांत सामील होऊन कर न देण्याविषयीहि बोअर लोकांस उपदेश करण्यास सुरुवात केली. अशा विरोधी धोरणानें राज्यकारभार बंद पडून शेवटी १८७७ मध्यें ब्रिटिश लोकांनीं तो प्रांत आपल्या प्रांतास जोडून टाकला. या कृत्यास ट्रान्सव्हालचा देशभक्त क्रूगर यानें विरोध केला खरा; परंतु ती गोष्ट चुकत नाहीं असें ठाम दिसल्यामुळें नंतर त्यानें ब्रिटिश सरकारची एक मोठ्या पगाराची नोकरी पत्करली. यावरून यावेळीं ट्रान्सव्हालांतील बोअर लोकांनां देशभक्तीची व्याख्या बरोबर कळतच नव्हती असें म्हणावें लागतें. तथापि नोकरी पत्करल्यावरहि क्रूगरनें ट्रान्सव्हाल पुन्हा स्वतंत्र करण्याची चळवळ उघड चालवून, इंग्लंडमध्यें ट्रान्सव्हालचा ब्रिटिशांशी जडलेला नूतन संबंध तोडून टाकण्याची खटपट करणार्‍या दोन डेप्युटेशन्समध्यें सदस्य पाकरिले! तेव्हां या राजद्रोही कृत्यांबद्दल अर्थांत क्रुगरला नोकरीतून काढून टाकण्यांत आलें. १८८० मध्यें बोअर लोकांनीं बंड केलें. त्या बंडांतील नेतृत्रयींपैकी जनरल जौबर्ट व प्रेटोरियस हे दोघे व क्रूगर हा तिसरा होता. १८८३ मध्यें क्रूगरला बहुमतानें ट्रान्सव्हालचा प्रेसिडेंट निवडले. १८८३ मध्यें प्रेसिडेंट क्रूगर पुन्हां इंग्लंडमध्यें गेला व ब्रिटिश सरकारपासून लॉर्ड डर्बीमार्फत लंडन कन्व्हेन्शन नामक करारपत्र त्यानें मिळविलें. त्यायोगें ट्रान्सव्हालचा राज्यकारभार पुन्हां पूर्णपणें बोअर लोकांच्या हातीं गेला. परंतु तेव्हापासून त्यानें राष्ट्राची स्थिति खालावत चालली. स्वत: क्रूगर फारसा लोकप्रिय नव्हता; राज्यकारभाराच्या कामांतहि तो बराच नालायक ठरत चालला होता. फक्त ब्रिटिश सरकारबरोबरच्या कारभारांत यश आल्यामुळे देशांत त्याला साधारण पाठिंबा होता इतकेंच. १८८८ मध्यें क्रूगर दुसर्‍यांदा प्रेसिडेंट निवडून आला. १८८९ डॉ. लिडस हा तरुण हॉलंडर स्टेट सेक्रेटरी नेमला होता. त्यानें कुलमक्तेपद्धतीला फार उत्तेजन दिलें. व्यापारांत सरकारलाहि हक्क घेऊन देण्याचें तत्व मान्य करण्यांत आलें. १८९० ते १८९२ व १८९४ या सालांत मताधिकारासंबंधींच्या कायद्यांत फेरबदल करून क्रूगरनें सर्व यूटलंडर लोकांनां त्या अधिकारांतून वगळून टाकलें. ह्या त्याच्या कृत्यामुळें इतर समाजाचें मत क्रूगर विरुद्ध इतके बळावलें होतें कीं, १८९३ च्या निवडणुकींत क्रूगरच्या ऐवजीं जौबर्ट प्रेसिडेंट निवडून येणार असें बहुतेक लक्षण दिसत होतें. तथापि निवडणुकीच्या वेळीं प्रतिनिधि सभेच्या सभासदांशीं समेटाचें धोरण ठेवून कित्येक विरोधक मतदारांच्या मतांचा हक्क कायद्याच्या फालतू सबबींवर काढून टाकून व मतें मोजण्याच्या कामांतहि कांहीं लटपटी करून जौबर्टपेक्षां अधिक मतें मिळवून निवडणुकींत आपला विजय झाल्याचें क्रूगरनें जाहिर करविलें. त्या निकालाविरुद्ध जौबर्टनें प्रतिनिधिसभेकडे जाहिर करविलें. त्या निकालाविरुद्ध जौबर्टनें प्रतिनिधिसभेकडे अफील केलें, पण त्याचा कांहीं उपयोग न होता क्रूगर तिसर्‍यांदा प्रेसिडेंटच्या जागीं कायम झाला. बर्गर्स व जौबर्ट यांच्याबरोबर क्रूगरनें केलेल्या वर्तनावरून व तसेंच यूटलंडर्सनां मताधिकारांतून वगळण्याच्या त्याच्या कृत्यावरून असें दिसतें कीं, ट्रान्सव्हालचें सरकार विशिष्ट मंडळाच्या हातांत ठेवून आपण स्वत: त्या मंडळाचा आमरण प्रेसिडेंट रहावें, अशी त्याची महत्वाकांक्षा होती.

१८७७ पासून क्रूगरनें आपलें परदेशी राजकारण सतत ब्रिटिशविरोधक ठेवलें आणि बेच्युआनालँड, ऱ्होडेशिया व झुलुलँड या तिन्हीं ट्रान्सव्हालची सरहद्द वाढविण्याचा व ब्रिटिश मुलुख आपल्या राज्यांत सामील करण्याचा क्रम चालविला. या गोष्टींत १८९५ पर्यंत क्रूगरला यशच येत गेलें; पण त्या सालीं मात्र त्याला पाहिजे होतें तें बंदर मिळाले नाहीं. अंतर्गत कारभारांतील त्याचें धोरणहि विचारशून्यपणाचें, बेफिकीरीचें व बेदिक्कती असे. त्यामुळें शेंवटीं अनर्थ गुदरले. यूटलंडर्स लोकांच्या डेप्युटेशनला त्यानें जें उत्तर दिलें त्यांत त्याच्या एकंदर वागणुकीचें स्पष्टीकरण चांगले होतें. तो म्हणाला, हा माझा देश आहे व हे ह्या देशाचे कायदे आहेत; ज्यांनां हे कायदे पाळावयाचे नसतील त्यांनीं हा माझा देश सोडून खुशाल चालतें व्हावें.’’ यूटलंडर्स लोकांशीं सलोख्यानें तो वागला असता तर त्याच्या राज्यास चांगली बळकटी आली असती. शिवाय जेमसनच्या हल्ल्याच्या प्रकरणावरूनहि त्यानें कांहीं एक बोध घेतला नाहीं. आणि ब्रिटिश सरकारनें मध्यस्थी केली तरीहि यूटलंडर्स लोकांच्या तक्रारी दूर करण्याचें क्रूगरनें साफ नाकारलें. १८९८ मध्यें क्रूगर चवथ्यांदा ट्रान्सव्हालचा प्रेसिडेंट निवडून आला. १८९९ मध्यें परकीयांवर जो जुलूम चालला होता त्याचा विचार करण्याकरितां ब्लोएमफाँटेन येथें सर मिलनर व प्रेसिडेंट क्रूगर यांची एकत्र बेठक भरली. पण त्या बैठकींत क्रूगर आपली तत्वें तिळमात्र सोडण्यास तयार नव्हता. येथपर्यंतच्या सर्व प्रसंगी क्रूगरनें स्वत:च्या व आपल्या समाजाच्या करितां सर्व फायदे मिळवून इतरांनां तो काडीची सवलत देण्यास तयार नसे. त्यामुळेंच फ्री स्टेटचा प्रे. सर जॉन ब्रँड याच्या बरोबर क्रूगरचें कधीं पटलें नाहीं. ब्रँडनंतर रीट्झ प्रेसिडेंट झाला. त्यावेळीं क्रूगरनें सर्व बोअर लोकसत्ताक राज्यांनी त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला आल्यास एकमेकांना परस्पर मदत करण्याचा बंधनपर ठराव केला; पण त्या ठरावानें फ्रीस्टेटला कांहीं मदत न होतां क्रूगरनें मात्र ब्रिटिशांविरुद्ध त्यांची वारंवार मदत घेतली. याप्रमाणें क्रूगरनें आपला एक कावा तर साधलाच. पण त्याच्या मुळे चढून जाऊन मिल्नर बैठकीत कोणतीहि सवलत इतरांनां द्यावयाची नाहीं अशा निश्चयानें तो आला. त्या बैठकीत मताधिकार देण्याचें त्यानें वरकरणी कबूल केलें. पण त्याला दुसर्‍या इतक्या अनेक अटी घातल्या कीं तें सर्व ढोंग होतें हें उघड दिसत होते. मिल्नरनें जी जी म्हणून सूचना पुढें मांडली तिला ट्रान्सव्हालच्या स्वातंत्र्यास यानें धक्का पोहोचेल असे क्रूगरचे ठराविक उत्तर मिळत गेले. अर्थात् ही बैठक अयशस्वी झाली. पुढें १८९९ आक्टोबरमध्यें ग्रेटब्रिटनबरोबर पत्रव्यवहार होऊन शेवटी ट्रान्सव्हाल सरकारनें निर्वाणीचा खलिताही पाठविला व ताबडतोब ट्रान्सव्हाल व फ्रीस्टेट यांमधील बोअर लोकांनीं नाताळ व केप कॉलनी यावर स्वारी केली. १९०० मध्यें ब्रिटिश फौजेनें ब्लोएम फाँटिन व प्रेटोरिया हे प्रदेश व्यापले. त्यावेळी स्वतः वृद्धपणामुळे रणांगणावर जाण्यास असमर्थ असल्यामुळे क्रूगर आपल्या कार्यकारी मंडळाच्या सल्ल्याने युरोपात जाऊन तिकडील राष्ट्रांची मध्यस्थीरूपी मदत मिळविण्याच्या खटपटीस लागला. परंतु त्यात त्याला बिलकुल यश आले नाही. यापुढे राजकारणात त्याचे महत्त्व उरलेच नाही. तेव्हा तिकडेच युट्रेट येथें राहून त्यानें स्वतःचें चरित्र लिहून प्रसिद्ध केलें. १९०४ जुलै १४ रोजीं तो जेनेवा सरोवरानजीक क्लेरेन्स येथें मरण पावला. प्रिटोरिया येथें त्याच्या तिसर्‍या बायकोच्या थडग्यांतच त्याचें शव पुरण्यांत आलें. त्याच्या एकंदर तीन बायका झाल्या. त्याचें कुटुंबहि मोठें होतें. प्रिटोरिया येथें क्रूगरचा एक पुतळा स्थापला. त्यावेळीं क्रूगरच्या बायकोच्या इच्छेवरूनच क्रूगरच्या डोक्यावरील टोपी उताणी ठेवण्यांत आली; कारण असें कीं, तींत पावसाचें पाणी आपोआप सांचावें व तें पक्ष्यांनां पिण्यास उपयोगीं पडावें.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .