प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें       
      
क्लाइव्ह- (१७२५-१७७४) रॉबर्ट क्लाइव्ह हा इंग्लंडांत श्रॉपशॉयर परगण्यांत स्टिचे येथें ता. २९ सप्टेंबर १७२५ रोजीं जन्मला. याचा बाप वकील होता. हा लहानपणी धाडशी व हूड असे. फारशीं विद्या नसल्याकारणानें त्याला त्याच्या बापानें खटपट करून ईस्ट इंडिया कंपनींत कारकुनीची जागा देवविली. तो इ.स. १७४३ त मद्रासेस आला. त्यावेळीं कारकुनीच्या जागेला व्यापाराची चांगली माहिती लागे. पण ती याला मुळींच नव्हती व त्यामुळें पैसाहि त्याला फारसा मिळेना. हा काळ विपत्तींत एकलकोंड्यासारखा त्यानें घालविला. पिस्तुलानें आत्महत्या करण्याचाहि त्यानें दोन वेळां प्रयत्‍न केला परंतु प्राण गेला नाहीं हें पाहून, माझ्या जगण्याचें कांहीं तरी प्रयोजन आहे असें त्यानें ठरविलें. शेवटीं त्याला घरी जावेसें वाटलें. त्यावेळचा मद्रासचा गव्हर्नर त्याला चांगलें वागवी. इ. स. १७४३ त फ्रेंचांनीं मद्रास घेतलें, तेव्हां पळून गेलेल्या इंग्रजांत हा होता. पळतानां त्यानें मुसुलमानी वेष घेतला होता. याच सुमारास डेव्हिडच्या किल्ल्यावर फ्रेंचांनीं हल्ला केला पण त्यांत त्यांचा मोड झाला. या चकमकींत क्लाइव्हनें प्रथम हातांत शस्त्र घेतलें. नंतर इंग्रजांनीं पांदेचरीस वेढा दिला. त्यावेळीं यानें तरवार गाजविली. इंग्रजानें यानंतर देवीकोटा घेतला तेव्हां हा लेफ्टनंट बनला. पुढें बालकोंड्यावरील हल्ल्यांत याचें व कॅप्टन जिंजेनचें जमलें नाहीं म्हणून तो मद्रासला परतला. पुढें इ. स. १७५१ त चित्रनापल्लीच्या वेढ्यांत यानें कारकुनाची जागा कायमची सोडून लष्करांत नौकरी धरली. त्रिचनापल्लीस महंमद अल्ली हा फ्रेंचांनी (चंदासाहेबानें) अडकवून ठेविला होता. तेथील इंग्रजांच्या सैन्यांत अत्यंत बेशिस्ती होती. तेव्हां क्लाइव्हनें चंदासाहेबास तेथें तसाच सोडून एकदम अर्काटवर (चंदासाहेबाच्या राजधानीवर) ता. ११ आक्टोबर सन १७५१ रोजीं हल्ला केला व किल्ला काबीज केला. तेथें मुसलमानीं फौज थोडी होती; शिवाय चंदासाहेबानें पाठविलेली कुमक उशीरां आली. त्यामुळें राजधानी सहजासहजी पडली. चंदासाहेबानें आपला मुलगा राजेसाहेब याला अर्काटवर पाठविलें. त्यानें अर्काटला वेढा दिला तेव्हां क्लाइव्ह आंत कोंडला गेला. तटाला खिंडारें पडलीं पण राजेसाहेब आंत घुसेना, अन्नसामुग्री संपल्यावर आपोआप इंग्रज शरण येईल असें त्याला वाटलें. ही ढिलाई त्याला नडली. पुढें मोहरमच्या एके दिवशीं जोराचा हल्ला करावयाचा त्यानें बेत केला, तो फितुरीमुळें क्लाइव्ह यास समजला. त्यामुळें राजेसाहेबाच्या लढाईचें काम बिनसलें; शेवटीं त्यानें ५० दिवस चालविलेला वेढा उठविला. या वेढ्यामुळें फ्रेंचांच्या वजनास उतरती कळा लागून इंग्रज वरचढ बनूं लागले. याच वेढ्यांत हिंदी लोकांनीं आपण पेज पिऊन इंग्रजांस भात दिला. या व पुडील मोहिमांत मराठे (मुरारराव घोरपडे व तंजावरकर) यांनीं इंग्रजांचा पक्ष घेतल्यामुळें अखेर त्यांचा जय झाला. मद्रानहूनहि क्लाइव्हला मदत आली. त्यामुळें त्यानें अरणी येथें राजेसाहेबाचा पराभव केला (१७५१). नंतर तो मद्रासेस परत गेला. तेव्हां राजेसाहेबानें परत सर्व प्रांत काबीज केल्याचें ऐकून तो मागें फिरला. कावेरीपाक येथें दोघांची गांठ पडली व मोठ्या युक्तीनें क्लाइव्हनें जय मिळवला, आणि कवळंग व चिंगलपट हे दोन किल्ले त्यानें घेतले. मद्रासला परत आल्यावर आपल्या एका स्नेह्याच्या मास्कलिन नांवाच्या बहिणीशीं त्यानें लग्न केलें व अखेर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळें १७५३ त तो विलायतेस गेला. या वेळी दोन लाखांची माया त्यानें जमविली. इ. स. १७५६ मध्यें इंग्रजांचें व सिराजउद्दौल्याचें वांकडें आलें होतें. कलकत्तेकर इंग्रज फार संकटांत होतें. अशा वेळीं इंग्लंडहून आलेला वाटसन व क्लाइव्ह यांस बंगल्यांत पाठविलें. क्लाइव्ह नुकताच मद्रासला विलायतेहून गव्हर्नर म्हणून आला होता. सिराजशीं मिटतें घ्यावें असा मद्रासकारांचा हेतु होता. परंतु क्लाइव्हनें हुबळीस उतरल्याबरोबर लगेच सिराजला चढाईचीं पत्रें लिहिण्यास सुरुवात केली. त्याने कलकत्याचा विल्यम किल्ला काबीज केला. त्यावेळीं तत्रस्थ इंग्रजांत भांडणें सुरू होतीं. क्लाइव्ह सर्वांस अप्रिय झाला होता. तो कंपनीचा व वॉटसन हा राजाचा नोकर असल्यानें त्यांची आपसांत चुरस लागली होती. क्लाइव्हने हुगळी घेतली तेव्हां सिराजनें त्याच्याशीं तहाची वाटाघाट सुरू केली, पण त्यानें ती टाळली व दोघांची लढाई कलकत्यास होऊन उभय पक्षांचें सारखेंच नुकसान झालें. तेव्हां अलीनगर येथें तह झाला (९ फेब्रु. १७५७). यूरोपांत १७५७ त फ्रेंच-इंग्रजांचें युद्ध सुरू झाल्यामुळें चंद्रनगरच्या फ्रेंच गव्हर्नरानें इंग्रजांची कांहीं एक खोडी काढली नसतांहि क्लाइव्हनें त्याच्यावर एकाएकीं हल्ला केला. फ्रेंचांनीं शर्थीनें बचाव केला. यावेळीं क्लाइव्हचा पराजय झाला असता पण वॉटसननें आयत्या वेळीं मदत केल्यानें त्याला जय मिळाला. तो धाडशी असला तरी कठिण प्रसंगीं त्याची तारांबळ उडे. त्याच्या आयुष्यांतील सर्व मोठे प्रसंग अशा धरसोडीनेंच पार पडले आहेत. ऐन आणीबाणीच्या वेळीं त्यानें स्वतःच्या हिंमतीनें मनाचा निश्चय करून पराक्रम गाजविला असें घडलें नाहीं. या लढाईत नंदकुमार व एक फ्रेंच या दोघांच्या फितुरीनें इंग्रज विजयी झाले. याच वेळीं पातशहा आपल्यावर चालून येत आहे असें समजल्यावरून सिराजनें क्लाइव्हला मदतीस बोलाविलें. तो या संधीची वाट पहात होता. अलीनगरच्या तहाचा वाटेल तसा अर्थ करून क्लाइव्हनें आपल्या मागण्या वाढविल्या व स्वतः सिराजच्या प्रजेस त्रास देऊं लागला. कांहींतरी कुरापत काढून सिराजचें राज्य स्वाहा करण्याचा घाट त्यानें घातला. सिराजनें इंग्रजास भेटण्यापूर्वी नजराणे द्यावे, फ्रेंचांच्या सर्व वखारी इंग्रजांस द्याव्या, त्यांनां सर्व बंगाल्यांत व्यापारास परवानगी असावी वगैरे अटी क्लाइव्हनें घातल्या; त्या सिराजनें अमान्य केल्या. त्यावेळीं सिराजचा सेनापति मीरजाफर हा फितूर होऊन मिळाला. सिराजच्या दरबारीं वॅट हा इंग्रजी वकील होता, त्यानें व क्लाइव्हनें हीं सर्व कारस्थानें रचलीं. वरून त्यानें सिराजास गोड पत्रें लिहून कटाचा सुगावा लागूं दिला नाहीं. या कटांत उमीचंद हा सावकार होता. त्याला क्लाइव्हनें अगदीं हातोहातीं फसिवलें (उमीचंद पहा). मीरजाफर फितूर झाल्याचें सिराज याला कळलें तरी त्यानें त्याला बडतर्फ केलें नाहीं. क्लाइव्हची लबाडी मात्र त्याला समजली व तुम्ही तह मोडला असें त्याला पत्र लिहून तो प्लासीस आला. यावेळीं क्लाइव्ह धरसोडीनें वागत होता. कोणावरहि त्यानें पुरा विश्वास टाकला नाहीं. त्यानें पांच हजार फौज पाठविण्याचें मीरजाफरास वचन दिलें होतें, परंतु त्याच्याजवळ सारे बावीसशें लोक व थोड्याच तोफा होत्या. सिराजवर आपण एकदम हल्ला करावा असें त्यानें ठरविलें. त्यानें आपलें सैन्य आंबराईंत सुरक्षित ठिकाणीं ठेविलें होतें. सिराजचा मुख्य सेनापति मीरमदन मेल्यावर व मीरजाफर फितूर झालेला पाहून सिराजनें मुर्शिदाबादेस परत फिरण्याचा हुकूम केला व त्यामुळें सर्वत्र गोंधळ माजला. खरी लढाई येथें झालीच नाहीं. सिराज उगाच घाबरून पळाला (२३ जून १७५७). पुढें दोन-तीन दिवसांनीं क्लाईव्हनें फितुरी मीरजाफरास मुर्शिदाबादेस नेऊन गादीवर बसविलें व गुप्‍त कराराप्रमाणें बक्षिसाची मागणी केली. एकंदर रक्कम सव्वादोन कोटी रुपयांची होती. मोठ्या कष्टानें मीरनें ती भरली. त्यांत खुद्द क्लाइव्हला तेवीस लाख, चाळीस हजारांची रक्कम मिळाली. ही निव्वळ लूट असल्यानें इंग्लंडांत याबद्दल मोठा गवगवा झाला. परंतु आपण हें गैर केलें असें क्लाइव्हला कधींच वाटलें नाहीं. हिंदी लोकांत फूट पाडून आपला कावा साधण्याची युक्ति प्रथम क्लाइव्हनेंच अंमलांत आणून, इंग्रजी राज्याचा पाया घातला. मीरजाफरासहि पुढें क्लाइव्हनें छळलें. बाकीच्या उगवणीबद्दल त्यानें त्याच्याकडून पंचवीस लक्षांचा मुलुख लुबाडला (इ. स. १७५८), सार्‍या बहार प्रांतांतील सोर्‍याचा मक्ता कंपनीस देवविला आणि स्वतःस सहा हजारांची मनसबदारी मिळविली व आपण पातशाही अमीर बनला. त्यानें सहा हजार पायदळ व पांच हजार घोडदळ ठेवावें व त्याबद्दल पातशहानें त्याला सात लक्षांची नेमणूक द्यावी असा याचा अर्थ होता. परंतु त्यानें फौज न ठेवतां रक्कम मात्र मागितली व मीरजाफरनें परभारे कंपनीच्या जहागिरींतून वसूल करण्यास त्याला परवानगी दिली. यामुळें कंपनी व क्लाइव्हमध्यें याबद्दल तंटा उत्पन्न झाला. या सुमारास तो कलकत्याच्या कौन्सिलचा अध्यक्ष झाला होता. इ. स. १७५९ त शहाजाद्यानें मीरजाफरवर स्वारी केली तेव्हां हा त्याच्या मदतीस गेला होता. नंतर आपल्या मनाप्रमाणें कलकत्यास व्यवस्था लावून तो १७६० च्या फेब्रुवारींत स्वदेशीं परत गेला. तेथें त्याला प्लासीचा लॉर्ड बनविलें गेलें. त्यानें तेथे कंपनीच्या कारभाराची थोडीशी सुधारणा केली. इकडे मीर कासीमला इंग्रजांनीं गादीवर बसविलें व त्याच्यापासून पुष्कळ पैसा उपटला. ‘‘कंपनीच्या मुलकी व लष्करी सार्‍या नौकरांनीं लाच खाल्ला.’’ तेव्हां ही स्थिति सुधारण्यास क्लाइव्हला गव्हर्नर म्हणून तिसर्‍यानें हिंदुस्थानांत पाठविलें (१७६५). या वेळीं इंग्रजांवर आयोध्येचा नबाब व दिल्लीचा बादशहा हे चालून गेले. परंतु त्यांचा बक्सार येथें पराभव झाला. याचा फायदा घेऊन क्लाइव्हनें बंगाल, बहार व ओरिसा या तीन प्रांतांची प्रख्यात दिवाणी सनद शहाअलमपासून मिळविली. या सनदेनें कंपनी ही या प्रांताची (४ कोटी उत्पन्नाची) मालकीण झाली. कर्नाटक व दक्षिण या प्रांतांतील इंग्रजांच्या प्रदेशाचींहि दुसरीं फर्मानें त्यानें या वेळीं मिळविलीं. नंतर कंपनीच्या नौकरांचे पगार त्यानें वाढवून त्यांनीं नजराणे घेऊं नयेत व खासगी व व्यापारांत भाग घेऊं नये असें ठरविलें, सैन्यांत सुधारणा केली, तोफखान्याचे सर्व गोलंदाज युरोपियन नेमलें; एकहि हिंदी नेमला नाहीं. हल्लींहि हीच पद्धत अंमलांत आहे. यानंतर तो परत विलायतेस कायमचा गेला. तेथें त्यानें फार पैसे खाल्ले या आरोपावर त्याची चौकशी पार्लमेंटांत सुरू झाली (मीरजाफरनें आपल्या मृत्युपत्रांत त्याला ७ लक्ष रु. देऊन ठेविले होतेच). पुष्कळ वादविवाद होऊन व त्यानें बंगालच्या पहिल्या सफरींत २३ लक्ष ४० हजारांची माया जमविली खरी परंतु ती कशी जमविली त्यावर वाद न घालतां अखेर एकमतानें ‘‘त्याच वेळीं त्यानें स्वदेशांची मोठी व स्पृहणीय कामगिरी केली’’ असा निकाल देण्यांत आला व त्याला निर्दोषी ठरविलें. त्यावेळीं क्लाइव्हनेंहि आपलें समर्थन केलें. तो उमीचंदाच्या फसवणुकीबद्दल म्हणाला कीं ‘‘मला त्याबद्दल यत्किंचिंतहि वाईट वाटत नाहीं. एवढेंच नव्हे तर वेळ आल्यास शंभरदां मी पुन्हा असेंच करीन.’’ यानंतर लवकरच १७७४ च्या नोव्हेंबरमध्यें त्यानें आत्महत्या केली. याला अफूचें जबरदस्त व्यसन लागलें होतें. [अर्बुथनाट, सर विल्सन, मॅलेसन, कॅरसिन्नोली यांचीं क्लाइव्हचीं चरित्रें]

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .