प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें   
          
खडक, ओळख- खडक ओळखण्याला त्याच्या गुणधर्मांची माहिती असली पाहिजे. खडकांचे गुणधर्म तीन तर्‍हानी ठरवितात त्या तीन तर्‍हा अशा आहेतः- (१) खडकांचें ढोबळ परीक्षण. यांत सूक्ष्मदर्शक यंत्राचा वगैरे उपयोग न करतां वरवर दिसणार्‍या व थोड्या सामुग्रीनें शोधून काढतां येणार्‍या गुणधर्माचें वर्णन असतें. (२) प्रयोग शाळेतील परीक्षण. (३) सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानें परीक्षण.

ढोबळ परीक्षणः- खडक शोधण्याकरितां बाहेर हिंडावयास जातांना बरोबर मोठा हातोडा, छत्री, लोहचुंबक महत्कारी कांच (मॅग्निफाइंग ग्लास), खडकांचे तुंकडे गोळा करून आणण्याकरितां पिशवी, थोडें उदहराम्ल (हैड्रोक्लोरिक अ‍ॅसिड) इत्यादि जिन्नस बरोबर ठेवले पाहिजेत. प्रत्यक्ष जागेवर दिसणार्‍या गोष्टींची नोंद येथेंच एका वहींत करून ठेवण्याची पद्धत आहे. खडक मूळ स्थितींत दिसल्यास ओळखावयास सोपें जातें परंतु खडकावर त्याच्या पिष्टाचा थर असल्यास किंवा खडकांत फेर होऊन खरबुडी सांठल्यास ओळखण्यास जड पडतें. अशा ठिकाणीं कित्येक वेळां वरचा भाग काढून खालच्या खडकाचा तुकडा तपासण्यास घ्यावा लागतो. खडक पाहून त्याच्या ढोबळ गुणधर्मांवरून तो कोणत्या प्रकारचा आहे हें कसें ओळखावें तें पुढें दिलें आहे.

(अ) खडकाचा नवीन तुकडा पडल्यावर त्या बाजूस बारीक एकमेकाला चिकटून कण असले, त्यावर कोणत्याहि प्रकारची चकाकी नसली व विशिष्ट प्रकारची रचना नसली तर खालीं दिल्याप्रमाणें गुणधर्म पाहून खडक कोणता तो ठरवावा.

(१) काठिण्य (हार्डनेस) ०.५ ते १ आहे; मऊ असून नखानें किंवा चाकूनें सहज खरडला जातो; मातीसारखा वास येतो; अम्ल (अ‍ॅसिडनें) टाकल्यानें कोणताहि वायु निघत नाहीं; रंग राखी, पांढुरका, तांबूस, पिवळट असेल तर एखादा मातीचा दगड, शेल, विस्तवानें न बदलणारी माती किंवा ठिसूळ झालेला फेलस्पार असलेला खडक असण्याचा संभव असतो. शेल किंवा स्लेट असल्यास खडक थोडा कठिण असतो.

(२) काठिण्य १.५ ते २, विशिष्ट गुरुत्व २.२ ते २.४; रंग पांढरा, पिंवळट किंवा तांबूस; थर अथवा भेगांत सांपडतो; अ‍ॅसिड घातल्यास कोणताहि वायु निघत नाहीं तर तो बहुतकरून 'जिप्सम' असेल.

(३) हातानें मोडला जातो; रंग पांढुरका किंवा पिंवळट असून अ‍ॅसिड घातल्यास कर्बद्विप्राणिद (कार्बन डाय-ऑक्साइड) वायु निघत असेल तर तो चुनखडीच्या दगडांपैकीं असेल.

(४) काठिण्य ३ ते ४ आहे. विशिष्टगुरुत्व २.५ ते २.७, रंग हिरवट व तांबडा याचें मिश्रण, पुडीचा रंग पांढरा, हाताला साबणासारखा गुळगुळीत लागतो; अ‍ॅसिडनें वायु निघत नाहीं तर सर्पेंटाइन असेल.

(५) काठिण्य ३. विशिष्टगुरुत्व २.६ ते २.८, रंग पांढरवट, निळसर, पिवळट, काळा, भुकटीचा रंग पांढरा, अ‍ॅसिडनें कर्बद्विप्राणिद (कार्बन डाय-ऑक्साइड) वायु निघतो तर तो चुन्याचा खडक असेल.

(६) काठिण्य ३.५; ते ४.५; विशिष्टगुरुत्व २.६ ते २.८; रंग पांढरा पिंवळट; अ‍ॅसिड खडकावर घातल्याचा फारसा परिणाम होत नाही परंतु पूड करून त्यावर घातल्यास थोड-थोडा कर्हद्विप्राणिद वायु निघूं लागेल, तर तो डॉलोमाइट असेल.

(७) काठिण्य ३ ते ४; विशिष्टगुरुत्व ३ ते ३.९; रंग काळसर तपकिरी, काळा; पुडीचा रंग पिवळा किंवा तांबडा; अ‍ॅसिडमध्यें थोड्या प्रमाणांत विरघळून अ‍ॅसिडला पिवळट रंग येतो. खडकांत किंवा थरांत सांपडतो तें एखाद्या लोहाचें प्राणिद (ऑक्साइड) असेल.

(८) रंग पांढुरका, पिंवळट, निळसर; हातोड्यानें नाद निघतो व चकत्या निघतात; अ‍ॅसिडनें वायु निघत नाहीं तर बहुतेक तो फोनोलाइट किंवा फेल्साइट असेल.

(९) विशिष्ठ गुरुत्व २.९ ते ३.२; रंग काळा किंवा काळसर हिरवा, भुकटी तपकिरी असल्यास बेसॉल्ट किंवा अ‍ॅम्फिबोलाइट असेल.

(१०) काठिण्य ७; विशिष्टगुरुत्व २.५ ते २.९; रंग पांढरा, तांबूस, पिवळट. तपकिरी, चाकू ओढल्यास चाकूची लोखंडी रंगाची रेघ उठते तो बाग, चकमक वगैरे असण्याचा संभव आहे.

(आ) खडकाचा फोडलेला भाग काचेसारखा असल्यास कांचमणी, चकमक सैंधव वगैरेंसारखीं खनिज द्रव्यें किंवा आबसिडियन व पिचस्टोन सारखे खडक असतील.

(इ) खडकाच्या तुकड्यांत खनिजद्रव्यें स्फटिक स्थितींत आहेत, अशा वेळीं स्फटिक स्पष्ट दिसत असल्यास खडक ओळखण्याचा त्रास पडत नाहीं. परंतु स्फटिक स्पष्ट दिसत नसेल तर चाकूनें खडक खरवडला जातो का पहावा. खरवडला जाऊन अ‍ॅसिडनें कार्बन डाय ऑक्साइड निघाल्यास तो चुन्याचा खडक असणार. अ‍ॅसिडचा परिणाम फक्त पूड केल्यावर झाल्यास डॉलोमाइट पण अ‍ॅसिडचा परिणाम न झाल्यास जिप्सम समजावा. चाकूनें खरवडला जात नसल्यास त्याच्या व त्याच्यांतील खनिज द्रव्यांच्या रंगावरून खडक ठरवावा. एकच खनिज पदार्थ असून हिरवट रंग आहे तर अ‍ॅम्फिबोलाइट असेल. पांढरा व हिरवट असे दोन खनिज पदार्थ नसल्यास डायओराइट असेल.

(ई) खडकांत पल्लवी रचना असल्यास त्याला पल्लवीभूत खडक (शिस्ट फॉलिएटेड) असें म्हणतात व खडकांत जें खनिजद्रव्य प्रामुख्यानें असेल त्यावरून खडकाचें विशिष्ट नांव ठरवितात. या वर्गांत सर्व प्रकारचें शिस्ट किंवा ज्यांनां फॉलिएटेड खडक म्हणतात ते येतात.

(उ) खडक निरनिराळ्या प्रकारच्या तुकड्यांच्या एकीकरणानें झाला असल्यास ते तुकडे तपासून खडक कोणत्या प्रकारचा आहे हें शोधून काढणें झाल्यास तुकड्यांचा आकार व त्यांची आकृति व त्याचप्रमाणें ज्या लुकणानें हें तुकडे चिकटून राहिले असतील तें लुकण यांची तपासणी केली पाहिजे. जलजन्य खडक तुकड्यांचे किंवा कणाचे झालेले असतात व त्यांचें वर्गीकरण तुकड्यांच्या आकृतीच्या आकारमानाप्रमाणें केलेलें असतें.

(२) खडकतपासणीच्या प्रयोग शाळेंतील पद्धतिः- प्रयोग शाळेबाहेर खडक तपासण्याकरितां काय करावें हें वर सांगितलें आहे. आतां प्रयोगशाळेंतील उपकरणांच्या मदतीनें खडक ओळखण्याचें काम कसें करावयाचें हें खालीं थोडक्यांत दिलें आहे.

(अ) विशिष्टगुरुत्वः- खडकाचें विशिष्ट गुरुत्व माहिती असलेल्या माणसाला खडकाचा तुकडा हातांत घेऊन अंदाजानें सांगता येतें. परंतु नक्की माहितीकरितां व विशिष्टगुरुत्वाकरितां मुद्दाम केलेल्या ताजव्यावर वजन करून काढलें पाहिजे किंवा पदार्थविज्ञानशास्त्रांत दिलेला कोणत्यातरी एखाद्या पद्धतीनें काढलें पाहिजे.

(आ) बाह्यपृथक्करणः- रासायनिक पृथक्करण न करतां बाह्य पृथक्करणावरून पुष्कळ खडक व त्यांतील खनिजद्रव्यें ओळखतां येतात. बाह्यपृथक्करणाकरितां खडकाचा तुकडा घेऊन हातोड्यानें त्यांतील कणांचा भुगा न करितां ते सुटे करावे; नंतर एकासारखे एक दिसणारे कण इतर कणांपासून निराळे काढून ते महत्कारिकाच्या खालीं व लोहचुंबकानें तपासावे; त्याचप्रमाणें निरनिराळ्या विशिष्टगुरुत्वाचे द्रवपदार्थ घेऊन त्यांच्यांत वरील कण टाकावे. हलक्या द्रव्यावर टाकल्यास ते तळीं जाऊन बसतील व जड द्रव्यावर टाकल्यास त्यावर तरंगतील. परंतु त्याच्या इतक्याच विशिष्टगुरुत्वाच्या द्रवांत टाकल्यास ज्याठिकाणीं सोडावे त्याच ठिकाणीं राहातील. आपल्याजवळ निरनिराळ्या विशिष्टगुरुत्वाचीं बरींच द्रव्यें तयार ठेवल्यास कणांचें विशिष्ट गुरुत्व तेव्हांच काढतां येतें. कित्येक वेळां खडकाची पूड करून त्यावर पाण्याचा ओघ सुरू ठेवल्यास जड व हलकीं द्रव्यें वेगळीं होतात.

(इ) रासायनिक पृथक्करणः- कोणत्याहि खडकाचें रासायनिक पृथक्करण करणें भूस्तरशास्त्रज्ञाचें काम नसल्यामुळें खडक रसायन शास्त्रज्ञाकडे पाठवून त्याचें पृथक्करण करून आणण्याची पद्धत आहे. परंतु अगदी सोप्या तर्‍हेचे रासायनिक प्रयोग भूस्तरशास्त्रज्ञ करितात. उद्हराम्ल (हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड), दिव्याची जोत, कोळशावर तापविणें, काचेच्या नळींत तापविणें वगैरेंचा परिणाम खडकावर किंवा त्यांतील द्रव्यावर काय होतो हें नोंदून ठेवणें अत्यंत आवश्य आहे.

(ई) सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्यानें परीक्षणः- सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्यानें खडक तपासण्याची पद्धत जास्त जास्त प्रचारांत येऊं लागली आहे, म्हणून त्याबद्दलची थोडी माहिती येथें देणें अवश्य आहे. प्रथमतः सूक्ष्मदर्शक यंत्राखालीं घालून तपासतां येईल इतका पातळ खडकाचा तुकडा करावा लागतो. लेथच्या सहाय्यानें किंवा पुष्कळ वेळां नुसत्या हातोड्यानें खडकाचा पैशाएवढा जितका पातळ निघेल तितका तुकडा पाडावा व तो लांकडी मूठ करून त्यावर एका टोंकाला चिकटवावा. तुकडा लाकडास चिकटण्याकरितां मेण व राळ एकेठिकाणीं ऊन करून त्याचें लुकण तयार करावें व त्यामध्यें तो बसवावा. नऊ इंच चौरस व अर्धा इंच जाडीच्या लोखंडाच्या तकटावर जाड इमरीची किंवा कुरुंदाची पूड पसरावी आणि त्यावर पाणी घालून लांकडावर चिकटविलेल्या खडकाच्या तुकड्याची एक बाजू घासावी व जितक्या समपातळींत ती आणता येईल तितकी आणावी. एक बाजू वर सांगितल्याप्रमाणें तयार झाली म्हणजे लुकण दिव्यावर ऊन करून तुकडा सोडवावा व तो उलटा करून चिकटवावा आणि एमरीवर घांसावा. याप्रमाणें जाड एमरीवरचें घासणें झालें म्हणजे तुकड्याच्या दोन्ही बाजू अगदीं गुळगुळींत होण्याकरितां तुकडा काचेच्या तुकड्यावर 'कानडा बालसम'नें चिकटवून मऊ एमरीवर घांसावा व तो पारदर्शक झाला म्हणजे सुटे झालेले कण धुवून काढावे व धारेच्या मऊ दगडावर घांसून साफ करावा. नंतर सूक्ष्मदर्शक यंत्रानें तपासण्याकरितां मुद्दाम केलेल्या काचेवर हा तुकडा कानडा बालसममध्यें चिकटवावा व त्यावर काचेचा पातळ तुकडा बसवावा. अशा तर्‍हेनें तयार केलेला खडकाचा पातळ तुकडा सूक्ष्मदर्शक यंत्राखालीं तपासतां येतो. वरील सांगितलेली कृति फार काळजीपूर्वक करावी लागते. नाहींतर खडकाचा पातळ झालेला तुकडा तेव्हांच मोडण्याचा संभव असतो.

सूक्ष्मदर्शक यंत्रः- भूस्तरशास्त्राचा अभ्यास करतांना खडक किंवा खनिज पदार्थ तपासण्याकरितां जें सूक्ष्मदर्शक यंत्र उपयोगांत आणितात त्यास पेट्रॉलॉजिकल अथवा प्रस्तरनिर्णायक सूक्ष्मदर्शक यंत्र असें म्हणतात. या यंत्रांत दोन निकोलचे समपार्श्व (प्रिझम) असतात. त्यांत पदार्थाच्या खालच्याला, ज्यांतून आलेला प्रकाश पदार्थांतून घेतात त्याला, ध्रुवकारक (पोलरायझर) व वरच्याला पृथक्कारक (अ‍ॅनलायझर) म्हणतात. याशिवाय क्वार्टस वेज जिप्सम व अभ्रक यांचे पातळ तुकडे वगैरे साहित्य या सूक्ष्मदर्शक यंत्रांत अवश्य असतें.

परावर्तित प्रकाशः- प्रस्तरनिर्णायक सूक्ष्मयंत्रानें वर सांगितल्याप्रमाणें तयार केलेले खडकाचे पातळ तुकडे तपासतांत. प्रथमतः परावर्तित प्रकाशांत हा तुकडा तपासल्यास पुष्कळ खनिज पदार्थ ओळखतां येतात. पदार्थांतून येणार्‍या उजेडापेक्षां या प्रकाशानें अपारदर्शक खनिज पदार्थांच्या रंगातील सूक्ष्म छटा व पदार्थांवरील रेषा वगैरे स्पष्ट दिसतात.

पारप्रकाशः- अपारदर्शक खनिज पदार्थ ओळखण्यास परावर्तित प्रकाश उपयोगी पडतो. परंतु प्रस्तरनिर्णायक सूक्ष्मदर्शक यंत्रांत विशेष उपयोग पारभूत प्रकाशाचाच होतो. कारण बहुतेक पारदर्शक खनिज पदार्थच खडकांतून पुष्कळ असतात. पारभूत प्रकाशांत खडक तपासीत असतांना निरनिराळ्या कणांचा वक्रीभवनांक (रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स) काढण्याची पद्धत आहे ती अशीः- ज्या पदार्थाचा वक्रीभवनांक काढावयाचा असेल तो पदार्थ ज्याचा वक्रीभवनांक ठाऊक आहे अशा पदार्थाला लागून असतांना काढितात. सूक्ष्मदर्शक यंत्राखालीं हे दोन्ही पदार्थ असतांना यंत्राची नळी थोडथोडी वर उचलावी म्हणजे ज्या पदार्थाचा वक्रीभवनांक जास्त असतो त्या बाजूस त्या दोन पदार्थांतील रेषा सरकते आहे असें दिसतें. याप्रमाणें तो पदार्थ कोणत्याहि खनिज पदार्थाचा वक्रीभवनांक दोन तीन माहीत असलेल्या पदार्थाबरोबर तपासल्यास ठरवितां येतो.

ध्रुवीभूत (पोलराइझड) प्रकाश- ध्रुवीभूत प्रकाशांत पदार्थ तपासण्याकरतां प्रस्तरनिर्णायक सूक्ष्मदर्शक यंत्रांत ध्रुवकारक व पृथक्कारक असे दोन समपार्श्व (प्रिझम) असतात. ध्रुवकारकामधून आलेला प्रकाश तपासण्याच्या पदार्थांतून पाठवून नंतर पृथक्कारकामधून प्रकाश न घेतां पहिल्यांदा पदार्थ तपासावा व नंतर पृथक्कारकामधून प्रकाश घेऊन तपासावा. ध्रुवकारक यंत्राच्या खालच्या बाजूस बसविलेला असतो व त्याची जरूर नसल्यास तो एके बाजूस सारतां येते. पृथक्कारक यंत्राच्या नळींत किंवा नळीवर बसविला असतो, परंतु हा सुद्धां नको असेल तेव्हां एका बाजूस काढितां येतो. ध्रुवकारकामधून व तपासण्याच्या पदार्थांतून आलेला प्रकाश पृथक्कारकामधून न घेतां पहात असतांना पोलरायझर (ध्रुवकारक) फिरवावा किंवा तपासण्याचा पदार्थ ज्यावर ठेविला असतो त्या सूक्ष्मदर्शक यंत्राची बैठक फिरवावीं. असें करीत असतांना तपासण्याच्या पदार्थाचा रंग पालटत राहिला तर याला प्लिओक्रोइक असें म्हणतात. ध्रुवीभूत प्रकाश पदार्थांतून आल्यावर पृथक्कारकामधून घेऊन तपासण्याचा प्रकार खालीलप्रमाणें आहेः- ध्रुवकारक (पोलरायझर) व पृथक्कारक (अ‍ॅनलायझर) समांतर किंवा एकाच दिशेनें न ठेवतां एकमेकास आडवे ठेवावे. ध्रुवकारक व पृथक्कारक आडवे करून ठेवल्यास त्यांतून प्रकाश येत नाहीं. आतां खडकांतील जो खनिज पदार्थ तपासावयाचा असेल तो मध्यें ठेवावा आणि अशा स्थितींत त्यांतून प्रकाश न आल्यास तो खनिज पदार्थ आयसोट्रॅपिक आहे असें म्हणतात. क्रास्ड निकॉलच्या मध्यें खनिज पदार्थ ठेवला असतां त्यांतून प्रकाश आल्यास त्याला अ‍ॅनिसोट्रॉपिक म्हणतात. अ‍ॅनिसोट्रॉपिक पदार्थ असल्यास त्याची पुढें तपासणी करावी. वरचा किंवा खालचा परंतु बहुतेक वेळां वरचा सोईचा असल्यामुळें तोच निकोल म्हणजे पृथक्कारक सावकाश फिरवावा व प्रकाश येण्याचें बंद झाल्याबरोबर थांबावें. असें करतांना कोणत्या कोनांतून पृथक्करक फिरविला तें नोंदावें व अशा तर्‍हेनें दहा पंधरा वेळा फिरविल्यावर त्या कोनांची सरासरी काढावी. या सरासरी काढून आलेल्या कोनास त्या पदार्थाचा अदृश्यीभवनकोन किंवा पिधानकोन (अँगल ऑफ एक्स्टिंक्शन) असें म्हणतात. निरनिराळ्या खनिज पदार्थांचे पिधानकोन निराळे असल्यानें ते पदार्थ ओळखण्यास पिधानकोन काढल्यानें मदत होते. सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्यानें परावर्तित प्रकाशांत, पारभूत प्रकाशांत व ध्रुवीभूत प्रकाशांत खडकांचे पातळ केलेले तुकडे तपासून त्यांच्यातील खनिज पदार्थांचें वक्रीभवनांक काढणें, ते प्लिओक्रोइक आहेत किंवा नाहींत, आयसोट्रॉपिक आहेत किंवा अ‍ॅनिसोट्रॉपिक आहेत व अ‍ॅनिसोट्रॉपिक असल्यास त्यांचा पिधानकोन कोणता आहे वगैरे टिपण केल्यास नेहमीचे बहुतेक खनिज पदार्थ ओळखतां येतील. याखेरीज आणखी विशेष विस्तृत तर्‍हेनें प्रस्तरनिर्णायक सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्यानें तपासणी करितात. परंतु ती सर्व देणें या ठिकाणीं शक्य नाहीं. त्याकरितां त्या विषयावर स्वतंत्र लिहिलेले ग्रंथ पहावे.

खडकांची ओळख होण्यासाठीं अवश्य असणार्‍या परीक्षणाच्या तीन प्रकारांचें (ढोबळ परीक्षण, प्रयोगशालीय परीक्षण व सूक्ष्मदर्शकीय परीक्षण) वर्णन येथवर झाल्यानंतर आतां खडकांच्या वर्गीकरणाकडे वळूं.

वर्गीकरण- खडकांचें वर्गीकरण पुष्कळ तर्‍हानीं करतां येईल; त्यांच्यांतील खनिज द्रव्यावरून, त्यांच्या आकारावरून, ते ज्या पद्धतीनें तयार झाले असतील तिजवरून किंवा ते ज्या काळांत झाले असतील त्यावरून यांपैकीं कोणत्याहि पद्धतीनें वर्गीकरण करणें शक्य आहे परंतु सर्वसम्मत खालील तीन मुख्य वर्ग केले जातात.

(अ) जलजन्य खडकः- पहिल्या वर्गांत पाणी, हवा, वनस्पती किंवा प्राणी यांच्या योबानें तयार होऊन सांठलेले खडक येतात. हे खनिज पदार्थांचे असोत वा सेंद्रिय असोत, जमिनीवर सांठलेले असोत, पाण्यांत साठलेले असोत, वनस्पतींच्या किंवा प्राण्याच्या वांढीनें झालेले असोत, ते सर्व या वर्गांत येतात. हे वाळू, माती वगैरे गाळाच्या योगानें तयार झालेले असतात व त्यांचे थर असतात. या वर्गांतील खडकांनां जलजन्य, गाळाचे किंवा थरांचे खडक असें म्हणतात.

(आ) अग्निजन्य खडकः- हेखडक पृथ्वीच्या उदरांतील खडकांचा रस वर येऊन झालेले असतात. हा रस आंतल्या आंत थंड होतो किंवा बाहेर ज्वालामुखी वगैरेच्या मार्गानें जमिनीवर पसरून थंड होतो. या खडकांत खनिज पदार्थांचे स्फटिक तयार होतात. या वर्गांतील खडकांना अग्निजन्य खडक असें म्हणतात. यांचे बहुतकरून थर नसतात.

(इ) रूपांतरित खडकः- वरील दोन वर्गांखेरीज आणखी एक तिसरा वर्ग आहे. त्यांतील खडक कसें झाले असतील हें नेहमींच सांगतां येत नाहीं. त्यांच्यांत अग्निजन्य खडकांप्रमाणें स्फटिक असतात व जलजन्य खडकांप्रमाणें त्यांचे थरहि असतात. हे मूळ अग्निजन्य किंवा जलजन्य असलेल्या खडकावर पाण्याचा, दाबाचा किंवा उष्णतेचा परिणाम होऊन तयार झालेले असतात. या खडकांची किंवा त्यांतींत खनिज पदार्थांची पल्लवी (फॉलिएटेड) रचना असते. या वर्गांतील खडकाना रूपांतरित (मेटामॉर्फिक) खडक म्हणतात.

(अ) जलजन्य खडकः- या वर्गांपैकी कांहीं खडक वार्‍याच्या वाहण्यानें समुद्रकिनारी किंवा वालुकामय प्रदेशांत होतात, कांहीं वाहत्या पाण्याच्या योगानें नद्यांच्या पात्रांतून किंवा समुद्रकाठीं होतात, तर कांहीं मृत वनस्पती व प्राणी यांच्या अवयवांचे झालेले असतात. याशिवाय ज्वालामुखी पर्वताच्या तोंडांतून फेंकून दिले गेलेले कण एके ठिकाणीं जमून झालेले खडकहि याच वर्गांत घालतात. खडक या संज्ञेमध्यें फक्त कठिण व घट्ट झालेले दगड येतात असें नव्हे तर मोकळे कण, गाळ, रेती वगैरे सर्वांचा खडक या संज्ञेंत अंतर्भाव होतो.

वाळूचे खडकः- (ग्रेव्हल ऑर सँड रॉक्स) हवा, पाऊस, नद्या वगैरेंचे जुन्या खडकावर आघात होऊन त्यांचे तुकडे झाल्यामुळें होतात. त्यांच्यांत जुन्या खडकांतील खनिज पदार्थ असतात, परंतु अमुकच प्रकारचे खनिज पदार्थ असतील असें म्हणता येणार नाहीं. बहुधा क्वार्टसचे प्रमाण जास्त असतें. कारण बाकीचे खनिज पदार्थ अगदीं बारीक भुगा होऊन धुवून जातात परंतु क्वार्टस् तसा जात नाहीं (क्वार्टसशिवाय फेल्स्पार, अभ्रक, हॉर्नब्लेंड वगैरेंचे तुकडेहि सांपडतात). साधारणतः सारख्या आकाराचे व एकाच विशिष्टगुरुत्वाचे खडे एके ठिकाणीं येऊन त्यांचे थर होतात. थरांतून कित्येक वेळां वनस्पती व प्राणी यांचे अवशेष पुरले जाऊन त्यांच्या खुणा शिल्लक राहतात. पुष्कळ वेळां खड्यांमध्यें व थरांमध्यें क्वार्टस् लाइम किंवा लोहाचें ऑक्साइड यांचें लुकण सांठून ते एकजीव होतात. खड्यांचा किंवा थरांचा एकजीव न झालेल्या खडकांत खालील प्रकारचे खडक येतात.

डोंगरांतील खडकांचा भुगाः- मूळ खडकांचा चुरा होऊन वार्‍यानें व पाण्यानें वाहून पायथ्याशीं सांठतो त्यांत बहुतेक अणकोचीदार व सुटे निरनिराळ्या आकाराचे तुकडे असतात.

माती अथवा जमीनः- खडकांचा भुगा होऊन त्याच्या पासून माती तयार होते. मूळ खनिज पदार्थांतील मूळ द्रव्यें मातींत रूपांतरित स्वरूपांत असतात. खडक व माती यांमध्यें एक अधोमृत्तिका अथवा अधोभूमीचा थर (सबसॉइल) असतो. खडकांचा अर्धवट भुगा होऊन अधोमृत्तिका होते व तिजपासूनच पुढें माती तयार होते. जमीनीवर उगवणार्‍या वनस्पतींच्या कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा कांहीं अंश मातींत असतो व त्यांतीलच थोडा भाग अधोमृत्तिकेंत सांपडतो. जसजशी माती वाहून जाते तसतशी अधोमृत्तिकेची माती होते. ज्या मूळ खडकापासून माती होते त्याच खडकावर ती सांपडते असें नाहीं. कित्येक वेळां ती वहात जाऊन दुसर्‍याच खडकावर आढळते.

वाळूः- वाळूचे कण लहान तर असतातच, परंतु ते कित्येक वेळां इतके बारीक असतात कीं, ते स्पष्ट दिसण्यास सूक्ष्मदर्शक यंत्राचें साहाय्य लागतें. वार्‍याच्या योगानें खडकांचे बारीक कण एकेठिकाणीं सांचून त्यांच्या लहान लहान टेंकड्या होतात व त्या वार्‍यानेंच एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणीं नेल्या जातात. यांमध्ये बारीक व मोठाल्या कणांचे कित्येक वेळां थर असतात. नदीच्या व समुद्राच्या पाण्याच्या तडाक्यानें वाळू मोठ्या प्रमाणांत तयार होते. समुद्रांत तयार झालेली वाळू त्यांत सांपडणार्‍या शिंपांच्या कणांवरून ओळखतां येते. बारीक कण पुष्कळ वेळां घर्षणांत न सांपडतां पाण्यांत तरंगत राहतात व त्यामुळें त्यांचीं टोंकें घांसली न जातां अणकोचीदार राहतात. मोठाल्या कणांचीं टोंकें मात्र घांसून कणांना वाटोळेपणा येतो. वाळूचे जाड खरबरीत कण असल्यास त्यास रेंव (ग्रॅव्हल) म्हणावे. परंतु सुपारीपेक्षा मोठे खडे असल्यास त्यांनां गोटे (शिंगल) म्हणावे. वाळूचे जसे वर सांगितलेले प्रकार आहेत तसेच वाळूच्या कणांचा एकजीव होऊन झालेल्या कठिण खडकांचे प्रकार आहेत. मोठाले गोटे एकेठिकाणीं सांठल्यावर त्यांच्यांत एखाद्या तर्‍हेचें लुकण बसून कठिण खडक तयार होतो. गोटे साधारणतः वाटोळे झालेले असतात. बरेचसे गोटे क्वार्टसचे असतात. कित्येक गोटे इतर खनिज द्रव्यें किंवा मूळ खडकाचे असतात. अशा तर्‍हेनें तयार झालेल्या खडकांनां गोट्यांचे खडक (काँग्लोमरेट) म्हणतात. गोटे सर्व बाजूंनीं झिजून वाटोळे झालेले नसले व त्यांचीं टोंकें कोंचदार असलीं म्हणजे त्या खडकांनां (ब्रेकिआ) म्हणावें. बारीक कणांचा जो खडक होतो त्याला सिकताश्म किंवा वाळूचा खडक म्हणतात. वाळूच्या खडकांत बहुतेक क्वार्टसचेच कण असतात तरी गोट्यांच्या खडकाप्रमाणें यांतहि इतर खिनज द्रव्यें असतात; परंतु हीं द्रव्यें अगदीं थोडक्या प्रमाणांत असतात. वाळूच्या खडकांना पुष्कळ तर्‍हेचे रंग असतात. तांबडा, पिवळा वगैरे रंग लोहाच्या प्राणिदा (आक्साइड)मुळें वाळूच्या खडकांना येतात. खडकांत एखादें विशिष्ट खनिज द्रव्य किंवा त्याचें लुकण असल्यास त्याचें नांव खडकाच्या नांवास जोडतात. उदाहरणार्थः- एखाद्या वाळूच्या खडकांत लोहाचें प्राणिद (ऑक्साइड) असल्यास त्याला लोही वाळूचा खडक (फेरुगिनस सँडस्टोन) असें म्हणतात व त्यांत अभ्रक असल्यास अभ्रकी वाळूचा खडक (मायकेशिअस सँडस्टोन) असें म्हणतात. विंध्याद्रीवर व दक्षिणेंत बेळगांव, विजापूर जिल्ह्यांत व मद्रास इलाख्यांतील कडाप्पा जिल्ह्यांत वाळूचे खडक मोठ्या प्रमाणांत सांपडतात. इमारती बांधण्यास हे फार चांगले व भक्कम असतात. यामुळे उत्तरहिंदुस्थानांतील पुष्कळ इमारती या खडकाच्या दगडांच्या बांधल्या आहेत. वाळूच्या खडकाचे फळ्यासारखे तुकडे काढून त्यांचा जमीनीवर बसविण्याकरितां उपयोग करितात. त्याचप्रमाणें त्यांचीं जातीं वगैरे जिन्नस करितात. विजापूर जिल्ह्यांतील बदामी गांवची प्रसिद्ध लेणीं वाळूच्या खडकांत आहेत. गोकाकचा धबधबा वाळूच्याच खडकावर आहे. वाळूच्या खडकापासून होणार्‍या जमीनीस रेताच किंवा वाळूची जमीन म्हणतात.

मातीचे खडक- निरनिराळ्या खडकांचा पिठासारखा भुगा होऊन त्यापासून तयार झालेल्या चिखल, गाळ वगैरेंच्या खडकांस मातीचे खडक म्हणतात. त्यांच्यांत पुष्कळ तर्‍हेच्या खनिज द्रव्यांची भेंसळ असते व त्याचे प्रकारहि पुष्कळ आहेत.

चिकण मातीः- हा एक प्रकारचा चिखलच आहे. याच्यावर वाफ सोडली असतां त्याला मातीचा वास येतो. त्याच्यांत चिकणाई असते व पाण्यांत ओला केल्यास चिकट गोळा होतो.

चिनी मातीः- फेल्स्पार नांवाचा जो खनिज पदार्थ आहे. त्याच्यावर पाण्याची व कार्बन डाय-आक्साइडची क्रिया होऊन अ‍ॅल्युमिनियम सिलिकेट निराळें निघतें तें पांढर्‍या रंगाचें व भुसभुशींत असतें. चिनीमातीची भांडीं करण्याकडे याचा विशेष उपयोग होतो. हिंदुस्थानांत ज्या ठिकाणीं ग्रनाइट खडक आहेत त्या ठिकाणीं अशा तर्‍हेची माती कांहीं ठिकाणीं आढळते. हीच माती अगदीं स्वच्छ पांढरी व लोहविरहित असल्यास त्याला पाइपक्ले (चिलमीची माती) म्हणतात. चिनीमातीचा उपयोग उत्तम पांढरीं मातीचीं भांडीं करण्याकडे होतो. ही कांहीं ठिकाणीं फेल्स्पारपासूनच तयार झालेली असते. तींत थोडासाच लोहाचा अंश असतो परंतु चुना किंवा अल्कलीचा मुळींच अंश नसतो. या मातीला फायरक्ले (अग्निमृत्तिका) म्हणतात. गोंडवनांत कोळशाच्या खाणींत फायरक्लेची माती पुष्कळ सांपडते. फायरक्लेचा उपयोग भट्ट्या बांधण्याकडे करतात. कांचेच्या वगैरे कारखान्यांत मातीचीं भांडीं विस्तवावर पुष्कळ तापवावयाचीं असतात म्हणून हीं भांडीं फायरक्लेचीं करतात. उत्तम फायरक्लेमध्यें असलेले पदार्थ त्यांच्या शेंकडा प्रमाणासह पुढें दिले आहेत. सिलिका ७३.८२; अ‍ॅल्युमिना १५.८८; लोहाचें आक्साइड २.९५; पाणी ६.४५; अल्कली ०.९ असून तिचें विशिष्ट गुरुत्व २.५ असतें.

विटांची मातीः- विटा करण्यास उपयोगी पडणारी पुष्कळ तर्‍हेची माती सांपडते. त्या सर्व प्रकारांना विटाची माती म्हणतात. या मातीचीं मडकीं, रांजण, खुजे वगैरे जिन्नस करतात. या मातींत लोहाचा अंश बराच असतो. विटांच्या मातीचें साधारण पृथक्करण पुडें दिलें आहे. सीलिका ४९.४४; अ‍ॅल्युमिना ३४.२६; लोहाचें ऑक्साइड ७.७४; चुना १.४८; मॅग्नेशिआ ५.१४ व पाणी १.९४.

फुलरची मातीः- मध्य प्रांत, राजपुताना वगैरे ठिकाणीं हिरवट रंगाची मऊ माती सांपडते. ती गुळगुळीत असते परंतु चिकट नसते. या मातीचा उपयोग अंगाला व कपड्याला साबणाप्रमाणें लावण्याकडे करितात. तिच्यांत शेंकडा सिलिका ५३; अ‍ॅल्युमिना १०; लोहाचें ऑक्साइड ९.७५; मॅग्नेशिआ १.२५; लाइम ०.५०; मीठ ०.१० व पाणी २४ असतें.

बॉक्साइटः- यामध्यें शेंकडा ४५ ते ८० भाग अ‍ॅल्युमिना, १५ भाग पाणी आणि लोहाचें आक्साइड वगैरे असतात. बॉक्साइट कसें होतें या संबंधानें मतभेद आहे. कांहींच्या मतानें उष्णता व पाणी यांच्या योगानें जुन्या खडकांत फरक होऊन तें झालें असावें असें आहे. इतर कांहीं जणांचें म्हणणें असें आहे कीं ग्रानाइट, नीस, बसाल्ट वगैरे खडकांवर पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड यांचा परिणाम होऊन बॉक्साइट झालें असावें. बॉक्साइटपासून अ‍ॅल्युमिनियम काढतात किंवा अ‍ॅलम (फटकी) तयार करतात. यावर उष्णतेचा फारसा परिणाम होत नसल्यानें भट्टीच्या आंतल्या बाजूनें लेप देण्याकरितां त्याचा उपयोग करितात.

लॅटराइटः- किंवा जांभळा दगड. हा तांबडा, पिवळट किंवा पांढुरक्या रंगाचा छिद्रमय मातीचा दगड असतो. हा बॉक्साइटप्रमाणें ग्रानाइट, नीस, डायोराइट, बसाल्ट वगैरे खडकांपासून झाला असावा अशी कल्पना आहे. यामध्यें अ‍ॅल्युमिना, लोहाचे ऑक्साइड व थोडा सिलिका असतो. उष्ण कटिबंधांत दमट हवेंत विशेषतः हा खडक तयार होतो. डेक्कन ट्रॅप म्हणून जो खडक आहे त्यावर हा पुष्कळ ठिकाणीं सांपडतो. हा प्रथम खणून काढला म्हणजे ओलसर व मऊ असतो परंतु कांहीं दिवस हवेंत राहिला कीं कठीण होतो. घरें बांधण्याकडे याचा पुष्कळ उपयोग करितात. मुंबई इलाख्यांत बेळगांव, रत्‍नागिरी, कुलाबा व कारवार जिल्ह्यांत लॅटराइट पुष्कळ सांपडतो.

मातीचा दगड- माती घट्ट होऊन दगडासारखी झाली म्हणजे मातीचा दगड होतो.

शेल- ज्याप्रमाणें वाळूचे कण एके ठिकाणीं दाबले जाऊन वाळल्यावर त्यापासून वाळूचे खडक होतात त्याचप्रमाणें अगदीं बारीक कण एके ठिकाणीं दाबले जाऊन त्यांपासून जो खडक होतो त्याला शेल असें म्हणतात. शेलचे नेहमीं थर असतात. थरांतील पातळ पापुद्रे सुटे निघतात. मातीच्या दगडासारखा एकच गोळा नसतो. निरनिराळ्या थरांचे तांबडा, पांढरा, पिवळा वगैरे कोणतेहि रंग असूं शकतात. अगदीं तांबडा रंग असल्यास त्यास काव व पिवळा रंग असल्यास पिवडी म्हणतात. भिंती, पत्रे वगैरेंना रंग देण्याकडे यांचा चांगला उपयोग होतो.

ज्वालामुखींतून निघालेल्या तुकड्यांचे व गाळाचे खडक- ज्वालामुखींतून खडकाचा रस वर येऊन त्यापासून होणारे खडक अग्निजन्य असतात व म्हणून ते त्या वर्गांत जातात परंतु रस बाहेर येण्यापूर्वी खडकाचे गोळे, तुकडे, बारीक कण व राखेसारखी भुकटी जोरानें वर उडून खालीं पडल्यावर त्यांचे खडक बनतात. ते गाळाच्या खडकांच्या वर्गांत येतात. ज्वालामुखीच्या धक्याच्या योगानें जमीनीवरील खडकांचे तुकडे होऊन पुन्हां खडक बनतात. ते ज्वालामुखींतून बाहेर आलेल्या तुकड्यांच्या खडकांसारखेच दिसतात. परंतु बारकाईनें तपासणी केल्यास त्याचा उगम कळण्यास कठीण पडत नाहीं. ज्वालामुळींच्या तोंडांतून वर आलेले तुकडे सुटे असले म्हणजे त्यांच्या आकारावरून त्यांना जीं निरनिराळीं नांवें दिलेलीं आहेत त्यांचें वर्णन ज्वालामुखी या सदराखालीं दिलेलें आहे. या ठिकाणीं तुकडे एके ठिकाणीं येऊन त्यांचे जे खडक तयार होतात त्यांचा निर्देश केला आहे. कित्येक वेळां ज्वालामुखींतून निघालेले तुकडे समुद्रांत किंवा सरोवरांत पडतात. त्या ठिकाणीं नदींतून वाहून आलेल्या तुकड्यांचे या तुकड्यांत मिश्रण होतें. जलजन्य खडकांना त्यांतील तुकड्यांच्या आकारावरून कांग्लॉमरेट, ब्रेशिआ वगैरे संज्ञा दिलेल्या आहेत, त्याच संज्ञा ज्वालामुखींतून बाहेर आलेल्या तुकड्यापासून तयार झालेल्या खडकांनां त्यांतील तुकड्यांच्या आकारमानावरून देतात.

सजीव पदार्थांपासून झालेले खडक- या सदराखालीं वनस्पती, प्राणी यांची वाढ होऊन ते नष्ट झाल्यावर जागच्याजागीं तयार झालेले खडक किंवा ते वाहून जाऊन एके ठिकाणीं सांठवल्यावर झालेले खडक येतात. त्यांचें वर्गीकरण त्यांच्यांत जें विशिष्ट द्रव्य असेल त्यावरून करतात. ते वर्ग येणेंप्रमाणें - (१) चुन्याचे अथवा कॅलकेरियस. (२) सिकयुक्त अ. सिलीशियस. (३) स्फुरयुक्त उर्फ फॉस्फॅटिक. (४) कर्बयुक्त उर्फ कार्बोनोशियस. आणि (५) लोहयुक्त.

(१) चुन्याचे खडकः- हे दोन तर्‍हेने तयार होतात. जुन्या खडकांत असलेला चुन्याचा अंश पाण्यानें वाहून जाऊन एके ठिकाणीं सांठला म्हणजे चुन्याचा खडक होतो याबद्दलची विशेष माहिती दुसरीकडे दिली आहे. पुष्कळ चुन्याचे खडक सजीव पदार्थांपासून झालेले आहेत. सजीव पदार्थांपासून झालेले चुन्याचे खडक कित्येक वेळां स्फटिकमय होतात त्यांची सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानें नीट तपासणी केल्याखेरीज ते इतर चुन्याच्या खडकापासून निराळे असे ओळखतां येत नाहींत. सजीव पदार्थांपासून झालेले चुन्याचे खडक जेथें तयार होतात ते त्या ठिकाणीं सांठतात किंवा वाहून जाऊन दुसरीकडे सांठतात. चुन्याच्या खडकांत बहुतेक सर्व खटकर्बित (कॅलशियम कार्बोनेट) असतो. तो उदहराम्लांत (हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड) विरघळतो व त्यांत वाळू, माती वगैरे असल्यास न विरघळल्यानें वेगळे होतात. थोड्या प्रमाणांत मग्नकर्बित (मॅग्नेशियम कार्बोनेट) हि सांपडतो. हे खडक कठिण व भक्कम असतात किंवा अगदीं ठिसूळहि असतात. यांचे काठिण्य ३ व विशिष्टगुरुत्व २.५ ते २.८ पर्यंत असतें. यांचे रंग निरनिराळ्या तर्‍हेचे असून ते अगदीं पातळ थरापासून तों कित्येक यार्ड उंचीच्या ढिगापर्यंत आढळतात. फोरॅमिनीफेरा जातीच्या बारीक प्राण्यांच्या शरीरापासून झालेल्या चुन्यांच्या खडकांचे थर अटलांटिक वगैरे महासागरांच्या तळाशीं पुष्कळ सांपडतात. ज्याला आपण खडू म्हणतों त्या प्रकारचा खडक या व अशाच तर्‍हेच्या बारीक प्राण्यांच्या शरीरांचे ढीग सांठून झालेला असतो. उष्णकटिबंधांतील समुद्राच्या उथळ पाण्यांत प्रवाळ नामक प्राण्यांची पुष्कळ वाढ होते. त्यांचीं राहण्याचीं घरें कॅलशियम कार्बोनेटची असतात व या घरांची वाढ येवढी होते कीं, त्यांचीं मोठमोठालीं बेटें हिंदीमहासागरांत पुष्कळ आहेत.

(२) सिकयुक्त अथवा सिलिकाचे खडकः- पाण्यांत थोड्या प्रमाणांत शिलीका असतात. ते कांहीं सूक्ष्म वनस्पती व प्राणी यांचें शोषण करून आपलीं शरीरें तयार करतात ते मेले म्हणजे त्यांच्या मृत शरीरांचे थर सांठतात व त्यांपासून खडक तयार होतात. ट्रिपोलीची पूड झिलईकरितां व स्फोटक द्रव्यें करण्याकरितां उपयोग करतात. ही ट्रिपोलीची पूड समुद्रांत किंवा सरोवरांत सांठलेल्या एक प्रकारच्या सिलीकाच्या खडकापासून तयार केलेली असते.

(३) फॉस्फॅटिक खडक- बहुतेक प्राण्यांच्या शरीरांत खंटस्फुरित (कॅलशियम फास्पेट) असतो. कित्येक प्राण्यांचीं शरीरें जुन्या खडकांत पुरलीं जाऊन त्यांचे खडक बनलेले आहेत. त्यामध्यें कॅलशिअम फास्फेट बर्‍याच प्रमाणांत असतो. दक्षिण अमेरिकेंत व आफ्रिकेंत ग्वानो नांवाचा एक पदार्थ सांपडतो. हा पदार्थ समुद्रपक्ष्यांची विष्टा, मृत शरिरें, त्यांनीं खाद्य म्हणून आणलेले मासे वगैरे सांठून झालेला असतो. ज्या ठिकाणीं पाऊस नाहीं अशाच ठिकाणीं हा सांठतो. हें उत्तम खत आहे व त्याप्रमाणेंच त्याचा पुष्कळ उपयोग होतो. पूर्वकालीन प्राण्यांचीं हाडें पुरलीं जाऊन त्यांचाहि स्फुरयुक्त (फॉस्फॅटिक) खडक होतो. त्याचप्रमाणें पूर्वकालीन प्राण्यांची विष्टा पुरली जाऊन त्याचेहि खडक होतात.

(४) कर्बयुक्त अथवा कार्बानेशियस खडक- वनस्पती वाहून जाऊन एके ठिकाणीं सांठल्यावर पुरल्या जाऊन किंवा वनस्पती उगवल्या जागीं वाळून वगैरे पुरल्या जाऊन त्यांचे जे खडक होतात ते सर्व या वर्गांत येतात. दगडी कोळसे अशाच प्रकारानें तयार झालेले आहेत.

पीट- दलदलीच्या जागीं, उथळ पाण्यांत वनस्पती वाहून गेल्यावर कुजतात व त्यांचेवर पुन्हां वनस्पती उगवत राहतात. यामुळें कुजलेल्या वनस्पतींचे मोठाले थर होतात. यांना पीट म्हणतात. दलदलीच्या प्रदेशांत पुष्कळ ठिकाणीं हा पीट सांपडतो. पीट ज्या ठिकाणीं सांपडतो त्या ठिकाणीं वाळवून जाळण्याकडे त्याचा उपयोग करितात. पूर्वी अशाच तर्‍हेचा पीट पुरला जाऊन त्यापासून दगडी कोळशाचे निरनिराळे प्रकार तयार झालेले आहेत.

लिग्नाइट- पीट दाबला जाऊन त्यापासूनच पुढें लिग्नाइट तयार होतो. लिग्नाइट ही पीट व दगडी कोळसा यांच्या मधली स्थिति आहे. कारण लिग्नाइटमध्यें बदल होऊन त्याचाच दगडी कोळसा तयार होतो. लिग्नाइटचा रंग पिवळट, तपकिरी किंवा काळा असतो. त्याचें विशिष्टगुरुत्व ०.५ ते १.५ असते व त्याच्यांत शेंकडा ५५ ते ७५ कार्बन असतो. लिग्नाइट भुरभुर जळतो व यांतून पुष्कळ धूर निघून त्याचा जळकट किंवा धुरकट वास येतो.

दगडी कोळसा- याचा रंग काळा किंवा काळ्याचा एखादा प्रकार असतो. कोळशांत शेंकडा ७५ ते ९० कार्बन, ३ ते २० ऑक्सिजन, ०.५ ते ५.५ हैड्रोजन, २.५ पर्यंत नैट्रोजन आणि १ ते २० पर्यंत राख असतें. हा कोळसा चांगला जळतो व जळतांना त्याला एक प्रकारचा वास येतो. दगडी कोळशाचे पुष्कळ प्रकार आहेत. मूळ वनस्पती निरनिराळ्या प्रकारच्या असल्यास असे प्रकार होणें साहजिक आहे. वाळूचे खडक, व यांत शेल वगैरे खडकाचे थर कोळशाचे थर सापडतात.

अ‍ॅन्थ्रसाइट- अति दाबाखालीं कठीण झालेला असा हा दगडी कोळशाचाच प्रकार आहे. हा लवकर जळत नाहीं व जळत असतांनां त्यांतून ज्वाला किंवा धूर निघत नाहीं व त्याला कोणत्याहि प्रकारचा विशिष्ट वास येत नाहीं. ह्याचा रंग अगदीं काळा कुळकुळीत असून कांचेसारखा चकाकतो. त्याच्यांत शेंकडा ९० कार्बन असतो व त्यांचे विशिष्टगुरुत्व १.३५ ते १.७ असतें.

ऑइल शेल- ज्या शेल खडकांतून राकेल तेल काढतां येते त्यांनां ऑइल शेल म्हणतात. या शेलचे थरच असतात आणि चांगला शेल असल्यास त्यांतून एका टनांतून ३० ते ४० गॅलन राकेल पूर्वीच्या वनस्पति व कांहीं प्राणी शेलमध्यें पुरले जाऊन दाबाखालीं कुजून त्यांच्यापासून हें तेल तयार होतें. शेलचे ऊर्ध्वपातन केल्यास तेल निघतें.

पेट्रोलियम- या सदराखालीं सर्व तर्‍हेची खनिज तेलें येतात. हीं खडकांतून सांपडतात. प्रथमतः ती एके ठिकाणीं मिसळलेलीं असतात, परंतु उर्ध्वपातनानें तीं वेगळालीं करितात.

अँबर- हें खडकांत पुरल्या गेलेल्या जुन्या झाडांतील राळेपासून होतें.

(५) लोहमिश्रित माती- दलदलीच्या जागीं कुजत असलेल्या वनस्पतींच्यापासून आम्लें निघतात त्यांचा व कर्बाम्लाचा (कार्बोनिक अ‍ॅसिड) आसपासच्या खडकांतील लोहावर परिणाम होऊन लोहाचे क्षार व ऑक्साइड यांचें मिश्रण होऊन सांठतें. यांत पुढें माती मिसळली जातें व त्याचप्रमाणें वनस्पतीचे अंश मिसळले जातात. या सर्वांच्या मिश्रणानें तयार झालेले थर लोहमिश्रित माती या सदराखालीं येतात.

रासायनिक क्रियेनें तयार झालेले स्फटिकमय खडक- पाण्याच्या साहाय्यानें होणार्‍या खडकांचें वर्णन वर दिलें आहे. ते खडक वाहून आलेल्या गाळापासून झालेले असतात. परंतु याशिवाय पाण्यांत विरघळलेल्या पदार्थांची एकमेकांवर रासायनिक क्रिया होऊन त्यांचे थर तयार होतात. हे पदार्थ बहुतेक स्फटिकमय असतात. अशा प्रकारें तयार झालेल्या पदार्थांत विशेष महत्त्वाचे म्हणजे सैंधव, पापडखार, चुन्याचे दगड, जिप्सम व इतर खार हे होत.

(आ) अग्निजन्य-स्फोटित-थररहित खडक- या वर्गांतील खडक पृथ्वीच्या उदरांतील खडकाच्या रसापासून झालेले आहेत. खडकांचें रासायनिक पृथक्करण, त्यांतील खनिज द्रव्यें, त्यांची घटना, उत्पत्तीची पद्धति, ठिकाण व वय वगैरे वरून या खडकांचें वर्गीकरण निरनिराळ्या तर्‍हेनें करतां येण्यासारखें आहे. परंतु यांपैकीं कोणत्याहि एका गोष्टीकडे लक्ष देऊन वर्गीकरण केल्यास त्याचा विशेष उपयोग नाहीं म्हणून यांपैकीं जितक्या गोष्टी एके ठिकाणीं आणतां येतील तितक्या आणून केलेलें वर्गीकरण खालीं दिलें आहे. त्यांमध्यें अग्निजन्य खडकांतील खनिजद्रव्यें व त्यांचें रासायनिक पृथक्करण या गोष्टींवरून पोटभाग पाडले आहेत. अग्निजन्य खडकांत दोन किंवा अधिक खनिज द्रव्यें असतात. त्यांमध्यें स्फटिक (अ‍ॅल्युमिना), मग्न (मॅग्नेशिआ), चुना (लाइम), पालाश (पोटॅश) व सिंधू (सोडा) यांचे सिलिकेट, मग्नलोह (मॅग्नेटिक आयर्न) व (चुन्याचें स्फुरित) (लाइमचें फॉस्फेट) असतात. कांहीं खडकात सिकाम्ल (सिलिसिक अ‍ॅसिड) इतके असतें कीं त्यामध्यें मोकळा क्वार्टस् सांपडतो. त्याचप्रमाणें ज्या खडकांत आर्थोक्लेज फेल्स्पार सांपडतो त्यांत फ्लॅजिओक्लेज फेल्स्पार सांपडणार्‍या खडकांपेक्षां अधिक सिकाम्ल (सिलिसिक अ‍ॅसिड) सांपडतें. अग्निजन्य खडकांचे पांच भाग आहेत ते असेः- (१) आम्लयुक्त (अ‍ॅसिड) खडक- यांत सिकाम्लाचें (सिलिसिक अ‍ॅसिडचे) प्रमाण शेंकडा ६५ ते ८० असतें. व त्यांतील मुख्य खनिज द्रव्यें आर्थोक्लेज फेल्स्पार, मायका (आभ्रक) व क्वार्टसहीं असतात. (२) उपाम्ल (सबअ‍ॅसिड) खडक- यांत सिलिसिक अ‍ॅसिडचें प्रमाण शें. ६० ते ६५ असते. आर्थोक्लेज फेल्स्पार व हार्नब्लेंड हीं मुख्य द्रव्यें त्यांत असतात. (३) उपअनाम्ल (सब् बेसिक) खडक- यांत शेंकडा ५५ ते ६० सिलिसिक अ‍ॅसिड व प्लॅजिओक्लेज फेल्स्पार, आणि हार्नब्लेंड ही खनिज द्रव्यें असतात. (४) अनाम्ल (बेसिक) खडक- यांत शेंकडा ४५ ते ५५ सिलिसिक अ‍ॅसिड व प्लॅजिओक्लेज फेल्स्पार, पायरॉक्झीन, मॅग्नेटाइट आणि ऑलिव्हिन हीं खनिज द्रव्यें असतात. (५) अति अनाम्ल (अल्ट्राबेसिक) खडक- यांत शेंकडा ४५ पेक्षां कमी सिलिसिक, अ‍ॅसिड ऑलिव्हाइन आणि पायराक्झीन हीं खनिज द्रव्यें असतात.

(१) पहिल्या पोटभागांत ग्रनाइट व र्‍हयोलाइट जातीचे खडक येतात. ग्रनाइट जातीचे खडकांत आर्थोक्लोज फेल्स्पार, क्वार्टस् व मायका ही द्रव्यें असतात. मायकाच्या ऐवजीं कित्येक वेळां हार्नब्लेंड असतें. ग्रनाइटमध्यें टोपॅझ टुरमलिन, गार्नेट वगैरे दुय्यम खनिज द्रव्यें सांपडतात. ग्रनाइटमध्यें फेल्स्पारचे मोठाले स्फटिक असून बाकीचे लहान स्फटिक असल्यास त्याला पारफिरिटिक ग्रनाइट म्हणतात. सर्वच स्फटिक अगदीं लहान असल्यास त्याला मायक्रो ग्रनाइट म्हणतात. ग्रनाइट खडक फार जुने आहेत, परंतु कित्येक तृतीयावस्थाक (टरशरी) वगैरे युगांत बाहेर आलेल्या खडकाच्या रसापासून तयार झालेले आहेत. ग्रनाइट दुसर्‍या खडकांत घुसून बॉस, डाइक, व्हेन वगैरे प्रकारानें सांपडतो. र्‍हायोलाइट जातीचे खडक ज्वालमुखींतून बाहेर आलेल्या रसापासून झालेले असतात. या जातीच्या खडकांतच ऑबसीडियन अथवा डोंगरी काच व पिच स्टोन म्हणजे राळेसारखा दिसणारा दगड वगैरे खडक सांपडतात.

(२) दुसर्‍या पोटभागांत सेनाइट व त्याचे पोटवर्ग आणि ट्रकाइट खडक येतात. सेनाइटमध्यें आर्थोक्लेझ, फेल्स्पार व हार्नल्बेंड बहुतेक असतात. परंतु कित्येक वेळां हार्नल्बेंडच्या ऐवजीं मायका किंवा कुचित प्रसंगी दुसरा एखादा खनिज पदार्थ सापडतो. ट्रकाइटमध्यें सेनाइटचेच खनिज पदार्थ सापडतात. परंतु यामध्यें स्फटिक चांगले तयार झालेले नसतात व खडक हाताला खरखरीत लागतात.

(३) तिसर्‍या पोटभागांत डायोराइट अँडेसाइट वगैरे खडक येतात. त्यांत प्लॅजिओक्लेज फेल्स्पार व हार्नल्बेंड हीं खनिजद्रव्यें असतात. कित्येक डायोराइटमध्यें मायका किंवा क्वार्टस् हीं द्रव्यें सापडतात. अँडेसाइट दिसण्यास ट्रकाइट सारखाच असतो. त्यांत पुष्कळ वेळां मायका, एन्स्टटाइट, ऑगाइट, क्वार्टस् वगैरे द्रव्यें आढळतात.

(४) चवथ्या पोटभागांत गॅब्रो, डॉलेराइट वगैरे खडक व त्याच्याच पोटजाती येतात. या खडकांत, स्पॅजिओक्लेज फेल्स्पार, पायरॉक्झीन व मॅगनेटाइट आणि कित्येक वेळां ऑलिव्हाइन हीं खनिज द्रव्यें असतात. बेसॉल्ट, टॅचिलाइट, डायाबेस्, ग्रीनस्टोन वगैरे खडक याच पोटभागांत येतात व ते डॉलेराइटचेच प्रकार आहेत असें म्हटल्यास हरकत नाहीं.

वरील चार पोटभागांत दिलेल्या खडकांखेरीज आलिव्हाइन, ऑगाइट वगैरे खनिज द्रव्यें असलेले पेरिडोटाइट, पिक्राइट, सर्पेंटाइन, फोनोलाइट इत्यादि खडक अग्निजन्य खडकाच्या वर्गांत येतात.

(इ) रूपांतरित खडक- मूळ जलजन्य किंवा अग्निजन्य खडक असून कोणत्याहि कारणानें त्यांत फरक होऊन जे नवीन खडक होतात त्यांना रूपांतरित खडक असें म्हणतात. पाण्याच्या योगानें मूळ खडक पुष्कळ वेळां बदलतो. वाळूच्या खडकावरून पाणी वहात राहिल्यास वाळूचे कण एके ठिकाणीं घट्ट बांधले जातील असे पदार्थ सांठले जाऊन वाळूचा खडक फार कठिण होतो तेव्हां त्याला क्वार्टझांइट म्हणतात. उष्णतेनें सुद्धां मूळ खडकांत फरक पडतो. उदाहरणार्थ चुन्याच्या खडकावर किंवा शेजारी ज्वालामुखीचा रस पसरल्यास मूळच्या चुन्याच्या खडकाचा संगमरवरी खडक होतो. त्याचप्रमाणें पृथ्वीच्या कवचाच्या हालचालीनें खडक दाबले जाऊन मूळ शेल खडक असल्यास त्याचा स्लेट खडक तयार होणें वगैरे फरक होतात. शिस्ट नांवाचे खडक असतात त्यांतील खनिजद्रव्यें स्फटिकमय असतात परंतु अग्निजन्य खडकांत व या खडकांत पुष्कळ फरक आहे. शिस्ट खडकांतील स्फटिक चपटे झालेले असतात. ते पानाप्रमाणें मध्ये जाड व कडेला पातळ असतात. ते पानाप्रमाणें मध्यें जाड व कडेला पातळ असतात. प्रत्येक स्फटिकाचा पातळ भाग दुसर्‍या दोन स्फटिकांच्या पातळ भागांत चिपेसारखा असतो. या मांडणीमुळें शिस्ट जलजन्य खडकाप्रमाणें थरमय दिसतो. दोन्ही तर्‍हेच्या खडकांच्या थरांत पुष्कळच फरक असतो. जलजन्य खडकांचे थर लांबपर्यंत स्पष्ट असे सांपडतात परंतु रूपांतरित खडकांचें थर तुटक असतात व कित्येक वेळां स्फटिकांच्या चपटेपणामुळेंच ते थरमय आहेत असें वाटतें. रूपांतरित खडक स्फटिकमय असल्यानें त्यांच्यांत व अग्निजन्य खडकांत थोडेसें साम्य आहे; त्याचप्रमाणें ते थरमय असल्यामुळें त्यांच्यांत व जलजन्य खडकांत थोडेसें साम्य आहे. हे खडक मूळ कशा प्रकारचे होते हें सांगणें कठिण असतें. त्याचप्रमाणें सगळा खडक सारख्या प्रमाणांत स्फटिकमय व थरमय नसतो. ज्या ठिकाणीं थर अगदीं संधिग्ध रीतीनें दिसतात व स्फटिक फार चपटे झालेले नसतात त्या खडकांना शिस्टच्या ऐवजी नीस संज्ञा वापरतात. रूपांतरित वर्गातील महत्त्वांच्या खडकांची पुढें माहिती दिलीं आहे.

स्लेट अथवा पाटीचा दगड— मूळ मातीचे जे खडक असतात ते दाबले जाऊन त्याचे कठिण, पातळ व सुटे थर तयार होतात. त्यावेळीं त्याला पाटीचा दगड म्हणतात. दाबल्यामुळें झालेले थर मूळ थरांच्या अनुरोधानेंच होतात असें नाहीं तर बरेच वेळां त्यांच्या लंबरेषेंत होतात. मूळ मातीचेच खडक असल्यानें त्यांमध्ये स्फटिक बहुधा नसतात. परंतु कित्येक वेळां अगदीं लहान व पातळ अभ्रकाचे तुकडे किंवा इतर कांहीं खनिज द्रव्यांचे स्फटिक सापडतात. हे खडक फार दाबले जाऊन शिस्टसारखे झाल्यास त्यांनां `मातीचे शिस्ट’, `फायलाइट’, वगैरे नांवें देतात. कायास्टोलाइट वगैरे द्रव्यें खडकांत असल्यास `कायास्टोलाइट स्लेट’ वगैरे नांवें खडकांना देतात. धारवाड, बेळगांव व विजापूर जिल्ह्यांत निरनिराळ्या तर्‍हेचे पुष्कळ स्लेट सापडतात.

क्वार्टझाइट – मूळ वाळूचे जे खडक असतात त्यापासून क्वार्टझाइट खडक तयार होतो. मूळ खडकावरून व खडकांतून पाणी वाहतांना पाण्यांतील चुन्याचा, लोहाच्या आक्साइडचा किंवा सिलिकाचा भाग वाळूच्या कणांत बसून त्याचें लुकण तयार होतें व त्यामुळें खडक फार कठीण होतो तेव्हां त्याला क्वार्टझाइट म्हणतात. आसपास खडकाच्या रसाचे प्रवाह येऊन वाळूचे कण अर्धवट वितळतात व पुन्हां निवाल्यावर त्यापासून जो खडक होतो तो मूळ वाळूच्या खडकापेक्षां फार कठिण होतो. तेव्हां त्यालाहि क्वार्टझाइट म्हणतात. वाळूचे खडक दाबले जाऊन त्यापासून क्वार्टझाइट खडक तयार होतो. हाच क्वार्टझाइट आणखी पुढें जास्त दाबला जाऊन त्याचे स्फटिक किंवा कण चपटे झाल्यास शिस्ट तयार होतो व त्याला क्वार्टझ् शिस्ट असें म्हणतात. कित्येक वेळां मध्यभागीं क्वार्टझाइट व त्याच्या एका बाजूस वाळूचा खडक व दुसर्‍या बाजूस क्वार्टझ् शिस्ट सांपडतात त्यामुळें मूळ खडकापासून रूपांतरित खडक कसे झाले असावे हें लक्षांत येतें.

संगमरवरी दगड— मूळ चुन्याचे दगडाचे आसपास खडकांच्या रसांचे उष्ण प्रवाह आल्यानें किंवा खडकांवर दुसरे थर येऊन त्यामुळें मूळ खडकांत उष्णता उत्पन्न होऊन चुन्याच्या कणांचे लहान लहान स्फटिक तयार होतात. अशा स्फटिकमय चुन्याच्या खडकास संगमरवरी दगड म्हणतात. हे पांढर्‍या, काळ्या, हिरव्या व तांबड्या रंगाचे असतात. ते घासल्यास त्यांना चकाकी येते व म्हणून ते बांधणीच्या कामांत महत्त्वाचे समजले जातात. संगमरवरी दगडांत अभ्रक व संगजिर्‍याचे कण सापडतात व त्यावरून त्यांना निरनिराळीं नांवेंहि कित्येक वेळां दिलीं जातात. जबलपूरपाशीं संगमरवरी दगड मोठ्या प्रमाणांत सांपडतात. व त्याचा उपयोग पुष्कळ ठिकाणीं होतो. मूळ खडकापासून कित्येक वेळा संगमरवरी दगड न होतां अर्धवट स्फटिकमय खडक होतो. त्याचा चुना उत्तम होतो व बांधण्याच्या कामाला त्याचा फारसा उपयोग नसल्यानें चुना करण्याकडेच त्याचा खप होतो.

नीस— नीस खडक स्फटिकमय असून थरमयहि असतात. यांतील स्फटिक स्पष्ट असतात परंतु थर मात्र सुटे होण्यासारखे नसतात. मूळ ग्रनाइट, सेवाइट वगैरे खडक दाबले जाऊन त्यांपासूनच बहुतेक नीस झालेले असतात. त्यांत सांपडणार्‍या खनिज द्रव्यावरून त्याचें इतर खडकांशीं साम्य पाहून त्याला निरनिराळीं नांवें देतात. ग्रनाइटमध्ये सांपडणारीं द्रव्यें असल्यास त्यास ग्रनाइट नीस, सेनाइटमधील द्रव्यें असल्यास सेनाइट नीस व त्याचप्रमाणें इतर नांवें नीसला दिलीं जातात. नीस व शिस्ट हे दोन्हीहि रूपांतरित खडक आहेत. दोहोंमध्ये थोडेसें साम्यहि आहे. तरी त्यांतील मुख्य फरक म्हणजे शिस्टमध्यें स्फटिक जितके दाबले जाऊन चपटे झालेले असतात तितके नीसमध्ये नसतात व यामुळें नीस व शिस्ट हे खडक ओळखतां येतात. मद्रास इलाख्याचा बराच भाग, मुंबई इलाख्याचा दक्षिण भाग, बुंदेलखंड वगैरे ठिकाणी नीस खडक सापडतो. तेथें ग्रनाइट व नीस असे दोन्हीहि खडक शेजारीं शेजारीं सांपडतात यामुळें ते नीस मूळ कोणत्या खडकापासून झाले असावे याची कल्पना होते. प्रथमत: नीस हा शब्द ग्रनाइटपासून झालेल्या खडकांनाच विशेषत: लावीत असत. परंतु आतां नीस शब्द अधिक व्यापक अर्थानें वापरतात म्हणून नीस या शब्दाखालीं निरनिराळ्या प्रकारचे खडक येतात. नीस खडकांत हॉर्नब्बेंड, टूरमलीन, गार्विट, एपिडोट, अ‍ॅपटाइट वगैरे पुष्कळ प्रकारचीं दुय्यम द्रव्यें सांपडतात. मूळ अग्निजन्य खडकापासून नीस खडक झाल्याचीं उदाहरणें पुष्कळ आहेत. परंतु नीस खडक नेहमींच अग्निजन्य खडकापासून होतो असें नाहीं. जलजन्य खडकापासून नीस झाल्याचीं सुद्धां उदाहरणें आहेत. कित्येक वेळां नीस, क्वार्टझाइट चुन्याचे खडक यांचे आळीपाळीनें एकावर एक थर सांपडतात, त्याचप्रमाणें कांग्लामोरेटचे थरहि सांपडतात त्यावरून त्या ठिकाणचा नीस मूळ जलजन्य खडकापासून झाला असण्याचा संभव आहे. खडक कोणत्याहि मूळ खडकापासून होवो व तो कशाहि प्रकारानें होवो शेवटीं त्यांतील कण चपटे होऊन तो अर्धवट थरमय असला म्हणजे त्याला नीस ही संज्ञा लावतां येईल.

शिस्ट— शिस्ट खडक म्हणजे काय, ते कसे होतात, व ते कसे असतात याबद्दलची माहिती वर दिलीच आहे. त्यावरून असें स्पष्ट कळून येईल कीं, शिस्ट म्हणजे नीसच्या पुढची पायरी आहे. नीस अधिक दाबला गेल्यास त्यापासून शिस्ट होतो. शिस्टमधील खनिज द्रव्यें इतकीं दाबलीं गेलेलीं असतात कीं तीं अगदीं चपटीं होतात. त्यांचे थरहि अगदीं पातळ असून लवकर सुटे होतात. कांहीं शिस्ट खडकांचें वर्णन खालीं दिलें आहे. त्यावरून असें दिसून येईल कीं, शिस्ट खडकांत जें मुख्य व महत्वाचें खनिज द्रव्य सांपडतें त्यावरून शिस्ट खडकांना निरनिराळीं नांवें दिलीं आहेत. तीं:- (१) ग्रफाइट शिस्ट:- पूर्वीचे कार्बोनॅशियस शेल दाबले जाऊन त्यांपासून ग्रफाइट शिस्ट तयार होतात. यांमध्यें दुसरीं खनिज द्रव्यें असतात. परंतु काळे ग्रफाइटचे पट्टे किंवा थर त्यांत बरेच असतात म्हणून त्यांना ग्रफाइट शिस्ट म्हणतात. (२) ऑगाइट शिस्ट:- हे हिरवट रंगाचे खपल्या निघणारे खडक असतात. त्यांमध्यें लहानमोठे ऑगाइट द्रव्याचे कण असतात. ऑगाइटशिवाय कित्येक वेळां या खडकांत क्वार्टस, फल्स्पार, मॅग्नेटाइट किंवा क्लोराइट वगैरे द्रव्यें थोड्याफार प्रमाणांत सांपडतात. (३) हार्नब्लेंड शिस्ट:-  हा काळ्या रंगाचा खडक असतो. यांतील मुख्य द्रव्य हार्नब्लेंड असतें. परंतु त्याशिवाय इतर नेहमीं सापडणारीं द्रव्यें सांपडतात. (४) क्लोराइट शिस्ट:- काळसर हिरव्या रंगाचा खडक असतो. तो मऊ व ठिसूळ असून हाताला थोडासा गुळगुळीत लागतो. (५) टाल्क शिस्ट:- हा पांढरा, पिंवळट किंवा थोडासा हिरवट रंगाचा खडक असतो. तो फार मऊ, ठिसूळ असून हाताला गुळगुळीत लागतो. (६) मायका शिस्ट:- मायकाचे पातळ थर एके ठिकाणी या खडकांत सांपडतात. यांत इतर द्रव्यें असल्यास फारच थोड्या प्रमाणांत असतात. खडकांचा रंग पांढुरका, पिंवळट, काळसर किंवा तांबूस असतो. कित्येक शिस्ट खडकाला दोन किंवा अधिक खनिज द्रव्यें प्रामुख्यानें सांपडतात. तेव्हां खडकाला नांव देतांना या द्रव्याचीं नावें त्यांत घालतात. उदाहरणार्थ एखाद्या शिस्टामध्यें मायका व क्वार्टस् अशीं दोन्हीं नांवें असल्यास त्याला मायकेशियस क्वार्टस् शिस्ट म्हणतात. याप्रमाणें जोडनांवांचे शिस्ट पुष्कळ असतात.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .